कम्यूनिष्ट आणि सोशॅलिश्ट

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
22 May 2009 - 2:33 pm
गाभा: 

मित्रानो आपण नेहमी भांडवलदार ,कम्यूनिष्ट आणि सोशॅलिश्ट हे शब्द वापरतो
भांडवलदार म्हणजे हे बहुतेकाना माहित असते पण कम्यूनिष्ट आणि सोशॅलिश्ट यांच्यातील नक्की फरक उमजत नाही
मागे एक विनोद म्हणून त्यांची व्याख्या अशी केली होती
समज तुमच्या कडे दोन दुभत्यागायी आहेत
तर
सर्वसामान्य : एका गायीचे दूध घरातल्या लहान थोरांसाठी ठेवेल दुसर्‍या गाईचे दूध बाजारात विकेल
भांडवलदार : त्या दोन्ही गाईचे दूध बाजारात विकेल. व तिसरी गाय आणायचे मनात बाळगुन असेल
कम्युनिष्ट : तुमच्या दोन्ही गायी जप्त करून गावातल्या गोठ्यात बांधतील आणि तुमच्याकडून गोठा साफ करवून घेतील . साफ करण्याचे पैसे तुम्हाला देतील
सोशॅलिष्ट : दोन्ही गायी तुमच्याच कडे ठेवतील आणि दूध मात्र स्वतःकडे जमा करतील.

विनोदाचा भाग सोडून देउयात
पण कोणी इथे कम्यूनिष्ट आणि सोशॅलिश्ट यांच्यातला नक्की फरक सांगेल का?

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

22 May 2009 - 2:38 pm | विनायक प्रभू

कम्युनिस्टाचे माहीत नाही.
कितीही मोठी लिस्ट असु द्या, सोसतात ते सोशालिस्ट

चिरोटा's picture

22 May 2009 - 3:10 pm | चिरोटा

:D .आणि जे प्रजेला सोसायला लावतात ते प्रजा सोशालिस्ट!!
(प्रजा सोशालिस्ट वाल्यानी हलकेच घेणे.आहेत का अजुन कोणी प्र.सो.?)
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

हेरंब's picture

22 May 2009 - 6:55 pm | हेरंब

एक वेळ कम्युनिस्ट परवडले, ते निदान बंदुकीच्या धाकाने तरी कामे करुन घेतील, पण सोशालिस्ट प्रत्येक बाबतीत वितंडवाद घालतील, स्वतः कुठले काम होऊ देणार नाहीत आणि दुसर्‍यालाही करु देणार नाहीत. पक्ष स्थापन केला तर त्याचे संपूर्ण विघटन होईपर्यंत भांडत रहातील.

क्लिंटन's picture

22 May 2009 - 8:31 pm | क्लिंटन

समाजवाद्यांचे ध्येय समाजात आर्थिक आणि राजकिय समता प्रस्थापित करणे असते.म्हणजे अंबानींना राहायला कोट्यावधी रुपयांचे टोलेजंग घर आणि त्या घरापासून काही मीटर अंतरावर लोकांना रस्त्यावर झोपायला लागणे हा विरोधाभास दूर करावा, गरीब-श्रीमंतांमधील दरी कमी करावी,समाजातील तळागाळातील लोकांचा चांगल्या संधी देऊन विकास घडवून आणावा अशी धोरणे समाजवाद्यांची असतात.तसेच कोणताही उद्योग हा नफा मिळविण्यासाठी नाही तर लोकांच्या गरजा पूर्ण करायला असावा असेही समाजवाद्यांना वाटते.भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यात भारताचे उद्दिष्ट WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC and to secure to all its citizens: ..........
असे आहे. यात SOCIALIST आणि SECULAR हे शब्द इंदिरा गांधींच्या सरकारने १९७६ साली केलेल्या ४२ व्या घटनादुरूस्तीद्वारे आणण्यात आले. म्हणजेच राज्यघटनेच्या मते भारताचे उद्दिष्ट समाजवादी राज्य स्थापन करणे हे आहे.कागदोपत्री समाजवाद्यांचे उद्दिष्ट समतापूर्ण व्यवस्था आणणे हे असते.अस्तित्वात असलेल्या सरकारने धोरणे बदलूनही समाजवाद आणता येईल.त्यासाठी प्रस्थापित सरकार उलथावून लावलेच पाहिजे असे नाही.

तर कम्युनिस्टांचे उद्दिष्ट कामगार-कष्टकरी वर्गाचेच राज्य स्थापन व्हावे,खाजगी मालकीचे उद्योग न ठेवता समाजाच्या मालकीचे असावेत,उद्योगांनी काय,किती,कसे आणि कोणासाठी उत्पादन करावे हे सरकार ठरविणार असे असते.म्हणजे कम्युनिस्ट हे समाजवाद्यांपेक्षा अधिक कडवे मानले पाहिजेत. कम्युनिस्टांना अभिप्रेत असलेली व्यवस्था आणायला कामगारांचे सरकार येणे गरजेचे आहे आणि ते त्यांचे उद्दिष्ट आहे.त्यामुळे बहुतांश वेळा प्रस्थापित सरकार उलथावून लावणे हा त्यांच्या उद्दिष्टांचा एक भाग असतो.

ही एक वरवरची आणि ढोबळ ओळख झाली.कम्युनिझम मध्ये समाजवादाच्या काही उद्दिष्टांचा तरी अंगिकार केलेला असेल असे वाटते.यावर अधिक प्रकाश टाकल्यास बरे होईल.

अवांतर: माझा कम्युनिस्टांना विरोध जास्त राजकिय कारणांमुळे आहे.त्यांची आर्थिक धोरणेही घातक आहेतच पण राजकिय धोरणे भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात आहेत हे अनेकदा मिपावर म्हटले आहेच.त्यांच्या आर्थिक धोरणांमुळे फार फार तर आर्थिक विकास अत्यंत कमी वेगाने होईल पण त्यांच्या राजकिय धोरणांमुळे भारताच्या सार्वभौमत्वालाच नख लागेल म्हणून त्यांची राजकिय धोरणे अधिक धोकादायक आहेत असे माझे मत आहे.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

अडाणि's picture

22 May 2009 - 10:54 pm | अडाणि

आजकाल आर्थिक चर्चांमधे फ्रन्सचे धोरण हे .SOCIALIST. आहे असा सूर असतो... जाणकारांनी अजून प्रकाश टाकावा...
-
अफाट जगातील एक अडाणि.

नितिन थत्ते's picture

23 May 2009 - 6:33 pm | नितिन थत्ते

युरोपातील बरेच देश स्वतःला बाजारप्रधान अर्थव्यवस्था राबवणारे म्हणवत असले तरी प्रत्यक्षात त्यांची बरीच सामाजिक धोरणे समाजवादी म्हणतायेतील अशी असतात.
शिक्षण, आरोग्यव्यवस्था, वृद्धांची व्यवस्था, बेकारांची व्यवस्था, वाहतुक व्यवस्था, करमणुकीची व्यवस्था वगैरे सुविधा सरकारी पातळीवरून दिल्या जातात. म्हणजे मनुष्य म्हणून लागणार्‍या बहुतेक सोयी सरकारी असतात.
अर्थात ही ऐकीव माहिती आहे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

चिरोटा's picture

26 May 2009 - 1:19 pm | चिरोटा

शिक्षण, आरोग्यव्यवस्था, वृद्धांची व्यवस्था, बेकारांची व्यवस्था, वाहतुक व्यवस्था, करमणुकीची व्यवस्था वगैरे सुविधा सरकारी पातळीवरून दिल्या जातात. म्हणजे मनुष्य म्हणून लागणार्‍या बहुतेक सोयी सरकारी असतात.

सहमत्.काही युरोपिय राष्ट्रांमध्ये बेकारी भत्ता दिला जातो. उच्च शिक्षण (१२+) बर्‍याच युरोपियन राष्ट्रांमध्ये स्वस्त(म्हणजे तिकडच्या मध्यम वर्गाला परवडेल असे) आहे. सध्याच्या काळात बर्‍याच बहुराष्ट्रीय म्हणवणार्‍या आणि उदारीकरणाचा प्रसार करणार्‍या कंपन्यांचे धोरण 'स्थानिक लोकाना नोकर्‍या आधी' असे आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

विजुभाऊ's picture

26 May 2009 - 10:52 am | विजुभाऊ

धन्यवाद

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही