नमस्कार मिपाकरांनो,
हा प्रश्न कुणाला व्यनी किंवा खरड करुन सुटला असता की नाही मला माहित नाही. पण मी इथे का येतो किंवा नकळत मिपाकडे ओढला जातो या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एक प्रयत्न.
मिपा एक सामाजिक संस्था आहे असे मला वाटते. ज्याप्रमाणे एखादी कंपनी पब्लिक लिमिटेड होते तेव्हा ती कुण्या एका व्यक्तीची न राहता लोकांची होते त्याप्रमाणेच एक सामाजिक संस्था कुण्या एका व्यक्तीची न राहता समाजाची होते. (नाहीतर मग तिची अवस्था सत्यम कंपनी सारखी होते.) तर मला समजलेली उद्दिष्टे आणी तत्वे मी मांडत आहे.
१. मराठी भाषेचा विकास साधणे
२. मराठी बांधवांना एकत्र आणणे.
३. नवकवी/साहित्यिकांना चालना देणे.
४. विविध मुद्द्यांवर चर्चा घडवुन आणणे आणी ज्ञानाचा प्रसार करणे.
५. नवे विचारी/बुद्धीजीवी किंवा चांगले मित्र जोडणे, जेणे करुन एकमेकाला संकटप्रसंगी मदत करता येईल.
ही तत्वे मनात ठेवुन मी मिपाचा सदस्य झालो. माझ्यासारख्या मराठीच्या भुकेल्या माणसाला हे एक वरदानच होते. नव्या गोष्टी समजल्या, काही विचारांना योग्य दिशा मिळाली, कविता, लेख, चर्चा, पाकृ यातुन माझी साहित्यिक/वैचारिक भूक भागवू लागलो.
पण हे करत असताना काही गोष्टी खटकत होत्या/ आहेत.
उदा. एखादा मिपाकर जर काही चुका करत असेल (जसे एका ओळीचे धागे काढणे, निरर्थक कौल काढणे, अर्धवट माहिती देणारा लेख लिहिणे) तर त्याला/तिला प्रतिसादातुन किंवा चार्-पाच जणांनी कोंडीत पकडुन, त्या लेखाचे घाणेरडे विडंबन करु पळवुन लावणे कितपत योग्य आहे? हे सर्व आपले मराठी बांधव वेगवेगळ्या परिस्थितितुन घडले आहेत, प्रत्येकाचे आचार/विचार वेगळे आहेत. आपआपल्या विचारांप्रमाणे प्रत्येकजण वाटचाल करत असतो, त्यात जर काही चुका असतील तर मग त्या व्यक्तीला समजावुन सांगायचे की पळवुन लावायचे आणी त्याची मजा घ्यायची? आपल्या घरातल्या व्यक्तींबरोबर आपण असे वागत नाही मग इथे का?
काही लोक तर स्वत:कडे कोणतेही साहित्यिक दर्जाचे गुण नसताना लोकांचे विचार आणी लेख निरर्थक ठरवुन मोकळे होतात आणी मित्रांच्या जीवावर भरपूर बहुमताने निवडुन येतात. आणी मग बाकीचे मिपाकर जिकडे बहुमत तिकडे आपले मत नोंदवुन मोकळे होतात असे का घडत असावे? (काही सायकॉलॉजी आहे का) मित्र/मैत्रिण आहे म्हणुन त्याने/तिने कितीही चुका केल्या तरी समर्थन का द्यायचे. खरा मित्र तोच जो चुका दाखवून देतो. काही लोक मुद्दाम मराठी शब्द चुकीचा लिहितात (गावरान भाषेत लिहिणे अपवाद), हे जाणुन बुजुन करणे म्हणजे मराठी भाषेचा अवमान आहे असे मला वाटते.
असो बरेच विचार उसळ्या मारत आहेत बाहेर येण्यासाठी, पण इथेच थांबतो.
सर्वाना ज्ञात आहे तरी एक चांगले तत्व म्हणजे "एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ"
मालक व संपादक मंडळास विनंती आहे की हा धागा निरर्थक वाटल्यास अप्रकाशित करावा, तरी इथे मुद्देसुद आणी विचारी प्रतिसाद यावेत अशी अपेक्षा करतो.
आपला,
मराठमोळा
प्रतिक्रिया
8 Jun 2009 - 12:09 pm | अविनाशकुलकर्णी
मिसळपाव ची उद्दिष्टे आणी तत्त्वे काय आहेत
मला असे वाटते कि, विचार देवाण घेवाण...काव्य शास्त्र विनोद...खादाडि..कला कौशल्य..थोडि मानवेल इतकि टिंगल टवाळकि..
8 Jun 2009 - 11:55 pm | टारझन
सर्व प्रथम , ह्या निबंधा द्वारे आमचे परममित्र कोदा ह्यांची आठवण करून दिल्याबद्दल मंडळ आपले हार्दिक आभारी आहे !! सत्कारात णटराज षिषिपेण्षिल्स आणि खुडलब्बर्स घेउन जावीत !! एकूण एक शब्द कोदांना टक्कर देतोय .. वा वा वा !!
आता राहिलं मिपाच्या धोरणांचं आणि आमच्या दृष्टीकोणाचं .. तर आपल्याला काय त्या जड जड वांझोट्या वैचारिक चर्चांत रस नाय बा !! आपण चार लोकांना "हसू फुलवून" जरा आनंदाचे क्षण देऊ शकलो तर कृतकृत्य होतो पहा. (बघा हो मराठमोळा जी .. शब्दरचना जमतेय का ते ) आता आम्हाला तो मिळमिळीत प्रकार आवडत नाही म्हणून आम्ही त्यांना जा म्हणत नाही, शेवटी ज्याची त्याची इच्छा :)
हा आता आम्हालाही णजरे समोर लिहून चार शब्द लिहीले असतील (नसतीलही) तर सांगतो आमची विडंबणं घाण की नाहीत ते ठरवायला जो तो मोकळा आहे आम्ही कोण आडवणारे अर्थात तुम्ही म्हणालात तसं प्रत्येकाच्या विचार करण्याच्या तर्हा वेगेळ्या आहेतंच की .. आता त्यावर चार लोकांचा विरंगूळा होत असेल तर ज्याचं विडंबण झालं त्याने त्याचा सलमान( मराठीत सन्माण) झाला समजावं .. उगाच भले आपले काथ्याकुटायला मोकळे होऊ नये .... बाकी काथ्याकुट गोड गोड शब्दात घोळून आपल्यात तुंबलेल्या भावणा बाहेर काढणारा वाटला .. जर फक्त वरिल गोष्टी मिपावर उरल्या तर मात्र मिपावर यायला रस उरणार नाही .. मिळमिळीत आमटीने आम्हाला उलट्या होतात ..
- (हिण आणि हिणकस विडंबण/मराठी भाषा अवहेलक)
टारझन
9 Jun 2009 - 9:20 pm | विनायक पाचलग
( कोणा त्रयस्थाने या लेखाची लिंक माझ्या आंतरपत्रपेटीत दोनदा टाकली त्यामुळे पाहिले आणि काही वेगळेच आढळले म्हणूणथोडे लिहितो)
तर मराठमोळा साहेब.
खरे सांगायचे तर मिपाची उद्दीष्टे काय आहेत ते मला माहित नाही, आणि मला ती माहीत करायची गरजही नाही. मला व्यक्त व्हायला मिळत आहे ना म्हणून मग मी इथे यायचो आणि येतो.
आपण ज्या उद्दिष्टांचा उल्लेख आपण केलात ते आपले सर्व मुद्दे योग्यच आहेत. पण पहिला मुद्दा सोडल्यास बाकी सर्व मुद्दे हे व्यक्तीव्यक्तीवर अवलंबुन असल्याने त्यात फरक जाणवतो आणि या फरकाचा परिणाम म्हणून मिपावर आणि महाजालावर अनेक कुरबुरी होतात.
मराठी बांधवांना एकत्र आणणे.
हा आपला पहिला मुद्दा, अगदी बरोबर आहे ,पण याचा प्रत्यक्ष आमल किती होतो ते पाहणे गरजेचे आहे ,कारण बर्याचशा मराठी माणसांकडे आज घरात संगणक असले तरी नेट नाही आणि नेटवर मराठी साइटस असतील ही जाणीव नाही त्यामुळे हे एकत्रीकरण हे तरुणांपुरते विशेषतः महानगरीय आणि महानगर होवु पाहणार्या गावांपुरते आणि इतर देशातील लोकांपुरते मर्यादीत आहे.पण अशी संकेतस्थळे एक मोठे काम करतात ते म्हणजे इतर देशातील मराठी लोकाना एकत्र आणणे .इतर देशातील मराठी माणसाना आपल्या मायबोलीच्या माणसांशी बोलण्यासाठी संवादासाठी महाजालाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, त्यांचीही गरज मिसळपाव सारखी स्थळे भागवतात त्यामुळे त्यांना आपल्या संस्कृतीशी जोडुन राहता येते. पण मिसळपावच्या यशाचे फक्त हे रहस्य नाही आहे, अनेक मराठी महाराष्ट्रातील माणसेही याचे सदस्य झाले आहेत्.पण या मुद्द्याद्वारे परदेशातील मराठी माणसांचे त्यांच्या मराठीप्रेमाबद्दल अभिनंदन करतो.
नवकवी/साहित्यिकांना चालना देणे.
हा मुद्दा पटतो ,पण ह्या मुद्द्याला खरा वाव मिळत नाही, माझ्यासारखे नवलेखक ,कवी आपले साहित्य लोकाना वाचायला मिळावे म्हणुन इथे येतात.त्याना आपले लिखाण लोकापर्यंत पोहोचवायला हा राजमार्ग वाटतो .पण साहजीकच येथे अनेक प्रकारचे लेखक येतात ,त्यात माझ्यासारखे स्वतःला उगाचच शहाणे समजणारे आणि काहीही अनुभव नसताना लोकाना शिकवायचे प्रयत्न करणारेही असतात,त्याना जागेवर आणलेच पाहिजे पण वेगळ्या मार्गाने, त्यासाठी जे मार्ग वापरले जातात ते खचीतच योग्य नाही.एखाद्या माणसाची व्यक्त व्हायची पद्धत वेगळी असु शकते पण चुकीची असु शकत नाही .त्यासाठी प्रतिसादात तसे लिहिण्याची आणि टिंगलटवाळी करण्याची गरज नसते असे माझे मत आहे. आपण जेव्हा प्रतिसाद लिहितो तेव्हा एक लक्षात घेत नाही की हे प्रतिसाद फक्त मिपावरचे सदस्यच वाचतात असे नाही .अनेक पाहुणे स्वरुपात येणारे वाचकही हे लेख वाचत असतात,त्याना आपल्या टिंगलटवाळीत काही रस नसतो ,मग आपणतरी खरडवही वगैरे असताना असे का लिहावे यामुळे माझ्यासारख्यांचा भ्रमनिरास तर होतोच पण लिहायची उमेद निघुन जाते .
माझ्या वैयक्तीक बाबतीत बोलायचे तर मी आत्ता सध्या कॉलेजात शिकतो त्यामुळे दिवसभर कट्टा करणे आणि मजा करणे हा माझ्या जीवनक्रमाचा भाग आहे,त्यासाठी मला मिपावर यायची गरज नसते .
आणि मला लिहिताना हे लेख अनेक लोक वाचतात याची जास्तच जाणीव होती त्यामुळे मी आपला सीरीयस लिहित गेलो ,पण हा मिपाचा स्वभाव नव्हता,इथल्या लोकांसाठी हा टाइमपाससाठी आणि विरंगुळ्याचा कट्टा आहे हे समजायला मला वेळ गेला आणि त्याचे परिणाम मी आजही भोगत आहे.त्याचे काय आहे, इथे अवलिया ,भडकमकर मास्तर यांसारखे सिद्धहस्त लेखक आहेत ते एकाचवेळी अतिसीरीयस आणि अती टवाळखेर दोन्ही लिहु शकतात .पण आम्ही बिचारे लहान ,आम्हाला हेही धड जमत नाही आणि तेही मग माझ्यासारखे या कात्रीत आपण अडकुन पडतो .पण तो आपला दोष आहे. काय करणार, ही माणसेच आहेत्,ते तरी मुर्खाना कितीवेळ सांभाळु शकणार.शेवटी आपला त्रास त्याना होणारच
विविध मुद्द्यांवर चर्चा घडवुन आणणे आणी ज्ञानाचा प्रसार करणे.
याबाबतीत मी सहमत आहे. पण मी आल्यापासुन तरी मी विचारप्रवर्तक लेखांचे प्रमाण कमीच पाहिले आहे, याला कारण मला माहित नाही. कदाचीत अशा प्रतिसादांमुळे वा प्रकारामुळे लोक असे लिहायला इथे तयारच होत नसावेत्.ठिक आहे न लिहु देत त्याने काही फरक पडत नाही. पण जर का मालकानी संस्थळ काढताना मालकांचे हे उद्दीष्ट असेल तर मात्र त्याना विचार करायची गरज आहे .लोक म्हणतात तसे इथे गंभीर विषय वेगळ्या प्रकारे हाताळले जातात म्हने, पण आमच्यासारख्या न समजणार्यांसाठी काय? कदाचीत हे सर्व लिखाण आमच्यसारख्याना गृहीत धरुन तर केले जात नाही ना ? असो ,पण विविध मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मिपाचा विचार कोण करत नाही असे वाटते कारण मिपाचे सदस्य देखील काही वैचारीक चर्चा करण्यासाठी इतर संस्थळांचा वापर करतात,असे दिसते .कदाचीत इथे होणार्या विडंबन वा तत्सम प्रकाराची भीती त्याना असावी .असो चालायचेच. हे योग्य का अयोग्य हे सर्वस्वी मालकानी ठरवणे आहे.
नवे विचारी/बुद्धीजीवी किंवा चांगले मित्र जोडणे, जेणे करुन एकमेकाला संकटप्रसंगी मदत करता येईल.
हा खरी गोची इथे होते हो... त्याचे काय आहे हे मित्र वगैरे जोडले जातात वगैरे ठिक आहे हो,पण असे एकमेकाना न भेटताही मैत्री होवु शकते हे अजुन पुणे मुंबई वगळल्यास इतर ठिकाणी रुचलेले आणि पचलेले नाही ,त्यामुळे अजुन लोकाना अशी मैत्री होवु शकते यावर विश्वास बसलेला नाही .कदाचीत मिपाचे बहुतेक कट्टे हे पुणे ,मुंबई ,बेंगलोर आणि परदेश याठिकाणी झालेले आहेत त्याचे कारण तेच असावेत. बर यात प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा त्यामुळे वागताना प्रचंड सावधगीरी बाळगावे लागते आणि माझ्यासारखे ऑफीसातुन वगैरे न येता घरातुन वा इतर ठिकांणांहुन काही कामानिम्मित वा थोडावेळ येणार्या लोकाना हे कसे जमणार, त्यामुळे इथे अनेक मैत्रीचे प्रस्ताव फेटाळले जातात,आणि वैरत्व तयार होते ..
बाकी याचा वापर अने़क ठिकाणी होतो,अजुनही महाजालावरील लोकात एखादा आवडत नसेल तर तु जा असे सांगण्याची हिंमत आलेली नाही त्यामुळे यासाठी मित्रपरिवार वगैरेचा सहारा घ्यावा लागतो .
आता या सगळ्यावर उपाय काय?
सर्वात चांगला उपाय गरजेपुरते येथे यावे ,आपले लेख लिहावेत्,चर्चा करावीत आणि निघुन जावे ,जे टाइमपाससाठी येतात त्यानी ते करावे .पण दोघानी एकमेकांच्या मध्ये जावु नये त्याचा फार त्रास होतो. पण यात पुर्वग्रह तयार होण्याची शक्यता असते उदारणार्थ आजकाल बरेचशे लोक माझे लिखाण माझे नाव वाचुनच लोक वाचत नाहीत ,पण अशाला पर्याय नाही.
तर शेवटी इतकेच की
काही ही कारणाने का असेना मिसळपाव हेच आज सर्वात प्रसिद्ध संस्थळ आहे आणि तुम्हाला तुमचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे असतीलतर इथे यावेच आणि इथे जे होईल ते सहन करावे लागेल्,पण आजही इथे लोक येतात याचा अर्थ मिपा अजुन चांगले आहे पण त्यात बदल व्हायला हवा असे मला वाटते.पण लक्षात घ्या की जोपर्यंत तात्या
मिपा हे आहे असे आहे ज्याला यायचे तो येईल नाही आला तर गेला ओसाड जंगलात
हे वाक्य बिनधास्त म्हणू शकतात तोपर्यंत मिपाला पर्याय नाही आणि म्हणुनच मिपावरच्या प्रेमापोटी मी आजही स्वतःची कितीही संस्थळे काढली तरी लेख पहिल्यांदा इथेच लिहितो ,खरडीच्या आणि लेखाच्या विडंबनामुळे मन आतुन दुखावले असले आणि आजही होणार्या कुत्सीत उल्लेखामुळे त्यावर मीठ चोळले जात असले तरी इथेच येतो आणि इथल्यांप्रमाणे व्हायचा प्रयत्न करत राहतो,यात जेव्हा मी यशस्वी होइन तो दिवस खरा म्हणायचा .........
तोपर्यंत उगाचच लोकांना पिडणारे लेख अधुन मधुन टाकत आहेच........चलतो आता,लय बोललो
आपला सच्चा मिपाकर
विन्या टारगट्(मिपावर खर्याच नावाने येणारा)
स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......
विनायक पाचलग
8 Jun 2009 - 12:11 pm | आम्हाघरीधन
आपली मते आपण योग्य शब्दांत आणि योग्य पध्दतीने मांडली आहेत असे मला व्यक्तिशः वाटते.
मराठी माणसाची चुक दाखवुन त्यात सुधारणा करणे हे आपले कर्त्यव्यच आहे आपण मानता याला +१ सहमत..
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
8 Jun 2009 - 12:16 pm | अवलिया
तुम्ही कॉलेजात कधी गेला आहात का हो?
गेला असाल तर कॉलेजकट्टा हा काय प्रकार असतो हे तुम्हाला माहित आहे का हो?
बहुधा माहित नसावा, कारण मग तुम्हाला असे प्रश्न पडलेच नसते :)
बाझवला तिच्यायला, मिपा हे आहे असे आहे ज्याला यायचे तो येईल नाही आला तर गेला ओसाड जंगलात :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
8 Jun 2009 - 12:17 pm | अवलिया
तुम्ही कॉलेजात कधी गेला आहात का हो?
गेला असाल तर कॉलेजकट्टा हा काय प्रकार असतो हे तुम्हाला माहित आहे का हो?
बहुधा माहित नसावा, कारण मग तुम्हाला असे प्रश्न पडलेच नसते :)
बाझवला तिच्यायला, मिपा हे आहे असे आहे ज्याला यायचे तो येईल नाही आला तर गेला ओसाड जंगलात :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
8 Jun 2009 - 12:22 pm | परिकथेतील राजकुमार
तेज्यायला विकास, नवकवी, आणी बुद्धीजीवी असले काय काय शब्द
वाचुन डोक्याची मंडई झाली भेंडी.
सविस्तर प्रतिसाद मुड आल्यास देउ नाहीतर गेला प्रतिसाद तेल लावत.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
8 Jun 2009 - 1:47 pm | अनंता
नव्या सदस्यांना थोडं स्थिरस्थावर होऊ द्यावं. शेवटी आयुष्यात प्रत्येकजण कधी ना कधी नवा असतोच. चुकणं चूक नाही, तर चुकांतून काहीच न शिकणं ही खरी चूक आहे. कुणी नवख्या सदस्याने एक ओळीचे धागे काढले तर लगेचच त्याला झोडपणे योग्य नव्हे. अगदी ३० आठवड्यांनंतरही संबंधित सदस्य त्याच त्या चूका करत असेल तर त्याला समज देता येईल. तरीही हा अधिकार मालकांचा आहे, असे मला वाटते. भ्रमनिरास वगैरे होत असला तरी त्यावरही उपाय आहे, गप्पाटप्पा मारण्यासाठी , अवांतर चर्चा इ. साठी धाग्याचा वापर करता येतोच. शेवटी जगात कोणतीही गोष्ट टाकाऊ नसते. ;) मिपावर एका ओळीचे काय, अगदी एका टिंबाचेही धागे निघाल्याची उदाहरणे आहेत. सगळ्यांच्या वाटेला असेच कौतुक येईल असे नव्हे.
आता कथित कंपूबाजीविषयी.. आपला मिपा हा एकच एक कंपू का असू शकत नाही?
स्पष्ट लिहील्याबद्दल माफी असावी.
>प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
8 Jun 2009 - 3:47 pm | बाकरवडी
पण हल्ली तर नवीन सदस्य येतच नाहीत मिपावर!
याचे कारण काय ? कोण सांगेल का?
बरेच दिवस झाले नवीन सदस्यांच्या यादीत फक्त हीच नावे आहेत.
नीलाक्षी
आलोक
वेडाखुळा
सौरभ.बोंगाळे
:B :B :B बाकरवडी :B :B :B
8 Jun 2009 - 3:49 pm | बाकरवडी
पण हल्ली तर नवीन सदस्य येतच नाहीत मिपावर!
याचे कारण काय ? कोण सांगेल का?
बरेच दिवस झाले नवीन सदस्यांच्या यादीत फक्त हीच नावे आहेत.
नीलाक्षी
आलोक
वेडाखुळा
सौरभ.बोंगाळे
:B :B :B बाकरवडी :B :B :B
8 Jun 2009 - 5:17 pm | चिरोटा
ईतर भाषिकांच्या तुलनेत आंतर्जालावर येणार्या मराठी भाषिकांची संख्या मर्यादित असावी.तामिळ्/तेलुगु भाषिकांची संख्या मराठी भाषिकांपेक्षा कमी असली तरी इंटरनेटचा प्रसार त्यांच्यात जास्त आहे.केवळ मिपाच नाही तर ईतरही मराठी वेब साईट्स त्याला अपवाद नसाव्यात.शिवाय आजुबाजुला घडणार्या घडामोडी/राजकारण्/अर्थकारण ह्यांचाही परिणाम होत असतो. विधानसभा निवडणुका जवळ आल्यात्.त्यावेळी संख्या परत वाढेल.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
3 Nov 2010 - 3:02 pm | सुहास..
कोणे-एके काळी अश्याही चर्चा होत असत ...
आज मात्र एककल्ली निर्णय घेण्याकडे कल जास्त दिसुन येतो आहे.
8 Jun 2009 - 12:24 pm | मराठमोळा
नाना,
>>तुम्ही कॉलेजात कधी गेला आहात का हो?
कॉलेजात पण गेलो आहे आणी निम्म आयुष्य कट्ट्यावरच काढले आहे. पण ती दुनिया मित्रांपुरती मर्यादित होती.
आता आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना आहे. :)
>>बाझवला तिच्यायला, मिपा हे आहे असे आहे ज्याला यायचे तो येईल नाही आला तर गेला ओसाड जंगलात
हे तर तात्यांचे वाक्य आहे.. त्यांच्याआधीच तुम्ही विकेट घेऊन मोकळे झालात, असो... ओसाड जंगलात काय करणार नाना, त्यापेक्षा तुमच्यासारखे हिमालयात जाईन म्हणतो थोडे दिवस.. म्हणजे कदाचित योग्य दिक्षा मिळेल,, ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
8 Jun 2009 - 12:30 pm | अवलिया
पण ती दुनिया मित्रांपुरती मर्यादित होती.
म्हणजे ? मिपावर तुम्हाला मित्र नाहीत ? ;)
घ्या आम्ही करतो तुमच्याशी मैत्री :)
मज्याशी म्य्त्री कर्नर क?
आता आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना आहे.
हम्म, वैचारिक मुलामा लावलाय तर मनातल्या खळबळीला. असो.
हे तर तात्यांचे वाक्य आहे.. त्यांच्याआधीच तुम्ही विकेट घेऊन मोकळे झालात, असो...
तुम्ही स्टंप्स सोडुन खेळायला लागले, चान्स घेतला :)
ओसाड जंगलात काय करणार नाना, त्यापेक्षा तुमच्यासारखे हिमालयात जाईन म्हणतो थोडे दिवस.. म्हणजे कदाचित योग्य दिक्षा मिळेल,,
या! या ! निपुत्रिक असल्याने शिष्यगणाची जास्त गरज आहे मला ;)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
8 Jun 2009 - 12:39 pm | मराठमोळा
>>हम्म, वैचारिक मुलामा लावलाय तर मनातल्या खळबळीला
असं का वाटतय तुम्हाला नाना? मन चांगलं स्थिर आहे, अजिबात चलबिचल नाही किंवा अस्थैर्य नाही. :)
असो,
काय म्हणताय मग? धागा अप्रकाशित करावा काय? तरी सगळ्याना आपले मत मांडण्याची / वादविवाद घालण्याची संधी मिळावी असे वाटते. ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
8 Jun 2009 - 12:45 pm | अवलिया
छे छे धागा एकदा प्रकाशित केला की गंगार्पण... जे होईल ते होईल ! निवांत :)
आता दुस-या धाग्याची तयारी करा :)
विषय घ्या "हल्ली अवांतर प्रतिसाद कमी का झाले ? एक वैचारिक निष्कर्ष" :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
8 Jun 2009 - 1:18 pm | नितिन थत्ते
मिपाची उद्दिष्टे
१. मराठी भाषेचा विकास साधणे
असहमत. मराठीचा विकास वगैरे उच्च उद्दिष्टे आहेत असे वाटत नाही
२. मराठी बांधवांना एकत्र आणणे.
अंशतः सहमत.
३. नवकवी/साहितिकांना चालना देणे
सहमत
४. विविध मुद्द्यांवर चर्चा घडवुन आणणे आणी ज्ञानाचा प्रसार करणे.
अंशतः सहमत. खर्या गंभीर चर्चे साठी 'उपक्रम' जास्त योग्य आहे.
५. नवे विचारी/बुद्धीजीवी किंवा चांगले मित्र जोडणे, जेणे करुन एकमेकाला संकटप्रसंगी मदत करता येईल.
अंशतः सहमत. बहुतेक लोक स्वतःच्या खर्या नावाने वावरत नसल्याने प्रत्यक्ष मैत्री अवघडच.
मिपाचे स्वरूप हे घटकाभर मौजमजा आणि थोडेफार चर्वितचर्वण असे मर्यादित आहे असे वाटते. मुख्य म्हणजे मनोगताप्रमाणे लेखनाला (प्रतिसादालासुद्धा) प्रकाशनपूर्व चाळणी नाही. मी मनोगतावर दिलेले दोनतीन प्रतिसाद दोन महिन्यानंतरही प्रकाशित झालेले नाहीत. मिपावर अधूनमधून वैचारिक चर्चा होतात.
पण वैचारिक चर्चा हा मिपाचा हेतू मुळीच नाही असे वाटते.
(मला स्वतःला तसा अनुभव नसला तरी कुठल्याही संस्थेत असते तशी कंपूबाजी चालते असे जाणवते)
खराटा
(रंग माझा वेगळा)
8 Jun 2009 - 1:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>अंशतः सहमत. खर्या गंभीर चर्चे साठी 'उपक्रम' जास्त योग्य आहे.
मिसळपाववर अनेक गंभीर चर्चा आणि तितकेच गंभीर प्रतिसाद आपण पाहिलेले आहेत. 'उपक्रम' गंभीर चर्चेसाठी आहे हे किंचीत खरं आहे, पण तिथे गंभीर नसलेले प्रतिसाद अदृष्य होतात, त्यामुळे तेथील चर्चा गंभीर भासते. अर्थात आमच्या 'उपक्रमचा' लवकरच (शषांकला संपादक कळविणारसुद्धा नाहीत) विकिपिडिया होईल असेही वाटते ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(उपक्रमवर गंभीर चर्चेबरोबर, टवाळी करणारा)
8 Jun 2009 - 1:59 pm | अवलिया
दिलीपशेटशी सहमत आहे.
मिपावर अनेक गंभीर, वैचारीक लेख आलेले आहेत, येत असतात, आणि येतील. मिपाच वैशिष्ट्य म्हणजे गंभीर विचार ललितमाध्यमातुन मांडले जाणे. हे सहसा इतर ठिकाणी आढळत नाही. अर्थात ललितातुन मांडलेले जीवनविषयक विचार शोधण्यासाठी प्रज्ञा लागते आणि ती मिपाकरांकडे भरपुर आहे यात तीळमात्र संशय नाही.
(टवाळखोर लेखक आणि प्रतिसादक) अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
8 Jun 2009 - 4:40 pm | धमाल मुलगा
ते अभिजात, उच्चभ्रु, साहित्यिक वगैरे वगैरे आमच्या चिमुकल्या मेंदूस न झेपणारे शब्द आहेत. त्यामुळे त्यावर काहीही भाष्य करणं आम्हाला केवळ अशक्य आहे.
राहता राहिला एक मुद्दा:
पुर्णतः असहमत!!!
हा प्रकार खरं तर "जगात भूत आहे की नाही" ह्या वादासारखा आहे. ज्यांना अनुभव आलाय त्यांचं मत निराळं ज्यांना नाही, त्यांचं निराळं :)
जर प्रत्यक्ष मैत्री अवघडच असती, तर घडोघडी भरणारे मिपाकट्टे झाले असते काय?
मी कोण कुठला, ती यशोधरा कोण कुठली, तो अॅड्या म्हणजे कोण...तो अभिरत कोण...कशाचा कशाला संबंध नाही....पण मी बंगळूरात पोचल्यानंतर (किंबहुना, पोचण्यापुर्वीच बातमी दिल्यावर) त्या यशोनं आग्रहानं घरी का बोलवावं? सुग्रास स्वयंपाक करुन पोटभर खाऊ का घालावं? अॅड्यानं त्याच्याच रुमवर थांबण्याचा आग्रह का करावा? दुसर्या दिवशी सकाळी सहा साडेसहाला हापिसात जायचं असुनही अभिरतनं आमच्यासोबत गप्पा हाणत रात्र का जागवावी? अहो कारण मिपावर जुळलेले ॠणानुबंध! झालीच ना प्रत्यक्ष मैत्री?
हे एक उदाहरण केवळ वानगीदाखल दिले....अशी कित्येक उदाहरणं आहेत हो....
मिपाकरांना इतकेही कोत्या मनाचे समजु नका शेठ :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
8 Jun 2009 - 4:53 pm | विंजिनेर
माझ्या मते प्रत्येक संस्थळाचा एक-एक स्वभाव असतो. त्यात मग संपादन करणारे विनालालित्य जगणारे गंभीर संपादक असो किंवा प्रशासकीय परवानगीचा हट्ट धरणारे नमोगती असो.
एव्हढच कशाला मिपावर टवाळखोर(सुद्धा) प्रतिसाद देणारे तेच सभासद इतर ठिकाणी गंभीर चर्चा करताना आढळतील. ह्यात दोष काढायचा नाही आहे मला . पण काहीसं भारतात असताना जागोजागी पानाची पिंक बिनदिक्कत टाकणारे(आणि त्याचं समर्थन करणारे) परदेशातल्या स्वच्छतेला बिचकून चॉकलेटचे आवरण फर्लांगभर अंतर चालत जातात आणि (जाचक नियमांच्या नावाने खडे फोडत का होईना) कचरापेटीत टाकतात तसंच हे.
हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे मराठी भाषेत चालवलिली जाणारी "समूह संकेत स्थळे" अगदी टिचभर सुद्धा नाहीत. त्यात आपापल्या संकेतस्थळाच्या स्वभावाचा वृथा गर्व बाळगणे हे हास्यास्पद आहे.
पण चालायचंच. अजूनही मराठी जालविश्व पौंगडावस्थेत आहे. त्यात विचारलेल्या प्रश्नाला प्रसंगी जीव घोटवणार्या ("बॅड अॅडमिनिस्ट्रेशन हॅबिटस" ;)) शांतते बरोबर, "गेला बा**वत" असं उर्मटपणे उत्तर टाळण हे सुद्धा येते.
अजून १०-१५ वर्षांनी ही परिस्थिती जाऊन प्रौढावस्था यावी बहुदा...
पुन्हा मराठी माणसाची कर्कवृत्ती आहेच. त्यामुळे संकेतस्थळ काढून ते चालविणे ह्या एक पुढे टाकलेल्या पावलाबरोबर जागीच फतकल मारून केलेल्या भांडणे/कुटाळक्यांची दहा मागे टाकलेली पावलेसुद्धा येणारच की हो!!
मध्यंतरी कुणीतरी मराठी संकेतस्थळांमुळे मराठी भाषेची अवस्था "नेसायला छत्तीस लुगडी पण तरीसुद्धा उघडी" असं समर्पक वर्णन केल्याचं आठवतंय.
असो. ह्या चर्चेवर ज्याने त्याने आपापल्या आवडीनुसार निवड करावी हे ब्येस हे उत्तर आहे.
इथे आणि इतर संकेतस्थळांवर येणं आणि जाणं हे स्वेच्छेनुसार आहे. तो काही जुलुमाचा राम राम नाही त्यामुळे इथे खेळल्या जाणार्या झिम्मा फुगडीला तितपतच (गौण) महत्व माझ्या तरी आयुष्यात आहे.
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
8 Jun 2009 - 5:29 pm | वेताळ
=)) :T
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
8 Jun 2009 - 7:19 pm | अनामिक
जवळ जवळ वर्षभरापुर्वी मी मिपावर आलो ते एक विरंगुळ्याचं साधन म्हणून... आणि मला खात्री आहे की मिपाचे बरेच सदस्य याच एका कारणासाठी इथे आले असावेत. निदान मलातरी मराठी बांधवांनी एकत्र यावे किंवा मराठीचा विकास व्हावा अश्या तत्वांसाठी मिपावर यायची गरज वाटत नव्हती/नाही. मिपाकडे आपल्या मनोरंजनासाठी, आपले लेख/कविता/विचार इतर लोकांपर्यंत पोहचवण्याचा एक मार्ग म्हणून बघीतलं जावं (असं माझं मत).
आता इथं व्यक्तीस्वातंत्र्य असल्यामुळे तुम्ही एका ओळीचेच नव्हे तर एका टिंबाचेही धागे काढू शकता. बहुतेकवेळा नवीन सदस्य असले प्रकार करताना दिसतात.... आणि बर्याचवेळा त्यांना सांभाळून घेण्यातही येते, परंतू तोच-तो प्रकार समज देऊनही (म्हणजे एकोळीचे धागे वगेरे) परत परत व्हायला लागला तर इतर सदस्य नक्कीच वैतागतात. मग त्यांनी थोडी टवाळकी केली की लगेच एकोळीच्या लेखकाला राग येतो (म्हणे). मी टवाळकीचं समर्थन करत नाही, पण अनेकवेळा ते योग्यही असतं आणि मौजमजेसाठी गरजेचंही.
मिपाला आपण आपलं म्हणतो ना? मग त्याला चांगलं ठेवण्याची जबाबदारी आपली नको का? संपादक आणि मालक कुठपर्यंत आणि किती लेख/कविता/चर्चेकडे लक्ष देतील? त्यांना हे काम करायचा मोबदला मिळत नाही. ते हे काम स्वेच्छेने आणि मिपाला आपलं म्हणून करतात. त्यातच थोडा हातभार म्हणून प्रत्येक सदस्याने स्वतः कोणत्या प्रकारचे लेख्/कविता/चर्चा प्रकाशीत करतो याकडे भान ठेवावं असं मला वाटतं.
-अनामिक
9 Jun 2009 - 1:31 am | हरकाम्या
मी कुठल्याही कॉलेजात गेलो नाही आणि येथुन पुढेही जाणे शक्य नाही. बाकि मिपाची तत्वे वगैरे शोधण्याच्या भानगडीत मी पडणार
नाही. मिपा जसे आहे तसे मला भावले. दिवसातुन एकदा तरी मिपावर
आल्याशिवाय मला चैन पडत नाही. मला वाटते श्री . मराठमोळा
यांनी हाच द्रुष्टी़कोन ठेवावा. बाकी तत्वे वगैरे प्रकार गेले उडत.
9 Jun 2009 - 6:36 am | यन्ना _रास्कला
नमोगतासारखा सुद्ध्लेखन चिकीत्श्क बसविने. आनी शुध्ध नसलेले सर्वे लेख आनि पर्तिसाद उडवुन लावने. झालच त मिपाच पुर नमोगतीकरन करने.
बिरुट्दादा पाहाताय नव्ह कस लोक आडुन आडुन बहुजनाना मिपावर येन्यास बंदि करतायेत. तुमी काहिच कस बोलत नाय.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
9 Jun 2009 - 8:20 am | विसोबा खेचर
तर त्याला/तिला प्रतिसादातुन किंवा चार्-पाच जणांनी कोंडीत पकडुन, त्या लेखाचे घाणेरडे विडंबन करु पळवुन लावणे कितपत योग्य आहे?
नक्कीच योग्य नाही. मराठमोळासाहेब, हल्ली मी फार कमी वेळ मिपावर असतो त्यामुळे मला लक्ष द्यायला जमत नाही. परंतु आपण वर म्हटल्याप्रमाणे जर काही गोष्टी आपल्याला खटकल्या तर आपण त्या माझ्या अवश्य लक्षात आणून द्याव्यात ही विनंती. मी संबंधितांवर निश्चितच योग्य ती कारवाई करेन, वा त्यांना योग्य ती समज देईन..
हे सर्व आपले मराठी बांधव वेगवेगळ्या परिस्थितितुन घडले आहेत, प्रत्येकाचे आचार/विचार वेगळे आहेत. आपआपल्या विचारांप्रमाणे प्रत्येकजण वाटचाल करत असतो, त्यात जर काही चुका असतील तर मग त्या व्यक्तीला समजावुन सांगायचे की पळवुन लावायचे आणी त्याची मजा घ्यायची? आपल्या घरातल्या व्यक्तींबरोबर आपण असे वागत नाही मग इथे का?
खूप पटण्याजोगं लिहिलं आहे. मराठमोळासाहेब, जियो..!
मिपा आपलंच आहे. कृपया मिपावर असाच लोभ असू द्या, लक्ष असू द्या..
आपला,
(अलिकडे कामात व्यस्त) तात्या.
9 Jun 2009 - 8:58 am | टारझन
वा !! मस्त !!
णक्की तात्या कशाशी सहमत आहात हो ? कसले तरी बकवास कौल /काथ्याकुट्स वारंवार पाडले जातात .. काहींना वारंवार असं करण्याची सवय असते :)
एवढंच जर वाईट वाटत असेल तर थोडा वेळ इकडं तिकडं पाहून मग निट लिहावं की !! काहींना "लाइमलाईट" मधे हटकून रहाण्याची गोडी असते ..
चुकून चुकणार्याला माफ केले जात .. पण हटकून चुकणार्याला का बॉ माफ करावं ? आणि ते पण डोक्याला पिक आणणार्याला तर सोडावसं वाटत नाय बा !!
आफ्टरऑल मिपा सगळ्यांचं आहे :) थट्टामस्करी णसेल तर मज्जा नाही तात्या ..
आपला
(पलिकडे विडंबणात व्यस्त) टार्या
9 Jun 2009 - 9:28 am | मराठमोळा
तात्या,
तुमचे मनःपुर्वक आभार.
मी तुम्हाला व्यक्तीशः जरी ओळखत नसलो तरी तुमचे जेवढे काही लिखाण वाचले आहे त्यातुन एक न बोलता काम करणारा माणुस पाहिला आहे. मनात काही तत्त्वे ठाम करुनच तुम्ही मिपा ही संस्था कुठल्याही जाहिरातीच्या किंवा आर्थिक आधार नसताना चालु केली मग तिच्यामागे नकीच काहीतरी सामाजिक जाणीव असलेले उद्दीष्ट असणार याची मला खात्री होती, त्याचेच एक फळ म्हणजे "मिसळपाव प्रतिष्ठान" आहे असे मला वाटते.
आता राहिला प्रश्न टारझण भाऊंचा.
मिसळपाव झणझणीतच असावे यात वाद नाही, तर्रीदार खमंग मिसळ सर्वांनाच आवडते. पण अशी मिसळ बनवताना आपले काही मित्र जास्त तिखट खात नाहीत किंवा एखाद्याला अल्सर होईल ईतपत तिखट करु नये.
विडंबने हलकीफुलकी विनोदी असली तर नक्कीच वाचायला मजा येते, पण त्यातुन एखाद्या व्यक्तीचा/संस्थेचा/भाषेचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली तर बिघडले कुठे? मग ज्या लेखाचे विडंबन केले आहे तो लेखक सुद्धा आनंदाने त्या मिष्किलीमधे सामिल होईल. प्रत्येकाकडे काहीतरी चांगला गुण असतो, तो ओळखावा आणी दाद द्यावी.
मीसुद्धा इथे काही लोकांशी भांडलो आहे पण त्यांचे जे गुण चांगले आहेत त्याचे कौतुक सुद्धा नक्कीच केले आहे. जे चांगल आहे त्याला चांगलंच म्हणाव, तसेच एखादा धागा निरर्थक आहे किंवा नाही हे कुणी एकट्याने ठरवु नये, काही मिपाकर लेख्/काव्य आवडले नाही तर प्रतिसाद देत नाहीत इतके सभ्य आहेत, उगाच नकारात्मक प्रतिसाद देऊन खच्चीकरण होऊ नये अशी भावन असते त्यांची, असो..
तुम्हाला हे विचार पटतीलच असे नाही, कारण तुम्ही तशा परिस्थितुन घडला असाल.
बाकी माझी सही माझ्या तत्वांपैकी एक आहे. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
9 Jun 2009 - 9:57 am | Nile
मराठमोळा साहेब,
मला मान्य आहे प्रत्येक संकेतस्थळाचे आले एक उद्दीष्ट वगैरे असते पण आपण ते स्थळाच्या संपादक मंडळाकडे सोपवावे, (व्य. नी वगैरे करावा फारतर).
उरला प्रश्न "काही" लोकांच्या "वागण्याचा" तस अश्या गोष्टी दुर्लक्षीत कराव्यात वा फार तर संपादक लोकांच्या नजरेस आणुन द्याव्यात. शेवटी सोनारानेच कान टोचावेत अशी काहींची इच्छा असते. असो! तुमची तळमळ बघीतली म्हणुन हा प्रपंच.
9 Jun 2009 - 10:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नीलशेटशी अगदी सहमत. फार त्रास नका हो करून घेऊ!
(आंतरजालीय विरोधकांची मैत्रिण) अदिती
9 Jun 2009 - 10:08 am | चिरोटा
एखाद्याचे लिखाण आपल्याला आवडत नसेल तर ते न वाचण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहेच.दुसर्याने आपल्याला रुचेल असेच लिहिले पाहिजे अशी अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणा आहे.
कौल्/काथ्याकूटला बकवासपणाची फूट्पट्टी लावणारे आपण कोण?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
9 Jun 2009 - 10:12 am | मराठमोळा
भेंडी बाजार साहेब,
>>एखाद्याचे लिखाण आपल्याला आवडत नसेल तर ते न वाचण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहेच.दुसर्याने आपल्याला रुचेल असेच लिहिले पाहिजे अशी अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणा आहे.
मान्य आहे पण ते लिखाण कोणाशी संबंधित नसेल तर ठिक आहे पण ते लिखाण आवडले नाही म्हणुन नकारात्मक प्रतिसाद देणे किंवा त्याला पळवुन लावणे तरी योग्य म्हणावे का? मग एखादा अश्लील लिखाण करत असेल किंवा जातीवाचक लिखाण करत असेल तर त्याला आपण का अडवतो मग? त्याचे लिखाण न वाचणे ही भुमिका आपण घेत नाही ना. कारण मिपा हे सगळ्यांचे आहे आणी ईथले लिखाण सुद्धा सगळ्यांसाठीच आहे असे मला वाटते.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
9 Jun 2009 - 10:19 am | वेताळ
इथे काय वाचायचे काही नाही वाचायचे हे तुमच्या हातात आहे. एकाद्याचे विडंबण नाही आवडले तर नका वाचु. बाकी मराठी भाषेचा ईकास करायचा असेल,डोकेबाजाची वांझोटी चर्चा घडवुन आणायची असेल तर मराठी साहित्य परिषद आहेच की. इथे आम्ही आपले दिवसभरचा उत्साह परत मिळवायला येतो आणि आनंदी मनाने घरी जातो. तेवढे जरी मिळाले तर खुप आहे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
9 Jun 2009 - 6:32 pm | आनंद घारे
हे मी इथे लिहिले आहे. त्यानंतर त्यात बदल झालेला नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
3 Nov 2010 - 3:19 pm | यशोधरा
ममो, चांगला पण सद्ध्या बिन उपयोगाचा धागा.
28 Sep 2011 - 10:57 pm | आशु जोग
अगदी पटण्यासारखे आहेत विचार यांचे
अशा लेखांचे नेहमीच स्वागत !