तळलेले (कुरकुरीत) सुके बोंबील.

जागु's picture
जागु in पाककृती
29 May 2009 - 12:18 pm

साहीत्य :
७-८ सुके बोंबील (तुकडे करुन)
दोन चिमुट मिठ (कमीच घालावे कारण आधीच हे खारट असतात)
थोडी हळद, हिंग, मसाला, पाव चमचा लिंबाचा रस, तळण्यापुरते तेल.

बोंबील धुवून घ्यावेत. त्याला हिंग, हळद, मिठ, मसाला, लिंबाचा रस चोळावा
तवा गरम करून त्यात २ चमचे तेल टाकुन बोंबील टाकावे. गॅस मंद ठेवावा.
मधून मधून हलवावेत. साधारण ५ मिनीटांत हे तळून होतात मग गॅस बंद करावा.

हे थंड झाले की कडक होऊन कुरकुरीत लागतात.

प्रतिक्रिया

सुर's picture

29 May 2009 - 12:23 pm | सुर

लेखात एक छोटीशी चुक झाली आहे. तुम्ही बोंबील न लिहिता लिंबु लिहिल आहे.

सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

जागु's picture

29 May 2009 - 12:27 pm | जागु

=)) =)) सुर धन्यवाद हो. मी बघितलच नव्हत.

सुर's picture

29 May 2009 - 12:37 pm | सुर

:)

सुर तेच छेडीता......
:) Waiting For Good Luck To Come In My Life :)

काजुकतली's picture

29 May 2009 - 1:38 pm | काजुकतली

जागु अगं किती धन्यवाद देऊ तुला..... घरी मुलांना खुप आवडतात सुके बोंबिल... आणि मलाही..

साधना

जागु's picture

29 May 2009 - 1:43 pm | जागु

मुलांना करुन दे आणि तु पण खा म्हणजे मिळाले मला धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

30 May 2009 - 4:14 am | विसोबा खेचर

आम्ही विनाफोटूच्या पाकृंना बरा-वाईट, कोणताच प्रतिसाद देत नाही..

क्षमस्व..

तात्या.

जागु's picture

30 May 2009 - 10:42 am | जागु

एवढा तरी प्रतिसाद दिलात त्या बद्दल धन्यवाद.

खादाड's picture

30 May 2009 - 4:25 pm | खादाड

कुरकुरीत पा.क्रु. :)
करुन बघावीच लागेल !!!!