गुन्हेगारी पार्श्वभूमीचे १५० नेते.. ७३ वर अत्यंत गंभीर स्वरुपाचे गुन्हे

बहुगुणी's picture
बहुगुणी in काथ्याकूट
17 May 2009 - 9:19 pm
गाभा: 

महाराष्ट्र टाईम्स च्या या वृत्तानुसार: "....गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सुमारे १५० नेते लोकसभेवर निवडून गेले असल्याचे ताज्या लोकसभा निवडणूक निकालांनी दाखवले आहे. त्यातही ७३ खासदारांच्या विरोधात अत्यंत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत."

या माहितीचा मूळ स्त्रोत नॅशनल इलेक्शन वॉच हे संस्थळ आहे.

मि पा च्या वाचकांच्या दृष्टीने या वृत्तातील महत्वाचा भाग म्हणजे: "उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राने सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडून दिले आहेत. उत्तर प्रदेशातले ३१ (गंभीर स्वरुपाचे गुन्हे असलेले २२) आणि महाराष्ट्रातले २३ (गंभीर स्वरुपाचे गुन्हे असलेले ९) खासदार गृन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यात साता-याचे उदयनराजे भोसले, औरंगाबादचे चंद्रकांत खैरे आणि उत्तर मुंबईचे खासदार संजय निरुपम यांचा समावेश आहे."

अर्थात्, यांपै़की कुणावरही गुन्हा अद्याप शाबित झाला नसल्यानेच त्यांना निवडणूक आयोगाने निवडणूक लढवायला आडकाठी केली नाही हे उघडच आहे (आणि काही चांगल्या उमेदवारांवर विनाकारण/आकसाने असे खटले दाखल केले जातात हेही शक्य आहे.)

पण यापुढील काळात या खटल्यांचं काय होतंय याचा आपण जाणीवपूर्वक पाठपुरावा केला पाहिजे असं वाटतं. अन्यथा निवडून येणं म्हणजे गुन्हेगारी खटल्यांमधून अभय मिळवणं हाच शिरस्ता चालू राहील.

प्रतिक्रिया

यन्ना _रास्कला's picture

17 May 2009 - 10:38 pm | यन्ना _रास्कला

राम नायकासारक्या सोछ्छ नेत्यावर ३ किरमिनल केस आस ही वेबसायिट म्हंते. आनि पुर्वी त्याच सायटीवर राम नायकासमोर ९ गुन्ने लिवलेले होते. कुट विश्वास ठ्येवता आशा बातम्यावर.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

नितिन थत्ते's picture

17 May 2009 - 11:19 pm | नितिन थत्ते

या यादीत पदाचा वापर करून केस काढून टाकणार्‍या खासदारांची नावे नाहीत.

त्यात लालकृष्ण अडवाणींचे नाव दिसेल.

खराटा
(रंग माझा वेगळा)

तिमा's picture

9 Feb 2011 - 6:50 pm | तिमा

गुन्हेगारांना लोकशाहीचे शिक्षण देण्यासाठी, आपल्याकडे त्यांना लोकसभेत, राज्यसभेत पाठवण्याची उदात्त पध्दत आहे. एकदा का सगळे गुन्हेगार लोकशाहीवादी झाले की गुन्ह्याला आळा बसणारच. सगळ्या गुन्हेगारांचे हे शिक्षण संपेपर्यंत सामान्य जनतेने कळ सोसावी.