पुलंच्या लग्नाची गोष्ट

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
12 Jun 2009 - 12:49 am
गाभा: 

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4646148.cms

पुलंच्या लग्नाची गोष्ट. एक सुसंस्कृत, प्रतिभावंत जोडपे किती साधेपणाने विवाहबद्ध झाले त्याचे वर्णन वाचा. सुनीताबाईंचा साधेपणा कधी कधे अतिरेकी वाटेल इतका असायचा. मराठी संस्कृतीला इतके काही देऊन गेलेले हे लोक इतके सरळ साधे होते हे वाचून त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित होतो.

कुठे हे लोक आणि कुठे राजेनवाबांना लाजवतील असे भपकेदार लग्नसमारंभ करणारे आपले थोर थोर "लोकसेवक" नेते!

प्रतिक्रिया

Nile's picture

12 Jun 2009 - 1:19 am | Nile

वा! नक्कीच आदर्श! :)

दरदिवशीच्या दुपारच्या चहाबरोबरच अगदी साधेपणाने पुलंचे लग्न झाले

यामुळे आमचे चहावरील प्रेम दुणावले आहे! ;)

धन्यवाद या लिंक साठी. :)

रेवती's picture

12 Jun 2009 - 6:54 am | रेवती

बातमी वाचून गम्मत वाटली.

रेवती

विसोबा खेचर's picture

12 Jun 2009 - 7:14 am | विसोबा खेचर

मराठी संस्कृतीला इतके काही देऊन गेलेले हे लोक इतके सरळ साधे होते हे वाचून त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित होतो.

सहमत आहे!

जी माणसं साधी असतात ती किती मोठी असतात आणि खरोखरच जी माणसं खूप मोठी असतात ती प्रत्यक्षात किती साधी असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे जोडपं!

आपला,
(भाईकाकांचा शिष्य आणि भक्त) तात्या.

धमाल मुलगा's picture

12 Jun 2009 - 2:43 pm | धमाल मुलगा

जी माणसं साधी असतात ती किती मोठी असतात आणि खरोखरच जी माणसं खूप मोठी असतात ती प्रत्यक्षात किती साधी असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे जोडपं!

खरंच, काय वाक्य आहे!!
बाकी, (रावसाहेबांच्या भाषेत म्हणायचं तर,) पी.यल. म्हणजे क्काय वो? आमची काय लायकी का क्काय त्यांच्याबद्दल बोलायची?

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

ऋषिकेश's picture

12 Jun 2009 - 1:47 pm | ऋषिकेश

पु.लं कडून इतकं काहि शिकण्यासारखं आहे की जन्म कमी पडावा..
असो...ह्या छान दुव्याबद्दल हुप्प्या यांना दुवा :)

आणि पुलंचा स्मृतीदिन?.. ते तर अजरामर आहेत

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

प्राजु's picture

12 Jun 2009 - 11:58 pm | प्राजु

_____/\_____
दंडवत!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनुप कोहळे's picture

13 Jun 2009 - 2:51 am | अनुप कोहळे

तर आश्या तह्रेने पु. लं. च आठ आण्यात लग्न लागल तर.... :?