खानदेशी शेव भाजी

दिपाली पाटिल's picture
दिपाली पाटिल in पाककृती
2 Jun 2009 - 4:10 am

साहित्यः

१ वाटी कांदा - उभा चिरून
१/२ वाटी सुके खोबरे
१ टेस्पु. पोहे
२-३ लसुण पाकळ्या (सोलून)
१ १/२ इंच आले
१ १/२ टि स्पु गरम मसाला
तिखट चवीनुसार
मिठ चवीनुसार
१/२ वाटी तेल
३-४ वाट्या गरम पाणी - मी अंदाजाने च टाकते.
१ वाटि तिखट शेव

कृति:
१) कांदा, १ टे स्पु. तेल घालुन भाजुन घ्यावा. कांदा चांगला तपकिरी रंगा चा भाजला गेला पाहिजे.
२) खोबरे सोनेरि रंगा वर भाजुन घ्या. तसेच पोहे पण थोड्या तेलात भाजुन घ्या.
३) कांदा + खोबरे + पोहे +आले + लसुण + गरम मसाला , पाणी घालून नीट बारिक वाटुन घ्या.
४) बाकिचे तेल पातेल्या त किंवा कढई त गरम करुन घ्या.
५) तेलात वरिल बारिक केलेले वाटण + तिखट टाका.
६) आता तेल सुटे पर्यंत मध्यम आचे वर परतवत रहा.
७) छान तेल सुट्ले पाहिजे नहितर चोथा पाणी होतो मसाला.
८) आता गरम पाणी , मिठ टाकुन मध्यम आचे वर उकळी यायला ठेवा.
९) जेवायच्या १० मिनिटे आधी तिखट शेव टाकुन वाढा.

टिपः
शेव खुप आधी टाकुन ठेवु नये नाहितर लगदा बनतो.
मस्त कांदा लिंबू घेउन खावे.

प्रतिक्रिया

मितालि's picture

2 Jun 2009 - 4:15 am | मितालि

सही... खुप छान आहे ..

टारझन's picture

2 Jun 2009 - 9:14 pm | टारझन

आयच्यान ... खरं सांगतो .. बणेल ओला झाला लाळ गळून ...
आमची आई .. असली झण्झणीत शेवची भाजी करते .. त्याची आठवण झाली ..
बेष्ट ..

- टारझन
(मु.पो. सावदा)

रेवती's picture

2 Jun 2009 - 5:30 am | रेवती

फारच झकास दिसते आहे भाजी!
मसाल्यात पोहेसुद्धा घालायचे म्हणजे अगदी वेगळाच प्रकार!
मी विचारच करत होते या अठवड्यात ही भाजी करायचा......बरी सापडली कृती! ;)
केल्यावर कळविनच!
एक शंका, भाजीबरोबर पोळी खायची की भात?

रेवती

दिपाली पाटिल's picture

2 Jun 2009 - 7:14 am | दिपाली पाटिल

रेवती,
आम्ही आधी पोळी सोबत खातो आणि नंतर भातासोबत... :)
मसाल्यात पोहे घातल्याने भाजी मिळून येते पण जास्त पोहे घालू नयेत, एखाद चमचा पुरे होतात.
दिपाली :)

रेवती's picture

2 Jun 2009 - 4:17 pm | रेवती

आम्ही आधी पोळी सोबत खातो आणि नंतर भातासोबत...
हा हा हा.

रेवती

अनुप कोहळे's picture

3 Jun 2009 - 2:28 am | अनुप कोहळे

मस्त गावरणी ज्वारी चि भाकरी आणि शेवभाजी....आहा हा हा......
कांदा....लिंबाची फोड......
नाकातोंडातून पाणी आले.....नुसत्या आठवणीने.....

दिपाली पाटिल's picture

2 Jun 2009 - 7:19 am | दिपाली पाटिल

ही भाजी थोडी तिखट च असते.

दिपाली :)

अनिता's picture

2 Jun 2009 - 5:41 am | अनिता

झकास...

बर्याच दिवसा॑न॑तर सय आली शेव भाजीची....

प्राजु's picture

2 Jun 2009 - 6:07 am | प्राजु

आईऽऽऽ शपथ्थ!!
जबरी!!!!!!!!!!
या भाजीत पोहे असतात हे माहीतीच नव्हतं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विंजिनेर's picture

2 Jun 2009 - 6:32 am | विंजिनेर

अरे भाई , आ शाक तो आपडा सेव टमाटानाच शाक होय... सुरतमा बहु सरस मळसे.. खानदेसमा क्यांथी आवी गयु?

विंजिनेर पटेल

दिपाली पाटिल's picture

2 Jun 2009 - 7:16 am | दिपाली पाटिल

या शाक मध्ये टोमॅटो नाहिये..

खानदेसमा क्यांथी आवी गयु? :/

दिपाली :)

घाटावरचे भट's picture

2 Jun 2009 - 6:36 am | घाटावरचे भट

आहाहा.... सुट्टीत खूप खेळून दमून आल्यावर 'आजीऽऽ भूऽऽक' अशी मारलेली आरोळी आणि मग आजीने पानात वाढलेली अस्सल खानदेशी पद्धतीची गरम गरम शेव भाजी आणि पोळी आठवली. जीव कासावीस की हो झाला.

अवलिया's picture

2 Jun 2009 - 7:27 am | अवलिया

झ क्का स !!
बास ! दुसरा शब्दच नाही :)

--अवलिया

क्रान्ति's picture

2 Jun 2009 - 8:03 am | क्रान्ति

खुसखुशीत भाजी मस्त! करून पहायला हवी!
:) क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा

नंदन's picture

2 Jun 2009 - 8:50 am | नंदन

पाककृती. आमच्या महाराष्ट्र मंडळातल्या भुसावळकडच्या एका कुटुंबाने शेवभाजीचा बेत केला होता त्याची आठवण झाली -

Shevbhaji

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सँडी's picture

2 Jun 2009 - 8:57 am | सँडी

वा! शेव भाजी!

झख्खास!

मराठमोळा's picture

2 Jun 2009 - 11:19 am | मराठमोळा

अतिसुंदर... :)
ही गरम मसाल्याची शेव भाजी आहे...अस्सल काळ्या मसाल्याची शेव भाजी फार सुंदर लागते... नाशिकमधे तर जवळपास सर्व ठिकाणी मिळते.

काही लोकं भावनगरी शेव वापरतात.. ती सुद्धा छान लागते पण त्यात सोडा जास्त असल्याने पोटासाठी तेवढी चांगली नाही. ;)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

विसोबा खेचर's picture

2 Jun 2009 - 11:27 am | विसोबा खेचर

पाकृ जबर्‍याच!

दिपाली, जियो..! :)

तात्या.

जागु's picture

2 Jun 2009 - 11:32 am | जागु

वा. मस्तच.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jun 2009 - 11:41 am | परिकथेतील राजकुमार

उच्च !
ह्या रविवारी हा बेत नक्की !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

शार्दुल's picture

2 Jun 2009 - 11:48 am | शार्दुल

करुनच बघते ,,,,,, आता ,,,,,

नेहा

स्वाती दिनेश's picture

2 Jun 2009 - 12:23 pm | स्वाती दिनेश

आज सकाळीच मला शेवभाजीची आठवण झाली आणि मिपा उघडल्यावर तीच दिसली.. पोह्यांचे मलाही माहित नव्हते.
पण इथे फ्राफुत शेव अगदी बंडल मिळते, :( तरीही करीनच एकदा लवकरच..
स्वाती

माधुरी दिक्षित's picture

2 Jun 2009 - 12:54 pm | माधुरी दिक्षित

भाजी झकासच आहे ग !!!!!
पण याच्या ग्रेव्हीत टोमॅटो का वापरत नाहीस?

नितिन थत्ते's picture

2 Jun 2009 - 1:01 pm | नितिन थत्ते

जबरी.
मिसळपाववर अगदी सुयोग्य पाककृती.

खराटा
(रंग माझा वेगळा)

शाल्मली's picture

2 Jun 2009 - 5:03 pm | शाल्मली

मस्त दिसत्ये शेव भाजी.
सध्या फक्त फोटोवरच समाधान मानावं लागणार भारतात जाईपर्यंत ..
इथे तशी शेव मिळत नाही. :(

--शाल्मली.

चकली's picture

2 Jun 2009 - 7:35 pm | चकली

कसली भारी दिसतेय शेवभाजी!! मस्तच !!

चकली
http://chakali.blogspot.com

दिपाली पाटिल's picture

2 Jun 2009 - 9:07 pm | दिपाली पाटिल

माधुरि दिक्षीत - अस्सल खानदेशी ग्रेव्यां मध्ये टोमॅटो नसते . :)
स्वाती ताई, चकली - तुमचे प्रतिसाद आले म्हणजे परिक्षे त पास झाल्यासारखं वाटतं. :D
बाकि तात्या, परा,प्राजु, रेवती, मिताली,अनिता, क्रांती, खराटा, अवलिया,शाल्मली, सँडी, आणि ज्यांची नावं विसरली असेल त्यांनासुध्दा मनापासून धन्यवाद.
बागडू -- खानदेशा त सगळ्या आमट्यां ना भाजी च म्हणतात.
मराठमोळा - काळ्या मसाल्याची कशी असते शेवे ची भाजी ? पाकृ दिलीत तर ....:)
सगळे करून बघा आणि फोटो टाका...

दिपाली :)

समिधा's picture

2 Jun 2009 - 9:59 pm | समिधा

खुपच छान दिसतीय ही भाजी ,खुप दिवसात केली नाही आता करुन बघेन

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

श्रीयुत संतोष जोशी's picture

6 Jun 2009 - 8:52 am | श्रीयुत संतोष जोशी

लै भारी आहे ही पाकक्रिया.
काही वर्षापूर्वी भुसावळ ला एका भावाच्या लग्नाला गेलो होतो त्यावेळी आदल्या दिवशी त्या कार्यालयात ही शेवभाजी प्रथम खाल्ली होती.
अजूनही जिभेवर ती चव रेंगाळते आहे.

( दुसर्‍या दिवशीचं जेवण मात्र अगदीच बावळट होतं )

ही पाकृ दिल्याबद्दल आभार.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

बबलु's picture

6 Jun 2009 - 1:33 pm | बबलु

टोटल आडवा झालो.
आता करायलाच पाहिजे. जातो कुठे.

दिपाली..
ब्रेड बरोबर खायला सुद्धा चांगली लागते ना ?

....बबलु

कुंदन's picture

10 Jun 2009 - 12:45 pm | कुंदन

एकदम झकास दिसतीये भाजी....

जेवण झाल्यावरही लिंबु पिळुन अशी आंबट-तिखट भाजी ओरपण्यात काय मज्जा येते....

प्रभाकर पेठकर's picture

10 Jun 2009 - 1:00 pm | प्रभाकर पेठकर

शेवभाजीची पाककृती आणि छायाचित्र जबरी आहे.
सोबत जोंधळ्याची भाकरी आणि जमल्यास खानदेशी भरीत (वांग्याचे) हवे बुवा!

लवकरच करून पाहतो म्हणणार होतो पण भाजीवरील तेलाचा तवंग पाहिल्याबरोबर आमच्या फॅमिली डॉक्टरांची कृद्ध नजर आठवली.
(ते कोकणांत त्यांच्या गावी गेले की करू.)

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

दिपाली पाटिल's picture

12 Jun 2009 - 5:13 am | दिपाली पाटिल

सोबत जोंधळ्याची भाकरी आणि जमल्यास खानदेशी भरीत (वांग्याचे) हवे बुवा!

प्रभाकर , या भाजी सोबत जोंधळ्याची भाकरी आणि खानदेशी भरीत नाही खात, या सोबत पोळी , भात खातात. आणि सोबत लिंबु पिळुन, कांदा, टोमॅटो, मुळा खातात.
हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने दोघांची ही चव नीट लागणार नाही. :)

दिपाली :)

दिपाली पाटिल's picture

12 Jun 2009 - 5:13 am | दिपाली पाटिल

सोबत जोंधळ्याची भाकरी आणि जमल्यास खानदेशी भरीत (वांग्याचे) हवे बुवा!

प्रभाकर , या भाजी सोबत जोंधळ्याची भाकरी आणि खानदेशी भरीत नाही खात, या सोबत पोळी , भात खातात. आणि सोबत लिंबु पिळुन, कांदा, टोमॅटो, मुळा खातात.
हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने दोघांची ही चव नीट लागणार नाही. :)

दिपाली :)

मुक्ता's picture

11 Jun 2009 - 9:44 pm | मुक्ता

खानदेशी भरीत (वांग्याचे) ? अरे वा...

रेसिपी डकवा..

../मुक्ता

संदीप चित्रे's picture

11 Jun 2009 - 10:19 pm | संदीप चित्रे

हा एक प्रकार आत्तापर्यंत कधी खाल्ला नाहीये :(
बघू लवकरच जमवावं लागेल.

दिपाली पाटिल's picture

12 Jun 2009 - 5:07 am | दिपाली पाटिल

खानदेशी भरित पाकृ द्यायची होती मला पण फोटो नाहिये. ते थोड्या वेगळ्या पद्धती ने करतात..

दिपाली :)

राकेशपाटील's picture

11 Jun 2009 - 11:43 pm | राकेशपाटील

पार्सेल मिलेल का...........

राकेश
मु पो अमळनेर.....

विसोबा खेचर's picture

12 Jun 2009 - 12:25 am | विसोबा खेचर

सकाळ की कुठल्याश्या अंकात हीच पाकृ आली आहे! :)

तात्या.

दिपाली पाटिल's picture

12 Jun 2009 - 5:05 am | दिपाली पाटिल

ही पाकृ मला झोपेतुन उठवुन विचारली तरी येईल. :) ... माझी च नाही घेतली ??? /:) /:) /:)

विसोबा खेचर's picture

12 Jun 2009 - 7:10 am | विसोबा खेचर

माझी च नाही घेतली ???

येस! तुझीच ढापली आहे कुणीतरी! सर्वसाक्षी का कुणीसं मला म्हणत होतं!

आता वयानुसार नक्की आठवत नाही..

असो

तात्या.

चैत्रपालवी's picture

12 Jun 2009 - 11:15 am | चैत्रपालवी

एकदम मस्त... माझी काकी मस्त करते ही भाजी... आता मी पण करुन बघेन...
पण दिपालीताई, पोहे कुठले वापरु सान्गाल का? म्हणजे जाड, बारिक?? की कुठलेही वापरले तरी चालतील? कारण आमच्या इकडे जाड पोहे म्हणजे बर्‍यापैकी कडक मिळतात...

हरकाम्या's picture

12 Jun 2009 - 5:46 pm | हरकाम्या

आजच 'हिला " भाजी करायला सांगतो. अगदी वघळ येइस्तो हाणायचा बेत ठरवलाय, दिपालिताइ बाकी प्रतिक्रिया उद्या.......