या माध्यमांचं काहीतरी करा रे....

अ-मोल's picture
अ-मोल in काथ्याकूट
16 Jun 2009 - 12:04 pm
गाभा: 

या माध्यमांचं काहीतरी करा रे....
टीम इंडिया २०-२० मधून बाहेर पडली आणि वखवखलेल्या माध्यमांनी रीतसर धोनी आणि कंपनीच्या डोक्यावर पराभवाचं खापर फोडलं. २०-२० क्रिकेट हे बरंचसं जुगार आणि नशिबावर अवलंबून आहे. त्या दिवशी तुमच्या चाली यशस्वी झाल्या, की तुम्ही जिंकणार.
चुका करायला जवळपास शून्य जागा आणि १०० हून कोटी भारतीयांच्या अपेक्षेचे ओझे डोक्यावर घेवुन खेळणे सोपे नाही. गेली जवळपास दोन वर्षे धोनी आणि कंपनी विजयाचे मनोरे रचत आहे. तेव्हाही त्यांना नको इतके डोक्यावर घेवून नाचणारा हाच मीडिया होता.
हल्ली वर्तमानपत्रांनाही चॅनल पत्रकारितेची इंगळी डसली आहे. अतिशय उथळ विश्लेषण आणि गंभीर समालोचनापेक्षा सनसनाटी बातम्या देण्याकडे त्यांचा ओढा वाढतो आहे. वर्तमानपत्र वाचण्याचा तर हल्ली नॉशिया आलाय. अर्ध्या हळकुंडात पिवळी झालेली पोरे काहीही तारे तोडतात आणि ते छापुनही येतात.
धोनी आणि कंपनीवर टीका करताना कृपया याही गोष्टी लक्षात घ्या,
- गेली दोन वर्षे हा संघ अविश्रांत खेळत आहे.
- त्यात भर पवारांच्या गल्लाभरू आयपीएलची पडली. त्यामुळे वेळापत्रकावर आणि खेळाडुंच्या खेळावरही अधिक ताण आला.
- "आयपीएलमध्ये खेळू नका ना मग" असे सल्ले देणे सोपे आहे. शेवटी संघातली आपली जागा प्रत्येकालाच प्रिय असते. आपण त्यांच्या जागी असतो तर हेच केले असते.
- प्रत्येक वेळी आपणच जिंकायला हवं हा अटृटाहास विचित्र नाही का ?
- धोनी ब्रिगेडला दोषी ठरवून आपण एका गुणवत्तेने ठासून भरलेल्या संघाचे मनोधैर्य खच्ची करत आहोत हेही लक्षात घ्या.
- सेहवाग-धोनीतील मतभेदाच्या बातम्या नको तितक्या रंगवून माध्यमांनी काय मिळवले?
- जगात छापण्याजोगे दुसरे विषय राहिले नाहीत, की हल्लीच्या पत्रकारांची बौदिधक कुवत फक्त गल्ली-दिल्लीतले राजकारण आणि गेलाबाजार क्रिकेट याभोवती घुटमळण्याइतकीच आहे?
- या माध्यमांचं काही तरी कराच !

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

16 Jun 2009 - 12:25 pm | चिरोटा

जगात छापण्याजोगे दुसरे विषय राहिले नाहीत, की हल्लीच्या पत्रकारांची बौदिधक कुवत फक्त गल्ली-दिल्लीतले राजकारण आणि गेलाबाजार क्रिकेट याभोवती घुटमळण्याइतकीच आहे?

बर्‍याच पत्रकारांची बौदिधक कुवत सुमार आहे.'द हिंदु/स्टेट्स्मन' सारखी व्रुत्तपत्रे सोडली तर बहुतांशी व्रुत्तपत्रे सुमार दर्जाची आहेत्(इंग्रजी/मराठी तरी. बाकीच्या भाषांचे माहित नाही).ऑनलाइन ऑस्ट्रेलियन्/ब्रिटिश व्रुत्तपत्रे बघा,क्रिकेट् खेळाडुना आपल्याकडे देतात त्याच्या एक दशांशही महत्व तिकडे नसते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

नितिन थत्ते's picture

16 Jun 2009 - 12:22 pm | नितिन थत्ते

हम्म.
तरी अजून धोणी वगैरे पैसे घेऊन हरले असा नेहमीचा यशस्वी आरोप केला नाही :)

(अवांतरः २०-२० हा क्रिकेटचा खेळ नसून बॅट आणि बॉलच्या सहाय्याने केला जाणारा एक करमणुकीचा कार्यक्रम आहे असे आमचे वैयक्तिक मत असल्याने जास्त प्रतिक्रिया देत नाही)

खराटा
(रंग माझा वेगळा)

विनायक प्रभू's picture

16 Jun 2009 - 3:56 pm | विनायक प्रभू

आणि ह्या बॅट आणि बॉलच्या करमणुकीच्या कार्यकर्मात प्रत्येक वेळेला यश मिळेल असे सांगता येत नाही.

भोचक's picture

16 Jun 2009 - 12:25 pm | भोचक

हाहाहा. अगदी शंभर टक्के सहमत. काल तर जोश १८ या वेबसायटीने धोनीबाबत काय एकेक तारे तोडले होते. यंव रे यंव. जिंकत होतो तेव्हा त्याचे गुणगान चालले होते आता संख्यात्मक दृष्टीकोनातून फक्त दोन सामने गमावले तर एवढी टीका. बाकी माध्यमे संवग बनली आहेत हे नक्कीच.

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

मी तर म्हणतो कि धोनीने म्याच फिक्सींग केली आहे.
कारण west indies विरुद्द त्याने खुप मोठया मोठया चुका केल्यात ज्या चुका छोटा बाळ सुध्धा करणार नाही

विसोबा खेचर's picture

16 Jun 2009 - 4:03 pm | विसोबा खेचर

बाकी धोणीची चांगली खोड मोडली हे बरेच झाले. गेल्या टायमाच्या विजयापासून बराच माजला होता साला!

तात्या.

निखिल देशपांडे's picture

16 Jun 2009 - 6:18 pm | निखिल देशपांडे

बाकी धोणीची चांगली खोड मोडली हे बरेच झाले. गेल्या टायमाच्या विजयापासून बराच माजला होता साला!
बरे झाले....
==निखिल

टारझन's picture

16 Jun 2009 - 8:24 pm | टारझन

गेल्या टायमाच्या विजयापासून बराच माजला होता साला!

धोणी माजला असल्याची काही उदाहरणं देता येतील का हो तात्या ? असो ...

आपल्या इथं जिंकलं की डोक्यावर घेणं .. आणि हारलं की पायदळी उडवणं .. ह्या गोष्टी अगदी कॉमन आहेत ... भारत हरल्यावर मी पण थोडा वेळ पॅनिक झालो होतो .. पण त्यानंतर कोणताही न्यूज चॅनल किंवा पेपर वाचला नाही .. ह्यामुळे माझ्या भावना जास्त दिवस एवढ्या टोकाच्या राहिल्या नाहीत ..

जाउन द्या !! ९ महिन्यांनी पुढचा वर्ल्डकप आहे ... तिकडे विजयाची आशा करू !!

(ढोणीपंखा) टारेंद्रसिंग टोणी

मानस's picture

17 Jun 2009 - 12:28 am | मानस

धोनी माजल्याचे आठवत नाही. खरं म्हणजे तो सगळ्यात शांत, संयमी तसेच वेळप्रसंगी अतिशय कणखर कॅप्टन आहे.

२०-२० चा फॉरमॅटच असा आहे की त्यात काहीही होऊ शकतं. बलाढ्य समजल्याजाणार्‍या ऑस्ट्रेलियाचे काय झाले?

त्यामुळे, भारताची कामगिरी काही वाईट नव्हती. आजचा साऊथ्-आफ्रिके बरोबरचा सामना आपण जवळ जवळ जिंकल्यातच जमा आहोत.

धोनीला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा ......

प्राजु's picture

17 Jun 2009 - 12:57 am | प्राजु

हेच म्हणते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

16 Jun 2009 - 7:30 pm | संदीप चित्रे

त्यांना रोज नवीन मसाला पाहिजे असतो. दुर्दैवाने आता त्यात वृत्तपत्रांचीही भर पडतीय. झी टीव्हीवरच्या बहुतांशी बातम्या तर दिल्ली आणि आजूबाजूचा प्रदेश इतक्यापुरत्याच मर्यादित असतात. मुळात 'बातमी' कुठली आणि 'अफवा पसरवणं' कुठलं ह्याचं तारतम्य उरलं नाहीये असं वाटतं.

आता क्रिकेटबद्दल -- व्यक्तिशः क्रिकेटवेडा म्हणून आपण हरल्यावर मलाही वाईट वाटलं पण मिडीया ज्याप्रमाणे वागतोय ते विचित्र आहे. मी खात्रीपूर्वक सांगतो उद्या ह्याच संघाने अजून दोन्-तीन आंतरराष्ट्रीय सामने जिंकले की सगळे पुन्हा उदो उदो करायला लागतील. जोपर्यंत क्रिकेटशिवाय इतर खेळ लोकप्रिय होत नाहीत तोपर्यंत मिडीयाचा फोकस पूर्णपणे क्रिकेटवर (किंबहुना क्रिकेटबद्दल पण क्रिकेटेतर विषयांवर -- उदा. धोनी आणि सेहवाग) राहणार !

शिशिर's picture

16 Jun 2009 - 8:02 pm | शिशिर

खरे तर कुठलच माध्यम खेळाशी प्रामाणिक नाही. खेळात एक हरणार हे निश्चितच आहे. प्रत्येक वेळी आपणच विजेते होणार हे कसे शक्य आहे.
ह्या माध्यमांना फक्त त्यांचा जाहिराती आणि टी.आर.पी. दिसत. त्या साठी खेळ चालू असो वा नसो, फाल्तू समीक्षक बसवून नसत्या चर्चा घडवतात. खेळ चालू नसतांना खेळाडू कुठे गेले, कुठे जेवले, कुठे हिंड्ले असल्या गोष्टी चघळत असतात. अतिशय सुमार दर्ज्या चे रिपोर्टिंग करताना आव मात्र एखद्या उत्तम पत्रकाराचा असतो.
शेवटी जे खपत तेच दाखविणार. ते थोडच खेळाच्या प्रचार, प्रसारासाठी समर्पित आहेत. बाकी असे रिपोर्टिंग बघणार्‍यांचा हातात टी.व्ही. बंद करणे हाच पर्याय असतो.

सूहास's picture

16 Jun 2009 - 8:57 pm | सूहास (not verified)

माध्यम॑, ज्याला माझ्यासारखी साधी माणस॑ "ईलेकट्रॉनिक मिडीया" म्हणतात. आजकाल शेफारत चालली आहे..यावर वेळीच ब॑ध यायला हवा..मी पहातोय ते २६/११ पासुन्,तिकडे लोक मरतायत आणी या॑चे ध॑दे चाललेत टी.आर.पी वाढवायचे. मिडीया मुळेच मुख्यम॑त्र्याचे, ऊपमुख्यम॑त्र्याचे बारा वाजले.गृहम॑त्र्या॑च राहु द्या. त्यादिवशी बहुधा आय्.बी.एन.७ वर बघत होतो.रहस्यमय झील का काही तरी रहस्य काय होत तेच विसरलो..काही तरी असच दिवसातुन एकदा तरी दाखवतात.एक दिवस नदीतला भोवरा दाखवत होते.क्या ये सच है..जमीन पर पाणी क्यो॑ नही रुक रहा है..आणी अस काय काय्...ईलेक्शन च्या वेळेला तर विचारू नका...कोण कुठे जि॑कलय हे समजायला खाली लिहीलेल वाचाव लागायच्..आणी निवेदक मात्र सरकार कस येणार आणी आकडेवारी कशी असेल ह्याच्यात व्यस्त.बाबा सरळ निकाल सा॑ग आणी ब्रेक घे की !!!

घटनाकारा॑नी "पत्रकारीता " हा लोकशाहीचा चौथा स्त॑भ मानला होता..तोच बाकी च्या स्त॑भाना हादरा देण्याच काम करतोय.

सुहास

प्राजु's picture

17 Jun 2009 - 12:59 am | प्राजु

जगात छापण्याजोगे दुसरे विषय राहिले नाहीत, की हल्लीच्या पत्रकारांची बौदिधक कुवत फक्त गल्ली-दिल्लीतले राजकारण आणि गेलाबाजार क्रिकेट याभोवती घुटमळण्याइतकीच आहे?

हो असेच झाले आहे हे खरे आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/