मराठ्यांना शिवसेनेने खचविले

टायगर's picture
टायगर in काथ्याकूट
26 May 2009 - 8:48 pm
गाभा: 

शिवरायांचा आदर्श बाळगणारा मराठी माणूस अक्षरक्ष: खचला आहे. कारण त्याला न्यूनगंडाने पछाडले आहे. स्वत:च्या कर्तृत्वावर त्याचा तीळमात्र विश्‍वास राहिलेले नाही. त्यामुळे शिवाजी महाराजानंतर शिवसेनाच आपली तारण हार आहे, असे त्याला वाटते. परंतु मराठी माणसाने वेळीत या मानसिकतेतून बाहेर यावे. कारण शिवसेना ही काही मराठी माणसांचे उन्नयन करणारी संघटना कधीच नव्हती. या संघटनेमुळे ठाकरे यांना पोट भरण्याचा स्त्रोत मिळाला आणि राजकारणात डावपेच खेळण्यासाठी मराठी माणूस मिळाला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बाळासाहेबांसह ठाकरे कुटुंबातील कोणत्याचा वक्तव्याला मराठी माणसाने भुलू नये. कारण मराठी माणसाची त्यांना काळजी असती, तर उत्तर भारतीयांना खासदारकी, आमदारकी या संघटनेने कधीच बहाल केली नसती. राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर भांडत होते, त्यावेळी पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर खटले भरले, त्यावेळी शिवसेनेचे खासदार संसदेत मूक गिळून गप्प होते. त्यांना राज ठाकरे यांना यशस्वी होऊ द्यायचे नव्हते. याचाच अर्थ मराठी माणूस मेला, तरी चालेल आमचे राजकारण जिवंत राहिले पाहिजे, अशी शिवसेनेची खेळी होती. यातून शिवसेना काय आहे, हे प्रत्येकला समजले आहे. त्यामुळे मुंबईत त्यांचे उमेदवार भूईसपाट झाले.

एका आशावादी मराठी माणसाची भावना वाचा -
http://beta.esakal.com/2009/05/25131710/pailteer-sad-pratisad-about-sh.html

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

26 May 2009 - 10:35 pm | Dhananjay Borgaonkar

मराठ्यांना कस फसवल या पेक्शा मराठ्ई मानसाला फसवल अस म्हणआयच होत क हो भाऊ??????

अनामिका's picture

27 May 2009 - 11:11 am | अनामिका

मुळातच खचलेल्यांना कशाला कुणी खचवायला हवे?...............मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरुनच त्यांच किती खच्चीकरण झालय हे दिसुन येतय्.............उगा स्वतःच्या नसलेल्या स्वाभिमानाच्या खच्चीकरणासाठी इतर पक्षांना जबाबदार धरण्यात काय अर्थ..........सेनेने कधी तुमच्या पवारांसारख जातीपातीच राजकारण केल नाही.
राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर भांडत होते, त्यावेळी पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर खटले भरले, त्यावेळी शिवसेनेचे खासदार संसदेत मूक गिळून गप्प होते
माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेत महाराष्ट्रातील स्वतःला मराठा म्हणवत मिशिला पिळ देणार्‍या काही इतर पक्षांचे खासदार देखिल होते किंबहुना आहेत्........सेनेच्या खासदारांनी मुग गिळले होते हे मान्य मग महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या खासदारांनी काय मुखात गुट्ख्याचे तोबरे भरले होते कि त्यांची वाचा बसली होती? की मराठीअस्मिता म्हणजे काय? हे स्वतः महाराष्ट्रात जन्माला येऊन व जन्माने मराठी असुन देखिल त्यांना माहित नव्हते...........आणि राजवर व त्याच्या समर्थकांवर लाठ्याचालवत कारवाई करण्याचे आदेश तुमच्याच मराठा म्हणवणार्‍या विलासरावांनीच दिलेले होते.........त्याचे काय?......सेनेने उत्तरभारतियांना प्रतिनिधीत्व देऊन चुक जरुर केली असेल पण म्हणून तुमच्या आवडिच्या दोन्ही पक्षांच्या खासदारांची यादी तुंम्ही तपासुच नये असे होत नाही..........आणि सेनेने हिंदुत्वाच्या भुमिकेला पाठिंबा देऊन २० वर्षॅ झाल्यानंतर तुंम्हाला सेनेने मराठी माणसासाठी काही केले नाही याची जाणिव झाली असेल तर धन्य तुमची . हिंदुत्वाची भुमिका अंगिकारण्याआधी २० वर्षॅ सेना कुणासाठी लढत होती.?

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

चिरोटा's picture

27 May 2009 - 10:36 am | चिरोटा

आता परत निवडणुकीचा हंगाम चालु होतोय. मराठी माणूस्,न्युनगंड,ईतिहास्,शिव छत्रपती,बेळगाव प्रश्न हे विषय मुद्दामून चर्चिले जातील.मिडिया आगीत तेल ओतण्याचे काम करेल्.'मर्द्,बांगड्या,थोबाड्,झोडपून,जातियवाद' असले शब्द वारंवार ऐकु येतील.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

अमोल केळकर's picture

27 May 2009 - 11:23 am | अमोल केळकर

सहमत
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

नम्रता राणे's picture

27 May 2009 - 11:24 am | नम्रता राणे

मा. बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायलाच नव्हे तर लढायला शिकवले त्यावेळेस राज ठाकरेंचा जन्म सुध्दा झाला नव्हता.
सेनेचाच विचार राज यांनी 'हायजॅक केला' हे मिसळ्पाववरील विचारवंतानी ध्यानात घ्यावे.
अनामिकाचा लेख अप्रतिम!!!!!!

तिमा's picture

30 May 2009 - 5:11 pm | तिमा

शिवसेना आणि राज यांची बाजू घेऊन जेंव्हा लोक एकमेकांशी तावातावाने वाद घालतात्(जालावर आहे म्हणून, नाहीतर डोकीच फोडली असती), तेंव्हा मला प्रचंड हंसु येते. आम्ही तर शिवसेनेच्या जन्माआधीपासून या जगांत आहोत. शिवसेनेची सगळी कर्तृत्वे आम्ही पाहिली आहेत.
आमच्याकडेही नियमितपणे मार्मिक वाचले जायचे. पण ज्या दिवशी मार्मिकमधे, बाळासाहेब व लोकमान्य टिळक यांचा एकत्र फोटो छापून त्याखाली 'दोन लोकमान्य' असा मजकूर वाचला त्याक्षणी आम्ही सर्वांनी एकमताने मार्मिक घेणे बंद केले. त्यानंतर जे जे होत गेले ते पाहिल्यावर आपण योग्यच निर्णय घेतला होता याची खात्री पटत गेली.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

यन्ना _रास्कला's picture

30 May 2009 - 7:20 pm | यन्ना _रास्कला

मनशे आनि शेनावाल्यानी यु.पि. ट्याक्सी चालवनार्‍याना मारन्याएैवजी ज्या मराठी मान्साने आपली सोताचि ट्याक्सी त्या भैयाला चालायला देवुन सोता बो* वर करुन इड्या फुन्कतोय त्येला झोडाव.

आनी आशा यु.पि. ट्याक्सी डराव्हरना पैशे खावुन पर्मिट देनार्‍या मराठी आर्टीओ वाल्या आदिकार्‍याना.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

चिरोटा's picture

31 May 2009 - 12:45 pm | चिरोटा

आनी आशा यु.पि. ट्याक्सी डराव्हरना पैशे खावुन पर्मिट देनार्‍या मराठी आर्टीओ वाल्या आदिकार्‍याना.

१००% सहमत्. गेल्या काही वर्षात मुंबई,ठाणे,पुणे ह्या शहरांची जी नियोजन्शुन्य वाढ झाली त्यात असल्या मराठी अधिकार्‍यांचा सिंहाचा वाटा आहे. मराठी अधिकारी(चीफ अभियंता,शहर अभियंते,वॉर्ड अधिकारी वगैरे),अमराठी बिल्डर्स ह्यानी ह्या शहराना पुरते लुटले.ह्यात राजकारणी पण सामील असल्याने तेही तोंडे बंद ठेवून होते.ज्यांचे पोट कष्टावर चालते(रिक्षावाले,फेरीवाले,टॅक्सीवाले) अशा लोकाना टार्गेट करायचे आणि अमराठी धनदांडगे लोक्-बिल्डर्,मोठे व्यापारी,हॉटेल्वाले,अनैतिक धंदे करणारे लोक ह्याना शहरे लुटायला मदत करायची हे धंदे मराठी राजकारणी लोकानी(सेना,काँग्रेस आणि आता मनसे) आजपर्यंत केले.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न