नारळीपाकाचे लाडू

रेवती's picture
रेवती in पाककृती
31 May 2009 - 1:28 am

साहित्य: पाव किलो जाड रवा, सव्वा मोठी वाटी नारळाचा चव, पाव किलो साखर, अर्ध्या वाटीपेक्षा थोडे कमी साजूक तूप,
पाव वाटी दूध, पाच वेलदोड्यांची पूड, आवडत असल्यास बेदाणे दीड ते दोन टेबलस्पून, साखरेच्या निम्मे पाणी.

कृती: रवा गुलाबी रंगावर तूप घालून भाजावा. पाव वाटी दूध शिंपडून पुन्हा भाजावा.
आता नारळाचा सव्वा वाटी चव घालून भाजण्यास सुरुवात करावी. रवा फुलू लागेल व कोरडाही होऊ लागेल
त्यावेळी परातीत हे मिश्रण काढून घ्यावे. त्याच कढई किंवा पातेल्यात आता पाक करण्यास ठेवायचा आहे.
मापाचे पाणी व साखर एकत्र करून मध्यम आचेवर ठेवावे. सतत ढवळत रहावे.
दीडतारी पाक करावा, त्यात वेलदोडापूड, बेदाणे घालून नंतर रवा व नारळाचे मिश्रण घालावे.
व्यवस्थित ढवळून झाकून ठेवावे. एक तासाने पुन्हा ढवळून बघावे, मिश्रण आळायला सुरुवात झालेली असेल.
साधारण चार तासाने लाडू वळावेत.

लाडू लवकर तयार हवे असतील तर दोनतारी पाक करावा त्यामुळे दोनेक तासातच लाडू वळता येतात.
रव्याचा लाडू खरखरीत व किंचित बसका हवा. त्यासाठी रवा जाडसर वापरावा.
वरील साहित्यामध्ये बेताच्या आकाराचे सोळा लाडू झाले.
ही पाककृती सौ. आई, सौ. सासूबाई यांच्या अनुभवातून मिळालेले सल्ले व माझ्याकडील पुस्तकातील कृती यावर आधारित आहे.

रेवती

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

31 May 2009 - 1:36 am | बिपिन कार्यकर्ते

उ त्कृ ष्ट ! ! ! पण त्रास झाला. :(

बिपिन कार्यकर्ते

Nile's picture

31 May 2009 - 1:40 am | Nile

मस्त दिसतायत लाडु! च्यामारी लाडु खाउन वर्ष लोट्लं! :(

आजी बरोबर तिळाचे लाडु वळायचो त्याची आठ्वण झाली. :)

मीनल's picture

31 May 2009 - 2:08 am | मीनल

मस्त फोटो .एक उचलावा आणि अस्सा घालावा तोंडात!!!!!!!!!!!

मीनल.

अवलिया's picture

31 May 2009 - 6:14 am | अवलिया

वा! मस्त !!!!
रेवतीताई सकाळी सकाळी लाड्डु ! वा!
आजचा दिवस झक्कास जाणार बर का!
करतो, लाडु करायचा प्रयत्न करतो आणि काय झाले (लाडु की दगड ;) ) नक्की कळवतो :)

सुप्पर !!!!!!!

--अवलिया

सहज's picture

31 May 2009 - 7:34 am | सहज

काय फोटो आहे जीवघेणा. रव्याचे लाडू खर तर इतके आवडत नसले तरी हा फोटो पाहून ते नक्कीच भारी असणार असे वाटते.

सुंदर.

विसोबा खेचर's picture

31 May 2009 - 7:39 am | विसोबा खेचर

फोटू जबराच आला आहे. त्यावरून लाडू अत्यंत उच्च दर्जाचे झाले आहेत हे समजते..!

या सुंदर पाकृकरता रेवतीकाकूंना अनेकानेक धन्यवाद...

तात्या.

समिधा's picture

31 May 2009 - 9:36 am | समिधा

खरच खुप छान झाले आहेत लाडू
अग २ तारी पा़क तयार झाला हे कस ओळखायच... :S

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

मदनबाण's picture

31 May 2009 - 10:01 am | मदनबाण

व्वा...ताई लाडू मस्तच झालेले दिसतात. :)
वेलदोडापूडीने येणारी चव आणि सुगंध हा लाडवाला एक वेगळीच लज्जत देतो...

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

क्रान्ति's picture

31 May 2009 - 10:30 am | क्रान्ति

मस्त झालेत लाडू!
<:P
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

अविनाशकुलकर्णी's picture

31 May 2009 - 3:11 pm | अविनाशकुलकर्णी

खुप छान्,,पाणी सुटले तोंडाला..आयुश्यात प्रथमच राग आला मधुमेह असल्याचा

लवंगी's picture

1 Jun 2009 - 6:12 pm | लवंगी

कोणताही गोड पदार्थ करता येतो. मधुमेहासाठी वरदान आहे हे. बाकी लाडू क्लास..

शार्दुल's picture

31 May 2009 - 5:26 pm | शार्दुल

मस्तच!!!!!!!!!!!!!

शाल्मली's picture

31 May 2009 - 5:40 pm | शाल्मली

फारच सुंदर दिसताहेत लाडू.
फोटो मस्तच आलाय.
फक्त तो साखरेचा पाक म्हणजे जरा भीतीच वाटते करायला. म्हणून मी अजूनपर्यंत रव्याच्या लाडवांच्या वाटेला गेले नाही. :(
कधी धीर झाला तर नक्की करुन बघीन.

--शाल्मली.

माधुरी दिक्षित's picture

31 May 2009 - 5:46 pm | माधुरी दिक्षित

लाडू मस्तच दिसत आहेत!!!
दीड / दोन तारी पाक कसा ओळखायचा ?

रेवती's picture

31 May 2009 - 6:33 pm | रेवती

समिधा, शाल्मली व माधुरी ,
पाक रव्याच्या लाडवासाठी बरोबर तयार आहे की नाही हे पाहताना आपण थेंबभर पाक
तर्जनी व अंगठा यामध्ये घेऊन त्याची तार येते आहे का हे पाहतो.
कच्च्या पाकाची तार येत नाही, त्याहीपुढे तो उकळवून पुन्हा पहावे.
जर तर्जनी व अंगठा यामध्ये पाकाची एक तार व्यवस्थित आली व पुढची मात्र तुटली तर दिडतारी
पाक व दोन्हीवेळा तारा आल्या तर दोन तारी अशी माझी व्याख्या मीच ठरवलेली आहे.
आतापर्यंत मलाही कोणी सांगणारे भेटले नाही.:( स्वातीताई यावर मार्गदर्शन करू शकेल काय?
तरी वरील साहित्याचे लाडू करताना पाक होण्यास (मध्यम आचेवर) चार मिनिटे लागली.
दोनतारीसाठी कदाचित अजून एखादा मिनिट जास्त वेळ लागला असता.
(नविन लग्नं झाल्यावर मी लाडू करावयास घेतले. पाक उकळायला ठेउन समोर राहणार्‍या
आज्जींकडे जाउन थोड्या गप्पा मारून लाडवांची हकिगत सांगितल्यावर त्यांनी डोक्याला हात लावला.
घरी जाउन बघते तो पक्का गोळीबंद पाक तय्यार.) ;)

रेवती

माधुरी दिक्षित's picture

31 May 2009 - 6:44 pm | माधुरी दिक्षित

ओके , युक्ती चांगली आहे , करुन बघते आता
धन्यवाद

चकली's picture

1 Jun 2009 - 8:57 am | चकली

छानच !! फोटो एकदम मस्तच आलाय!

चकली
http://chakali.blogspot.com

दिपाली पाटिल's picture

1 Jun 2009 - 9:42 am | दिपाली पाटिल

बरं झालं रेवती ताई ही पाकृ टाकलीत. मी नक्कि करुन बघेन. बाकी फोटो एकदम मस्त.

दिपाली :)

निखिल देशपांडे's picture

1 Jun 2009 - 12:46 pm | निखिल देशपांडे

अरेरे काल ही पाककॄती वाचली असती तर.... आईच्या हातचे रवा खोबरे लाडु खायला मिळाले असते... आता पुढच्यावेळ घरी जाण्या पर्यंत वाट बघावी लागणार...
बाकी आईला विचारावी लागेल पाककृती???
==निखिल

स्वाती दिनेश's picture

1 Jun 2009 - 12:53 pm | स्वाती दिनेश

फोटू क्लास...लाडू मस्त दिसताहेत. करायलाच हवेत आता, कित्येक दिवसात केले नाहीत.
रेवती, दिडतारी पाक मला माहित नव्हता,रव्याच्या लाडवांसाठी मी एकतारी पाक करते.पण तू म्हणतेस तसे एक तारी पाकाहून थोडा जास्तवेळ उकळायचे पण दोनतारी इतके नाही असे असावे.. :)
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jun 2009 - 12:59 pm | परिकथेतील राजकुमार

वाह वाह वाह !
सकाळ गोड झाली.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

जागु's picture

1 Jun 2009 - 1:07 pm | जागु

फोटो आणि पाकृ दोन्ही छान.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jun 2009 - 2:56 pm | बिपिन कार्यकर्ते

रोज एकदा लाडवांचे दर्शन घेतल्याशिवाय चैन नाही पडत आजकाल. :(

बिपिन कार्यकर्ते

रेवती's picture

1 Jun 2009 - 10:55 pm | रेवती

सर्व प्रतिसादकांचे आभार!
बिपिनभाऊ, आपले दोनदा आभार!

रेवती

स्मिता.'s picture

7 Jun 2011 - 11:47 pm | स्मिता.

लाडू कसले टेम्टींग दिसत आहेत. आता हे करणे आलेच...

साखरेच्या पाकाचे पदार्थ कधीच करून पाहिले नाहियेत त्यामुळे कॉन्फिडन्स जरा कमी आहे. पण मोह त्यावर नक्कीच मात करेल असं वाटतंय.

माझ्याकडे वजनकाटा नाहीये. रवा-साखरेचं माप वाट्यांमध्ये सांगता येईल का? आणि नारळाच्या चवाऐवजी कोरड्या खोबर्‍याचा खिस चालेल का?

पाव किलो म्हणजे माझ्याकडच्या मोठ्या पावणेदोन वाट्या होतात.
कोरड्या खोबर्‍याच्या कीस नको गं!
असं ऐकलय की नारळाच्या दुधात कोरडा कीस भिजवून ठेवल्यास चांगली चव येते.
हा प्रयोग मी केलेला नाही.

ह्याचं पार्सल कधी मिळणार??? ;)

गप्प बैस.
मोठ्या विकांतला वाट पहायला लावलीस्......येतो म्हणून आला नाहीस्.....मिपा बंद होतं म्हणून चेपुवर तुला (नवर्‍यातर्फे) खडसवायला गेले तर महाराज कुंग फू पांडा (द्वितीय) पहात बसले होते.

रेवतीआज्जी लाडू छानच हो !!

सूड's picture

20 Dec 2017 - 1:51 pm | सूड

Laadu