ढॅण टे ढॅण! आम्ही मिक्सर घेतला!
इतके दिवस मिक्सर नाही, म्हणून पावलोपावली अडत होतं. एकदा एक पांढर्या दगडाचा खलबत्ता मिळतो (आयुर्वेदिक दवाखान्यात वगैरे औषधं खलायला वापरतात तसला) तो आणला. काही दिवसांनंतर खरडा वाटता वाटता खलाचे दोन तुकडे. (एवढा जीव लावून बनवलेला खरडा टाकून द्यायचा जिवावर आल्यामुळे मी हावरटासारखा वरचा खरडा उचलला - होय, ब खवचटासारखं खिक् करून हसली - तर त्यात चक्क दगड लागत होते. मग जड मनानं मी तो टाकून दिला. :( असो.)मी मग नुसताच खल आणला, तर परवा बत्ताच फुटला. :(
त्याच पावली तिरिमिरीत जाऊन मी, अ आणि ब मिक्सर घेऊन आलो. :)
काल मँगो मिल्कशेक बनवून ढोसून झाला. आज सकाळी तत्परतेनं वाटण करून ठेवलं.
आता मिक्सर वापरून काय करावं तेच सुचत नाहीये. सुचवता का जरा?
प्रतिक्रिया
25 May 2009 - 10:04 pm | स्वाती दिनेश
छोले,कांदे बटाट्याचा खोबरे, मिरच्या , आलं लसणीचं वाटण घालून रस्सा हे लग्गेच आठवलेले २ पदार्थ..
आले मिरची खोबर्याचंवाटणं करुन ठेवू शकशील. चटणी /चटण्या वेगवेगळ्या.. तोंडीलावणं म्हणून सँडविचपासून भाकरीपर्यंत कशाही बरोबर खा...
स्वाती
25 May 2009 - 10:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मेघना, लसूण चटणी कर ... घरात लसूण चटणी हवीच. इडल्या, डोसे खाऊन पकली नसशील तर ते कर.
अवांतरः लेखकांमधे तुझं नाव पाहून मी पण 'ढॅण टे ढॅण' म्हटलं, पण आत काही फारसा मेघना-टच नाही आहे. ही शुद्ध फसवणूक आहे. ;-)
25 May 2009 - 10:08 pm | मेघना भुस्कुटे
अग, हा सल्ला मिळवायला काढलेला धागा आहे. 'लेखकू' धागा नाही काई! ;)
26 May 2009 - 8:14 am | मुक्तसुनीत
मेघना, लसूण चटणी कर ...
आमच्यात खायच्या कशाचीही चटणी बनवायला मिक्सर हा घटक लागत नाही. कशाचीही चटणी आमच्यात अशी बनवतात :
१. खायचे काहीही आणावे किंवा बनवावे.
२. किमान तीन चार रिक्कामटेकड्या मित्र मैत्रिणींना बोलवावे.
३. जे काही आणले /बनविले असेल ते या टोळक्यासमोर ठेवावे.
४. बघता बघता कशाचीही चटणी.
इति लेखनसीमा.
26 May 2009 - 2:25 pm | छोटा डॉन
वा वा, काय मस्त आयडिया सांगितली आहे, जमलच आता.
मेघनाबाई, बघा बॉ मुक्तशेठ काय म्हणातात ते ....
(रिकामटेकडा)
छोटा डॉन
अवांतर : मस्त मक्याच्या कणसाची उसळ करणार का ? मडिवालाच्या मंडईत कणसे विकायला येतात, मी पाहिली आहेत ( ह्याचा अर्थ मी आणेनच असा होत नाही ;) )
किंवा मस्त फालुदा वगैरे ???
झालेच तर मला "थालिपीठे" बनवायचा अनुभव आहेच, लगेहात "कांदेबटाटे भजी" पण बनवु शकतो ;)
- डॉन्या कपुर
26 May 2009 - 3:01 pm | मेघना भुस्कुटे
नुसतं बोल. येऊ नकोस तू. तोंडपाटीलकी बघून घ्यावी डॉनसाहेबांची.
26 May 2009 - 3:07 pm | बिपिन कार्यकर्ते
आम्ही घडवून आणली होती की नाही डान्रावांची व्हिजिट?
बिपिन कार्यकर्ते
26 May 2009 - 3:09 pm | मेघना भुस्कुटे
होय होय, खरं आहे. पण दर वेळी डॉन्याकरता तुम्हांला बंगळुरी अवतार घ्यावा लागणार असेल तर अवघड आहे...
26 May 2009 - 3:18 pm | छोटा डॉन
तसे काही नाही, ठरवु एकदा व्यवस्थितपणे , आता मिक्सर आला म्हणुन तर नक्कीच ठरवु ;)
बिकाशेठ, येताय का फिरुन पुन्हा घरट्याकडे ...
अवांतर :
मिपावरच्या एका गाजलेल्या वाक्याची आठवण झाली " कॄपया धाग्याशी असंबंधीत आणि अप्रस्तुत मजकुराची चर्चा करताना सर्व सदस्यांनी खरडफलक अथवा खरडवह्यांचा वापर करावा. इथुन पुढे विषयाशी असंगत असलेले सर्व प्रतिसाद अप्रकाशित केले जातील ह्याची अवश्य नोंद घ्यावी. धन्यवाद". ;)
अहो ऑलरेडे आम्ही बदनाम आहोत ह्या बाबतीत्ल, तेव्हा खवमध्ये बोलु ....
आम्हाला ऑलरेडी धमक्या आल्या आहेत, आहात कुठे ?
------
(स्वयंघोषीत ..... कोणीच नाही ) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
25 May 2009 - 10:11 pm | बिपिन कार्यकर्ते
त्या नाटक्याशेठच्या कोणत्यातरी कॉकटेलमधे मिक्सरचा उपयोग झाला होता असं आठवतंय. ट्राय मारा.
अजून एक. दाण्याचा कूटबीट करा मस्त.... दाण्याच्या कूटाची चटणी पाच मिनिटात होते आणि अडीअडचणीला पटकन आधार देते. :)
बिपिन कार्यकर्ते
25 May 2009 - 11:42 pm | शाल्मली
पेठकर काकांनी दिलेली प्लेन ग्रेव्हीची कृती पाहा.
ही ग्रेव्ही अनेक पदार्थांसाठी उपयोगी पडते आणि मिक्सरचा चविष्ट वापर होतो :)
--शाल्मली
26 May 2009 - 1:36 am | मीनल
आता मिक्सर वापरून काय करावं तेच सुचत नाहीये. सुचवता का जरा?
सुचवते ना !
तो साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवावा आणि कप्प्यात ठेऊन द्यावा. त्यात काही केले नाही तरी ब-याचदा अपल्याकडे `हे अमूक अमूक` आहे हा विचार ही भारी सुख देतो बघ. :))
मीनल.
26 May 2009 - 2:17 am | योगी९००
पालक सुप, टोमॅटो सुप, मक्याचे सुप, वेज सुप आणि विविध प्रकारच्या फळांचे ज्युस बनवा.
खादाडमाऊ
26 May 2009 - 3:03 am | मिथिला
बर्फ + दूध + साखर + इन्स्टंट कॉफी + तूमचा नवीन मिक्सर = थंड कॉफी
26 May 2009 - 7:40 am | शोनू
एक वाटी उडीद डाळ , पाउण वाटी चणा डाळ, अर्धी वाटी तांदूळ, मूठभर तूरडाळ अन दोन सुक्या मिर्च्या एकत्र भिजवत ठेवा पाच सहा तास. नंतर थोडं थोडं पाणी घालून खसखशीत वाटा. मीठ घालून मिसळून घ्या अन ( डोशाप्रमाणे) अडे काढा तव्यावर. सुक्या मिरच्यांएवजी ओल्या मिरच्या+ आलं पण घालू शकता. पीठ आंबवायची गरज नाही.
आता ( इडली साठी )ग्राईंडर पण आणून टाका एक :-)
26 May 2009 - 7:53 am | सँडी
अभिनंदन! :)
आता अजुन वेगवेगळ्या पाककृती येऊ द्यात.
26 May 2009 - 9:23 am | विसोबा खेचर
दाण्याचं कूट करून झकासपैकी साबुदाणा खिचडी करा. आम्ही येतो खायला! :)
तात्या.
26 May 2009 - 2:52 pm | सुनील
दाण्याचं कूट करून झकासपैकी साबुदाणा खिचडी करा
मिक्सरवर दाण्याचे कूट ही कल्पना उत्तम. पण हे काम जरा हलक्याने करावे. दाणे घालून मिक्सर फार काळ फिरवलात तर, दाण्याचे "पीनट बटर" होऊन ते मिक्सरच्या पात्याला चिकटून बसेल!
बाकी साबुदाण्याच्या खिचडीत सोडे घातले तर कसे लागतील याचा विचार सध्या करीत आहे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 May 2009 - 9:53 am | ऋषिकेश
मिक्सरबद्दल अभिनंदन!! :)
अवांतर प्रश्नः
कोणत्याहि पदार्थाचे मिश्रण करायचे सोडून फक्त कुट, चुरा, लगदा करणार्या यंत्राला 'मिक्सर' का बरे म्हणतात?
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
27 May 2009 - 1:20 am | वजीर
चुकिचे म्हणतात. ग्राइंडर हा योग्य शब्द आहे.
26 May 2009 - 12:20 pm | पक्या
हा काय धागा झाला?
पदार्थ बनवतानाच कळेल मिक्सर चा वापर कधी करायचा ते. मिक्सर बरोबर रेसिपी बुक मिळाले नाही वाटते?
26 May 2009 - 2:10 pm | मस्त कलंदर
बाजारात कैर्या अजून मिळतात... तेव्हा आंबेडाळ बनवायलाही सोपी अन चटपटीतही!!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
26 May 2009 - 2:13 pm | मेघना भुस्कुटे
मस्त आयडिया आहे. जरा कृतीपण सांगता का प्लीज? (आहे? याला म्हणतात, बोट दिल्यावर खांद्याला लोंबकाळणे. :))
27 May 2009 - 12:04 am | सखी
स्वातीने आंबेडाळीची (कैरीची डाळीची) कृती इथे दिली आहे.
27 May 2009 - 9:08 am | मेघना भुस्कुटे
थ्यांकू!
26 May 2009 - 6:39 pm | रेवती
महत्वपूर्ण खरेदीबद्दल व धाग्याचे नाव बरोब्बर टाकल्याबद्दल चविष्ट अभिनंदन!
बाकी आता पदार्थाबद्दल सुचावायचे झाल्यास, मिक्सरवर पुदिन्याची चटणी वाटावी.
ही चटणी व इतर साहित्य घेउन भेळ करावी.;)
रेवती
27 May 2009 - 1:58 am | संदीप चित्रे
मस्तपैकी ठेचा कर......
रेवतीने सांगितल्याप्रमाणे सगळ्या साहित्यात हा ठेचा टाकून भेळ कर :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com