गाभा:
महाराष्ट्र टाईम्स मधील 'नांदी बिगरमराठी मुख्यमंत्र्याची ?' ही बातमी वाचा.
अटकेपार झेंडे रोवणार्या मराठ्यांवर आता परप्रांतीय राज्य करणार काय?
महाराष्ट्र टाईम्स मधील 'नांदी बिगरमराठी मुख्यमंत्र्याची ?' ही बातमी वाचा.
अटकेपार झेंडे रोवणार्या मराठ्यांवर आता परप्रांतीय राज्य करणार काय?
प्रतिक्रिया
8 Feb 2008 - 5:02 pm | धमाल मुलगा
वाचून अतिशय आन॑द जाहला...
आता आपापली गाठोडी काठीच्या टोकाला बा॑धून मराठी माणसाने "ॐ भवति .." करत फिरायची तयारी सुरू करावी. की छानपैकी काशीयात्रेला निघून तिकडेच ग॑गामाईच्या तिरी टाचा घासून प्राण सोडावेत?
ह॑...कदाचित लवकरच यातला योग्य तो उपाय आपले दूरदृष्टीशून्य राजकीय नेते स्वतःच्या बुडाखालची खुर्ची वाचवताना एखादी दळभद्री युती करून आपल्या समोर सादर करतीलच, यात श॑का नसावी.
राज ठाकरे॑च्या नावाने गळे काढणार्याना योग्य त्या वेळी कळेलच, काय योग्य अन् काय अयोग्य ते.
चला म्हणजे आता "मुक्त"राज्याचा टे॑भा फक्त बिहारनेच मिरवायला नको, महाराष्ट्राचाही लवकरच न॑बर लागेल हो !!!.
आपला
- (भैय्याप्रेमी(?), पराकोटीचा पुरोगामी (यडxx)विचारव॑त) ध मा ल.
8 Feb 2008 - 9:31 pm | ऋषिकेश
हा लेख एकांगी आणि एक खास दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन लिहिल्यासारखा वाटतो आहे. पण त्यात मतदारसंघ पुनर्रचना अंमलात येत असल्याचं वाचून आनंद झाला. (असे झाले तरीही महाराष्ट्रात बिगरमराठी मुख्यमंत्री होणे कठीण वाटते. हे आपलं माझं मत)
असो.
या पुनर्रचनेचा मुख्य फायदा असा की आता पुन्हा प्रत्येक मतदार संघात साधारण सारखेच मतदार झाले आहेत. उपनगरात अशा छोट्या मतदारसंघांची गरजच होती. जितका मतदार संघ छोटा तितके प्रशासन नेटके होऊ शकते. आणि चांगले प्रशासन हे व्यक्तीचा प्रांत, धर्म, जातस आदि बघून दिले जात नाहि (उदा. गुजरातेत प्रत्येक गावात वीज आली ती, हा गुजराती आहे, हा हिंदु आहे त्यांनाच वीज असा प्रकार नव्हता.) अश्या पुर्रचनेने (जर झाला तर) विकास हा सगळ्यांचाच होणार आहे. मराठी मंडळींचा आणि बिगरमराठी लोकांचाहि!
-ऋषिकेश
21 Feb 2008 - 6:34 pm | विजुभाऊ
बिगर मराठी ग्रुह मन्त्री क्रुपा शन्कर सिंह होतच ना........
त्याना मराठी भाशा समजत नाही......
आपल्या द्ळ्भद्री ( खास् थोरल्या ठाकर्यान्चा अवडता शब्द) सहिश्णु व्रुत्तिमुळे हे सगळे होतेय.
21 Feb 2008 - 8:15 pm | तळेकर
या परिस्थितीत अ-मराठी मुख्यमंत्री ? अटळ आहे.