हर्क्युलस मी होणार

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in काथ्याकूट
14 May 2009 - 11:32 am
गाभा: 

काल कधी नाही ते वैकुंठात गेलो होतो. जवळच्या स्नेह्यांचा पत्ता कट झाला होता. बाकीचे विधी चालु असताना त्यांच्याच ऑफिस मधल्या दोन तरुणांमधला संवाद सहज कानावर आला.

"यार, अती तेथे माती म्हणतात ते हेच.. पिकनीकला गेला होता, तिथेच खपला. सिलदेफिनाल चे बळी. नॅन्ड्रेनॉल पण घेत होता."

नाव ऐकुन आधी वाटले च्यायला कोकेन वगैरे आजकल 'पुराने जमाने की बात' वगैरे झाले का काय? 'जंगलात' हे नवीन ड्र्ग्ज कुठले आलेत ? हा काय प्रकार बॉ?

गुगुल बाबाला विचारायचे ठरवले.

पण नीट स्पेलींग नव्हते माहीत.

म्हणुन 'कामशेत' मुक्त विद्यापिठांच्या कुलगुरुना फोन लावला.

गुरुवारी सुट्टी ह्यांना. घरच्या राहीलेल्या कामाचा बॅकलॉग हे गुरुवारी भरुन काढतात.

त्यांनी सांगितले की दोन्ही गोळ्या 'पर्फॉर्मन्स एनहान्सर' आहेत. (ह्यांचा माझ्या बुद्धीमत्ते विषयी काय समज आहे ते देवाला ठाउक. 'परा'ला सगळ्यातले सगळे कळते अशा अविर्भावात हे मला माहिती देत असतात.)

"नॅन्ड्रेनॉल खेळाच्या मैदानावर वापरले जाते."

"सिदेफिनाल घरच्या मैदानावर वापरले जाते." (अरे देवा नारायणा , असे आहे होय !)

"सिलदेफिनाल घेतल्यावर नसांना रक्त पुरवठा वाढतो." (कुठल्या?)

मी विचारेले, "सर, ह्या गोळ्यानी माणुस मरतो?"

"हो, डॉक्टरने ब्लड प्रेशर, डायबेटीस व इतर तपासणी केल्याशिवाय आणि त्यांनी सांगितलेल्या डोस बाहेर वापर केल्यास मरु पण शकतो."

सहसा ४०+ चे पुरुष ह्या ह्या गोळ्यासाठी वेडे होतात.

"पण आजकाल कॉलेज तरुणामधे सुद्धा हे वेड वाढले आहे. 'विरेंद्र सहवाग', 'ब्रायन लारा' होता येते असा त्यांचा गैरसमज असतो.
एकदा का सवय लागली की पुर्ण आयुष्याचा सत्यानाश. सगळे नॉर्मल असताना वेळेच्या खुळचट्पणाचे बळी."

हे मात्र गुर्जी सत्य सांगत होते. "काल ट्रिपल सेंचुरी रे" किंवा "चारशे धावा ठिकल्या रे रात्री" असे सांगणारे महाभाग माझ्या बघण्यात होतेच.

मी विचारले, "प्रिस्क्रिप्शन शिवाय ह्या गोळ्या का दिल्या जातात?"

"११० कोटी च्या देशात असे प्रश्न विचारायचे नसतात" असे गुर्जी म्हणाले.

(महत्वाचे :- सिलेदेफिनाल म्हणजे सुहागरा नावाने विकले जाणारे वायाग्रा.)
-----------------------------------------------------------------------------------------------
च्यायला हे ऐकुन मला तर शॉकच बसला. माझ्या माहितीत हॉस्टेलचे काही 'खेळाडु' आहेत जे ह्या औषधांचा सर्रास वापर करतात. दुसर्‍या दिवशी त्याच्या पासुन झालेले फायदे सुद्धा अगदी बढाई मारत सांगत असतात. जर आजच हे ह्या गोळ्यांच्या येव्हडे आहारी गेले असतील तर उद्या ह्या गोळ्यांशिवात ते काही करु शकतील का नाही ? हे एक प्रकारचे व्यसनच नाही का ?

मग नक्की काय खरे आणी काय खोटे ? काय आहे हे मनावर पसरलेले गारुड ?

हि कुठल्याही मेडिकल मध्ये सहजी उत्पन्न होणारी औषधे अपायकारक का उपायकारक ? आणी जर अपायकारक असतील तर सरकार त्यावर काही बंदी वगैरे का आणत नाही ? ह्या बाबत औषध कायदा काय सांगतो ?

आणी सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही औषधे तुम्हाला काही काळासाठी 'हर्क्युलस' बनवुन टाकतात, हा जो समज मोठ्या प्रमाणावर रुढ झाला आहे त्यात किती तथ्य आहे ?

प्रतिक्रिया

खरं आहे.
पण आपल्या देशात उजेडाची बाजू अशी आहे की प्रबोधन केले तर अशा प्रकाराला बराच आळा बसतो.उदा : एड्सची माहीतीचा मुबलक प्रमाणात भडीमार झाल्यावर रोगाच्या थर्ड जनरेशनला आळा बसला आहे असे काही तज्ञांनी सांगीतले आहे.

विआग्राची चिंता नको कारण नव्वद टक्के गोळ्या नल्ला असतात.खोट्या गोळ्या प्लेसीबो सारख्या काम करून जातात.
निरामय कामजीवन आता दुर्मीळ झालं आहे का ? हा प्रश्न मोठा आहे.

अनंता's picture

14 May 2009 - 12:02 pm | अनंता

प्रत्येक गोष्टींसाठी गोळ्या-औषधाचा वापर जिवावर बेतू शकतो.
तारतम्य बाळगणे हाच सर्वोत्तम उपाय!!

वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 May 2009 - 12:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तारतम्य बाळगणे हाच सर्वोत्तम उपाय!!

काय बोललात!!
तारतम्य हा "अटकपूर्व जामीन" अनेक रोग, व्याधी, विकार, भांडणं यांच्यावरही उत्तम उपाय असावा, नाही??

अटकपूर्व जामीन हा शब्द आमच्या डॉक्टरकडून साभार!

सायली पानसे's picture

14 May 2009 - 12:08 pm | सायली पानसे

सहमत!

अनंता's picture

14 May 2009 - 12:11 pm | अनंता

अवलिया , परा आणि आता अदितीतै यांनाही क्रीप्टीक बाधा झाली वाटते!!

अवांतर : प्रभू चावला असेल तर ठीक आहे ;)

वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

विजुभाऊ's picture

15 May 2009 - 9:56 am | विजुभाऊ

प्रभु देवा
तुमची साथ आता सर्वत्र जोमाने पसरत चालली आहे

हे काय बोलणं झालं?
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभ

विनायक प्रभू's picture

15 May 2009 - 1:51 pm | विनायक प्रभू

नविन दमाची पिढी तयार होत आहे.
निसर्ग नियम

सहज's picture

14 May 2009 - 12:13 pm | सहज

मास्तरांनी नविन झाड पकडल का नवा विक्रम गाठला?

प्रमोद देव's picture

14 May 2009 - 12:41 pm | प्रमोद देव

म्हणुन 'कामशेत' मुक्त विद्यापिठांच्या कुलगुरुना फोन लावला.

गुरुवारी सुट्टी ह्यांना. घरच्या राहीलेल्या कामाचा बॅकलॉग हे गुरुवारी भरुन काढतात.

हे तर लय भारी.

अवांतर: कांदा,विशेष करून सांबारमध्ये वापरतात तो छोटा कांदा ह्यासाठी एक जालीम उपाय आहे असेही 'तथाकथित' तज्ञ सांगत असतात. वातुळ पदार्थांचे सेवन...वांगी,भोपळा,वाल वगैरेही उपयोगी पडते असेही म्हटले जाते.
खरे तर हे सर्व मनाचे खेळ आहेत. ज्याचे मन घट्ट आहे तो कितीही वेळ 'टिकू' शकतो.ती देखिल एक 'साधना' आहे बाकी सगळे बाह्योपचार...प्लेसीबो की काय म्हणतात ना ते .

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2009 - 12:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>ज्याचे मन घट्ट आहे तो कितीही वेळ 'टिकू' शकतो.ती देखिल एक 'साधना' आहे बाकी सगळे बाह्योपचार.

सहमत आहे !

आनंदयात्री's picture

14 May 2009 - 12:58 pm | आनंदयात्री

फक्त मन घट्ट असुन कसे चालेल ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2009 - 1:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>फक्त मन घट्ट असुन कसे चालेल ?
मन घट्ट असले की......
(आंद्या चावटपणा करु नको ! :) )

-दिलीप बिरुटे
(चावट)

सँडी's picture

15 May 2009 - 8:25 pm | सँडी

>>ज्याचे मन घट्ट आहे तो कितीही वेळ 'टिकू' शकतो.ती देखिल एक 'साधना' आहे बाकी सगळे बाह्योपचार.
हजारवेळा सहमत! :)

वेताळ's picture

14 May 2009 - 1:14 pm | वेताळ

अशाने पोर बिघडतील काका.......बाकी मन घट्ट सावेच लागते.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

प्रमोद देव's picture

14 May 2009 - 1:39 pm | प्रमोद देव

कायच्या काय!
अहो येणारी प्रत्येक नवी पिढी ही तुमच्या आमच्यापेक्षा कैक योजनं पुढे आहे. ....अगदी सर्व बाबतीत.
बाकी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे ना....आमी बी घडलो,तुमी बि घडाना(आमी बीघडलो,तुमी बीघडाना)

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

धमाल मुलगा's picture

14 May 2009 - 1:47 pm | धमाल मुलगा

कसल्या गोळ्या अन कसलं काय रे? फुकाचे धंदे साले. विकणारे येडे बनवतात आणि हे पदरचे पैसे घालुन येडे बनतात.
च्यायला, ह्या सगळ्यांना एकदा टाईम म्यानेजमेंटचं एक सेमिनार द्या, आणि सांगा "फॉलो द रुल्स!"

-(कॉर्पोरेट ट्रेनर) ध.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

विनायक प्रभू's picture

14 May 2009 - 7:02 pm | विनायक प्रभू

चांगला साईड बिजिनेस आहे रे धमु.
उदघाटनाला मुद्दाम बोलव रे बाबा.

अवलिया's picture

14 May 2009 - 1:52 pm | अवलिया

चांगला 'विषय' !! चांगली चर्चा !

पराशेट, मस्त लेखन :)
गुर्जी ! जय हो !!

-- अवलिया

मदनबाण's picture

14 May 2009 - 1:59 pm | मदनबाण

औषध कंपनांच्या हाती हे पैसा कमवण्याचं अमोघ अस्त्र लागले आहे...
आधी स्वतःस्वस्त किंमतीत ही औषध विकतील,,,एकदा का सवय(चटक्???)लागली की मग त्याच गोळ्यांची किंमत वाढवतील देखील...कमी पावर वाले जास्त पावरची मागणी करतील !!!!!
एकुणच काय तर या औषध कंपन्यांची चांदी,सोना आणि प्लाटिनम वगरै आहे. ;)
अफगणिस्तानात टिपर मिळत नव्हते...मग काय अमेरिकी सैंन्याने पाकिटांची व्यवस्था केली...आता ते अमेरिकी सैन्य गडी(टारगेट) बरोबर टिपतात !!!
उध्या या गोळ्यांचे मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्कटिंग झाले तरी नवल वाटाला नको... :)

(विक्स की गोली लो खिचखिच दुर करो...)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

बहुगुणी's picture

15 May 2009 - 1:43 am | बहुगुणी

"सिलदेफिनाल घेतल्यावर नसांना रक्त पुरवठा वाढतो."..

दोन छोट्याशा दुरुस्त्या: या औषधाच्या (हे 'औषध' आहे हे इथे महत्वाचं!) इंग्लिश नावाचा उच्चार स्लाय्डेनाफिल (slidenafil) असा आहे (आधिक माहिती इथे मिळेल) आणि याचा उपयोग 'नसां'ना नव्हे तर 'रोहिण्यांना' रक्त पुरवठा वाढवण्यासाठी होतो (माझ्या समजुतीप्रमाणे 'नस' म्हणजे nerve, इथे artery वर परिणाम होतो, 'नसे'वर नाही.) बाकी चालू द्या.

अवांतरः याच औषधाचा काही 'उद्योगी' शास्त्रज्ञांनी फुलांचे देठ किंवा वेलींचे देठ आधिक काळ ताठ ठेवण्यासाठीही करून पाहिलाय, तत्व तेच, cyclic GMP आधिक प्रमाणात निर्माण करून द्रव-दाब वाढवणं.

टारझन's picture

15 May 2009 - 1:48 am | टारझन

छाण ... अगदी नावाप्रमाणे आहात ;)

बाकी .. ए प्रसाद्या .. मेल्या .. नको त्या गोष्टी कसल्या ऐकतोस बे ? गुरूवारी कसर काढण्याचा फंडा =)) भोचकसम्राट आहेस डुरक्या ...

(सुप्तगुणी) टारझन