अंजीर मोदक (पेढा)

दिपाली पाटिल's picture
दिपाली पाटिल in पाककृती
9 Jun 2009 - 12:32 pm

पेढा

साहित्यः

१ कप दुध पावडर
२ टे. स्पु . तुप
वेलची पावडर
१/२ कप अंजीर पेस्ट (५ अंजीर १/२ कप दुधात भिजवुन बारिक करावेत)
१/२ डबा कंडेन्स्ड दुध (याच्या गोडपणा मुळे साखर लागत नाही सहसा..)

कृती:
वरिल सगळं साहित्य (वेलची पावडर सोडुन) एका पॅन मध्ये एकत्र करुन घ्या.
कमी उष्ण्ते वर घट्ट होईपर्यंत ढवळत रहा.
वेलची पुड टाकुन हलवा आणि हव्या त्या आकारात पेढे बनवा. वरुन बदाम काप टाकुन सजवू शकता...

टीपः
अंजीर न टाकता पेढ्या चा बेस तयार होईल, त्यात दुसरा फ्लेवर टाकुन ही पेढे बनवता येतील. जसं केशर पेढा...

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

9 Jun 2009 - 12:38 pm | पर्नल नेने मराठे

ह्याला आपण अन्जिर मोदक म्हणुयात का :-?
चुचु

शार्दुल's picture

9 Jun 2009 - 12:39 pm | शार्दुल

पाकक्रुती एकदम सोपी आणि साधी आहे,,, अगदी जमेल अशी,,, अग पण दुध पावडर पाण्यात मिक्स नाही ना करायची? कोरडीच वापरायची?

नेहा

विसोबा खेचर's picture

9 Jun 2009 - 12:46 pm | विसोबा खेचर

शब्दच संपले..!

दिपाली, तुझं कौतुक तरी किती करू?! :)

मोदक ही आमची अत्यंत मनभावन पाकृ! जियो...!

तात्या.

अवांतर - अगं पण शीर्षक तर 'पेढा' असं दिलं आहेस. पान उघडून पाहतो तर बाप्पाच्या कृपेने त्याचे मोदक तयार झालेले! :)

असो, लालबागच्या राजाचा विजय असो..

आपला,
(कट्टर गणेशभक्त) तात्या.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jun 2009 - 12:46 pm | परिकथेतील राजकुमार

हे हे हे २ पेढे ताबडतोब इमेल करा ;)
काय जबर्‍या दिसत आहेत, पटकन उचलुन एक खावा असे वाटत आहे.

परा हलवाई
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

दिपाली पाटिल's picture

9 Jun 2009 - 1:10 pm | दिपाली पाटिल

२ च कशाला, चांगले १०-१२ पेढे ई- मेल करते. :)

दिपाली :)

अवलिया's picture

9 Jun 2009 - 2:57 pm | अवलिया

मला पण इमेल करा ...... :)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

दिपाली पाटिल's picture

9 Jun 2009 - 12:50 pm | दिपाली पाटिल

धन्यवाद तात्या,
मी याला मोदक च शिर्षक देते.
चुचुताई यांना अंजीर मोदक पण म्हणता येईल.
शार्दुल , दुधाची पावडर पाण्यात नाही टाकायची, गरम झाल्यावर कंडेन्स्ड मिल्क आणि अंजीर पेस्ट , तुप विरघळायला लागेल.
दिपाली :)

पर्नल नेने मराठे's picture

9 Jun 2009 - 12:58 pm | पर्नल नेने मराठे

थन्क्स दिपाली ;)
चुचु

स्वाती दिनेश's picture

9 Jun 2009 - 12:56 pm | स्वाती दिनेश

अंजीर मोदक फारच सुरेख दिसताहेत ग दिपाली,
अंजिर न घातल्यास नुसते थोडे केशराच्या काड्या घालून केशरी पेढाही करता येईल ना? वरुन पिस्त्याचे काप लावायचे..:)
स्वाती

दिपाली पाटिल's picture

9 Jun 2009 - 1:02 pm | दिपाली पाटिल

स्वाती ताई , केशर पेढ्या चा फोटो डकवलाय तुमच्या साठी.. :)

दिपाली :)

स्वाती दिनेश's picture

9 Jun 2009 - 3:05 pm | स्वाती दिनेश

मस्त ग, खव्याशिवाय पेढा करता येतो हा शोध तू लावल्याबद्दल असंख्य धन्यवाद, आता करते नक्की..
स्वाती

सहज's picture

9 Jun 2009 - 1:07 pm | सहज

दिपालीताई जय हो!!

पाकृ मस्त व फोटो तर काही बोलायलाच नको!!!

अप्रतिम!

यशोधरा's picture

9 Jun 2009 - 1:31 pm | यशोधरा

दिपाली, एकदम मस्त गं! :)
त्या पर्‍याला २ पेढे दे आणि उरलेलं पेढ्यांच आणि मोदकांच ताट पेढ्यां मोदकासकट मला पाठव पाहू :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2009 - 1:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोदकाचा फोटो लै भारी..!

शार्दुल's picture

9 Jun 2009 - 1:38 pm | शार्दुल

नेहा

श्रीयुत संतोष जोशी's picture

9 Jun 2009 - 2:23 pm | श्रीयुत संतोष जोशी

फार झकास दिसताहेत हे अंजीर मोदक आणि पाकृ सुद्धा किती सोपी.
धन्यवाद दिपाली.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

जागु's picture

9 Jun 2009 - 2:23 pm | जागु

वा खुप छान आणि सोपी रेसिपी आहे.

मराठमोळा's picture

9 Jun 2009 - 3:02 pm | मराठमोळा

फोटो एकदम जबरदस्त..

पाकृ आवडली.. पुढच्या चतुर्थीला नक्कीच होणार घरी अंजीर मोदक.. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

विसोबा खेचर's picture

10 Jun 2009 - 12:11 am | विसोबा खेचर

पुढच्या चतुर्थीला नक्कीच होणार घरी अंजीर मोदक..

मी पण येणार! :)

तात्या.

रेवती's picture

9 Jun 2009 - 6:40 pm | रेवती

काय भारी दिसतायत सगळे फोटू!
दिपाली तू म्हणजे एकदम बाजी मारलीस की!
स्वातीताईच्या सुचवण्यावरून तू पेढ्यांचा जे फोटू चढवलायस ना....
तो तर ग्रेटच आहे. तू भेट मला एकदा! :)
ह्या पाकृबद्दल तुला बक्षीस द्यावसं वाटतयं.

रेवती

चकली's picture

9 Jun 2009 - 6:55 pm | चकली

दिपाली !! अगं कसले मस्त दिसताहेत मोदक .. आणि पेढे सुद्धा झक्कास !!

चकली
http://chakali.blogspot.com

मदनबाण's picture

9 Jun 2009 - 7:19 pm | मदनबाण

मोदक आणि तोही अंजिरवाला....अहाहाहाअ...

मदनबाण.....

Love is a game that two can play and both win.
Eva Gabor

संदीप चित्रे's picture

9 Jun 2009 - 7:28 pm | संदीप चित्रे

दीपाली,
आधीच मोदक आवडता प्रकार आहे. त्यात खव्याचे मोदक / पेढे म्हणजे तर एकदम आवडते. फोटो पाहूनच खलासलो...
लवकर पाठव हे अंजीर मोदक :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

घाटावरचे भट's picture

9 Jun 2009 - 8:09 pm | घाटावरचे भट

दिपालीतै, मोदक मस्तच. आणि पहिला फोटुसुद्धा उत्तम आलाय...

शाल्मली's picture

9 Jun 2009 - 9:26 pm | शाल्मली

काय मस्त दिसताहेत मोदक आणि पेढे!
खव्याशिवायही पेढे होतात हे वाटलंच नव्हतं!
ह्या उत्तम पाकृसाठी धन्यवाद.

--शाल्मली.

समिधा's picture

9 Jun 2009 - 11:03 pm | समिधा

मलाही खव्याशिवायही पेढे होतात हे वाटलंच नव्हतं!
खुपच सुंदर दिसतायत..
धन्यवाद.....:)

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

पण कसलं काय! एकदा नव्हे सकाळपासून चारदा चक्कर झाली इथे!
दीपालीताई, कसला अल्टी फोटू आलाय!! शिस्तीत ताटली घेऊन बसावे आणि मांडा ठोकून एकेक करुन सगळे मोदक अन पेढे फस्त करावेत असं वाटतंय! =P~

(गोडघाशा)चतुरंग

प्राजु's picture

10 Jun 2009 - 12:42 am | प्राजु

मस्त केले आहेस गं!
मस्तच फोटो. एकदम खास.
मीही पेढे करून बघेन.
आवांतर : तुझ्याकडे तो मोदकाचा साचा आहे का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दिपाली पाटिल's picture

10 Jun 2009 - 2:13 am | दिपाली पाटिल

धन्यवाद प्राजु, मोदक साचा मी भारतातुन आणला होता. छान होतात मोदक त्याने.

दिपाली :)

अंजली's picture

10 Jun 2009 - 5:34 am | अंजली

दिपाली,

छानच आले आहेत फोटो. साच्याचा फोटो टाकशील का?

क्रान्ति's picture

10 Jun 2009 - 8:36 am | क्रान्ति

उद्या गणपतीला नैवेद्य! मस्तच फोटो आणि पाकृ.

:) क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

मुक्ता's picture

11 Jun 2009 - 5:47 am | मुक्ता

रिकोटा चीज आणि कंडेंस मिल्क सारख्या प्रमाणात घेतल्यास अगदी खव्याचा
मोदकासारखे मोदक होतात. त्यात बदाम, पिस्ते, काजु, इ.(पेस्ट) घालून आपल्या
आवडी/स्वादा प्रमाणे करता येतात.

बाकी तुझी रेसीपी आवडली, नक्की करुन पाहीन.

../मुक्ता

दिपाली पाटिल's picture

11 Jun 2009 - 5:51 am | दिपाली पाटिल

धन्यवाद मुक्ता..मी तुझी पाकृ करुन बघेन आणि कळवेन.

दिपाली :)

लवंगी's picture

6 Jul 2009 - 3:44 am | लवंगी

मस्त झाले होते. १-२ तासात पोरांनी चट्टा-मट्टा केला.

दिपाली पाटिल's picture

6 Jul 2009 - 10:03 am | दिपाली पाटिल

छान वाटलं ऐकुन. खा आणि मजा करा. :)

दिपाली :)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

31 Aug 2009 - 1:16 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मोदकाची पध्दत फार सोपी आहे.ते मिल्कमेड मिळ्ते ते आणी हे कंडेन्स्ड दुध एकच की वेगवेगळे?