साहित्य:
१ वाटी बडीशोप ( कच्ची ) , २ वाट्या साखर , मीठ , पाणी.
कृती:
बडीशोप १ वाटीभर पाण्यात २ तास भिजत ठेवावी ,
साखर २ वाट्या पाण्यात विरघळवून घ्यावी.
बडीशोप मिक्सर मधून वाटून घ्या (पाण्यासकट)
पूर्णपणे वस्त्रगाळ करून घ्यावी.
मग साखरेच्या पाण्यात मिक्स करावे.
आणि सर्व्ह करताना १ भाग मिश्रणात ४ भाग थंड पाणी आणि चवीपुरते मीठ घालून सर्व्ह करावे.
प्रतिक्रिया
7 Jun 2009 - 10:45 am | अनंता
जिर्याचे, धण्याचेही सरबत करता येईल!
कसें?
प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
7 Jun 2009 - 10:50 am | श्रीयुत संतोष जोशी
नक्कीच.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
7 Jun 2009 - 11:35 am | मराठमोळा
थोडा उशीर केलात जोशीसाहेब..
महाराष्ट्रात आता वाफारणारा चहा आणी खुसखुशीत गरमागरम भजे यांची गरज वाढली आहे.. थंडगार पावसामुळे. :)
असो, पाकृ छान आहे. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
7 Jun 2009 - 11:58 am | सुनील
सहज करता येण्यासारखे सोपे सरबत!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
14 Jun 2009 - 9:28 am | पक्या
छान.