गुलाब

स्वप्नयोगी's picture
स्वप्नयोगी in विशेष
8 May 2009 - 6:55 pm
छंदशास्त्र

या जगात सगळच , बाहेरून सुंदर दिसत
प्रत्यक्षात मात्र गुणी ,फारच थोड असत

सुंदर आणि गुणी अस , जगात एकच असत
ते म्हणजे सुंदर , गुलाबाच फुल असत

काट्यावर उभ राहूनही, सतत सारख हसत असत
दुसर्‍याच्या आनंदासाठी , खुप खुप फुलत असत

निस्वार्थी निरागस अस , मोहक त्याच रूप असत
'प्रेम ' व्यक्त करताना , म्हणुनच ते प्रतिक असत

सर्वांमध्ये त्याला , राजाच स्थान असत
म्हणुनच डौलात ते , वार्‍यावरती डोलत असत

जितक सुंदर जितक मोहक , तितकच ते खट्याळ असत
काट्याशिवाय हाताला , सहज अस लाभत नसत

देवाच्या देव्हारयात त्याला , मानाच स्थान असत
आपल्याजवळ असत तेंव्हा , आपला ते मान राखत

एक दिवसाच्या आयुष्यात , खुप काही शिकवून जात
स्वत: काहीच न घेता , खुप काही देउन जात

स्वप्नयोगी

प्रतिक्रिया

सुप्रिया शेम्बेकर's picture

10 Jun 2009 - 5:35 pm | सुप्रिया शेम्बेकर

बरि लिहिलि अहे कविता फ॑कत कुना शालेतिल मुलाने लिहिल्यासार्अ खि वातते आहे क्शमस्व

संजयशिवाजीरावगडगे's picture

11 Aug 2010 - 5:10 pm | संजयशिवाजीरावगडगे

निस्वार्थी निरागस अस , मोहक त्याच रूप असत
'प्रेम ' व्यक्त करताना , म्हणुनच ते प्रतिक असत !

देवाच्या देव्हारयात त्याला , मानाच स्थान असत
आपल्याजवळ असत तेंव्हा , आपला ते मान राखत !

खुपच सुंदर !!! अप्रतिम !!! मन वेडेपिसे झाले !!!

पारिजात's picture

11 Aug 2010 - 6:15 pm | पारिजात

सुंदर.........

काट्यावर उभ राहूनही, सतत सारख हसत असत
दुसर्‍याच्या आनंदासाठी , खुप खुप फुलत असत

एक दिवसाच्या आयुष्यात , खुप काही शिकवून जात
स्वत: काहीच न घेता , खुप काही देउन जात

छान लिहील आहे.