असे का?

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in काथ्याकूट
9 Jun 2009 - 11:33 am
गाभा: 

मागच्या काही आठवड्यात पुण्या मधे पीएमपीएमएल (आपली लाडकी पीएमटी हो) ने प्रवास करण्याचा योग आला. या बस मधील डाव्या बाजुची आसने महीलांकरता राखीव असतात. तश्या प्रकारच्या सुचनासुध्दा स्पष्ट पणे लीहीलेल्या असतात. यासंर्दभातले माझे निरीक्षण असे की महीलांसाठी राखीव असलेल्या जागेवर जर पुरुष प्रवसी बसलेले असतील आणि दुसरी कडे बसायला जागा नसेल तर महीला उभे राहुन इतरांचे धक्के खात प्रवास करणे पसंत करतात. जर कोणी या नियमाची त्यांना आठ्वण करुन दीली तरी सुध्दा त्या अशा सुचनेकडे दुर्लक्ष करतात व उभ्यानेच प्रवास करणे पसंत करतात.

मी हैदराबाद मधे असताना याच्या उलट अनुभव घेतला होता. तिकडे महीला आपला हक्क पुर्णपणे बजावत होत्या. पुरुष प्रवाश्यांना त्या आसने रीकामी करण्यास भाग पाडत होत्या आणि इतर प्रवासी आणि वाहक सुध्दा त्यांना सहकार्य करत होते.

याचा अर्थ असा घ्यावा का की पुण्यातल्या महीलांना आरक्षणाची गरज नाही?कींवा पुरोगामी (अस म्हणण्याची पध्द्त आहे) महाराष्ट्रा मधे महीलांना त्यांच्या हक्काची जाणीव नाही? असे असेल तर महीला आरक्षण हा केवळ राजकीय लाभा साठी केलेला एक खेळ होता असेच म्हणावे लागेल.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

9 Jun 2009 - 11:50 am | चिरोटा

स्थानिक संस्क्रुतीवर हे अवलंबून असते.मुंबई/आजुबाजुचा परिसर सोडला तर महाराष्ट्राची संस्क्रुती बर्‍याच अंशी पुरूषप्रधान आहे.आपणहुन उठून महिलेला जागा देण्यात बर्‍याच पुरुषाना कमीपणा वाटतो.बेंगळुरुतही मला पुण्यासारखाच प्रकार दिसला. बर्‍याच लोकाना वरच्या आवाजात बोललेली भाषाच समजते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

टारझन's picture

9 Jun 2009 - 9:32 pm | टारझन

ह्म्म .. ह्या धाग्यावरून आम्हाला एका महान समाजसेवकाची आठवण झाली .. त्यांनी बर्‍याच वेळेस २० ची छाती प्रसंगी ४० करून मुलींना जागा करून दिल्या होत्या !! त्यामुळे ते काही दिवस कौतुकास पात्रही ठरले होते ..

-(नजरकैद) टारझन

छोटा डॉन's picture

9 Jun 2009 - 9:38 pm | छोटा डॉन

टारबाशी सहमत ...

इनफॅक्ट त्यानंतर ते महान समाजसेवक नंतर "गंडलेल्या स्टॅटकाउंटरचा गांधी" ह्या नावाने प्रसिद्धीस पावले अशी इतिहासात नोंद आहे.
नंतरच्या इतिहासाचा आम्हाला काय पत्या नाय ... ;)

------
( इतिहासाच्या पेप्रात कॉप्या करणारा ) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

टारझन's picture

9 Jun 2009 - 10:30 pm | टारझन

"गंडलेल्या स्टॅटकाउंटरचा गांधी"

=))
=)) _ =))
=)) ___ =))
=)) ______ =))
=)) _________ =))
=)) _____________ =))
=)) _________________ =))
=)) _____________________ =))
=)) _________________ =))
=)) _____________ =))
=)) _________ =))
=)) ______ =))
=)) ___ =))
=)) _ =))
=)) =))
=))

दिल मे बजी गिटार
आयच्यान आम्हाला हा इतिहास म्हाईत नव्हता ... डाण्या मेल्या .. मारतो काय आजचं ?

(डाण्याभाई एस्सेस्सी ला कॉप्या पुरवणारा) टार्किट
सदरहु प्रतिसाद नजरकैद आहे :)

पर्नल नेने मराठे's picture

9 Jun 2009 - 11:53 am | पर्नल नेने मराठे

ह्म्म्...मी ही भान्दायचा X( मुड असेल तरच उठा म्हणते...नहितर शान्तपणे उभि राहाते. :|

चुचु

समोरचा बिचारा भांडायचा का हसायच अशा द्विधा मन:स्थितीत पडत असेल.

दिपाली पाटिल's picture

9 Jun 2009 - 12:16 pm | दिपाली पाटिल

नवी मुंबई त तरी आम्ही बी.ई.एस.टी. किंवा न.मुं.म.पा. मध्ये उठवायचो पण जर गर्दी असली किंवा दुसरी जागा नसली की...खरंतर आजकाल कुणी बसतच नाही या सीट्स वर :) (कदाचित घाबरुन :D)

एकदा फार च गर्दी होती आणि फार धक्के लागत होते, एक भैय्या माणुस महीला राखीव सीट वर बसला होता, तो काही उठायला तयार नव्हता, शेवटी बस पोलिस स्टेशन मध्ये न्यायचं ठरलं (कंडक्टर आणि चालकाचं )तेव्हा कुठे महाभाग उठले. पण लोकं ही सहकार्य नाही करत बर्‍या च दा...

दिपाली :)

अविनाशकुलकर्णी's picture

9 Jun 2009 - 1:11 pm | अविनाशकुलकर्णी

सिटाचे आरक्षण असावे पण ते वापरावे कि नाहि हा त्या व्यक्तिचा प्रश्ण आहे..त्यावर महीलांना आरक्षणाची गरज नाही असा निश्कर्श काढणे घाई घाईचे होइल..तसेच ज्या महिला आपण पाहिल्या त्यांना आपण विचारले कि तुम्हि धक्के का खाता ज्या अर्थी त्या बोलल्या नाहि मह्णजे त्यांना तसे आवडत असावे..असाहि निशक्र्श काढणे चुकिचे होइल...पुण्यातल्या महिला उभ्या उभ्या नेच का प्रवास करतात पुरुष प्रवाश्यांना त्या आसने रीकामी करण्यास भाग पाडत नाहित आणि इतर प्रवासी आणि वाहक सुध्दा त्यांना सहकार्य का करत नाहित हा एक चिंतनाचा विषय होइल..व त्या वर धागा हि काढता येईल असे वाटते.....

मराठी_माणूस's picture

9 Jun 2009 - 1:18 pm | मराठी_माणूस

समोरचा माणूस कसा वागेल हे सांगता येत नाही म्हणून महिला कदाचीत बोलत नसाव्यात , पण ही पुर्ण जबाबदारी कंडक्टरची आहे कारण काहीही झाले तरी एक मोठी संस्था त्याच्या मागे असते सामान्य माणसाच्या मागे लोक असले तरी ते बाजु घेतलीच हे सांगता येत नाही.

अभिज्ञ's picture

9 Jun 2009 - 1:25 pm | अभिज्ञ

मी एकदा माझ्या वडिलांबरोबर( वय ६५) बसने प्रवास करत होतो.
हिच पीएमटी.
कंडक्टरच्या पुढच्या सीटवर आमची जागा होती.
गाडित ब-यापैकी गर्दी होती.
माझ्या बाजूला एक पस्तीशीतली बाई उभी होती. तिला बस मधे कोणीतरी मैत्रीण सापडलि.
तिला काय हुक्की आली काय माहीत,तिने तिला इथे जागा आहे म्हणून पुढून बोलावून घेतले. व आम्हा दोघांना हि लेडीज सीट आहे म्हणून उठावयास सांगितले.
फक्त पहिल्या चार/पाच सीटसच फक्त लेडीजकरीता आहेत व तुम्ही आम्हाला इथून उठवू शकत नाही म्हणून मी तिच्याशी वाद घातला.
तुम्हाला बसायला जागा हवी असेल तर स्त्रीदाक्षिण्य म्हणून मी माझी जागा तुम्हाला देउ शकेन परंतु वडिलांना उभ्याने प्रवास करणे झेपणार नाही तेंव्हा ती सिट तुम्हाला मिळणार नाही असे ठणकावून सांगितले.
बराच वाद झाल्यावर बाकिचे लोक मधे पडले व तिने शेवटी माघार घेतली.
थोडक्यात अशीहि मंडळि असतात.
आता बोला.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jun 2009 - 8:49 pm | llपुण्याचे पेशवेll

हिंजवडी ते पुणे स्टेशन बसमधेदेखील अशीच डावी बाजू महीलांसाठी आरक्षित असते. आणि ते आरक्षण कंडक्टर बर्‍यापैकी पाळून घेतो. कमीतकमी सुरुवातीला बसताना लोकाना सांगतो की डाव्या बाजूला जर कोणी पुरुष बसला असेल आणि एखाद्या बाईमाणसाने उठायची विनंती केली तर उठावे लागेल म्हणून.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

छोटा डॉन's picture

9 Jun 2009 - 1:27 pm | छोटा डॉन

बाय द वे, आम्ही तो राखीव जागांचा नियम फक्त आणि फक्त "पहिल्या सुरवातीच्या थांब्यापुरता मर्यादीत" असल्याचे कुठेसे वाचले होते.
कमीत कमी ३-४ कंडक्टर व एका निरीक्षकाकडुन ह्याबद्दल "सहमती"ही मिळवुन घेतली होती ...

नियमाप्रमाणे, पहिल्या बस सुटण्याच्या सुरवातीच्या थांब्यावर राखीव जागेवर कुणी बसल्यास महिला त्याला आवश्य उठवु शकतात. मात्र बसचा प्रवास सुरु झाल्यावर हा नियम लागु होतो का ह्याब्बबत गोंधळ आहे. जाणकारांनी योग्य काय ते सांगावे ...

माणुसकी अगर सज्जनपणा म्हणुन जागा द्यायला अजिबात हरकत नाही.
मात्र जेव्हा एखादी षोडशवर्षीय कन्या राखीव जागा आहे म्हणुन चक्क आजोबांच्या वयाच्या वृद्धाला सीटवरुन उठवते तेव्हा "ह्या नियमाच्या नानाची टांग" म्हणुन हमखास आडमुठेपणा करु वाटतो.
ह्यात काही चुक आहे असे मला वाटत नाही ....

नियमांची सोय नसुन हक्क अशी गल्लत झाली की असे प्रश्न येणारच.
बाकी चालु द्यात ....

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

मराठमोळा's picture

9 Jun 2009 - 2:37 pm | मराठमोळा

मात्र जेव्हा एखादी षोडशवर्षीय कन्या राखीव जागा आहे म्हणुन चक्क आजोबांच्या वयाच्या वृद्धाला सीटवरुन उठवते तेव्हा "ह्या नियमाच्या नानाची टांग" म्हणुन हमखास आडमुठेपणा करु वाटतो.
ह्यात काही चुक आहे असे मला वाटत नाही ....

एकदम सहमत आहे डॉनराव..
नियमाचा गैरफायदा घेणारेही आहेतच..

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

बाकरवडी's picture

9 Jun 2009 - 5:37 pm | बाकरवडी

मलाही वाईट्च अनुभव आलेत हा नियम लागू झाल्यापासून.
मी दोनदा तरी पाहीले आहे की काही बायका खेकसून उठायला लावतात प्रवाशाला.
कधी तर अपशब्दही वापरतात.

नियमाचा गैरफायदा घेणारेही आहेतच
कदाचित जास्तच!
असो.
काही तर इतक्या आगाउ असतात, त्या मुद्दामून डाव्याबाजूला जागा असली तरी उजव्या बाजूला बसतात. मग काय पुरुषांनी काय फक्त उभ्यानेच प्रवास करायचा काय?

हा एक न संपणारा वादाचा विषय आहे. जाउदे आपण काय उभ्याउभ्या प्रवास करावा, वेळ आहे कोणाला भांडायला ?

:B :B :B बाकरवडी :B :B :B

रेवती's picture

9 Jun 2009 - 9:59 pm | रेवती

चर्चा चालू असल्याप्रमाणे गैरफायदा घेणारे दोन्ही पक्ष ;) दिसतात.
आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे हे मान्य आहे व दक्षिणेला मातृसत्ताक पद्धतीमुळे आलेली स्त्रीप्रधान संस्कृती आहे तिथे बायका भलत्याच धीट असतात. बायकांनी खेकसून कुणाला उठवले तर ते तेवढ्यापुरते असावे असा अंदाज. आपल्याकडे आपण उठवण्यासाठी वाद घालतो पण त्यातल्या कुणी कुठे खुन्नस काढायची ठरवली तर आयुष्याचे वांधे होऊन बसायचे अश्या भितीने कित्येक स्त्रीया खपवून घेतात; किंवा माणूस बघून भांडतात. ;) तरुणींनी हक्क बजावण्यासाठी आजोबांना उठवू नये हे अगदी मान्य पण 'आजोबा' वाटणार्‍या कित्येकांनी वयाचा मान घेऊन कसे कुठे स्पर्ष केलेत हे न विचारलेलच बरं. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद आहेतच! :)

रेवती

Nile's picture

9 Jun 2009 - 10:19 pm | Nile

अगदी मान्य पण 'आजोबा' वाटणार्‍या कित्येकांनी वयाचा मान घेऊन कसे कुठे स्पर्ष केलेत हे न विचारलेलच बरं.

आइला! याबद्द्ल माझा (म्हणजे मी बघितलेला बरका! ;) ) भयानक अनुभव आहे. आठवुनच कसतरी झालं, काय एक एक लोक असतात.

विषयाला धरुनः आम्ही बर्‍याच वेळा (पुण्यात असताना) अश्या वेळेस महीलांना सांगायचो(कारण नियम तेव्हा नविन होता). लोकांना उठवायचो. वाहकाशी भांडुन त्यांना उठवायला लावायचो. मजा येते असं करायला. ;)

तसेच सिग्नला झेब्रा क्राँसींगच्या पुढे कोणी जाउन थांबत असेल तर त्याला चिडवणे, रस्त्यावर नको तिथे "शंका" करणार्‍यांच्या "शंका" सोडवणे वगैरे पण करायचो. सुजाण नागरीकांनी असले प्रयोग करायला हरकत नाही. ;)

नीधप's picture

10 Jun 2009 - 10:05 am | नीधप

>>तरुणींनी हक्क बजावण्यासाठी आजोबांना उठवू नये हे अगदी मान्य पण 'आजोबा' वाटणार्‍या कित्येकांनी वयाचा मान घेऊन कसे कुठे स्पर्ष केलेत हे न विचारलेलच बरं. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद आहेतच!<<
पतेकी बात रेवती!
अश्या वेळेला एखाद्या षोडशीने वळून 'आजोबा' वयाच्या थिल्लर माणसाच्या मुस्कटात वाजवली तर वरच्या लोकांचे काय म्हणणे असेल?

मी पुण्यात बस ने प्रवास करून १७-१८ वर्षे तरी झाली असतील त्यामुळे आताचे काही माहीत नाही. पण मुंबईत केवळ ३ च लेडीज बाकडी आहेत बसेस मधे. म्हणजे केवळ ६ सीटस. एकूण ५०-५५ ते ६ लेडीज सीट हे प्रमाण आणि बसमधले पुरूष व महिला यांचे प्रमाण याचा ताळमेळ नाही तेव्हा लेडीज सीटस सोडून इतर सीटस वर महिलांनी बसू नये या म्हणण्याला काही अर्थ नाही.

'आजोबा' प्रकारातली व्यक्ती सिनियर सिटीझन्स साठी असलेल्या राखीव जागेवर न बसता लेडीज सीटवरच का बसली असेल हाही विचारात घ्यायचा मुद्दा आहे.

तसेच वरपांगी ठिकठाक दिसणार्‍या तरूणीला बसून प्रवास करायची खरोखरच गरज असणार नाही हा निष्कर्ष काढणे महाचूक आहे.

पण हल्ली जनरली मुंबईत लेडीज सीटस वर पुरूष मंडळी बसत नाहीत. अपवादात्मक उदाहरणे सोडता.
आणि लेडीज सीटस भरल्या नसतील तर इतर सीटस वर बाया जनरली बसत नाहीत. इथेही अपवादात्मक उदाहरणे सोडा.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अनुप कोहळे's picture

9 Jun 2009 - 11:03 pm | अनुप कोहळे

नियमाचे उल्लंघन करायचेच कशाला?
जेंव्हा आपल्याला माहीती असते कि स्त्रियांसाठी राखीव जागा आहेत तर त्यावर बसुच नये शाहाण्या मनुष्याने.

-आपला (मवाळ) अनूप.

विसोबा खेचर's picture

10 Jun 2009 - 8:14 am | विसोबा खेचर

याचा अर्थ असा घ्यावा का की पुण्यातल्या महीलांना आरक्षणाची गरज नाही?कींवा पुरोगामी (अस म्हणण्याची पध्द्त आहे) महाराष्ट्रा मधे महीलांना त्यांच्या हक्काची जाणीव नाही? असे असेल तर महीला आरक्षण हा केवळ राजकीय लाभा साठी केलेला एक खेळ होता असेच म्हणावे लागेल.

वा! एक वेगळाच विचार..!

आपला,
(स्त्रीदाक्षिण्यवादी) तात्या.

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jun 2009 - 10:59 am | ज्ञानोबाचे पैजार

लहान पणा पासुनच आमच्या वर इतके जालीम संस्कार झाले आहेत की आमची विचार करण्याची एक वेगळीच इस्टाइल बनली आहे. त्याच मुळे सर्व सामान्यां पेक्षा आम्ही नेहमीच वेगळे ठरत आलो आहोत. :) :) :) :) असो ....

काही खुलासे वजा माहिती...(पीमटी च्या जबाबदार अधिकार्‍यांनी दीलेल्या माहीती नुसार...)

राखीव जागा या सर्व काळ राखीव असतात (मुंबई लोकलच्या महीला पेशल ड्ब्या प्रमाणे)

वध्द आणि अपंगां साठी बस मधे वेगळ्या जागा आरक्षीत असतात (चालकाच्या मागील दोन आसने) अजोबा लोकांनी त्या जागेवर आपला ह्क्क बजावायला हरकत नाही.

_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jun 2009 - 7:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बसमधलं आरक्षण आणि निवडणूकांमधलं यांचा परस्परसंबंध नीटसा समजला नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Jun 2009 - 9:13 am | ज्ञानोबाचे पैजार

खालील सुधारीत वाक्य वाचावे....

असे असेल तर बस मधील महीला आरक्षण हा केवळ राजकीय लाभा साठी म. न. पा. सदस्यांनी केलेला एक खेळ होता असेच म्हणावे लागेल.

सर्व वाचकांनी इतकाच मर्यादीत अर्थ घ्यावा ही विनंती. पुढ्च्या वेळी अधिक काळजी पुर्वक लिहीन.

_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jun 2009 - 9:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझा मुद्दा हा होता की बसमधलं महिला (वृद्ध, अपंग आणि आजारी लोकांसाठीही असणारं) आरक्षण, सदर समाजघटकांची शारीरिक क्षमता मूळातच (किंवा काही अपरिहार्य कारणांमुळे) कमी असल्यामुळे असावं.
राजकीय आरक्षणात मूळ शरीररचना, संप्रेरकं, जनुकं यांचा विचार न होता सामाजिक स्थितीचा विचार होत असावा. त्यामुळे तुलना पटली नाही.

ज्या देशांमधे स्त्रियांची सामाजिक स्थिती पुरूषांपेक्षा फार वेगळी नाही तिथे स्त्रियांसाठी राजकीय आरक्षण नाही. अर्थात अशा देशात प्रचंड गर्दीही नसल्यामुळे, वृद्ध, अपंग, लहान मुले, स्त्रिया यांना बस, ट्रेन्स, (जहाजे, विमाने इ) सार्वजनिक वाहतून साधनांमधे आरक्षणाची गरज पडत नसावी.

आता अगदीच अवांतर किंवा फाजील बोलण्याचा मोह आवरत नाही आहे; स्त्रिया व पुरूषांसाठी प्रसाधनगृह वेगवेगळी असतात याला आरक्षण म्हणणार का नाही?

उजवी बाजु पण पुरुष प्रवाश्यांना राखीव सावी ५० % ५० %

टारझन's picture

12 Jun 2009 - 10:26 pm | टारझन

वा रे दिड शहाण्या ... मग मधे कोण उभे राहील ?

१.५ शहाणा's picture

12 Jun 2009 - 10:28 pm | १.५ शहाणा

बस म्ध्ये जा एक रांग महिलांसाठि राखीव आसते उभ्याने प्रवासाचा मक्ता फक्त पुरषांचा महिला कोठेही जागा अडवु शकते व याचा फायदा युवतीच जास्त घेतात रांगेत पुरुष तासंतास थांबतो व बाई? (मुली) १० मि. काम उरकुन बाहेर .
५०% मते जर महिलांची तर कशाला पाहिजे ३३ % आरक्षण (कदाचीत स्वताहाचे मत नसावे)