ज्ञानाची व्याख्या [उपधागा]

अजय भागवत's picture
अजय भागवत in काथ्याकूट
21 Jun 2009 - 9:23 am
गाभा: 

हा उपधागा श्री. विकास ह्याच्या ह्या प्रतिक्रियेनुसार निर्माण केला आहे.

प्रश्नः ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाची व्याख्या कशी करता येईल?

प्रतिक्रिया

Nile's picture

21 Jun 2009 - 9:31 am | Nile

जे आपल्याकडे (म्हणजे इथे माझ्या कडे) नाही आहे ते.;)
(विनोद करतोय, ज्ञानी लोकांचे विचार ऐकायला आवडतील इतकेच म्हणतो! ) :)

अजय भागवत's picture

21 Jun 2009 - 9:55 am | अजय भागवत

ज्ञानाची व्याख्या करणे तितकेसे सोपे नसले तरी आपल्याला प्रयत्न करता येईल व ह्यालेखाचा आशय समजण्यासाठी त्या व्याख्येचा वापर करता येईल ह्या उद्देशाने पुढील व्याख्या केली आहे .

मानव नवे ( प्राथमिक स्वरुपाचे ) ज्ञान स्पर्ष , वास , दृष्टी , चव , ध्वनी , अशा इंद्रियांनी मिळवतो . हे नवे ज्ञान त्याच्या मेंदूतील आधीच साठवलेल्या माहितीशी सांगड घालता येत असेल तर त्याची साठवण त्या आधीच्या माहितीच्या नात्याने , अनुषंगाने , बरोबरीने करतो .

प्राथमिक स्वरुपात साठवलेल्या ज्ञानाचा क्रमाक्रमाने विकास होतो . व ते अधिकचे , वाढीव ज्ञान आधिच्या ज्ञानाच्या बरोबरीने साठवले जाते . ह्या अशा ज्ञानाचे विश्लेषण केले असता , त्यात आपल्याला वेगवेगळे परिमाणं ( मापं / प्रकार ) दिसतात - हे ज्ञानाचे स्वरुप एखादी उतरंड नव्हे . एकाच वेळी आपण अनेक स्वरुपाचे ( परिमाणाचे ) ज्ञान उघड करु शकतो .

१ . तथ्य ( फॅक्ट ), उदा . एव्हरेस्टची उंची ८८६८ मी . आहे

२ . संकल्पना ( कॉन्सेप्ट ), उदा . व्याख्या , वेगवेगळ्या कल्पनातील साम्ये अथवा फरक , एखादा नियमही ( सिद्धांत ) कल्पना असतो . ह्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे , मिटींगला " शोभतील " असे कपडे घालावेत आणि ही कल्पना कालानुसार , स्थळानुसार बदलते . ( एव्हरेस्टची उंची अशी संकल्पनेने बदलत नाही , म्हणून ते तथ्य !)

३ . पद्धत ( प्रोसीजर ) उदा . गणित सोडवण्याची , गाडी सुरु करण्याची . पद्धत ही अनेक पायऱ्यांनी बनते , ती पुन्हा - पुन्हा त्याच क्रमाने करता येते .

४ . संरचना ( मॉडेल ) उदा . परिक्षा कशी घ्यावी , उत्तरपत्रिका कशा तपासाव्यात . संरचना आपल्याला मार्ग दाखवते .

५ . अभिसंरचना ( मेटामॉडेल ) उदा . संरचना कधी व कशी तयार केली म्हणजे ती अडचण सोपी करु / सोडवू शकेल , संरचनेचे घटक काय असावेत हे समजणे

६ . कौशल्य उदा . मी " अशा " रितीने उत्तम चित्र काढू शकते . अशा - इतरांपेक्षा वेगळ्या व अधिक परिणामकारकतेने - ते कसे हे माहित असणे

७ . निवडकौशल्य ( व त्यावर असलेला आत्मविश्वास ) उदा . मी आजपर्यंत तोरण्यावर गेलो नाहीए पण मला गडावर जाण्याचे अनेक मार्ग ऐकिव अथवा पुर्वानुभवाने माहिती आहेत , मी ह्याच वाटेचा वापर करेन

८ . विचारसंरचना ( ह्याला अनुभव असेही म्हणता येईल पण ते तितकेसे सुसंगत वाटत नाही ) ( मेटाकॉग्निशन ) उदा . मी ह्यावर कसा आणि काय विचार केला पाहिजे ?- की जेणेकरुन समोरील प्रश्नाची उकल होईल ? तोरणावर जायचे मला १० मार्ग माहिती आहेत , त्यातील योग्य तो कसा निवडावा ?

वरील ज्ञानपरिमाणं एखादी व्यक्ति कशी वापरते ते पाहूया . एक कॅप्टन हा विचार करतो आहे असे समजा -

" शत्रूचे ६८ सैनिक त्या टेकडीमागे आधुनिक शस्त्रांनी सज्ज आहेत . माझ्याकडे प्रशिक्षित ३४ सैनिक आहेत . रात्रीच्या वेळी सैन्याची लढण्याची क्षमता व तयारी बऱ्याचदा कमी असते . मी सगळ्यांना संध्याकाळी ७ वाजता बोलावून घेऊन सर्व - सज्जतेची चाचणी घेईन व कमतरता भरुन काढेन . वरुन होकार मिळताच आम्ही तिन तुकड्यात विभागून चाल करु . नेहमीप्रमाणे दर एक तासाने मी रेडिओने मुख्यालयाला खबर देत राहीन . अशा सज्ज आणि तुलनात्मक संख्येने जास्त असलेल्या शत्रूवर घाव कसा घालायचा हे उजळणी करत असतांनाच असे वाटतेय की , प्रत्येक तुकडीच्या लिडरला विचारावे की , ज्ञात मार्गांशिवाय आणखी काही नव्या कल्पना त्यांच्याकडे आहेत का . मलाही काही सुचतेय तेही त्यांच्यासमोर मांडावे असे वाटतेय ; वर्षीपुर्वी असेच काहीसे करुन आम्ही शत्रूला चकीत केले होते . चाल आधी कोणी करायची , कोणत्या शस्त्रांचा वापर काळजीपुर्वक करायचा हे ठरवून घेणेही आवश्यक आहे . ते कसे ठरवावे हे मला अंधुकसे दिसतेय पण खात्री वाटत नाहिए ."

वरील आठही ज्ञानपरिमाणं तुम्हाला ह्या विचारात स्पष्टपणे दिसतील . हे ज्ञानाचे स्वरुप लहान मुलातही दिसते फक्त त्यांच्या स्वरुपाची कक्षा वयस्कर व्यक्तिच्या कक्षेच्या तुलनेने बरीच लहान असते . परंतू ते स्वरुप आकारायला सुरुवात केव्हाच झालेली असते . ( काय केले म्हणजे बाबा मला नवे खेळणे आणून देतील ? मी मोठ्यापणी पायलट होणार .. वगैरे ).

ज्ञान कशाला म्हणता येईल ह्याची कल्पना आल्यावर आपण पुढील मुद्द्याकडे वळू शकतो . पुढचा मुद्दा आहे तो पंचेन्द्रीयांनी प्राथमिक स्वरुपात मिळवलेल्या ज्ञानाचे परिमाण कसे वाढवायचे ह्याचा . ह्यालाच आपण " शिक्षणपद्धत " म्हणू शकतो .

अगोचर's picture

22 Jun 2009 - 9:26 am | अगोचर

---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jun 2009 - 3:08 pm | ज्ञानोबाचे पैजार

अजयजी,

आपली प्रतिक्रीया आवडाली, आपल्या विचारां बद्द्ल अनादर व्यक्त करणे हा माझ्या खालील प्रतिक्रीयेचा हेतु नाही.

माझे असे मत आहे की आपण नमुद केलेली परीमाणे ही माहीतीचे संकलन व त्या माहीतीचे विश्लेशण कसे करावे याच्या पध्द्ती आहेत. माहीती व ज्ञान यामधे फार फरक आहे. जो संगणक व माणुस यात आहे तोच.

ज्ञान हे सतत आपल्या बरोबरच असतेच. ते कोणी शिकवल्याने वाढत नाही कींवा न शिकवल्याने कमी होत नाही. कोणताही खरा गुरु आपल्या शिश्ष्याला ज्ञान देत नाही. फक्त शिश्ष्या कडे असलेल्या ज्ञानाचा त्याला साक्षात्कार करुन देतो.

ज्ञान हे असीम, अनंत आणि अविनाशी आहे. अनादी काळा पासुन ते आहे आणि अनंत काळ ते टिकणार आहे.

अर्थात माझ्या पेक्षा कीती तरी अधीकारी व्यक्ती या वर आपल्या प्रतिक्रीया देतील. माझे बाळबोध मत मी मांडायचा प्रयत्न केला.
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

अजय भागवत's picture

22 Jun 2009 - 3:42 pm | अजय भागवत

ज्ञान व माहिती ह्यातील स्तरांचा उलगडा होणे, ज्ञान व माहिती हे दोन्ही एकच की वेगळे, ह्याचा उहापोह व्हावा हाच तर मुळात ह्या धाग्याचा हेतू; त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया लाख मोलाच्या आहेत.

कृपया हा धागा पहावा.