लोक कम्युनिस्टांवर इतके चिडतात तरी का?

वेताळ's picture
वेताळ in काथ्याकूट
20 May 2009 - 10:46 am
गाभा: 

आजकाल मिपावर राजकारणाची चर्चा चालताना त्यातल्या त्यात कम्युनिस्टांवर चर्चा करताना लोक जहाल होतात . असे का घडते?
कम्युनिस्टांवर सगळ्याना इतका राग का आहे तेच कळत नाही.खर तर कम्युनिझम हा तर सर्वसामान्य माणसांचे जीवन्मान सुधारण्यासाठी निर्माण झाला आहे . परंतु आज सर्वसामान्य लोकच त्याच्या कडे पाट फिरवत आहेत. हा विचार करण्याचे आज कारण म्हणजे नेपाळ ह्या आपल्या शेजारच्या देशातील अस्थिरता .
नेपाळ हा खुप वर्षापासुन भारताचा खुप चांगला शेजारी व मित्रदेश आहे. परवा पर्यत त्या देशात राजेशाही होती.परंतु गेल्या काही वर्षात त्या राष्ट्राने लोकशाहीचा स्विकार केला आहे. परंतु काही महिन्यापुर्वी तिथे सत्ता परिवर्तन होऊन तिथे प्रथमच माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेता छबिलाल उर्फ पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड हा पंतप्रधान झाला. इथे देखिल लक्षात घेण्याची बाब म्हणजे लोकांनी प्रचंडच्या पक्षाला पुर्ण बहुमत न देता त्याने काही समविचारी पक्षाशी युती करुन नेपाळ मध्ये माओवादी सरकारची स्थापना केली. प्रचंडचा माओवादी पक्ष हा आधी बंदुकीवर विश्वास ठेवणारा पक्ष होता. सदर माओवादी पक्षाचे नेपाळी लष्कराशी गेली कित्येक वर्ष सशस्त्र संघर्ष सुरु होता. माओवादी दहशतवादी लष्कर,जनता व इतर राजकिय पक्ष ह्याच्यावर सशस्त्र हल्ले करत असत. नेपाळ मध्ये माओवाद्याच्या हल्ल्यात खुप लोक ठार झाले आहेत. परंतु फक्त बंदुकीच्या जोरावर सत्ता ताब्यात येत नाही हे लक्षात आल्यावर प्रचंडने लोकशाही मार्गाने सत्ता ताब्यात घेण्याचे ठरवले. त्यात त्याला यश आले. खरतर नेपाळी जनतेला मनातुन वाटत होते कि भारत आपला मोठा भाऊ असुन आपल्याशी नीट न वागता आपले नियम व अटी आपल्यावर लादत आहे,ह्यासुप्त विचाराचा फायदा घेत भारताबद्दल नेपाळी जनतेच्या मनात भिती निर्माण करुन प्रचंड ने नेपाळची सत्ता हस्तगत केली.सता ताब्यात आल्यावर प्रचंडने सर्वप्रथम भारताचा जवळचा मित्र चीन? ला भेटदिली.भारतिय पुजारी जे नेपाळी मंदिरात कामाला होते त्याच्या नोकरीवर गदा आणली.भारतिय व्यावसायिक व मित्राना त्रास देण्यास सुरुवात केली.भारता बरोबरचे संबध खुपच ह्या काळात ताणले गेले.परंतु ह्यावर अजुन एक कडी प्रचंड ने केली ,ती म्हणजे जे माओवादी नेपाळी लष्कराविरुद्ध लढले होते त्याना सरळ सरळ लष्करात भरती करुन घेण्याचा निर्णय त्याने घेतला. हा निर्णय नेपाळी लष्कर,जनता ,नेपाळ चे अध्यक्ष ह्याना पटला नाही. लष्कराने उघड उघड विरोधाची भुमिका घेतली.सदर विरोध मोडुन काढण्यासाठी प्रचंडने नेपाळचे लष्करप्रमुखाना त्याच्या पदावरुन हटवले. आपला आदेश न मानणार्‍यावर सरळसरळ त्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय लोकशाहीत कोणताच पंतप्रधान घेवु शकत नाही,त्याला काहीतरी कायदेशिर मार्ग आहेत्.परंतु कम्युनिस्ट कायदा कसला मानतात. हा प्रचंडचा निर्णय नेपाळ मध्ये कोणलाच आवडला नाही. तेथिल जनता , नेपाळचे अध्यक्ष व भारताने ह्या गोष्टीला विरोध दर्शविला. त्यामुळे प्रचंड ला एकतर लष्करप्रमुखाना विनाशर्त परत पदावर घेणे किंवा राजीनामा देणे हे दोनच पर्याय शिल्लक होते . परंतु हेकेखोर कम्युनिस्ट राजीनामा देवुन रिकामा झाला व ह्या सर्वाचे खापर भारतावर फोडण्यास विसरला नाही.

जर वरील गोष्टीचा विचार केला तर असेल लक्षात येईल की जगातील कोणताही कम्युनिस्ट सत्ताधारी एकदा का सता हातात आली की येनकेन प्रकारे सत्ता हातात धरुन ठेवायचा प्रयत्न करतो.जगातील कोणतेही कम्युनिस्टाचे उदाहरण घ्या त्यात तुम्हाला दिसेल की कम्युनिस्ट सत्ता प्राप्ती नंतर ती टिकवुन ठेवण्यासाठी हुकुमशाह बनतात.प्रचंड देखिल आपल्या अनुयायाना एकदा लष्करात घुसवुन आरामात नेपाळवर राज्य करायचे होते. ही बाब सर्वाच्या लक्षात आल्यामुळे व त्याल वेळीच आवर घातल्या मुळे त्याचे स्वप्न सत्यात आले नाही. कोणत्याही लोकशाही देशाच्या लष्काराने देशाच्या कारभारात ढवळाढवळ करु नये अन्यथा तिथल्या लोकाची अवस्था न घर का ना घाट का अशी होते ह्याचे उदाहरण पाकिस्थानचे देता येईल.लष्कराच्या सततच्या हस्तक्षेपामुळे त्या देशात लोकशाही कधीच बाळसे धरु शकली नाही.तीच अवस्था नेपाळ मधील नवजात लोकशाहीची झाली असती.परंतु वेळीच नेपाळ अध्यक्षांनी हस्तक्षेप करुन प्रचंडचे स्वप्न भंग केले.
आजकाल जे काही कम्युनिस्ट देश आहेत त्यात चीन सोडला तर बाकी देशाची आर्थिक स्थिती खुपच बिकट आहे.एकेकाळी कम्युनिस्टाची पंढरी सोव्हिएट रशियाची हालात किती खराब आहे हे आपण सर्व जाणता. तीच हालात उ.कोरीया वगैरे देशांची आहे.भारतात देखिल जी काही राज्ये कम्युनिस्टाच्या प्रभावाखाली आहेत तिथे सगळ्या ज्यादा बेकारी,दारिद्रता व दहशत आहे.भारतात जो काही नक्षलवाद आहे त्याचे पितृत्व पण ह्याच कम्युनिस्टांकडे जाते.बंदुकीच्या जोरावर हे जे काही साध्य करायचा प्रयत्न करत आहे ते काही अजुनही त्याना साध्य झाले नाही. फक्त लोकांच्या मनात भिती निर्माण करुन आपली पोळी हे भाजुन घेत आहेत.भारतात जी काही राज्ये कम्युनिस्टाच्या प्रभावाखाली आहेत तिथे लोक अजुनही गरीबीत खितपत पडले आहेत.ती राज्ये आर्थिक दृष्ट्या अजुनही सर्वात जास्त मागासलेली आहेत. कम्युनिस्टाच्या प्रभावाखालील क्षेत्रात अजुनही सर्वात जास्त नक्षलवाद पोसला जात आहे.ह्याचा लोकशाही कमी व बंदुकीवर जास्त विश्वास आहे.

परवा टिव्हीवर निवडणुकांचे विष्लेशण चालले असता एका वक्त्याने प्रकाश करात व येच्चुरीचे आभार मानले,कारण मागील खेपेला जवळजवळ ६० खासदार कम्युनिस्टांचे होते ,परंतु करात व येच्चुरींच्या करामती मुळे १५व्या लोकसभेत फक्त २४ खासदार उरले आहेत. अजुन वयाचा हिशेब केला तर करात २० वर्षे तरी सरचिटणीसपदी राहतील. म्हणजे त्याच्या हयातील ते भारतातील कम्युनिस्टांचे नामोनिशाण मिटवु शकतील.त्याबद्दल करातांना धन्यवाद.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

20 May 2009 - 11:14 am | चिरोटा

राज्यकर्त्यानी घेतलेले निर्णय आणि त्या राष्ट्राने अंगिकारलेली विचारसरणी ह्यांचा कितपत संबंध असतो?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

जीएस's picture

20 May 2009 - 1:34 pm | जीएस

भारतातील कम्युनिस्टांची भुमिका कायमच देशद्रोहाची राहिली आहे. अगदी स्थापनेपासून. मग ते...

(१) ब्रिटीशांशी हातमिळवणी करून १९४२ चे आंदोलन पाडण्याचा प्रयत्न असो,
(२) रशियाचे जर्मनीशी बिनसल्यावर सुभाषचंद्र बोसांच्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीला जाऊन केलेला प्रचार असो,
(३) पाकीस्तान या लीगच्या कल्पनेला ताबडतोब पाठींबा व सक्रीय प्रचार. मुस्लिम लीगने जाहीर आभार मानले होते कम्युनिस्टांचे 'लीगपेक्षाही हिरिरीने या मागणीला समर्थन दिल्याबद्दल.'
(४) भारत स्वत्रंत्र झाल्याक्षणीच हे खरे स्वातंत्र्य नाही असे म्हणत भारताविरुद्ध तेलंगणात चालवलेला सशस्त्र लढा असो
(५) चीनने आक्रमण केल्यावर चीनला सक्रीय पाठींबा देणे, भारताच्या श्स्त्रस्त्र निर्मितीच्या कारखान्यात संप घडवून आणणे असल्या कारवाया असो.
(६) माओवाद्यांशी आणि इतर कम्युनिस्ट दहशतवाद्यांशी हातमिळवणी करून भारतात अंतर्गत अराजक पसरवणे.
(७) गेल्या पाच वर्षात तर चीनच्या आदेशावरून लोकनियुक्त सरकारला वेळोवेळि कोंडीत पकडणे, विकासाला खीळ घालणे.
(७) एकसंघ भारताशी लढणे अवघड आहे. त्यामुळे भारताचे विघटन करून जमेल तेवढ्या भागावर आपली सत्ता आणणे हेच कम्युनिस्टांचे उद्दिष्ट आहे.

त्यामूळे कम्युनिस्टांविषयी भारतीयांच्या भावना पाकिस्तानबदल आहेत तशाच तीव्र असल्या तर त्यात फारसे आश्चर्य नाही असे वाटते.

सुनील's picture

20 May 2009 - 7:47 pm | सुनील

त्यामूळे कम्युनिस्टांविषयी भारतीयांच्या भावना पाकिस्तानबदल आहेत तशाच तीव्र असल्या तर त्यात फारसे आश्चर्य नाही असे वाटते.
हे तितकेसे खरे नाही. अगदी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीतील आकडेवारी पाहिलीत तर, असे दिसेल की, प. बंगालमध्ये जरी तिसर्‍या आघाडीच्या जागा लक्षणीयरीत्या कमी झाल्या असल्या तरी, त्यांना सुमारे ४५% मते मिळालेली आहेत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

यन्ना _रास्कला's picture

20 May 2009 - 1:42 pm | यन्ना _रास्कला

भारताचा नकाशा पाह्यलात त दिसेल कि गुजरात पास्न थेट ओरिसापत्तुर आदीवासी इलाक्यात कम्युनिश्ठ, माओवाले, नक्शलवादी या सर्व्या लोकानी एक पुर्न पट्टा लाल रन्गात रन्गवुन काडला आहे. भारतभुची पुरि छाती लाल करायचा त्या लोकान्चा ईरादा हाय. कोन्च्या तरी सायटीवर पन त्यानी तसा नक्शा टाकला व्हता.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*

हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

प्रशु's picture

20 May 2009 - 4:13 pm | प्रशु

गेले मेथांबा कुणी कडे?

नितिन थत्ते's picture

20 May 2009 - 7:31 pm | नितिन थत्ते

आजकाल मिपावर राजकारणाची चर्चा चालताना त्यातल्या त्यात कम्युनिस्टांवर चर्चा करताना लोक जहाल होतात

मिपाकर म्हणजे जे चांगले शिक्षण घेऊन सुस्थित अवस्थेत जीवन जगत आहेत असे लोक. हे कोणत्याही नेटिझनांना लागू आहे.
त्यांची सुस्थित अवस्था ही सध्या अस्तित्वात असलेल्या समाजरचनेमुळे मिळाली आहे आणि टिकून आहे हे त्यांना मनातून माहिती असते. त्या बेसिक समाजव्यवस्थेला धक्का लावण्याचा प्रयत्न जे जे करू पाहतात (किंवा ज्यांच्या मुळे लागू शकतो) त्यांना खच्ची करणे हे ते आपले कर्तव्य समजतात.
ही समाजव्यवस्था काही धार्मिक विशेषाधिकार देते आणि काही आर्थिक विशेषाधिकार देते.
एकोणिसाव्या/विसाव्या शतकातील सुधारकांवर झालेली टीका ही धार्मिक विशेषाधिकार धोक्यात येत आहेत असे वाटून झालेली होती.
कम्युनिस्ट आर्थिक विशेषाधिकारांवर घाव घालण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक सुस्थितीतले लोक तुटून पडणारच.

(जगन फडणीस यांनी 'महात्म्याची अखेर' नावाचे पुस्तक लिहिले होते त्यात 'मुख्यत्वे महाराष्ट्रातीलच ब्राह्मण समाज गांधी विरोधी का?'
असा प्रश्न विचारून त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे दिले आहे. ....टिळक प्रभृतींच्या चळवळीमुळे स्वराज्य येणार आणि पेशवाई पुन्हा स्थापित होणार अशी स्वप्ने महाराष्ट्रातील ब्राह्मणांना पडू लागली होती. गांधींच्या चळवळीमुळे (ब्राह्मणांना विशेषाधिकार देणारी) पेशवाई येण्याची शक्यता मावळू लागली आणि बहुजनांची सत्ता स्थापित होणार हे दिसू लागले. त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मण गांधीविरोधी झाले. पराकोटीचा कम्युनिस्टद्वेष हा याच प्रकारचा आहे.

येथे कम्युनिस्ट तत्वज्ञान (म्हणजे सामायिक सरकारी मालकी वगैरे) उत्तम आहे वगैरे मला अजिबात म्हणायचे नाही. किंवा समाजातील सर्व समस्यांवर तेच उत्तर आहे असेही मला म्हणायचे नाही. किंवा कम्युनिस्ट सरकारे हुकुमशाही नसतात आणि चांगला कारभार करतात असेही मला म्हणायचे नाही.

विशेषाधिकारांना धक्का लावणारा कोणीही आला (अगदी सावरकर जात्युच्छेदनाच्या चळवळीतून उच्चवर्गीयांचे अधिकार चॅलेंज करू लागले तरी) त्याला अशाच टीकेला सामोरे जावे लागणार.

कम्युनिस्ट चळवळ ही असे विशेषाधिकार नष्ट करण्यात मोठ्या प्रमाणात 'यशस्वी' झालेली (निदान ५०-६० वर्षे) चळवळ आहे त्यामुळे तिची भीती प्रस्थापितांना जास्त वाटणे साहजिक आहे. त्यामुळे कम्युनिझमवरील हल्लाबोल जास्त तीव्र असणार.

असो. कुणीतरी खरडीतून मला हाच प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर शोधताना मनात आलेले विचार.

खराटा
(रंग माझा वेगळा)

सुनील's picture

20 May 2009 - 7:49 pm | सुनील

गांधीजींबद्दल तुम्ही म्हटलेले ऐकले होते. बाकी प्रतिसादही वेग़ळा विचार करायला लावणारा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

परिकथेतील राजकुमार's picture

20 May 2009 - 7:58 pm | परिकथेतील राजकुमार

>>आजकाल मिपावर राजकारणाची चर्चा चालताना त्यातल्या त्यात कम्युनिस्टांवर चर्चा करताना लोक जहाल होतात
== काय सांगता ? म्हणजे नक्की काय होतात हो ? अपशब्द वगैरे वापरतात का? जहाल होण गुन्हा आहे का हो ?

>>मिपाकर म्हणजे जे चांगले शिक्षण घेऊन सुस्थित अवस्थेत जीवन जगत आहेत असे लोक. हे कोणत्याही नेटिझनांना लागू आहे.
त्यांची सुस्थित अवस्था ही सध्या अस्तित्वात असलेल्या समाजरचनेमुळे मिळाली आहे आणि टिकून आहे हे त्यांना मनातून माहिती असते. त्या बेसिक समाजव्यवस्थेला धक्का लावण्याचा प्रयत्न जे जे करू पाहतात (किंवा ज्यांच्या मुळे लागू शकतो) त्यांना खच्ची करणे हे ते आपले कर्तव्य समजतात.
== काय सांगता काय ? आमच्या कर्तव्यांची तुम्हालाच जास्ती माहीती बॉ ! अगदी दृष्ट काढावीशी वाटतीये बघा तुमची.
बर सध्या कुठली समाज रचना अस्तीत्वात आहे जिच्यामुळे आम्हाला सुस्थीती लाभली आहे , ते कृपया स्पष्ट करावे हि विनंती.
खच्ची करणे म्हणजे काय ? जे आगोदरच खचलेले आहेत त्यांना अजुन खचवता येते का ? एकदा तुम्ही सध्या अस्तीत्वात असलेल्या समाज रचनेविषयी बोलता आणी क्षणात 'बेसीक' समाज रचनेकडे उडी मारता.. असे का?

>>ही समाजव्यवस्था काही धार्मिक विशेषाधिकार देते आणि काही आर्थिक विशेषाधिकार देते.
एकोणिसाव्या/विसाव्या शतकातील सुधारकांवर झालेली टीका ही धार्मिक विशेषाधिकार धोक्यात येत आहेत असे वाटून झालेली होती.
== हि म्हणजे कोणती समाज रचना ? सध्या अस्तीत्वात असलेली का बेसीक ? एकोणिसाव्या/विसाव्या शतकातल्या गोष्टींचा आणी आत्ताच्या जहाल होण्याचा संबंध काय ? धार्मीक विशेषाधीकार म्हणजे काय ? त्याचा समाजातील कोणाला आणी कुठल्या प्रकारे फायदा होत होता ? किती टक्के लोक हा फायदा उकळत होते आणी कोणत्या स्वरुपात ? आर्थीक का सामाजीका ? का अजुन काही ? आर्थीक असेल तर साधारण किती आकडी?

>>कम्युनिस्ट आर्थिक विशेषाधिकारांवर घाव घालण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक सुस्थितीतले लोक तुटून पडणारच.
== आर्थीक सुस्थीती म्हणजे काय ? आजही 'करंडी कशाला, आत्ता १ डझन आंबे घेउ आणी पुढच्यावेळी काय ते बघु' असा विचार करणार्‍या कुटुंबाला आर्थीक सुस्थीतीत म्हणता येईल काय? डॉक्टरनी दिलेल्या १२ गोळ्यांपैकी ६ आज आणी ६ अजुन ५ दिवसांनी आणणारे आर्थीक सुस्थीतीत असतात काय? आर्थीक विशेषाधिकार म्हणजे काय? त्यांच्यावर घाव कसा घालतात ?

>>(जगन फडणीस यांनी 'महात्म्याची अखेर' नावाचे पुस्तक लिहिले होते त्यात 'मुख्यत्वे महाराष्ट्रातीलच ब्राह्मण समाज गांधी विरोधी का?'
असा प्रश्न विचारून त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे दिले आहे. ....टिळक प्रभृतींच्या चळवळीमुळे स्वराज्य येणार आणि पेशवाई पुन्हा स्थापित होणार अशी स्वप्ने महाराष्ट्रातील ब्राह्मणांना पडू लागली होती. गांधींच्या चळवळीमुळे (ब्राह्मणांना विशेषाधिकार देणारी) पेशवाई येण्याची शक्यता मावळू लागली आणि बहुजनांची सत्ता स्थापित होणार हे दिसू लागले. त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मण गांधीविरोधी झाले. पराकोटीचा कम्युनिस्टद्वेष हा याच प्रकारचा आहे.
== कोण हे जगन फडणीस ? त्यांचे दाखले द्यावेत असे काय असामान्य कार्य त्यांनी केले आहे? गांधीजींच्या सतत सेवेत असणारे आणी नथुरामला नावानी ओळखुन पकडुन देणारे 'गाडगीळ साहेब' ब्राम्हण न्हवते काय? ते पुण्यातले न्हवते काय?

>>येथे कम्युनिस्ट तत्वज्ञान (म्हणजे सामायिक सरकारी मालकी वगैरे) उत्तम आहे वगैरे मला अजिबात म्हणायचे नाही. किंवा समाजातील सर्व समस्यांवर तेच उत्तर आहे असेही मला म्हणायचे नाही. किंवा कम्युनिस्ट सरकारे हुकुमशाही नसतात आणि चांगला कारभार करतात असेही मला म्हणायचे नाही.
== तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे तेच अम्हाला कळलेले नाही.

>>विशेषाधिकारांना धक्का लावणारा कोणीही आला (अगदी सावरकर जात्युच्छेदनाच्या चळवळीतून उच्चवर्गीयांचे अधिकार चॅलेंज करू लागले तरी) त्याला अशाच टीकेला सामोरे जावे लागणार.
== पुन्हा तेच. विशेषाधिकारांची कृपया व्याख्या द्या आणी त्यातुन होणारे एका विशीष्ठ समाजाचे फायदे सांगा.

>>कम्युनिस्ट चळवळ ही असे विशेषाधिकार नष्ट करण्यात मोठ्या प्रमाणात 'यशस्वी' झालेली (निदान ५०-६० वर्षे) चळवळ आहे त्यामुळे तिची भीती प्रस्थापितांना जास्त वाटणे साहजिक आहे. त्यामुळे कम्युनिझमवरील हल्लाबोल जास्त तीव्र असणार.
== यशस्वी झाली म्हणजे नक्की काय झाली ? उदाहरणे दिल्यास डोक्यात प्रकाश पडेल. ह्यांची भिती नक्की कोणाला वाटत आहे ? प्रस्थापितांना, आर्थीक सुस्थीती वाल्यांना का ब्राम्हणांना ?

>>असो. कुणीतरी खरडीतून मला हाच प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर शोधताना मनात आलेले विचार.
== का का का ? ते मनातच का नाही ठेवले हो ?? ;)

असो उत्तरांच्या प्रतिक्षेत.....

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

20 May 2009 - 8:11 pm | नितिन थत्ते

=)) :''(

मराठी वाचन शिकवणार्‍या काही क्लासची जाहिरात सापडली तर दुवा देईन.

खराटा
(रंग माझा वेगळा)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 May 2009 - 8:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे सगळं एकवेळ जरी मान्य केलं तरीही, चीनला भारतविरोधात पाठींबा देणार्‍यांचा भारतीयांनी पराकोटीचा राग का करू नये?

नितिन थत्ते's picture

20 May 2009 - 8:21 pm | नितिन थत्ते

काही हरकत नाही. मी द्वेषाचे एक कारण सांगितले. द्वेश करणार्‍या प्रत्येकाचे कारण वेगळे असू शकते.

जसे दादाभाई नौरोजी, चाफेकर, टिळक, भगतसिंग, नेताजी आणि गांधी हे सर्व इंग्रजविरोधक होते पण प्रत्येकाची इंग्रजी राज्याला विरोध करण्याची कारणे वेगवेगळी होती. स्वातंत्र्य हे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या उद्दिष्टाची एक पायरी होती.
(अवांतरः आज बंगालमधील लाल डाव्या आघाडीत सामील असलेला फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष नेताजींनी स्थापन केलेला आहे)

खराटा
(रंग माझा वेगळा)

क्लिंटन's picture

20 May 2009 - 8:31 pm | क्लिंटन

कम्युनिस्टांना नावे ठेवायचे हे कारण असेलही.पण कम्युनिस्टांना नावे ठेवणार्‍या १००% लोकांच्या बाबतीत हेच कारण असेल असे मला वाटत नाही.माझेच उदाहरण घ्यायचे तर मी कम्युनिस्टांना नावे आधी ठेवायला लागलो आणि मग कम्युनिझमला.म्हणजे पूर्वी (शाळेत असताना) मला कम्युनिस्ट पक्षाची वेगळी आर्थिक धोरणे आहेत हेच माहित नव्हते आणि कम्युनिझमला अपेक्षित अर्थव्यवस्था कशी असेल याचा पत्ता नव्हता.पण त्याचवेळी कम्युनिस्टांनी वेळोवेळी केलेल्या राष्ट्रद्रोही कारवायांची माहिती मला झाली.१९६२ च्या युद्धात चीनला समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली हे मला तेव्हा कळले.भारतातील एक राजकिय पक्ष गोरगरीबांचा कैवारी असल्याचा टेंभा मारत उघडउघड शत्रूचे समर्थन करतो हे कळताच शुध्द शब्दात सांगायचे झाले तर माझी तळपायाची आग मस्तकात गेली आणि तेव्हापासूनच कम्युनिझम नाही तरी भारतातल्या कम्युनिस्टांना मी नावे ठेऊ लागलो.त्यानंतरच्या काळात मला कम्युनिस्टांच्या अर्थव्यवस्थेविषयीच्या कल्पनांची ओळख झाली.माझ्या स्वत:च्या खाजगी आयुष्यातही मला प्रत्येक ठिकाणी कोणी ’तू असे कर तसे करू नको किंवा अमुक कर तमुक करू नको’ असे सांगितले तर ते अजिबात आवडणार नाही.आणि यांच्या व्यवस्थेमध्ये आर्थिक आणि राजकिय अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये सरकारच सगळ्या गोष्टी ठरविणार! आणि ते ही अनेकदा बंदुकीच्या जोरावर! त्यामुळे मी भारतातल्या कम्युनिस्टांबरोबरच कम्युनिझमला पण नावे ठेऊ लागलो.

तेव्हा सगळे लोक प्रथम कम्युनिझम म्हणजे काय आणि त्याची ध्येयधोरणे काय हे आधी समजावून घेऊन मग कम्युनिस्टांना नावे ठेवत असतील हे माझ्या स्वत:च्या उदाहरणावरून वाटत नाही.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

सुनील's picture

20 May 2009 - 9:41 pm | सुनील

तुम्ही वेगळे दिसता!!

कारण बहुसंख्य लोक (माझ्यासहित) कम्युनिझमकडे केवळ आणि केवळच आर्थिक दृष्टीतून पाहतात.

असो, डाव्यांच्या पाठिंब्याविना मनमोहन सिंग यांचे सरकार स्थापन होणार असे कळताच शेअर बाजार उसळी मारून वर कसा आला बॉ?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चिरोटा's picture

21 May 2009 - 9:48 am | चिरोटा

त्या बेसिक समाजव्यवस्थेला धक्का लावण्याचा प्रयत्न जे जे करू पाहतात (किंवा ज्यांच्या मुळे लागू शकतो) त्यांना खच्ची करणे हे ते आपले कर्तव्य समजतात

१००% सहमत. कम्युनिस्ट धर्मविरोधी(विशेषतः संघविरोधी/भाजपा विरोधी) आणि अमेरिकाविरोधी आहेत हे त्यामागचे आणि एक कारण आहे. गेल्या १५ वर्षात अमेरिका/ब्रिटन भारताच्या सम्बंधांमुळे मुळे भारतातल्या मध्यम्/उच्च मध्यम वर्गाचा फायदा झाला. नोकर्‍या/धंदे/बाहेर स्थायिक होण्याचे विसा ह्यामुळे मध्यम्/उच्चमध्यम वर्गाचे राहणीमान सुधारले.आणि खिशात पैसा पण जास्त आला.ह्या संबंधाना जर धक्का लागला तर साहजिकच त्याला विरोध होतो.म्हणुनच अमेरिका/ब्रिटनच्या बर्‍याच्श्या धोरणांची री ओढण्याचे काम भारतातले काही लोक करत असतात.ईराकवरच्या हल्यांचे भारतातही समर्थन करणारे बरेच असतात.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

मराठी_माणूस's picture

21 May 2009 - 11:02 am | मराठी_माणूस

म्हणुनच अमेरिका/ब्रिटनच्या बर्‍याच्श्या धोरणांची री ओढण्याचे काम भारतातले काही लोक करत असतात

सहमत, उत्तम उदाहरण म्हणजे बरेचसे एन आर आय

टिळक प्रभृतींच्या चळवळीमुळे स्वराज्य येणार आणि पेशवाई पुन्हा स्थापित होणार अशी स्वप्ने महाराष्ट्रातील ब्राह्मणांना पडू लागली होती. गांधींच्या चळवळीमुळे (ब्राह्मणांना विशेषाधिकार देणारी) पेशवाई येण्याची शक्यता मावळू लागली आणि बहुजनांची सत्ता स्थापित होणार हे दिसू लागले. त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मण गांधीविरोधी झाले.

असं वाचनात आलं की टिळकांना अस्पृश्यांच्या सभेत त्यांचा चहा घेतला या कारणावरून पुण्यातील ब्राम्हणांनी कित्येक वर्षे वाळीत टाकलं होतं. त्यांच्या घरी श्रावणी सोडा, लग्ना कार्याला सुद्धा भटजी येत नव्हते. त्यांच्या संस्थानिक मित्राच्या आश्रित ब्राम्हणाने घरात लग्न लावले. इतकंच काय त्यांच्या बरोबरीने काम करणारे, रात्र रात्र बसून केसरी मराठा प्रकाशित करणारे ब्राम्हण मित्र बहिष्काराच्या भीतीने त्यांच्याकडे पाणीसुद्धा पीत नव्हते... सुमारे १९०८ किंवा त्यानंतर टिळक हे तेल्या तांबोळ्यांचे पुढारी समजले जात होते आणि त्यांची किर्ती पंजाब आणि बंगाल पर्यंत होती. केसरीच्या अग्रलेखांसाठी त्यांना राजद्रोहासारखा गंभीर आरोप ठेवून सहा वर्षांची शिक्षा झाली.
फाशी गेलेले क्रांतिकारक, आणि काळे पाणी मिळालेले जहाल नेते सोडता कोणाही सत्याग्रहीला इतकी मोठी शिक्षा झाली नसावी (चुभू देघे). मग या परिस्थितीत टिळकांमुळे पेशवाई येईल असे वाटणे निव्वळ हास्यास्पद आहे... टिळकांचे जवळचे मित्र आणि निष्ठावंत अनुयायी दादासाहेब खापर्डे हे कुठले ब्राम्हण होते?
तेव्हापासून आत्तापर्यंत पुण्यातील पेठेतील ब्राम्हण हे काँग्रेस धार्जिणेच आहेत. काँग्रेस स्वातंत्र चळवळीत अनेक नेते हे ब्राम्हणच होते - रावसाहेब पटवर्धन, गाडगीळ, इ.
त्यामुळे विनाकारण टिळकांचा उल्लेख योग्य नाही. सावरकरांच्या जहाल विचारांनी अनेक लोक भारावले होते. त्यात ब्राम्हण समाज जास्त होता. आणि सावरकर आणि काँग्रेसचे पटले नाही. गांधी आणि सावरकर ही टोकाची मते होती. त्यामुळे त्यांच्यावर गांधीजींमुळे किंवा कॉंग्रेस मुळे अन्याय झाला असे काही लोकांचे मत झाले. आणि पुणे हे अनेक वर्षे भारतीय राजकारणाचे केंद्र होते. मुस्लिम अनुनयाचे धोरण पटले नाही म्हणून गांधी विरोधी झाले एवढी स्वतंत्र विचारसरणी असलेले असंख्य लोक तेव्हा अस्तित्वात होते.

अवांतराबद्दल क्षमस्व. पण टिळकांसारख्या अत्यंत नि:स्पृह आणि महान व्यक्तीला तिसर्‍या वादात ओढणे पटले नाही.

नितिन थत्ते's picture

21 May 2009 - 5:47 pm | नितिन थत्ते

मी टिळकांना वादात ओढण्यासारखे कुठलेही विधान केलेले नाही. टिळक पेशवाई आणणार होते किंवा त्यांची तशी इच्छा होती असेही मी म्हटलेले नाही.

(पेशवाई याचा अर्थ पेशव्यांचे राज्य असा न घेता ब्राह्मणांना प्राधान्य देणारे राज्य असा घ्यायला हवा).

खराटा
(रंग माझा वेगळा)

मैत्र's picture

22 May 2009 - 11:12 am | मैत्र

माझ्या प्रतिसादात पेशवाई बद्दल काही मुद्दा नाहीये, पेशव्यांचे राज्य असंही कुठे म्हटलेलं नाही.

अनेक ब्राम्हणांचा टिळकांना असलेला विरोध आणि बहुजनांमधलं टिळकांचं स्थान तसंच टिळकांच्या कामाचा आणि परिस्थितीचा विचार करता त्यांच्या मुळे ब्राह्मणांना प्राधान्य देणारे राज्य येईल असे वाटणे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 May 2009 - 1:12 am | बिपिन कार्यकर्ते

लोक कम्युनिस्टांवर इतके चिडतात तरी का?

खूपच चांगला प्रश्न आहे. माझ्यापुरते उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.

माझ्या कानावर कम्युनिस्ट हा शब्द शाळेत असताना आला. साधारण पाचवीत असताना आमच्या शाळेतल्या एका बाईंच्या तोंडून 'भगवद्गीता आणि मार्क्स' या पुस्तकाचे नाव ऐकले. पुढे इतिहासात मार्क्स आणि एंगल्सबद्दल शिकलो. त्या काळी युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे तयार झालेला कामगार वर्ग (जो तो पर्यंत मानव इतिहासात एवढ्या प्रमाणात नव्हता) कसा भरडला जात होता याचे वर्णन वाचले. या सगळ्या बाबतीत मार्क्स-एंगल्सने मांडलेले विचार नक्कीच अतिशय वेगळे, मूलभूत होते. तो पर्यंत फारसे काही मत (चांगले किंवा वाईट) नव्हते. (शाळेत एका मित्राने 'मी मोठेपणी कम्युनिस्ट होणार' असे एकदा सांगितले होते, त्याला 'का?' असे विचारले तर त्याने 'माझा मामा कम्युनिस्ट आहे' असे उत्तर दिले होते ते ऐकून लै हसलो होतो. असो. हे अवांतर झाले.)

पुढे एका घनिष्ट मित्राच्या घरी येणेजाणे वाढले. त्याचे वडिल सीपीआयचे सदस्य. त्यांच्या घरी पक्षाचे बरेच साहित्य (लिटरेचर) असायचे. त्यात युएसएसाआर आणि त्याच्या घटक प्रजासत्ताकांबद्दल वगैरे बरिच पुस्तकं वाचली. त्यात रंगवलेली भूलोकीच्या स्वर्गाची चित्रं (शाब्दिक आणि छायाचित्रं, दोन्ही) वाचून त्या अर्धवट वयातही ते सगळे 'टू गुड टू बी ट्रू' वाटायचे. त्याचवेळी वर्तमानपत्रांमधे कम्युनिस्ट राष्ट्रांबद्दल, तिथल्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल, पोलंडच्या कामगार विद्रोहाबद्दल (सॉलिडॅरिटी चळवळ, लेक वॉलेसा) वगैरे वाचायचो. हे चित्र आणि ते चित्र अगदीच विसंगत होतं. सावध झालो.

त्याचवेळी 'नाझी भस्मासूराचा उदयास्त हाती पडलं'. दुसर्‍या महायुद्धाच्या आधी स्टॅलिन आणि हिटलरने दोस्ती करून पोलंडची कशी काशी केली ते वाचले. आणि नंतर त्याच हिटलरने स्टॅलिनवरच चढाई केली. त्या अनुषंगाने भारतियच नव्हे तर जगभरातील कम्युनिस्टांनी मारलेली कोलांटीउडी (एका रात्रीत लोकयुद्धाचे साम्राज्यवादी युद्ध झाले) वगैरे वाचनात आले. स्टॅलिनने केलेले अनन्वित अत्याचार वगैरे वाचले. कष्टकर्‍यांच्या हुकूमशाही (डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलेतारिएत) च्या नावाखाली व्यक्तिपूजेवर आधारित हुकूमशहा रशियातच नव्हे तर पूर्ण कम्युनिस्ट ब्लॉकमधे कसे उदयाला आले ते वाचले. झेक / हंगेरियन राज्यक्रांती कश्या दडपल्या गेल्या ते वाचले. (असे अजून बरेच काही लिहिता येईल.) या सगळ्यामुळे कम्युनिझमच्या उदात्त बातांमधला फोलपणा जाणवला.

अजून काही विचार करता, कम्युनिझमची मूलभूत चूक ही वाटली की त्यांनी मानव आणि मशिन यात फरकच केला नाही. मानव हा काही गुणदोष, आवडीनिवडी, भावभावना इत्यादींनी युक्त असतो हे ते विसरले. (उदाहरणार्थ: सामूहिकीकरणाचे प्रयत्न झाले. वैयक्तिक स्वार्थ समूळ गेल्याने, काम करण्याची इच्छा बहुतांशी मेली. लोक केवळ पाट्या टाकण्याचे काम करू लागले. उत्पादन घसरले.) जनता दारिद्र्यात असताना राज्यकर्ते मात्र ऐषोआरामात राहत होते. स्टॅलिनने तर कित्येक जाती / वंश समूह समूळ उपटून त्यांचे सक्तीने स्थलांतरण केले. मला तरी कम्युनिस्टांमधे आणि ते ज्याला अमेरिकेचा साम्राज्यवाद म्हणत त्यात काहीच फरक दिसेना. फक्त अमेरिकेच्या ऐवजी रशियाचे नाव टाकायचे. बाकी धंदे तेच.

असं सगळं असताना स्वातंत्र्ययुद्धात वगैरे कम्युनिस्टांची वागणूक, पाकिस्तानला पाठिंबा वगैरे वाचले. कळस झाला जेव्हा ६२च्या युध्दात काही कम्युनिस्टांनी घेतलेली चीनधार्जिणी भूमिका कळली तेव्हा. मी हतबुद्धच झालो, म्हणाना. त्यात परत जर का भारत हल्लेखोर असता तर समजू शकलो असतो. (मी पण समर्थन नसते केले भारताचे). पण आधीच तिबेटचा घास घेऊन बसलेल्या चीनने आता सरळ आपल्या देशाचे लचके तोडायचा प्रयत्न केला आणि हे असे वागले!!! मला अजूनही कुतूहल आहे की हे असे का वागले? त्यांची कारणं समजून घ्यायची खरंच इच्छा आहे. राष्ट्रापेक्षा विचारसरणी श्रेष्ठ असे मानताना, तसाच विचार चीन रशिया का करत नाही या बद्दल कधीच विचार नाही केला. कम्युनिस्ट चीनमधे ज्या प्रकारचा हुकुमशाही कारभार चालतो तसा यांना इथे चालेल का? इथे लोकशाहीची फळं भोगत कष्टकर्‍यांच्या हुकुमशाहीचे समर्थन अगदी सहजतेने करतात.

जगात कुठेच कम्युनिझम यशस्वी झाला नाही. सगळीकडे पराभवच झाला शेवटी. कम्युनिझम नीट राबवला गेला नाही असे काही लालभाई म्हणतात, त्यात तथ्य असेलही, मी काही दास कापिताल वाचला नाही की ते डायलेक्टिक (हा शब्द डोंगर म्हातारा झाला मधे पहिल्यांदा वाचला होता.) का काय ते म्हणतात कळत नाही. त्यामुळे त्यांचे हे म्हणणे मी बेनिफिट ऑफ डाऊट देऊन सोडू शकतो. पण जर का कम्युनिझम नीट राबवला गेला नाही तर त्याच राज्यकर्त्यांच्या भजनी हे लालभाई का लागले, याचे मात्र उत्तर कधीच मिळाले नाही. जेव्हा जेव्हा कम्युनिस्ट भेटले आणि उत्तरे शोधायचा प्रयत्न केला तेव्हा वरील कोणतेही उदाहरण दिले की हा भंडवलदारांचा अपप्रचार आहे, तुम्ही बूर्झ्वा लोक, तू ब्राह्मण आहेस म्हणून असा विचार करतोस अशी शेलकी विशेषणं / शिव्या मिळाल्या. उत्तर कधीच नाही. (हाच अनुभव मिपावर पण आला. विकि / मेथांबा वगैरेंना प्रामणिकपणे विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं कधीच मिळाली नाहीत.)

मला व्यक्तिशः कम्युनिझम बद्दल आस्था नाही त्याची ही काही कारणं, ही उत्तरं मिळाल्याशिवाय त्यात बदल होईल असे वाटत नाही.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

21 May 2009 - 1:40 am | चतुरंग

ऍनिमल फार्म मधल्या डुकराचं, 'ऑल एनिमल्स आर इक्वल, बट सम ऍनिमल्स आर मोर इक्वल दॅन अदर्स' हे वाक्य वाचलं आणि हा अख्ख्या कम्युनिझम विचारशैलीचा सारांश आहे हे पटले.
हे जे 'मोर इक्वल' आहेत ना तेच त्यांच्या पराभवाचे आणि नाशाचे कारण आहेत.

'कम्युनिस्टांवर राग का?' कोणतेही कम्युनिस्ट ह्याचे उत्तर देऊ शकणार नाहीत कारण त्यात उत्तर देण्यासारखे काही नाहीच आहे. जे मूलभूत मानवी हक्कांच्या नैसर्गिक प्रेरणांविरुद्ध असते त्याचा राग कोणत्याही सर्वसामान्य विचारी माणसाला येणारच, मग ते कम्युनिझम मधले असो किंवा इतरत्र.

चतुरंग

अनिता's picture

21 May 2009 - 2:07 am | अनिता

अगदी नेमके सार सा॑गितले आहे आपण.

वाघा॑चे (खरे व खोटे) आणि कम्युनिस्टांचे दिवस चा॑गले नाहीत हेच खरे...त्या॑ची जागा म्युझियमातच..

जॉर्ज ऑर्वेल हा सोशलिस्ट-कॉम्युनिस्ट सीमेवरचा होता.

"ऍनिमल फार्म" हे पुस्तक रशियातील राज्यकर्त्यांवर प्रखर टीका करणारे आहे, हे मान्य. पण मध्ये ट्रॉट्स्कीवादी कॉम्युनिस्ट बरे होते, त्यांना हाकलले, वगैरे कथाभागही आहेच. शेताच्या मूळ घटनेतल्या "सर्व समान आहेत" कलमात "पण काही अधिक समान आहेत", हे डुकरांनी जोडले, असा कथाभागही आहे. पण त्याच्या शेवटी डुकरे दोन पायावर चालायला लागून शेजारच्या मनुष्य-शेतकर्‍यांबरोबर मेजवान्या झोडायला लागतात. म्हणजे स्टॅलिन-राज्यकर्ते शेवटी सरंजाम/भांडवलशाही लोकांसारखेच झाले असा काही मथितार्थ आहे.

"सम आर मोर ईक्वल दॅन अदर्स" ही टीका कम्युनिस्ट विशेष वाईट आहेत अशा संदर्भात नसावी. कम्युनिस्ट राज्यकर्ते बाकीच्यांच्या इतकेच वाईट अशा अर्थाची असावी. मला वाटते ऍनिमल फार्म या कादंबरीचा हाच अर्थ सर्वात पारदर्शक आहे. हा ऑर्वेलच्या मते कम्युनिस्ट विचारसरणीचा सारांश आहे, असे समजण्यासाठी कादंबरीचा जवळजवळ सगळा कथाभाग खोडावा लागेल.

म्हणून मला वाटते, की वरील प्रतिसादात जॉर्ज ऑर्वेलच्या कादंबरीचा संदर्भ चुकलेला आहे. पण ते एकटे वाक्यही मोठे भन्नाट प्रतिभाशाली आहे, खरे. ऑर्वेलच्या कादंबरीचा संदर्भ विसरून त्या समर्थ वाक्याने तुमच्या मनात असा विचार स्फुरला असेल, ही शक्यता आहे.

ऍनिमल फार्म कादंबरीचा संदर्भ टाकला, तर मला खुद्द "ऑल आर ईक्वल बट सम आर मोअर ईक्वल दॅन अदर्स" या प्रतिभाशाली वाक्याने हे वेगळे चित्र मनासमोर येते:
"सर्व समान आहेत, पण काही बाकीच्यांपेक्षा अधिक समान आहेत" ही क्रूर थट्टा सर्वच लोकशाही देशांतसुद्धा होते, नाही का? भारत, यू.एस., वगैरे देशांच्या राज्यघटना सर्वांना समान अधिकार देतात. पण प्रत्यक्षात काही लोकांना सरकारकडून, न्यायव्यवस्थेकडून अधिक फायदे मिळतात. असा अनुभव भारतात येतो, अशा बातम्या अधूनमधून ऐकायला मिळतात - अमुक श्रीमंत नट गाडी झोपडपट्टीवासीयांवरून चालवतो, काळविटे मारतो, पण सहीसलामत सुटतो, वगैरे. अमेरिकेतही अशा बातम्या ऐकायला मिळतात की अमुक श्रीमंत क्रीडापटू बायकोचा खून करतो, पण न्यायालयातून निर्दोष सुटतो... काळ्यागोर्‍यांना पोलीस वागवतात त्यात फरक तर इतका रोजचा आहे, की लक्षही जात नाही.

तरी लोकशाहीवादी असल्यामुळे असा विचार येऊनही लोकशाहीबद्दल काही मूलगामी मत मी करून घेत नाही - म्हणजे "लोकशाही मनुष्याच्या नैसर्गिक प्रेरणांच्या विरुद्ध आहे," वगैरे.

विकास's picture

22 May 2009 - 1:12 am | विकास

>>>"सम आर मोर ईक्वल दॅन अदर्स" ही टीका कम्युनिस्ट विशेष वाईट आहेत अशा संदर्भात नसावी.

खरे आहे. "All animals are equal, but some animals are more equal than others" हे वाक्य कम्युनिस्ट विशेष वाईट आहेत असे म्हणत नाही, तर चतुरंगने म्हणल्याप्रमाणे, "कम्युनिझम विचारशैलीचा सारांश आहे," अथवा त्यातील आदर्शवादी स्वप्नांचे वेड इतरांना लावून स्वतः (म्हणजे सत्ताधारी) कडे जास्त (कुठलाही) फायदा घेयचा हा त्यातील उद्देश आहे असे म्हणावेसे वाटते. स्वतःचे विषम वाटणी करण्याच्या हक्काचे "जस्टीफिकेशन" करणारे हे वाक्य आहे असे वाटते.

थोडक्यात सगळ्यांना समान वागणूक हे तत्व जे कुठल्याच नैसर्गिक वृत्तीत बसत नाही ते आमच्यात आहे असे म्हणत परत वरकरणी समानता म्हणून १०० वेळा ओरडायचे म्हणजे इतरांना वाटते खरेच असेल आणि आत वाढणारी विषमता त्यात लपून जाते.

>>>"सर्व समान आहेत, पण काही बाकीच्यांपेक्षा अधिक समान आहेत" ही क्रूर थट्टा सर्वच लोकशाही देशांतसुद्धा होते, नाही का? भारत, यू.एस., वगैरे देशांच्या राज्यघटना सर्वांना समान अधिकार देतात.... <<<

सर्वांना समान अधिकार नक्कीच आहेत पण सर्वांना (राष्ट्रीयकरण करून संपत्तीची) समान वाटणी आहे असे आपण म्हणले नाही. किंबहूना जिथे जिथे भारतात असे प्रकार करायचा प्रयत्न केला गेला तेथे तेथे लबाड्याच झाल्या... अगदी थोडे वेगळे उदाहरण "भूदान" चळवळीचे पण आहे जिथे बिहारमधे विनोबांना अनेक जमिनदारांनी स्वखुषीने जमिनी देऊन अनेकांचे पुनर्वसन विनोबा पुढच्या गावात जाईपर्यंत केले किंवा नापिक जमिनी दिल्या...

थोडक्यात वास्तववादाशी फारकत केलेल्या आदर्शवादाचा अतिरेक झाला की तो पेलवतही नाही आणि सोडवतही नाही. आणि मग त्याची परीणिती होती ती भोंदूगिरीत... मग ते साम्यवाद असोत, समाजवाद असोत, गांधीवाद असोत अथवा गांधीजींच्या स्वप्नातील आणि भाजपाच्या जाहीरनाम्यातील रामराज्य असोत.

>>>तरी लोकशाहीवादी असल्यामुळे असा विचार येऊनही लोकशाहीबद्दल काही मूलगामी मत मी करून घेत नाही - म्हणजे "लोकशाही मनुष्याच्या नैसर्गिक प्रेरणांच्या विरुद्ध आहे," वगैरे. <<<

"Democracy is the worst form of government, except for all those other forms that have been tried from time to time." (from a House of Commons speech on Nov. 11, 1947)

हुप्प्या's picture

21 May 2009 - 3:39 am | हुप्प्या

कम्युनिझमचे एक आवडते वाक्य म्हणजे प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे आणि प्रत्येकाकडून त्याच्या कुवतीप्रमाणे. हे वाक्य वाचायला छान छान वाटले तरी अशी व्यवस्था असेल तर लोक कामचुकारपणा करणारच. सगळे सरकार चालवते आहे. मला अमका एक पगार मिळणार. मग मी खूप काम केले काय किंवा कमी केले काय. असले स्थितप्रज्ञ होणे माणसाला जमणार नाही. त्यामुळे उत्पादन कमी होणार, नवे संशोधन, नवनिर्माण हे सगळे यथावकाश बंद पडणार. ही एक मोठी अडचण आहे. दुसरे असे की इतिहासातील सगळे कम्युनिस्ट राज्यकर्ते हे हुकुमशहाच्या तोडीस तोड जुलमी होते. स्टालिन, माओ, पोल पॉट वगैरे सगळे तसलेच. झेकोस्लोवाकिया, युगोस्लाविया ह्या देशातही असलीच रत्ने. त्यामुळे कम्युनिस्टांबद्दल आकर्षण का वाटावे? भारतात ज्या राज्यात कम्युनिस्ट राजवट आहे तिथे उद्योगधंदे बंद पडत आहेत. संप, हरताळ ह्यांचेच राज्य आहे.
भांडवलशाही अगदी वाईट आहे. पण उपलब्ध पर्यायांमधे ती सगळ्यात चांगली आहे असेच म्हटले पाहिजे.

नितिन थत्ते's picture

21 May 2009 - 10:51 am | नितिन थत्ते

मी एमिल बर्न्स यांचे पुस्तक वाचून कम्युनिझम समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे. मला वाटते ते कम्युनिस्टांना मान्य असलेले 'अधिकारी' पुस्तक आहे.

त्या पुस्तकात वस्तूची किंमत ही त्यात कामगारांची किती श्रमशक्ती वापरलेली आहे त्यावर ठरते असे काहीसे विवेचन आहे. म्हणजे जास्त श्रमशक्ती लागणारी वस्तू जास्त महाग असते. त्यामुळे भांडवलदार जेव्हा एखादी वस्तू विकून नफा कमावतो तेव्हा तो कामगाराला पुरेसा वाटा देत नसल्याने तो नफा कमावत असतो. (आत्ता हे पुस्तक माझ्यासमोर नाही त्यामुळे तपशिलात काही चूक होऊ शकेल).
उलट बाजारव्यवस्थेत वस्तूच्या परसीव्ड उपयुक्ततेवर आणि उपलब्धतेवर वस्तूचे मूल्य ठरते. त्यामुळे एखाद्या भांडवलदाराने काही शोध लावून उत्पादकता एकदम वाढवली तरी वस्तूची परसीव्ड उपयुक्तता तेवढीच असल्याने किंमत (प्राइस) कमी होत नाही पण बनवण्याची किंमत (कॉस्ट) कमी होते आणि भांडवलदाराचा अतिरिक्त नफा होतो. ही उत्पादकता कामगारांनी जास्त काम केल्यामुळे वाढलेली नसते म्हणून तो त्यातला जास्त वाटा कामगारांना देत नाही. याला कामगारांची पिळवणूक होते असे म्हणता येणार नाही.

या मुद्द्यावर माझे कम्युनिस्टांशी मतभेद आहेत. मार्क्स एंजल्स यांनी जेव्हा ही वरकड मूल्याची थिअरी मांडली तेव्हा कदाचित जास्त काम म्हणजे जास्त उत्पादकता हे समीकरण योग्य असेल पण आजच्या भांडवलशाहीत ते खरे नाही.

उत्पादनसाधनांच्या मालकीमुळे संधीची असमानता येणे आणि त्यामुळे विषमता येणे हे मला मान्य असलेले विचार आहेत. त्यावरील उपाय शोधणे आवश्यक आहे हेही मान्य आहे. (रशिया टाइप सरकार हा त्यावरचा उत्तम उपाय नसावा असे आता मला 'पश्चातबुद्धीने' म्हणता येते).

रशियातील कम्युनिस्ट काळात (गोर्बाचेव यांनी सत्ता हाती घेतली तेव्हा) सर्वांना शिक्षणाची, अन्नाची, निवार्‍याची, आरोग्याची आणि वस्त्रांची किमान उपलब्धता समानपणे उपलब्ध होती की नव्हती (भले ती जुनाट तंत्रज्ञानावर आधारित असेल) ते कोणी सांगू शकले तर बरे होईल. रशियाची आजची स्थिती काय आहे हे येथे गैरलागू आहे कारण आता रशियाने भांडवलशाहीचा स्वीकार करून १५ वर्षे झाली आहेत.

खराटा
(रंग माझा वेगळा)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2009 - 4:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आचार्य अत्र्यांबरोबर कम्युनिष्टही होते त्याबद्दल कोणाकडे काही माहिती आहे का ?

संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा महाराष्ट्रात मराठी माणसाने घडवलेला एकाअर्थी चमत्कार होता. एक काँग्रेसवाले, ज्यांचा दिल्लीश्वरंचा विरोध म्हणून आमचा विरोध, सोडले तर सर्व राजकीय मत* एकत्र झाली होती... त्यात काँ डांगे हे कम्युनिस्ट पक्षातून होते. त्याकाळी कम्युनिस्ट हे मुंबईत प्रबळ होते. त्यांची शक्ती कामगार आणि कामगार मराठी. त्यामुळे त्यांच्या सहभागाने चळवळीला जास्त शक्ती प्राप्त झाली असे नक्की वाटते. माधव गडकरींचे या संदर्भात लेख वाचले होते, ज्यावर नंतर पुस्तकही निघाले मात्र आत्ता सर्व लक्षात नाही.

अवांतर

* सर्व राजकीय मते एकत्र होती त्यात एक थोडा अजून अपवाद : स्वा. सावरकर. ते विरोधात नव्हते / नसावेत. मात्र जेंव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते त्यांचा पाठींबा मागायला १९५० च्या दशकाच्या शेवटात गेले, तेंव्हा ते इतकेच (या अर्थी) म्हणाले, "सध्या, राज्यांच्या सीमांचा विचार करायच्या ऐवजी राष्ट्रांच्या सीमेचा करा. तुमच्या नेहरूंना सांगा तो माओ आपल्या देशावर नजर ठेवून आहे..."

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2009 - 5:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काँ डांगे हे कम्युनिस्ट पक्षातून होते. त्याकाळी कम्युनिस्ट हे मुंबईत प्रबळ होते. त्यांची शक्ती कामगार आणि कामगार मराठी. त्यामुळे त्यांच्या सहभागाने चळवळीला जास्त शक्ती प्राप्त झाली असे नक्की वाटते

करेक्ट ! त्याचबरोबर लो. टिळकांची परंपरा काँ डांगे माननारे होते. (चुभुदेघे) त्यामुळेच कम्युनिष्ट पक्षावरही बुद्धीवादी राष्ट्रवादाचे संस्कार त्यांनी केले (? ) महाराष्ट्रातील मध्यमवर्गाला कम्युनिस्ट पक्षाची सहानुभूती होती, त्यात त्यांचा मोठा वाटा समजला जातो. बाकी आणिबाणिच्या काळानंतर ही सहानुभूती कमी झाली असे वाटते.

>>सर्व राजकीय मते एकत्र होती
त्यामुळे हाही प्रश्न शिल्लक राहत नाही म्हणा, पण असा एक उल्लेख वाचण्यात होता की, तेव्हा अत्रे यांनी त्यांना आणि त्यांच्या पक्षाला मोठे स्थान त्यांच्या 'मराठ्यात' दिले होते. म्हणून मी वर तसे विचारले होते. माहिती दिल्याबद्दल आभारी !

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

21 May 2009 - 5:44 pm | विसोबा खेचर

परंतु करात व येच्चुरींच्या करामती मुळे १५व्या लोकसभेत फक्त २४ खासदार उरले आहेत.

म्हणून मीदेखील त्या दोघांचे आभार मानतो! :)

आपला,
तात्यामोहन सिंग! :)

स्वामि's picture

21 May 2009 - 9:47 pm | स्वामि

खराट्यासारखे लोक स्वतःचा ब्राम्हणाद्वेष विकण्यासाठी कम्युनिस्ट विचारसरणीची पुडी वापरतात.यांना कितीही इतिहास ओरडून सांगीतला तरी पालथ्या घड्यावर पाणीच पडणार आहे.दुर्दैव त्या टिळक सावरकरांचं ज्यांना ब्राम्हण आहेत या एकाच कारणाने वारंवार दुर्लक्षिलं जातय.जातीयवाद किती हीन पातळी गाठू शकतो हे या वरुन कळतं.विनाकारण या भंपक लोकांवर स्वत:ची बुद्धी वाया घालवु नका.भले देश बुडाला तरी चालेल,भले राष्ट्र्पुरुषांचा अपमान झाला तरी चालेल,आम्ही आमचा ब्राम्हणद्वेष सोडणार नाही.

नितिन थत्ते's picture

22 May 2009 - 1:56 pm | नितिन थत्ते

मी कोणाचाच द्वेष करीत नाही. पण स्वतः जन्माने (योगायोगाने) ब्राह्मण असल्याने माझ्या संपर्कात असलेली मंडळी म्हणजे नातेवाईक आणि मित्रमंडळी ही बहुतांश ब्राह्मण आहेत. त्यामुळे ते कश्या प्रकारे विचार करीत असतात हे मला जवळून अनुभवता येते. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर टीका करतो.

>>भले राष्ट्र्पुरुषांचा अपमान झाला तरी चालेल,आम्ही आमचा ब्राम्हणद्वेष सोडणार नाही
हे येथे गैरलागू विधान आहे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

विकि's picture

21 May 2009 - 10:32 pm | विकि

तुम्ही लेखाचा आढावा फार चांगल्या पध्दतीने घेतलात. छान

मिसळभोक्ता's picture

21 May 2009 - 10:32 pm | मिसळभोक्ता

कारण काहीही झालं तरी, हुतात्मा सरदार भगतसिंग हे कम्युनिष्ट होते.

-- मिसळभोक्ता

क्लिंटन's picture

22 May 2009 - 1:02 pm | क्लिंटन

कम्युनिझम ही व्यवस्था जगात सर्वत्र अपयशी ठरली आहे.तरीही त्यांच्या आर्थिक विचारसरणीविषयी कोणाला ममत्व असेल तर ते त्यांनी जरूर बाळगावे.त्याविषयी कोणालाही आडकाठी असायचे कारण नाही.पण मुख्य मुद्दा हा की भारतातले कम्युनिस्टांच्या विचारात भारताच्या हिताचा काही विचारच नसतो.तर चीनचे हितसंबंध राखण्यासाठी त्यांचा आटापिटा चालू असतो.आक्षेपाचा मुख्य मुद्दा तो आहे.कम्युनिस्टांचे आर्थिक विचार कालबाह्य आहेत,प्रत्येक ठिकाणी सरकारच्या हस्तक्षेपामुळे वाईट परिणाम होतात हा अनुभव आहेच.तरीही कालबाह्य विचारसरणी ठेवली म्हणून कम्युनिस्टांना कोणी इतकी नावे ठेवत असेल असे वाटत नाही.तो ज्याचा त्याचा ’चॉईस’ झाला. पण त्या कालबाह्य विचारसरणीच्या नावावर हिंसाचार करणे आणि भारतातील गोरगरिबांचे कैवारी असल्याचा टेंभा मिरवत भारताऐवजी चीनचे हितसंबंध सांभाळण्यासाठी कम्युनिस्ट आटापिटा करणे यावर खरा आक्षेप आहे.आज वस्तुविनिमय ही कालबाह्य आणि सध्याच्या परिस्थितीला अजिबात अनुसरून नसलेली पध्दती आणावी असे कोणाचे आर्थिक विचार असतील तर त्यावर लोकांनी इतके तुटून पडायचे कारण नाही.फार फार तर त्याला वेडा म्हणून सोडून द्यावे. पण आपले कालबाह्य विचार दुसरा देश (चीन) एकेकाळी अंमलात आणत होता म्हणून भारताचे हितसंबंध गेले चुलीत आणि करा चीनचा विचार याचे समर्थन कसे करणार?

भगतसिंह डाव्या विचारसरणीचे होते हे सत्यच आहे.पण म्हणून त्यांनी १९६२ नंतर चीनला समर्थन घ्यायची भूमिका घेतली असती असे मला स्वतःला अजिबात वाटत नाही.अनेकदा संघटना त्यांच्या संस्थापकांच्या विचार आणि ध्येयांपासून दूर जातात.स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती.पण १९९० च्या दरम्यान रामकृष्ण मिशनने ’आम्ही हिंदू नाही तर अल्पसंख्यांक आहोत म्हणून आम्हाला अल्पसंख्यांकांना मिळत असलेल्या सवलती मिळाल्या पाहिजेत’ असा अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता.तो अर्ज न्यायालयाने मान्य केला नाही. मिशनच्या या कृत्याविरूध्द धर्मभास्करचे संपादक अवधूत शास्त्रींनी मासिकातून बराच आवाज उठवला होता.तेव्हा रामकृष्ण मिशनचे कृत्य बघून स्वामी विवेकानंद हिंदू नव्हते असा अर्थ कोणी काढला तर तो बरोबर ठरेल का?विवेकानंदांच्या ध्येयापासून त्यांनी स्थापन केलेली संघटना थोड्याफार अंशी भरकटली होती हाच त्याचा अर्थ होत नाही का?

तेव्हा भगतसिंह डाव्या विचारांचे होते म्हणून आताच्या कम्युनिस्टांना नावे ठेऊ नये हा मुद्दा पटण्यासारखा नाही.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

मराठी_माणूस's picture

22 May 2009 - 1:06 pm | मराठी_माणूस

योग्य विश्लेषण

मैत्र's picture

22 May 2009 - 11:47 am | मैत्र

http://www.loksatta.com/daily/20090522/mp01.htm

यावर कम्युनिस्ट काही बोलताना दिसत नाहीत... हा दहशतवाद कम्युनिस्ट चळवळीतून सुरु झाला आणि गेली अनेक दशके भारताची मोठी डोकेदुखी झाला आहे. मुख्य भागात कारवाया नसल्याने त्याची जाणीव आपल्याला होत नाहीये.
कल्पना करा पश्चिम महाराष्ट्रात जर अशी घटना घडली तर? मुंबईत कोणी पोलिसांवर गोळीबार करुन सोळा पोलिसांना मारले तर?
२६/११ ची परिस्थितीच होईल! अर्थात हे नक्षलवादी कसाब आणि इतर अतिरेक्यांसारखेच आहेत!!
या प्रवृत्तीला सुरुवातीच्या काळात कम्युनिस्टांनीच खतपाणी घातले - चारू मुजुमदार व इतर...
नक्षलवाद ही संज्ञाच आली मुळात नक्षलबारी / नक्षलबाडी या ठिकाणावरुन...

यावर कम्युनिस्ट ठामपणे का बोलत नाहीत??

वेताळ's picture

22 May 2009 - 12:03 pm | वेताळ

खरतर जगाला जितका जिहादी दहशतवादा पासुन धोका आहे तितकाच हा साम्यवादी दहशतवाद धोकादायक आहे. मेथांबा व विकी कुठे तोंड लपवुन बसले आहेत त्यानी ह्याचे उत्तर द्यावे.
मला तर माझ्या हयातीत शेवटचा कम्युनिस्ट मरताना बघणे आवडेल.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

चिरोटा's picture

22 May 2009 - 12:13 pm | चिरोटा

त्यांचा पाठिंबाही नसावा असे वाटते.पक्षपातळीवरुन ईतर पक्षानी नक्षलवादाबद्दल मते प्रकट केली आहेत का?नसल्यास त्यानाही तो प्रश्न लागू होईल.
अवांतर-९ वर्षापुर्वी बाळासाहेब ठाकरे ह्यानी लिट्टे ला जाहीर पाठींबा दिला होता(http://in.rediff.com/news/2000/may/10thack.htm).ईलमचा जाहीर प्रचार करणारे वैको ह्यांचा एम्.डी.एम्.के. पक्ष भा.ज.पा.च्या राष्ट्रीय आघाडीत होता.माझ्यामते राजकिय फायद्यासाठी सर्वच पक्षानी केव्हा ना केव्हा लाज बाजुला ठेवली आहे.
कमुनिस्ट पण त्याला अपवाद नाहीत.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

वेताळ's picture

22 May 2009 - 12:08 pm | वेताळ

पुष्पदहल उर्फ प्रचंडच्या माओवादी दहशतवादाने नेपाळ मध्ये जवळ जवळ १३००० लोकाचा नरसंहार घडवुन आणला आहे.
जगातील सर्वात जास्त मानवसंहार कम्युनिस्टानी घडवुन आणला आहे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

मिहिर's picture

22 May 2009 - 2:14 pm | मिहिर

स्वातंत्र्यचळवळीतील अनेक क्रांतिकारक सुभाषचंद्र बोसांसह डाव्या विचारसरणेचे नेते होते. सुभाषचंद्र बोसांचा ४२ च्या चळवळीला बहुतेक पाठिंबा होता. मग डावे ४२ च्या चळवळीच्या विरोधात कसे होते?
मला 'महानायक' वाचताना डावे म्हणजे सुधारणावादी व उजवे म्हणजे सुधारणांना विरोध करणारे वाटत होते.

अवांतर : साम्यवाद व समाजवाद यात नक्की फरक काय? कारण भगतसिंग समाजवादी असल्याचे वाचले होते.