मटातील संतापजनक शीर्षकः शिवस्मारक आधी विघ्न बाबासाहेबांचे

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
27 May 2009 - 2:09 am
गाभा: 

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4579490.cms

वरील बातमी पहा.
समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक बनत आहे. त्या शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पुरंदरे आहेत. संभाजी ब्रिगेडसारख्या अन्य काही ब्राह्मणद्वेष्ट्या आणि आगलावू संघटनांनी बाबासाहेबांना हाकला नाहीतर त्यांच्यावर हल्ला करू अशी धमकी दिली आहे.
का तर म्हणे बाबासाहेब दादोजी कोंडदेवांना शिवाजीचे गुरू मानतात म्हणून. वा रे वा!
ह्यात बाबासाहेबांचे विघ्न काय आहे? असली दळभद्री हेडलाईन बातमीला काय दिली आहे?
हे विघ्न संभाजी ब्रिगेडादी विघ्नसंतोषी लोकांचे आहे.
बाबासाहेबांची शिवाजीबद्दलची भक्ती जगजाहीर आहे. एक क्षणभर असे मानू की दादोजी कोंडदेव शिवाजीचे गुरु नव्हते. पण म्हणून काय तसे म्हणणार्‍या लोकांवर हल्ला करायचा?
असला डोकेफिरूपणा मुसलमान करतात (आठवा महंमदाचे व्यंगचित्र व त्यानंतर झालेला दंगा). तो आपण करू नये.
शिवाजीचे थोरपण हे निव्वळ त्याच्या गुरु, आई, वडिलांचे नाही. शिवाजीचे स्वतःचे आहे. त्यांचा गुरू कुणी होता का नव्हता यावर त्यांचे बावनकशी कर्तृत्व कमीजास्त होणार नाही तेव्हा असले डोक्यात राख घालायचे प्रकार बंद केले पाहिजेत.
बघू आता आपले लाडके कॉंग्रेस सरकार काय करते ते.

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

27 May 2009 - 2:17 am | संदीप चित्रे

>> असला डोकेफिरूपणा मुसलमान करतात (आठवा महंमदाचे व्यंगचित्र व त्यानंतर झालेला दंगा). तो आपण करू नये.
अगदी योग्य लिहिलय.

मटासारखे पेपर अशी सनसनाटी (!) शीर्षकं देत असावीत कारण त्यामुळे लोकांचे लक्ष बातमीकडे जातं.
म्हणजे दुकानाच्या बाहेर मोठी पाटी लावायची 'एक रूपयात दुधी हलवा' !!!
माणूस पैसे देऊन आत आला की छताला दोरीनं टांगलेला दुधी भोपळा दाखवून सांगयचं, "हं.. आता हा दुधी 'हलवा' :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

स्वानन्द's picture

28 May 2009 - 8:35 am | स्वानन्द

शेवटी टाईम्स ऑफ इडिया चाच भाऊ तो. पण आत्ता मुद्दा आहे तो संभाजी ब्रिगेड सारख्या फालतू लोकान्च्या आगाऊपणाचा!

विकि's picture

30 May 2009 - 11:49 pm | विकि

येथे टिचकी मारा वाचनात आले. येथे अधिक माहीती मिळेल असे वाटते.

यन्ना _रास्कला's picture

27 May 2009 - 5:47 am | यन्ना _रास्कला

मराठी आनी मराठी मान्साचे हित आधी इघ्न मटाच.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

भडकमकर मास्तर's picture

27 May 2009 - 9:02 am | भडकमकर मास्तर

आता विधानसभा निवडणुकांसाठी हा सगळा स्टंट चालू आहे....
.... सरकार यावर काहीही म्हणत नसेल म्हणजेच सरकार हे सारे चालवून घेत असेल किंवा सरकारी आशीर्वादानेच हे घडत असेल तर बाबासाहेबांनी तरी का अध्यक्षस्थान भूषवत राहावे???...
सरकार स्पष्ट पवित्रा घेत नाही तोपर्यंत राजीनामा देऊन टाकावा त्यांनी...

.... बाबासाहेब समजा या समितीत नसले तरी शिवस्मारक उत्तम होईल याची खात्री आहे...

प्रकाश घाटपांडे's picture

30 May 2009 - 10:12 am | प्रकाश घाटपांडे

डीडीच्या दुनियेत आत्ताच नेमेची येतात निवडणूका आन जातीयवाद वाचले.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्राजु's picture

27 May 2009 - 9:12 am | प्राजु

आणि शिवरायांचं आणि त्या बाबासाहेबांचं दुर्दैव!!! दुसरं काय??
ज्यांच्या महात्म्यतेतून काही बोध घेऊन जनहिताचं कार्य करायचं सोडून शिवाजीचे गुरू ब्राह्मण होते की नव्हते यावर वाद घालणं म्हणजे शिवाजी राजांचं दुर्दैवचं म्हणावं लागेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वामि's picture

27 May 2009 - 9:28 am | स्वामि

संभाजी ब्रिगेड ही बहुतांश मराठा (९६ कुळी वगळता)संघटना आहे.राज ठाकरे बाबासाहेबांना गुरुस्थानी मानतात.म.न.से.ने पुण्यात कॉग्रेसला केलेली मदत व राजची पवारांबद्दल केलेली विधानं(धोकायंत्र,निवडुन येणार्या नेत्यांची मोळी)राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागलेली आहेत.त्यात बाबासाहेबांची जात हे तर आयतच कोलीत मिळालय.त्यांना लक्ष्य बनवून राष्ट्रवादी म.न.से. व कॉग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणु पहातेय.

डॉ.प्रसाद दाढे's picture

27 May 2009 - 9:35 am | डॉ.प्रसाद दाढे

जातीय विद्वेष पसरविणार्‍या (तेही संभाजी महाराजांसारख्या धर्मवीराच्या नावाने !) ह्या संघटनांना कॉम्ग्रेस वा राष्ट्रवादींचा छुपा
पाठिंबा असला तरी सर्वसामान्य ब्राम्हणेतर समाजाचा फारसा पाठिंबा नाही ही सत्य परिस्थिती आहे. हे सगळे निरूद्योग्यांचे धंदे आहेत. कष्टकरी
जनतेला जुनी मढी उकरून उगीचंच भांडायला आत्ता वेळच नाही. पावसाळा जवळ आलाय, तेंव्हा शेतीची कामे करायची की ह्या मूर्खांच्या नादी लागायचं? केवळ
मिडिया प्रसिद्धी देते म्हणून असल्यांचे फावते, तेंव्हा माध्यमांनी थोडेसे तारतम्य बाळगावे.
ज्या बाबासाहेबांनी आयुष्यभर थोरल्या महाराजांचे पोवाडे गायले, अक्षरशः रक्त गाळून दिवसरात्र शिवचरित्र महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचविले,
क्लिष्ट इतिहासाला लालित्याची जोड देऊन 'राजा शिवछत्रपती' सारखा असामान्य ग्रंथ लिहिला, त्यांच्यावर अशी राळ उडविताना ह्यांना शरम कशी
वाटत नाही? बाबासाहेबांसारख्या वयोवृद्ध ज्ञानतपस्व्यांचा अपमान करून स्वतःचे उपद्रवमूल्य दाखविणार्या संघटनांवर सामाजिक बहिष्कार घातला पाहिजे.
असल्या समाजघातकी संस्थांवर तातडीने बंदी घालून फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे.

विशाल कुलकर्णी's picture

27 May 2009 - 9:58 am | विशाल कुलकर्णी

असेच म्हणतो.
माझे तर पुढे जावुन असे म्हणणे आहे की संभाजी ब्रिगेडवाल्यांनी शिवशाहिरांपेक्षा शिवप्रभुंचा जास्त अभ्यास असलेला माणुस आणावा आम्ही त्यालाही स्विकारु. पण हि गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे हे ही आम्ही जाणतो.

सस्नेह
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री

विनायक पाचलग's picture

29 May 2009 - 5:15 pm | विनायक पाचलग

या प्रसंगाबाबत सांगोपांग चर्चा करुन विरोधकांचे पितळ पुराव्यासह उघडे पाडणार्‍या व थेट प्रक्षेपणात मुख्यमंत्राना"अंगावर आले तर शिंगावर घेवु "असे वक्तव्य करायला लावणार्‍या निखिल वागळेंचे आभार.
बाकी या प्रश्नाची विविध अंगे माहित नसल्याने कोण बरोबर, कोण चुक हे का चाललय ते माहित नाही,मत पण ठरवता येत नाही,
पण परवा निखील वागळेनी जो कार्यक्रम केला त्यामुळे नायक चित्रपटाची आठवण झाली एवढे मात्र खरे

स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......

विनायक पाचलग

वाचताना मन कसे त्याच्या धडाडीपणामुळे, त्याच्या कर्तव्यनिष्ठेमुळे,कॉग्रेसप्रेमामुळे उचबंळुन आले पाहिजे.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

या तथाकथित ब्रिगेड वाल्या लोकांनीच तर भांडारकर संस्था जाळली पुण्यात आणि का तर कुण्या त्यामूर्ख जेम्स लेन ला संदर्भ ग्रंथ दिले म्हणून ! हे म्हणजे असे झाले की बिकिनी विकून्सुद्धा मल्लिका शेरावतने ती घातलीच नाही (ह.घ्या,) तर त्या बिकिनी दुकानदारालाच मारायचे !
अरे पुण्यातील कित्येक इतिहासकारांनी अक्षरशः जिवाचे रान केले होते हे ग्रंथ मिळवायला !
नुसत्या एका विषिष्ट जातीच द्वेष करणार्‍या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा सुद्धा अधिकार आहे का याचा विचार व्हायला हवा ! आणि अश्या लोकांकडून विचार करणे वगैरे अपेक्षा ठेवणे ही आपलीच चूक ठरू शकते !
जसे रामदास स्वामी हे पण महाराजांचे गुरु नव्हते हा शोध तसाच दादोजी कोंडदेव पण गुरु नव्हते हा पण एक शोधच !
कर्मदरिद्रीपण , दुसरे काय? महाराजांची प्रतिमा इतक्या उच्च स्थानी जाणार याचा निखळ आनंद पण आम्हा शिवप्रेमी लोकांना हे लोक घेवू देणार नाहीत आणि त्यात भर राष्ट्रवादींची (वर कुणीतरी लिहिले ते खरे असेल तर !) - ते तर काय काँग्रेस च्या पुढे एक पाऊल्.....विशिष्ट प्रकारच्या टोप्या घालून मतं मिळवणारे लोक आपल्या हिंदुंलोकांसाठी काय करणार कपाळ ?
कालाय तस्मै नमः.....

ज्या औरंगजेबाने महाराष्ट्राच्या छत्रपतींना अनन्वित अत्याचार ,व हालहाल करुन मारले.............तसेच संभाजीराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई व त्यांचे पुत्र शिवाजी यांना जवळपास ३० वर्षॅ कैदेत ठेवले .............त्या औरंगजेबाचा हे संभाजी ब्रिगेड वाले स्त्रीदाक्षिण्य दाखवणारा औरंगजेब असे कौतुक करतात तसेच औरंगजेबाचे शाहु महाराजांवर अतिशय प्रेम वगैरे होते असे विधान करण्यात धन्यता मानतात्..............असल्या लोकांना कसला आलाय स्वाभिमान किंवा महाराजांबद्दल प्रेम्..............शिवचरित्रकार बाबासाहेबांवर हल्ला करण्याची भाषा करणार्‍यांना सरकारची फुस आहेच्.........आज हुसेन दलवाई यांनी देखिल बाबासाहेब हे इतिहासकार नाहित व संशोधकही नाहीत्..........व त्यांनी शिवाजीमहाराजांची प्रतिमा मुस्लिमविरोधी केली असा आरोप करत बाबासाहेबांना यासमितीच्या पदावरुन दुर करावे ही मागणी केली आहे..........म्हणजे छत्रपती हे देखिल सेक्युलर होते असे म्हणायचे आहे का यांना?
ज्या बाबासाहेबांनी आपल उभ आयुष्य थोरल्या महाराजांच्या अतुल्य अश्या शौर्याच व महतीच वर्णन करण्यात घालवल........बाबासाहेबांकडे नुसत बघितल तरी वाटत की त्यांच्यात नक्किच महाराजांचा थोडासा अंश असावा अश्या या थोर तपस्व्यासंदर्भात इतक्या खालच्या पातळीची वक्तव्ये करायचे धाडस तरी कसे होते या संभाजी ब्रिगेड वाल्यांचे.स्वाभिमान कशाशी खातात हे देखिल माहीत नसलेल्यांनी छत्रपतींना एका ठराविक समाजाशीच जोडण्याचा चालवलेला हा निरर्थक अट्टाहास आहे.........छत्रपती हे काय मराठ्यांची खाजगी मालमत्ता समजतात की काय हे?

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

अमोल केळकर's picture

27 May 2009 - 11:21 am | अमोल केळकर

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मराठा समाजातर्फे ( संघटने तर्फे) चाललेले हे सर्व प्रकरण आहे यात शंका नाही. व्होट बँक चे गणित लक्षात घेता सरकारला यात दुर्लक्ष करुन चालणार नाही
या प्रकरणा बरोबरच पुढेमागे मराठा आरक्षणा वरुन महाराष्ट्र पेटला तर त्यात आश्चर्य वाटायला नको.
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

ज्यांनी शिवाजी महाराजांसारख्या धुरंधर, मुत्सद्दी राजकारणी, खंबीर नेतॄत्व असणार्‍या महान राजाची आम्हाला ओळख करून दिली आणि त्या अनुषंगाने इतिहासाची गोडी आमच्यात निर्माण केली अश्या शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेबांना जे काही ऐकावे लागते आहे आणि सहन करावे लागते आहे त्याबद्दल महाराष्ट्रातल्या आमच्या दळभद्री भाईबंदांची मला अतिशय लाज वाटते. त्यांच्या हे लक्षात येत नाही, कि ह्यामागे कोणी संधीसाधू राजकारणी आहेत आणि गेले काही वर्षापासून ते आपला वापर करून घेत आहेत.
शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेबासाहेबांसारख्या व्रती आणि थोर इतिहासकाराचा उल्लेखसुध्दा टि.व्ही.वरच्या बातमीत मुलाखात देताना तुच्छतापूर्वक आणि एकेरी नावाने करुन जो अपमान केला त्याबद्दलही फार वाईट वाटले.

'असा बेधुंद समाज लवकरच रसातळाला जाणार' ही त्याची नांदी आहे.

स्वानन्द's picture

28 May 2009 - 8:47 am | स्वानन्द

अगदी सहमत.

ज्यानी आयुष्यभर शिवरायांचं चरित्र महारष्ट्राच्या कानाकोपर्‍यात नेऊन पोचवलं. शिवाजी महाराजंच्या चरित्राने स्वतः भारले गेले आणि आम्हालाही भारून टाकले अशा बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची थोडी तरी सर आहे का ह्या संभाजी ब्रिगेड वाल्याना?

महाराजांना अक्षरशः खेळणं बनवून टाकलं आहे यांनी!

सुहास's picture

28 May 2009 - 7:04 am | सुहास

महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रांचा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहेच.. त्यामुळे आपापले हितसंबंध जपताना वर्तमानपत्रे सामाजिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करत आहेत... मटाकडून तरी वेगळी अपेक्षा काय असणार? त्यांचे संपादक तर खासदार आहेत शिवसेनेचे...!

--सुहास

नितिन थत्ते's picture

28 May 2009 - 9:32 am | नितिन थत्ते

समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याची गरज काय पडली आहे?
गेटवे ऑफ इंडियावर महाराजांचा पुतळा आहेच की.

खराटा
(रंग माझा वेगळा)

चिरोटा's picture

28 May 2009 - 9:57 am | चिरोटा

स्मारक बघायला येणारे स्मारक बघतातच.पण बर्‍याचवेळा त्यांची नजर स्मारकाचे उद्घाटन कोणी केले येथेही जाते.लोकाना खायला प्यायला दिले नाही तरी हरकत नाही पण स्मरके/पुतळे पाहिजेतच.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

शाहरुख's picture

31 May 2009 - 6:41 am | शाहरुख

कुमार केतकरांचा या वरचा जुना लेख इथे वाचता येईल. (मराठीतील चटकन मिळाला नाही)

याच विनायक माटे यांनी तेंव्हा केतकरांच्या घरावर दगडफेक केली होती.

काजुकतली's picture

28 May 2009 - 11:35 am | काजुकतली

समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याची गरज काय पडली आहे?
गेटवे ऑफ इंडियावर महाराजांचा पुतळा आहेच की.

मला राजांबद्दल नितांत आदर आहे, पण हा प्रश्न मलाही पडला आहे. स्मारकामागची पार्श्वभुमी कोणी समजावून देईल काय??

साधना

काजुकतली's picture

28 May 2009 - 11:39 am | काजुकतली

समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याची गरज काय पडली आहे?
गेटवे ऑफ इंडियावर महाराजांचा पुतळा आहेच की.

मला राजांबद्दल नितांत आदर आहे, पण हा प्रश्न मलाही पडला आहे. स्मारकामागची पार्श्वभुमी कोणी समजावून देईल काय??

साधना

अमोल केळकर's picture

28 May 2009 - 12:01 pm | अमोल केळकर

अमेरिकेतील स्वातंत्र्य देवतेच्या धर्तीवर शिवाजी महाराजांचा समुद्रातील पुतळा असावा अशी कल्पना आहे असे वाचनात आले होते. खर खोटे सरकार जाणो
-------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

बाबासाहेब पुरंदरे शाहीर आहेत. त्यांनी शिवचरित्र सामान्यांपर्यंत पोचविण्याचे काम आयुष्यभर केले आहे. अशा व्यक्तीला विरोध म्हणजे मेटे आणि त्यांच्या जोडीदारांचा करंटेपणा आहे. त्यांनी बाबासाहेबांना विरोध केले हे ठीक; कारण ते जातीयवादीच आहेत. ब्राह्मण आणि दलित द्वेष हा त्यांच्या रक्तात आहे. पण बाबासाहेबांना विरोध केल्यावर शिवाजी महाराजांच्या नावावर पोट भरणाऱ्या शिवसेनेने मेटे, खेडेकर यांना का सुनावले नाही? एकाच माळेचे मणी साले?
आताही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुढे आहेत. त्यांनी आपल्या ठाकरी शैलीत मेटे आणि त्यांचा योग्य समाचार घेतला आहे. वाचा
http://beta.esakal.com/2009/05/28232616/mumbai-raj-thackeray-in-defenc.html

भडकमकर मास्तर's picture

29 May 2009 - 1:32 am | भडकमकर मास्तर

कमाल आहे..
राज भाऊंना मतांची चिंता कशी काय नाही?

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

हुप्प्या's picture

29 May 2009 - 2:39 am | हुप्प्या

समुद्रातले स्मारक बांधणे म्हणजे बरेच खर्चिक काम आहे. ते तसे टिकेल की नाही मला शंकाच वाटते. सरकारी लोकांना खायला एक नवे कुरण मिळेल. जर त्या स्मारकात चुकून दादोजी कोंडदेव वा मोरोपंत पिंगळे असे कुठल्या ब्राह्मणाचे चित्र वा शिल्प असले तर संभाजी ब्रिगेडसारख्या आगलाव्या द्वेष्ट्या लोकांच्या हातात आयतेच कोलित. मला खात्री आहे की ब्राह्मणाच्या प्रतिमेची विटंबना करताना शिवाजीच्या प्रतिमेचीही पर्वा करणार नाहीत हे लोक. अफझलखानाने वा औरंगजेबाने मूर्तीभंजन करताना जितका उत्साह दाखवला असेल त्याच्या कैक पटीने जास्त उत्साह हे खेडेकर प्रभृती ब्राह्मणभंजनात दाखवतील.
शिवाजीचे स्मारक बनवायची एक अत्यंत अवघड कल्पना म्हणजे नेत्यांनी जनतेला आपले मानणे. खर्‍या अर्थाने आपण जनतेचे पाईक आहोत असे वागणे. सरकारी पैशाचा थोडाही गैरवापर न करणे. भ्रष्टाचार तर दूरच. जर अगदी जवळच्या नातलगांनीही गैर वागले तर नि:स्पृहपणे त्यांना शासन करणे.
पण तसे होणे अशक्य आहे.
आपले थोर राज्यकर्ते कोट्यावधी वा अब्जावधी रुपये (करांतून मिळालेले) खर्चून महागडे स्मारकच उभारणार.

प्राजु's picture

29 May 2009 - 2:42 am | प्राजु

शिवाजीचे स्मारक बनवायची एक अत्यंत अवघड कल्पना म्हणजे नेत्यांनी जनतेला आपले मानणे. खर्‍या अर्थाने आपण जनतेचे पाईक आहोत असे वागणे. सरकारी पैशाचा थोडाही गैरवापर न करणे. भ्रष्टाचार तर दूरच. जर अगदी जवळच्या नातलगांनीही गैर वागले तर नि:स्पृहपणे त्यांना शासन करणे.

वाट बघा!!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे's picture

29 May 2009 - 8:53 am | डॉ.प्रसाद दाढे

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे हे शिवभक्त मराठी माणसांचे दैवत आहेत. ते महाराष्ट्राचे मानबिंदू आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले, सचिन तेंडूलकर,
पु. ल. देशपांडे, बाबासाहेब पुरंदरे ही अशी नावे आहेत की ज्यांच्या केवळ नामोच्चारानेच मराठी मन उचंबळून येतं. किंबहुना जे मन उचंबळून येतं,
थरारून उठतं तेच मर्‍हाठी मन अशी व्याख्या करायलासुद्धा हरकत नाही ! मराठी अस्मिता ह्या नावांशी निगडीत आहे. त्यांच्यावर कुणी हल्ला करू
पाहील त्या सूर्याजी पिसाळाची गय केली जाणार नाही. राज ठाकरे यांनी समाज-द्रोह्यांना योग्य जागा दाखवून मराठी माणसाच्या मनाचा ठाव
घेतला आहे, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! येत्या विधानसभा निवडणूकांमध्ये याचे पडसाद उमटल्यावाचून राहणार नाहीत ! महाराष्ट्रात मराठेतर
मतदारसुद्धा आहेत याचा काँग्रेस- राष्ट्रवादीला विसर पडलेला दिसतो.

प्रशु's picture

29 May 2009 - 12:37 pm | प्रशु

एक ९६ कुळी मराठा म्हणुन मी या सगळ्या प्रकाराचा निषेध करतो. बाबासाहेबाचे महाराष्ट्रावर फार उपकार आहेत. शिवचारित्र्य नावाचे धगधगीत अग्निहोत्र हा माणुस आयुष्यभर घेऊन फिरतोय.

सगळा प्रकारच अतिशय निषेधाय आहे.

महाराजांचे खरे स्मारक हे त्यांनी जिवापाड जपलेले किल्ले आहेत. तिकडे जाऊन लोक दारु पारटया करतात त्या कडे कुनि बघेल का?????????

गड किल्ल्यांची अवस्था अक्षरशः दयनीय आहे. गिर्यारोहक मंडळी व संस्थांच्या वावराने थोडे फार सांभाळले जाते.
पण त्याकडे या तथाकथित जातिनिष्ठ लोकांचे लक्ष नाही. कारण तो मुद्दा होऊ शकत नाही ना आपले नाव वाढवायला किंवा वाद करुन स्वत:चे महत्त्व वाढवायला.
तिकडे कोणी जात नाही विशेष मग त्यासाठी काम केले, आंदोलन केले तर लोकांपुढे कसे येणार आपण? असं खरं काम करण्याची वृत्तीच नाही मुळात.
वढू तुळापूरला उत्सव करतात पण पुरंदराच्या अवस्थेकडे दुर्लक्ष का? सगळं सोयीस्कर...

राजकीय हेतूने केलेले का होईना पवारांचे विधान आवडले - महाराजांना जातीच्या राजकारणात आणि एका जातीच्या मर्यादेत अडकवण्याचा मूर्खपणा करू नये.
शिवछत्रपती पुस्तकाने आणि जाणता राजा व त्यांच्या भाषणाने गेली कित्येक वर्षे मराठी माणसावर गारूड केले आहे आणि शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आणि महानतेची जाणीव आपल्या जगण्याच्या रोजच्या लढाईत जागृत ठेवली आहे. आयुष्यभर केलेले हे काम हे लोक का मुद्दामुन नजरेआड करत आहेत आणि ८० वर्षाच्या आदरणीय व्यक्तीला एकेरी संबोधून आपली पातळी का दाखवून देत आहेत हे समजत नाही.
महाराजच नाही तर उभा महाराष्ट्र खाजगी मालमत्ता असल्याप्रमाणे हे वागत आहेत. यांनी कोणासाठी काय चांगलं काम केलं? किंवा नुसता विचार तरी केला?

याच निमित्ताने किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करायला चालना मिळावी अशी आशा...

विशाल कुलकर्णी's picture

29 May 2009 - 2:39 pm | विशाल कुलकर्णी

<<बाबासाहेबाचे महाराष्ट्रावर फार उपकार आहेत. शिवचारित्र्य नावाचे धगधगीत अग्निहोत्र हा माणुस आयुष्यभर घेऊन फिरतोय. >>

अनुमोदन. केवळ जातीमुळे शिवशाहीरांना विरोध करणार्‍यांना एक साधा प्रश्न विचारावा वाटतो किं शिवशाहिरांनी ब्राम्हण असलेल्या
पेशवाईबद्दल न लिहीता, तिचा अभ्यास न करता छ. शिवाजी महाराजांची एवढी भक्ती का केली? हा जर त्यांच्या जातीयवादाचा पुरावा असेल तर असा जातीयवाद आम्हाला शिरोधार्य आहे.

सस्नेह,
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री

आता या निमित्ताने राज ठाकरेंची प्रतिमा मराठाविरोधी असे रंगविण्याचे उद्योग सुरू झालेत. घ्या, इथे याचा समाचार घेतलाय.

http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/manthan/0905/29/109...

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

त्यापेक्षा तो पैसा मेळघाटच्या परिसरात बालकाच्या आरोग्यासाठी ,निदान त्याना पोटभर अन्न उपलब्द करण्यासाठी खर्च करावा.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

विसोबा खेचर's picture

30 May 2009 - 3:38 am | विसोबा खेचर

बाबासाहेब पुरंदर्‍यांबद्दल चार जातद्वेष्ट्या टाळक्यांनी बोलू नये, ती त्यांची लायकी नाही! आणि या जातद्वेष्ट्यांच्या मताला आपण सर्वांनी फारशी किंमतही देऊ नये..!

राज ठाकरे यांचेही कौतुक वाटते आणि आभार मानावेसे वाटतात..!

तात्या.

या भान्ड्णाचे रियालीटी शो करता ह्क्क विकणे आहेत...

आम्ही आपुले लिम्बु - टिम्बु......

अर॑ विचारानी दरिद्री असल॑ल्यांनी बाबासाह॑बांना बोलण॑ बरोबर नाही. असल्यांची पुस्तक॑ बाजारात विकली जातात याहुन वाईट काहिच नाहि.
:T