रेल्वे पोलीसांची स्वागतार्ह मोहीम

विकास's picture
विकास in काथ्याकूट
25 Jun 2009 - 6:51 am
गाभा: 

मुंबईत लोकलने कायम प्रवास करणार्‍यांपैकी बहुतांशी लोकांनी कधी ना कधी कुठल्यान कुठल्यास्थानकावर एका फलाटावरून दुसर्‍या फलाटावर जाण्यासाठी जिन्याऐवजी रुळाचा उपयोग केला आहे असे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. मात्र त्यात ज्यांच्या केसाला कधी असल्या निष्काळजी वागणुकीने फट्का बसला नाही ते आपण सगळे सुदैवी असलो तरी अनेकजण आणि त्यांच्यापोटी त्यांचे कुटूंबिय यांना आयुष्याची शिक्षा झाली आहे ही दुर्दैवी वस्तुस्थितीपण आहे.

आत्ताच म.टा. मधे एक बातमी वाचताना लक्षात आले की आता पश्चिम आणि मध्य रेल्वे पोलीस असे क्रॉसिंग करणार्‍यांना तुरूंगात टाकू लागले आहेत आणि त्यांच्याकडून तसेच तरूण विद्यार्थी असल्यास त्यांच्या आईवडीलांकडून लेखी प्रतिज्ञा लिहून घेऊ लागले आहेत की परत असे करणार नाहीत.

काहि काळापुर्वी त्यांनी गांधीगिरी करण्याच्या नादात अशा रुळ ओलांडून येणार्‍या प्रवाशांचे स्वागत करून त्यांना गुलाबाच्या फुलाची "लालू"च देऊन नीट वागायला सांगितले. पण मग लक्षात आले की असली "ममता" काही उपयोगी नाही आणि मग हा बडगा दाखवू लागले आहेत. ;)

कधी काळी असली चूक केली असली तरी आता त्यातील गंभिर परीणाम काय असू शकतात हे कळू शकत असल्याने या मोहीमेबद्दल रेल्वेपोलीसांचे स्वागतच करावेसे वाटत आहे.

प्रतिक्रिया

सुनील's picture

25 Jun 2009 - 7:12 am | सुनील

मोठ्या रकमेच्या दंडापेक्षा अल्पकाळाकरीता तुरुंगवास, ही शिक्षा अधिक परिणामकारक ठरावी!!!

मद्यपान करून वाहन चालविणार्‍यांवरदेखिल अशाच प्रकारच्या शिक्षेचा बडगा उचलला गेला होता, हे आठवले.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

25 Jun 2009 - 7:18 am | सहज

चांगले आहे.

>मोठ्या रकमेच्या दंडापेक्षा अल्पकाळाकरीता तुरुंगवास
दोन्ही आधीक चांगले नाही का?
मोठ्या रकमेचा दंड + अल्पकाळाकरीता तुरुंगवास

नितिन थत्ते's picture

25 Jun 2009 - 8:08 am | नितिन थत्ते

एखादी गोष्ट करावी लागू नये अशी व्यवस्था केल्यानंतरही ती गोष्ट केली जात असेल तर शिक्षा करणे समर्थनीय.
परंतु ती न करता शिक्षा करणे असमर्थनीय.
ठाणे स्थानकावर ६ प्लॅटफॉर्म होते तेव्हाही पुलांवर प्रचंद गर्दी होत असे. गेल्या काही वर्षांत १० प्लॅटफॉर्म झाले, वाशी नेरूळ कडे जाणार्‍या गाड्या सुरू झाल्या. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना ठाण्याला नव्याने थांबे देण्यात आले. को़कणात जाणार्‍या गाड्या सुरू झाल्या पण पुलांची संख्या जेवढी १९८० मध्ये होती तेवढीच आहे. तेव्हा पुलांवर आणि त्याही पेक्षा पुलांवरून प्लॅटफॉर्मवर उतरणार्‍या जिन्यांवर जी मरणप्राय स्थिती असते ती 'अनुभवली' तर या दंड करण्याचे समर्थन केले जाऊ शकणार नाही.

तसेही ठाण्याला प्लॅटफॉर्मच्या टोकाकडून रूळ ओलांडण्याची शक्यता दूरपर्यंत फेन्सिंग घालून बंद केलेली आहे. पुलावरूनच मरत मरत जाण्यावाचून पर्याय नाही.
(पूर्वी एकदा गाडीच्या दरवाजात उभे राहून प्रवास केल्याबद्दलही दंड करण्याची घटना घडली होती. सुदैवाने ती पुढे घडली नाही).
खराटा
(रंग माझा वेगळा)

मराठी_माणूस's picture

25 Jun 2009 - 9:07 am | मराठी_माणूस

सहमत.
हा वरवरचा उपाय आहे मुळ प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे.

महेश हतोळकर's picture

25 Jun 2009 - 9:12 am | महेश हतोळकर

आई जेवू घालीना, बाप भीक मागु देईना!

सुनील's picture

25 Jun 2009 - 9:43 am | सुनील

हा ही मुद्दा विचार करण्यासारखा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नितिन थत्ते's picture

25 Jun 2009 - 9:22 am | नितिन थत्ते

या विषयातील आणखी वाईट भाग म्हणजे असे खटले ज्या न्यायालयांत चालतात तेथे आरोपीने गुन्हा मान्य केला नाही आणि तोंड उघडले तर दंडाची रक्कम वाढते असे म्हणतात.
(वरील माहिती ऐकीव आहे. प्रत्यक्ष अनुभव नाही)

म्हणजे खरेतर आरोपीला आपली बाजू मांडण्याची संधी न देताच शिक्षा ठोठावली जाते. (कसाबला मात्र वकील मिळाला नाही तर किती भयंकर अन्याय होईल याची चर्चा होते).

खराटा
(रंग माझा वेगळा)

सुनील's picture

25 Jun 2009 - 9:42 am | सुनील

या विषयातील आणखी वाईट भाग म्हणजे असे खटले ज्या न्यायालयांत चालतात तेथे आरोपीने गुन्हा मान्य केला नाही आणि तोंड उघडले तर दंडाची रक्कम वाढते असे म्हणतात.
(वरील माहिती ऐकीव आहे. प्रत्यक्ष अनुभव नाही)

खरे आहे. त्याला "अडाणी कोर्ट" असे म्हणतात. मुलुंडला असे एक कोर्ट होते (अद्याप आहे?). मी स्वतः अनुभवले आहे (प्रेक्षक म्हणून - उगाच गैरसमज नको!).

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चिरोटा's picture

25 Jun 2009 - 10:18 am | चिरोटा

पण पुलांची संख्या जेवढी १९८० मध्ये होती तेवढीच आहे

आणखी जादा पूल बांधण्यासाठी तिकडे जागा आहे का? महानगर पालिकेच्या/राज्य्/केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लोकसंख्या काही ठराविक परिसरात बेफाम वाढते.ठाणे शहराचेही तेच झाले असावे.रेल्वेकडून वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा करणे योग्य नाही असे मला वाटते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

नितिन थत्ते's picture

25 Jun 2009 - 11:40 am | नितिन थत्ते

वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा कोण करतंय.
फक्त त्यामुळे लोक रूळ ओलांडत असतील तर दंड करू नये एवढेच म्हणणे.
(मी रोज गाडीने प्रवास करत नाही पण ठाण्याला स्टेशनात शिरल्या पासून प्लॅटफॉर्मवर पोचायला जितका वेळ लागतो तितक्या वेळात तीन गाड्या येऊन निघून जातात. यावर असेही म्हणता येईल की मग लोकांनी तीन गाड्यांएवढा वेळ आधी निघावे. )
खराटा
(रंग माझा वेगळा)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jun 2009 - 12:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खराटाशेट, यावर माझा उपाय म्हणजे ठाण्याला पूर्वेच्या बाजूला जायचं. अर्थात तिकीट काढायला कमी वेळ लागतो असं नाही, पण गर्दी थोडी कमी असते.

सॅटीस, भरमसाठ लोकसंख्या वाढ, शिवाय ट्रेन्स, प्लॅटफॉर्म यांच्याही वाढीमुळे ठाणे स्टेशन आणि आजूबाजूचा भाग, रोजच्यारोज कुंभमेळ्यासारखा दिसतो.

नितिन थत्ते's picture

25 Jun 2009 - 12:26 pm | नितिन थत्ते

मी पुलावर चढू लागल्यापासून पुन्हा प्लॅटफॉर्मवर उतरेपर्यंतचा (किंवा उलट) वेळ म्हणतोय.

खराटा
(रंग माझा वेगळा)

पिवळा डांबिस's picture

26 Jun 2009 - 3:18 am | पिवळा डांबिस

रेल्वे पोलिसांनी हे असले उद्योग करण्यापेक्षा माणसांनी तुडुंब भरलेले फलाट आणि पूल जलद ड्रेन कसे होतील, फलाट/ पुलावर जागा अडवून बसलेले विक्रेते/ भिकारी तिथून नाहिसे कसे होतील, 'मदत' या पाटीखाली एकतरी पोलिस कायम कसा उपस्थित असेल, याची चिंता करणं जास्त जरूरीचं आहे....

सुहास's picture

26 Jun 2009 - 12:52 am | सुहास

एक गोष्ट ऐकून आनंद वाटला की या निमित्ताने का होईना, रेल्वे पोलिस फलाटावर जास्त वेळ असतील जेणेकरून लोकांना त्यांची मदतच होईल.. ;)

बाकी खराटा साहेबांशी सहमत.

अवांतरः पश्चिम रेल्वे वर फिरताना एक गोष्ट लक्षात येते की येथे कुठेही अपंगांसाठी/वयस्कर लोकांसाठी ramp ची सोय नाहीय.. ईथल्या फलाटांची ऊंची फूटबोर्डाच्या ऊंचीपेक्षा इतकी कमी आहे की एखादा ३०-३५ वयाचा माणूस चूकून गाडीतून पडला की गाडीखाली जातोच.. असे अपघात टाळण्यासाठी रेल्वे काय करतेय?

--- सुहास

रेल्वे पोलिसांचा असाही एक पराक्रम.....

http://www.mumbaimirror.com/article/2/200906262009062602043783781508705/...