आत्ताच मी नेहमीप्रमाणे पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन' ची जालआवृत्ती चाळत होतो. नेहमी काहीनाकाही छान मिळते वाचायला. आज तर आश्चर्याची परमावधी झाली. पटकन एका कोपर्यातल्या बातमीकडे नजर गेली. अक्षरशः उडालो... बातमी होती...
"Silence! The court is in session - Veteran stage and TV artist Rahat Kazmi directs the play of India's legendary writer Vijay Tendulkar. "
http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/news/enter...
तेंच्या "शांतता! कोर्ट चालू आहे" या नाटकाचा प्रयोग १६ मे ला उर्दूमधे कराचीत झाला, त्याची ही बातमी आणि छोटेखानी परिक्षण. बातमी मुळातून वाचण्यासारखी आहे. नाटक आणि त्याचे सादरीकरण या दोन्हीबद्दल स्तुति केली आहे. पाकिस्तानातले बहुतेक ग्रेट कलाकार इथेही तितकेच नावाजले गेले आहेत. पण आपल्या इथले सिनेकलाकार आणि उर्दू साहित्यिक सोडल्यास इतर भाषांमधून काही तिकडे गेले असेल असे वाटले नव्हते. आज अचानक हे सापडले. पाकिस्तानात नाटक वगैरे कला जिवंत आहेत आणि बर्यापैकी सुस्थितीत असाव्यात असेही वाटले.
शेवटचा परिच्छेद मुद्दम उद्धृत करत आहे:
If nothing else, the play is worth the Rs 500 price tag for its powerful dialogues, especially that of Benare in the end which sums up the dark undertones of our society. Students can avail a 50 per cent discount on the ticket.
५०० रू. तिकिट काढून लोक नाटक , ते पण एका भारतिय नाटककाराचे, बघायला येतात हे नक्किच कौतुकास्पद आहे. बेणारेबाई ही इथेच नव्हे तर तिथेही (किंबहुना कुठेही) तितकीच रेलेव्हंट (मराठी प्रतिशब्द?) वाटते!!! हेच ते तेंचे मोठेपण का?
***
खूप आनंद वाटतो आहे. हा धागा टाकायचे कारण की
०१. हा आनंद सगळ्यांबरोबर वाटावा असे वाटले.
०२. या निमित्ताने तें कसे जगभर पोचले आहेत त्या बद्दल अजून ऐकायला / चर्चा करायला आवडेल.
प्रतिक्रिया
18 May 2009 - 2:31 am | शरदिनी
तें पाकिस्तानात पोचले म्हणून त्यांचे कौतुक आहे की तेंचे नाटक करतात म्हणून पाकिस्तान्यांचे कौतुक आहे? की दोन्ही?
-----------
अवांतर : तुम्ही डॉन वाचता हे समजले. का वाचता अशी एक उत्सुकता निर्माण झाली.
18 May 2009 - 2:50 am | बिपिन कार्यकर्ते
माझा जो काही पाकिस्तान आणि एकंदरीतच पाकिस्तानी लोकांशी संबंध आला आहे (आणि खूप जवळून आला आहे) त्यावरून एक निश्चित सांगू शकतो की सामान्य पाकिस्तानी माणसाला भारत आपल्यापुढे आहे हे प्रखर वास्तव माहित असते पण ते कबूल करवत नाही. त्या उलट भारतिय माणसाला पाकिस्तानाबद्दल एक प्रकारची द्वेष / घृणा मिश्रित उत्सुकता असते. पाकिस्तानी मिडियात भारताचे जेवढे कव्हरेज असते त्याच्या निम्मेपण आपल्या मिडियामधे नसते. एकंदरीतच भारतीय कलाकार / सिनेमे यावर अजूनही तिथे बंदी आहे.
त्यात परत खाली नंदन म्हणतो त्या प्रमाणे सध्या जे काही एकूण वातावरण पाकिस्तानात आहे त्या पार्श्वभूमीवर आणि वर उल्लेखलेल्या कारणामुळेही आज पाकिस्तानातल्या तरूण कलाकारसमूहाला तेंसारख्या एका प्रादेशिक भाषेतल्या नाटककाराचे नाटक (त्यातल्या पात्रांची नावे न बदलता किंवा असे म्हणता येईल की त्या नाटकाचे पाकिस्तानीकरण न करता) करावेसे वाटते, डॉनसारख्या आघाडीच्या पत्राने त्याची दखल घेणे इ. गोष्टी मला रोचकच वाटल्या. त्याबद्दल कौतुक वाटले.
तेंचे कौतुक आहेच. जगभरात त्यांचे नाटक पोचले आहे, त्यांच्या नाटकांवर आज जगभरात चर्चा / परिसंवाद होतात. हे सगळे माहित आहेच. पण भारत - पाकिस्तान ही (एका भारतीय कलाकाराच्या दृष्टीने) 'फायनल फ्रंटियर' ओलांडली याचाच आनंद झाला.
बाकी डॉन का वाचतो वगैरे आपण खरडवही मधे बोलू.
बिपिन कार्यकर्ते
18 May 2009 - 7:14 am | मस्त कलंदर
१००% सहमत... बाकी.. ज्या लोकांनी खुदा के लिये पाहिला आहे.. त्यांना हेही ठाऊक असावे की पाकिस्तानात मुळात मनोरंजनावरतीच धर्माने बंदी आहे.. अशा परिस्थितीत..
>>एका प्रादेशिक भाषेतल्या नाटककाराचे नाटक
ही नक्कीच दखलपात्र नि चांगली गोष्ट आहे...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
18 May 2009 - 7:30 am | Nile
बिका 'काकांच्या शी' सहमत. ;)
18 May 2009 - 2:35 am | नंदन
बातमी वाचून डोक्यात पहिला विचार आला की, हिंसेने पोळलेल्या पाकिस्तानात सूक्ष्म हिंसेच्या रूपाची चिकित्सा करणारं नाटक हे एकाच वेळी विरोधाभासात्मक आणि सुसंगत म्हणता येईल का? बाकी राजकीय/सांस्कृतिक पार्श्वभूमी काहीही असो, तेंडुलकरांची नाटकं त्या त्या प्रेक्षकांपर्यंत समर्थपणे पोचतात ही त्यांच्या लेखणीची ताकद दाखवून देणारी गोष्ट. (शेवटी माणूस हा इथूनतिथून सारखाच इ.)
न्यू यॉर्क मध्येही २००४ मध्ये इंडो-अमेरिकन कौन्सिलने 'तेंडुलकर महोत्सव' आयोजित केला होता, त्याची या संदर्भात आठवण झाली. (अधिक माहिती येथे)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
18 May 2009 - 2:37 am | बिपिन कार्यकर्ते
शेवटी माणूस हा इथूनतिथून सारखाच
धन्यवाद ;)
बिपिन कार्यकर्ते
18 May 2009 - 6:04 am | सहज
>शेवटी माणूस हा इथूनतिथून सारखाच
अर्थात बातमी वाचून सुखद धक्का बसला. अर्थात ह्या नाटकाचे पाकिस्तानीकरण (बेणारे बाइंच्या ऐवजी कोणी बानो इ.) करुन सादर केले असते तर अजुनच मोठा धक्का बसला असता, विजय तेंडूलकर यांचे यश व इथुन तिथुन माणुस निदान भारतीय उपखंडातील सारखाच..
नुकतेच हे नाटक परत एकदा पहाण्यात आले, (रेणुका शहाणे बेणारे बाईंच्या भुमीकेत) काही वर्षात हे नाटक जरा अजुन मॉडर्न (कालावधी अजचा वाटेल असा, काही संदर्भ वेगळे) बनु शकेल.
18 May 2009 - 8:33 am | प्राजु
सहमत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 May 2009 - 8:31 am | मुक्तसुनीत
या बातमीबद्दल बिपिन यांचे अनेक धन्यवाद.
या बातमीमुळे या नाटकाबद्दलचे , तेंडुलकरांबद्दलचे , सुलभा देशपांडे यांच्याबद्दलचे संदर्भ जागे झाले. पाकिस्तानात याचा प्रयोग व्हावा, त्याची जाणत्या लोकांमधे प्रशंसा व्हावी हे सारे रोचक वाटले.
मनात उमटलेल्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक :
"शांतता" मधे ज्या अनेक "थीम्स" आहेत त्यापैकी एक (आणि बहुदा तेंडुलकरांच्या दृष्टीने मध्यवर्ती, महत्त्वाची ) म्हणजे माणसातल्या हिंसेचे प्रकटन. इथे साधीसुधी कारकुंडी माणसे "अभिरूप न्यायालय"रूपी खोटेपणाच्या पडद्याआड दडल्यानंतर जी हिंसक , मॉब मेंटॅलिटीरूपी हिंसेचे थैमान घालतात त्याचे अंगावर येणारे दर्शन घडते. या थीमला अर्थातच , धर्माचे , प्रदेशाचे , भाषेचे , देशाचे बंधन असण्याचे कारण नाही. या संदर्भात, जे आपल्या प्रदेशात परिणामकारक वाटले ते कुठेही वाटेलच.
तेंडुलकरांची नाटके इतर भाषांत परिणामकारक ठरतात याचे (मला वाटत असलेले ) एक कारण म्हणजे : त्यांची भाषा , शब्दांची योजना ही कधी क्लिष्ट नव्हती , अगदी आलंकारिकही नव्हती. (कानेटकर, शिरवाडकर या समकालीनांची नाटके या संदर्भात लक्षांत घ्यावीत. हेही उत्तम नाटककार. परंतु त्यांची नाटके इतर भाषांत नेणे कठीण. अपवाद : "अश्रुंची झाली फुले " सारखा मेलोड्रामा.) अर्थात, माझ्या तेंडुलकरांबद्दलच्या विधानालाही प्रचंड मोठा अपवाद म्हणजे : घाशीराम कोतवाल ! हे नाटक मराठीखेरीज इतर कुठल्याही भाषेत कितपत सुरेख होईल याबद्दल जबरदस्त शंका वाटते. पेशवाई, बावन्नखणी, नाना, त्यातली मुळगुंदांची नृत्ये , चंदावरकरांचे संगीत या सार्यासार्याचा मिलाफ "अन् - पोर्टेबल्" आहे. तर , या संदर्भात "शांतता!" उर्दूत जाणे , पाकिस्तानात केले जाणे , तिथे उचलले जाणे हे सारे आनंदाचे असले तरी अनपेक्षित नाही. अर्थात यातही एक छोटीशी गोम आहे. बेणारे च्या शेवटच्या स्वगतामधे "चिमणीला मग पोपट बोले" ही (बहुदा बालकवींची ) जुनी कविता येते. आता इतक्या चपखल, नाजूक कवितेला अन्य भाषेत तितकी योग्य कविता मिळाली असेल काय ? (बिपीन राव , तुमच्या उर्दूभाषिक मित्राना विचारा : याचे उर्दू पुस्तक उपलब्ध आहे काय ?अर्थात , त्याची लिपी अरेबिक असली तर मग परत बोलणे खुंटलेच !)
मात्र एक गोष्ट. कुमारी माता , गर्भपात यांचे संदर्भ आपल्या समाजात - विशेषतः शहरी भागात - ४० वर्षांत बदललेले आहेत. पाकिस्तानात - अगदी त्यांच्या शहरी भागात- या गोष्टींची चर्चा , त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहातली मान्यता हे कितपत घडले आहे कोण जाणे. जर का त्यांचा समाज अजूनही ४० वर्षे मागे असेल तर पाकिस्तानात नाटकाची ही "थीम" आणखी जास्त परिणामकारक ठरली असेल असे वाटते - कारण शॉक व्हॅल्यु जास्त.
बाकी या लेखात पाकिस्तान, पाकिस्तान्यांचे कौतुक आहे किंवा कसे , बिपिनराव यानी अमुक वृत्तपत्र वाचावे किंवा नाही इ. इ. प्रतिसाद लई भारी !
18 May 2009 - 8:51 am | Nile
छ्या! खरी मजा तर ख.व. मध्ये आहे. ;)
बाकी मी सखाराम बाईंडर चा विचार करत होतो, जरी कथानक "पोर्टबल" असलं तरि भाषा जरा त्रास देईल असे वाटते.
11 Feb 2011 - 1:10 am | चिंतामणी
अपवाद : "अश्रुंची झाली फुले " सारखा मेलोड्रामा.
ह्या नाटकार दोन हिंदी सिनेमे निघाले होते. एक "आसू बन गये फुल" आणि दुसरा (सिनेमा) मशाल. दिलीपकुमार, वहीदा रेहमान आणि अनील कपूर फेम.
या व्यतिरीक्त अनेक भाषात त्यांच्या आणि अनेक मराठी नाटकांचे/ कादंब-यांचे अनूवाद झाले आहेत. माझ्या माहिती प्रमाणे गुजराथी आणि कानडी भाषेत झाले आहेतच.
18 May 2009 - 9:08 am | ऋषिकेश
सुख्द धक्का बसला. शेवटी माणूस इथून तिथुन सारखा हे नंदनचे म्हणचे पटते.
पाकिस्तानाच्या सध्याच्या परिस्थितीमधे एकीकडे भयंकर अशांतता / हिंसा असताना नेमकं "शांतता!.." तिथल्या लोकांना का करावेसे वाटले असावे याचं उत्तर म्हटलं तर कळतं, म्हणलं तर अजिबात कळत नाहि.
पाकिस्तानात अजूनहि नाट्य संस्कृती जिवंत आहे आणि चक्क परदेशी प्रादेशिक भाषांतील नाटके करू पाहते आहे (का सर्रास करते?) हे वाचुन ओसाड वाळवंटात एक हिरवा कोंब बघुन वाटावे तसे काहिसे वाटले.
हि बातमी पोचवल्याबद्द्ल आभार बिपिनदा
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
18 May 2009 - 11:48 am | यशोधरा
नंदन आणि ऋषिकेशप्रमाणेच म्हणते. चांगली बातमी.
9 Feb 2011 - 11:06 pm | शिल्पा ब
असेच म्हणेन...आनंद वाटला...हळुहळु त्यांच्या जाणिवा जाग्या झाल्या की फक्त भारत या विषयापलिकडे त्यांना पाहता येईल.
18 May 2009 - 11:42 am | स्वाती दिनेश
आज पाकिस्तानातल्या तरूण कलाकारसमूहाला तेंसारख्या एका प्रादेशिक भाषेतल्या नाटककाराचे नाटक (त्यातल्या पात्रांची नावे न बदलता किंवा असे म्हणता येईल की त्या नाटकाचे पाकिस्तानीकरण न करता) करावेसे वाटते, डॉनसारख्या आघाडीच्या पत्राने त्याची दखल घेणे इ. गोष्टी मला रोचकच वाटल्या. त्याबद्दल कौतुक वाटले.
अगदी रे, सहमत आहे.
स्वाती
18 May 2009 - 3:43 pm | घासू
भारतीय (मराठी) नाटक पाकिस्तानात सुद्धा पोहचलं. अभिनदंन..........!
गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा!!!!!!!!!
बातमी पोहचवल्याबद्द्ल बिपीनजींचे विशेष अभिनदंन.
18 May 2009 - 5:08 pm | मेघना भुस्कुटे
खरंच, वर सगळ्यांनी म्हंटल्याप्रमाणे - बातमी आनंददायक, डॉनचा संदर्भ मजेशीर.
अवांतरः बिपिनदा, डॉन आणि तुम्ही डॉन का वाचता या दोन गोष्टी फक्त खरडवहीत का राहाव्यात? नवा धागा काढा की.
22 May 2009 - 10:27 am | विशाल कुलकर्णी
तेंडुलकरांचं नाटक पाकिस्तानातदेखील पोहोचलं याचा आनंदच आहे. पण यासाठी नाटककर्त्यांनी तेंडुलकरांच्या कुटुंबियांची परवानगी घेण्याचं किंवा योग्य ती रॉयल्टी देण्याचं सौजन्य दाखवलेलं नाही. त्याला काय म्हणणार?
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
22 May 2009 - 10:50 am | आनंदयात्री
'सुसंबद्ध' हा चटकन आठवणारा शब्द. 'प्रस्तुत' असाही एक शब्द असल्याचे कळते.
आंदोप राव
संगणक शिका, संगणक वापरा!
http://lokayat.com/
9 Feb 2011 - 7:49 pm | jaydip.kulkarni
मि पा वर हि बातमी दिल्याबद्दल बिपीन कार्यकर्ते यांचे आभार ...........
9 Feb 2011 - 10:47 pm | निनाद मुक्काम प...
आपल्याहून कैक पतीने जास्त रुपयाचे अवमूल्यन पाकिस्तानी रुपयाचे झाले आहे ./होत आहे /होणार आहे .
त्यामुळे त्यांचे ५०० रुपये नाटकाला फार काही जास्त नाही .
बाकी नाटक उर्दू मध्ये पाहणार्यात काराचीस्थित मुहाजिर ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे . व सध्या नव्याने ह्या शहरावर हुकुमत गाजवणारे पश्तून ह्यांचा उर्दूला प्रखर विरोध आहे .
कारण पाकिस्तानातील दोन मुख्य साधन प्रांत पंजाब (शेती ) सिंध (व्यापार ) ह्यांची मूळ भाषा उर्दू नसल्याने तेथे उर्दू विरोधात रान उठले होते .प्रचंड दंगे झाले होते .व अजूनही धूस मूस आहे .
तेव्हा उर्दू मध्ये सिनेमे व नाटके तीही दर्जेदार आता दुर्मिळ झाली आहेत .
त्यामुळे आता त्यांची मदार नेहमीच मनोरंजनासाठी भारतावर असते .
बातमी बद्दल धन्यवाद .
तेंडूलकर हे नाव पाकिस्तानला क्रिकेट मूळे माहित होते .मात्र आता ते साहित्यामुळे परिचित होईल .
बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या विषयी अनेक दंतकथा ह्या लोकांमध्ये प्रचलित आहेत .
त्यांना सांगून खरे वाटत नाही कि आमच्या रोजच्या जीवनात पाकिस्तान हा प्रमुळ विषय नसतो .
शीला कि जवानी आणि मुन्नी ची बदनामी तसेस अनेक रीयालती शो ह्यावर अखंड चर्चा चालू असते .(आता मनोरंजांच्या बापाची भर पडली आहे )बाकी पाकिस्तान मध्ये नव निर्मिती कोणत्याही शेत्रात होत नाही .गावात सरंजामी कारभार चालतो .त्यामुळे भारत द्वेष हा त्यांच्याकडे सर्व प्रांताला जोडणारा समान धागा असतो .
कोणताही खेळाडू व नेता मुलाखतीत आपण भारताविरुद्ध कसे कडक वागलो किंवा खेळलो .ह्यांचे एकतरी उदाहरण देतात .बाकी कार्यकर्ते म्हणतात ते योग्य आहे कि आपण अर्ध्याहून जास्त सुद्ध त्यांच्या घडामोडी कडे लक्ष देत नाही .(तेथे भारत ह्या विषयावर वाहिलेले (बहुतेक वेळा लाखोल्या ) अनेक कार्यक्रम मुलाखतीचे हे मुख्य वाहिन्यांवर दाखवतात .अशक्य कोटीचे स्वप्न रंजन भारताविषयी दाखवले जाते .उदा हिंदू .ज्यू आणि ख्रिस्ती धर्म एकत्र येऊन इस्लाम संपवण्यासाठी एकत्र आले आहेत .अफगाण युद्धात त्यांची संयुक्तिक आघाडी आहे .(अजून बरेच काही आहे .पण त्याबद्दल सविस्तर परत )
एका महाभागाने मला विचारले .कि त्याने एकले कि ठाकरे त्यांची माणसे ( पाकिस्तानात पाठवणार आहेत ) बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या विषयी अनेक दंतकथा ह्या लोकांमध्ये प्रचलित आहेत .
त्यांना सांगून खरे वाटत नाही कि आमच्या रोजच्या जीवनात पाकिस्तान हा प्रमुळ विषय नसतो .
शीला कि जवानी आणि मुन्नी ची बदनामी तसेस अनेक रीयालती शो ह्यावर अखंड चर्चा चालू असते .(आता मनोरंजांच्या बापाची भर पडली आहे )
9 Feb 2011 - 10:58 pm | बिपिन कार्यकर्ते
विषय काय? प्रतिसाद काय?
9 Feb 2011 - 11:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बरं. ह्यात नवीन काय?
9 Feb 2011 - 11:12 pm | मेघवेडा
अरे काय चाललंय काय?
10 Feb 2011 - 11:21 am | Nile
तुम्हाला लोकांना माहित नाय काय?
9 Feb 2011 - 11:04 pm | शिल्पा ब
सवयीने!!
10 Feb 2011 - 12:24 am | निनाद मुक्काम प...
लेखाच्या मालकाने आपण डॉन हे वृत्त पत्र वाचतो .( सीमेपलीकडील ) हे मिपाकरांना आवर्जून नमूद केले त्यात त्यांना जी बातमी मिळाली . तिचे काही तुकडे लेखात अडकवले .आता हा लेख मिपावर टाकण्याचे प्रयोजन म्हणजे बहुदा भारतीय प्रादेशिक (मराठी ) लेखकाची कलाकृतीचा त्या वृत्त पत्राने स्तुती पर लेख लिहिला म्हणून असावा .
त्यांच्याकडे ५०० रुपये तिकिटाला देऊन रसिकवर्ग नाटक पाहतात असा गौरव पूर्ण उल्लेख केला .आता
ह्या अप्रतिम लेखावर मालकाला प्रतिक्रिया बहुदा त्यांना हव्या तश्या म्हणजे अरे वा पाकिस्तान सारख्या देशात असे काही तरी घडते म्हणजे .....
अश्या ठराविक पाध्ध्तीच्या अपेक्षित होत्या .
शरदिनीची पहिलीच प्रतिक्रिया मालकांना झोंबली .( आपल्या लेखावर आपल्याला हवी तीच प्रतिक्रिया वाचायला मालकांना आवडते .इतर मुद्दे खरडवहीत चर्चा करायला हवे असतात .
मुळात माझ्या प्रतिक्रियेत पाकिस्तानात महागाई व रुपायचे अवमूल्यन ह्याने ५०० रुपयाला नाटकाचे तिकीट हि साधी बाब आहे हे लिहिल्याचे बहुदा आवडले नसावे .
कराची शहरात सध्या काय घडत आहे . हे जाणून न घेता केवळ वृत्त पत्रावर (ते देखील इंग्लिश ) जे पाकिस्तानात किती टक्के जनता वाचते देव जाणे
तुम्ही मत प्रदर्शित केले म्हणून मी प्रतिक्रिया दिली .
कराची येथे ह्या वर्षी भाषिक दंगल होऊन पश्तून विरुध्ध उर्दू समूहाने १०० वर हत्या व अनेक ठिकाणी मालमत्ता जाळली .
तेथे आता कर्फू हि रोजची गोष्ट झाली आहे .त्याचबरोबर दोन्ही समूहाचे राजनैतिक पक्ष झरदारी वर दबाव तंत्र वापरते आहे (पंजाबात पंजाबी हि उर्दू पेक्षा श्रेष्ठ आहे अश्या पद्धतीचा वाद चालला आहे )
त्यामुळे प्रदेशील अस्मिता ह्या तेथे प्रखर होत आहेत .त्याचा फायदा उर्दू नाटकांना होत आहे .असे माझ्या आधीच्या प्रतिक्रियेतून व्यक्त करायचे होते
बाकी लेखासाठी शिल्पा ब ह्यांनी जी जाणीव जागृत वैगेरे प्रतिक्रिया दिली ती पाहता तिथल्या मुठभर लोकांच्या नाटक पाहण्यावर सुतावरून स्वर्ग गढू नका एवढेच सांगणे होते .
कराचीचे तालिबानीकरण झपाट्याने होत आहे .ह्यावर एक वेगळा लेख होऊ शकतो .
तू नळीवर ह्याच्या अनेक चित्रफिती परदेशी वाहिन्यांच्या वार्ताहरांनी सोदाहरण दाखवल्या आहेत .
10 Feb 2011 - 10:31 am | बिपिन कार्यकर्ते
माझा प्रणाम स्वीकार करावा.
-- लेखनसीमा --
10 Feb 2011 - 10:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
एक तुच्छ प्रश्नः हाच काय तो आधुनिकोत्तरवाद?
10 Feb 2011 - 6:12 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या प्रतिसादाची तुलना फक्त आणि फक्त तम्मा तम्मा वाल्या प्रतिसादाशीच होऊ शकेल !
त्यात तो कुठेपण जो फुलस्टॉप टाकतो न तो तर कहर आहे.
10 Feb 2011 - 10:20 pm | पैसा
यालाच म्हणतात "आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी"
10 Feb 2011 - 11:50 pm | शिल्पा ब
वय झाल्यावर असं होतंच..
10 Feb 2011 - 2:55 pm | प्रदीप
अत्यंत सभ्य व संयत आहेत ह्याचा हा दाखला आहे.
मला असे रहावयास जमत नाही, म्हणून मी बिपीनचा हेवा करतो.
10 Feb 2011 - 2:59 pm | सहज
कुमार गंधर्व यांनी गायलेला तुकारामांचा अभंग आठवला.
10 Feb 2011 - 5:54 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मस्त प्रतिसाद. बिका खरच महान आहेत !!!!
बाकी ते दोन प्रतिसाद वाचून गणगोत मधल्या दिनेश च्या व्यक्तीचित्रणातील "माणूस, बेडूक आणि उप्पीटम" (का असेच काहीसे) या कथेची आठवण झाली.
10 Feb 2011 - 11:04 am | सुधीर काळे
सर्व प्रथम तेंडुलकरांना सलाम! मी स्वतः हे नाटक पाहिलेले नाहीं, पण त्याबद्दल ऐकले मात्र खूप आहे.
मी 'पाकिस्तानी लोक' आणि 'पाकिस्तानी सरकार' यातला फरक विसरत नाहीं. मला 'आम' पाकिस्तानी लोक आपल्यासारखेच आहेत असे वाटते. कित्येक 'बुजुर्ग' पाकिस्तानी "मैं दिल्लीका हूँ" असे सांगतात, तर तरुण पाकिस्तानी "मेरे अब्बा xxx के हैं" असा प्रेमाने उल्लेखही करतात. एका अशाच तरुण पाकिस्तानी माणसाला मी एकदा म्हटले की उर्दूतला 'ए' किंवा 'इ' मला फार घोटाळ्यात टाकतो (उदा. मुगल-ए-आझम"). तर त्याने आपल्या आईकडून मला नंतर फोन केला. व त्या बाईने "हमारे गरीबखानेमें तश्रीफ लाइयेगा, मैं समझानेकी कोशिश करूँगी" असेही मला सांगितले, पण मी त्यांच्याकडे जायच्या आधीच ते कुटुंब पाकिस्तानात परत गेले.
'अमरेली स्टील' नावाच्या एका पाकिस्तानी पोलाद कारखान्याचा मालक मला नेहमी कराचीला बोलवत असतो. ओळख झाली होती डॅनियली नावाच्या कंपनीत!
थोडक्यात काय कीं पाकिस्तानी माणसांना भारताबद्दल फारशी अढी नाहीं, पण सरकारबद्दल मात्र तसे म्हणता येत नाहीं.
वेळ झाला तर "मला भेटलेले पाकिस्तानी" या विषयावर एक पोस्ट करायचा मोह होतोय्. बघू वेळ मिळतो का आणि 'भट्टी जमते' कां!
बिकासेठ, तुम्हीही डॉन वाचता हे वाचून बरे वाटले! अलीकडे मला मोबाईलवर वाचायचा प्रॉब्लेम झाला होता, पण तो नुकताच सुटला!
10 Feb 2011 - 10:43 pm | रेवती
चांगली बातमी.
मी अजूनही हे नाटक पूर्ण पाहिलेले नाही.
अर्धे पाहून झाल्यावर कसेसेच झाले आणि त्यानंतर पाहिले गेले नाही.
11 Feb 2011 - 12:11 am | सुनील
छान बातमी.
एकमेकांच्या कलाकृतींची रुपांतरे आणि कलाकारांची एकमेकांशी गाठभेट ह्या गोष्टीदेखिल (राजनैतिक संबंधांइतक्या) महत्त्वाच्या आहेत.
सहा वर्षांपूर्वी मराठी लेखिका सानिया ह्या पाकिस्तात गेल्या होत्या. कराचीत त्यांची स्थानिक लेखकांशी बातचित झाली. त्या संदर्भातील बातमीदेखिल तत्कालीन डॉनमध्ये आली होती. इथे वाचा.
11 Feb 2011 - 5:15 am | भडकमकर मास्तर
या सार्यावरून एक सुप्रसिद्ध वचन आठवले...
डॉनको पढना मुमकिनही नहीं, आसानभी है"