वेरूळा की विरूळा सापाचे इंग्रजी/शास्त्रीय नाव?

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
22 May 2009 - 12:57 am
गाभा: 

आजच सकाळमधे वेरूळा सापाच्या ६६ पिल्लांना जंगलात सोडले अशी बातमी वाचली. ह्या सापाचे शास्त्रीय वा इंग्रजी नाव काय?

विविध सापांची भारतीय भाषांतली नावे आणि इंग्रजी/जीवशास्त्रीय नावे मिळू शकतील अशी कुठली साईट कुणाला माहित आहे क?

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

22 May 2009 - 1:28 am | लिखाळ

वेरोळ्याबद्दल येथे वाचा.

इंग्रजी वापरातले नाव Checkered Keelback
शास्त्रीय नाव Xenochrophis piscator विकिवरील दुवा.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

काजुकतली's picture

22 May 2009 - 1:32 pm | काजुकतली

अगदी जोरदार टाळ्या वाजवल्या बरे... मस्तच माहिती..

जागु's picture

22 May 2009 - 1:37 pm | जागु

बापरे फोटो बघुन भिती वाटली.

मि.इंडिया's picture

22 May 2009 - 7:52 pm | मि.इंडिया

हा साप नद्या, तलाव, पणवठे इ. ठिकाणी बर्यापैकी सपडतो. बिनविषारी व निरुपद्रवी आहे. भारतात दुर्मीळ झालेल्या किंग कोब्रा या सापाचे आवडते भक्ष आहे.

प्रदीप

हुप्प्या's picture

22 May 2009 - 7:56 pm | हुप्प्या

लिखाळ तुमचे मनःपूर्वक आभार. आणि टाळ्यांचा गजरही!