कामगार सभा

अमृतांजन's picture
अमृतांजन in काथ्याकूट
7 May 2009 - 11:40 am
गाभा: 

आज सकाळी पं. हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेली गाणी ऐकत होतो...आणि नॉस्टॅल्जिक झालो. लहानपणी (५-६ वर्षाचा असेन) कामगार सभा हा रेडीओवर (व्हॉल्व्हचा) सकाळी ११.०० वाजता लागणारा होणारा कार्यक्रम मी उन्हाळ्याच्या सुटीत/इतर सुटीच्या दिवशी नेहमी ऐकत असे. "ऐरणीच्या देवा तुला..." वगैरे गाणी तोंडपाठे असत.

त्यावरील अनेक गाणी कानावर पडल्यावर आजही त्या रम्य दिवसांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. मला कित्येक वर्षात माझे एक अत्यंत आवडते गाणे मात्र कुठेही मिळाले नाही- "माहेराला जा.." अशा आशयाचे ते गाणे होते. आणि दुसरी ओळ "झिम्मा खेळु" वगैरे अशी आहे. कोणाला आठवते आहे ते गाणे?

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

7 May 2009 - 11:55 am | नितिन थत्ते

http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/1772.htm

खराटा
(रंग माझा वेगळा)

अमृतांजन's picture

7 May 2009 - 12:16 pm | अमृतांजन

तेच ते गाणे!!!!
:-) खूप धन्यवाद!!!

जागु's picture

7 May 2009 - 12:22 pm | जागु

खुप सुंदर गाण्याची आठवण करुन दिलित.

llपुण्याचे पेशवेll's picture

7 May 2009 - 2:29 pm | llपुण्याचे पेशवेll

माझी दुपारची शाळा असे तेव्हा ११ला कामगार सभा चालू झाली कि जेवायला बसायचे आणि कामगारसभा संपता संपता म्हणजे ११:३० ला घराबाहेर पडायचे. हल्ली मुंबई केंद्र नीटसे ऐकू येत नाही पुण्यात त्यामुळे कामगार सभा ऐकली नाही बरेच दिवसात.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

अमृतांजन's picture

7 May 2009 - 2:59 pm | अमृतांजन

ह्या गाण्यातले खालील ठळक ओळिंचे अर्थे काय आहेत?

घागर घुमूंदे घुमूंदे, रामा, पावा वाजू दे
आला शंकरुबा शंकरुबा, गवर माझी लाजू दे

रुणझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा

माझं माहेर सावली, उभी दारात माऊली
तिच्या काळजात बाई, माया-ममतेचा झरा

मला माहेरी पाठवा, मला माऊली भेटवा
माझ्या आईच्या पंखात, मला मिळू दे उबारा

सौभाग्याचं लेणं, गवर माझी लेवू दे
मोरपंखी चोळी, गवर माझी घालू दे

मला पुसते माऊली, आले कोणत्या पाऊली
माझं गौराईचं पाय, माझा सोन्याचा उंबरा

गवर गौरी ग गौरी ग, झिम्मा फुगडी खेळू दे
हिरव्या रानात रानात, गवर माझी नाचू दे

मी हो बहीण लाडकी, पंचप्राणांच्या तबकी
दिली कुऱ्हाडीची ओवाळणी, त्याचं भाव करा

माया ममतेची ममतेची, आई मला भेटू दे
माहेरपणाचं पणाचं, सुख मला लुटू दे

कशी माहेराला येऊ, शिवंवरी उभा भाऊ
गेला दगड मातीनं ओटी भरून माघारा

गवर गौरी ग गौरी ग, झिम्मा फुगडी खेळू दे
हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे

जीव लाऊन जीवाचा, टिळा लाविते रक्ताचा
आता म्होरल्या जल्मात, नदी भेटु दे सागरा

चिंतामणराव's picture

7 May 2009 - 4:48 pm | चिंतामणराव

गवर हा गौर ह्या शब्दाच लोकगीतांत वापरल जाणारं स्वरुप आहे.

क्रान्ति's picture

7 May 2009 - 10:01 pm | क्रान्ति

गणपतीसोबत ज्येष्ठा कनिष्ठा गौरी तीन दिवसांसाठी येतात. त्या गणपतीच्या बहिणी असून त्या माहेरपणाला येतात, असं समजलं जातं. [म्हणूनच त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलं ही असतात.] घागरी फुंकण्याचा उल्लेख ज्येष्ठागुअरीच्या कहाणीतही आहे. या गौरी माहेरी येतात, तेव्हा लिंबलोण उतरून त्यांचं स्वागत करायचं [लेक माहेरी आली की तुकडा ओवाळून टाकतात ना], माहेरी आलेल्या लेकीला काही नवं सौभाग्यलेणं आई देते, नवी साडीचोळी देते, त्याचाही उल्लेख या गीतात आहे. माहेरपणाला आलेल्या सगळ्या सख्यांच्या सोबत शेत्-मळ्यात मुक्तपणे ही लेक मुक्तपणे खेळ, गाणी, नाच यांचा आस्वाद घेते. हे एका माहेरी आलेल्या लेकीचे गीत आहे. [कुरहाडीची ओवाळणी याचा संदर्भ मात्र मला माहीत नाही. कुणाला माहिती असेल तर जाणून घ्यायला आवडेल.] कदाचित चित्रपटातील काही घटनेचा संदर्भ असेल. कितीही वय झालं तरी माहेरी जायचं म्हटलं की स्त्रीच्या मनात अशाच भावना उमलून येतात!
माझ्या अल्पमतीप्रमाणे या गीतातल्या काही ओळींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. चुभूदेघे!
:)
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com

केळ्या's picture

11 May 2009 - 5:43 pm | केळ्या

वा!छानच निरुपण.

प्रदीप's picture

11 May 2009 - 7:03 pm | प्रदीप

विश्लेषण. 'लिंबलोण उतरण्या'च्या उल्लेखावरून माझे लहानपणीचे एक अत्यंत आवडते गीत आठवले :"लिंबलोण उतरता अशी का झालीस ग बावरी, मुली तू आलीस अपुल्या घरी.." सुंदर शब्दात पी. सावळारामांनी व्यक्त केलेल्या भावना : (ह्याच घरावर छाया धरूनी, लोभ दाविसी मायपक्षिणी, हसते घर हे तुझ्या दर्शनी, सुखव मला गे आई म्हणूनी, बिलगूनी माझ्या उरी-- असे नव्या सुनेला उद्देशून सासू म्हणते आहे), वसंत प्रभूंचे संगीत,लताचा आवाज आणि त्याला बरोबर बिलगून जाणारे लीड व्हायोलिन....

जाता जाता, 'ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे' ह्याच्या संगीतकार होत्या आनंदघन म्हणजे लताबाई.

अमृतांजन's picture

7 May 2009 - 11:12 pm | अमृतांजन

योगायोग कसा असतो पहा- हे गाणं येत्या सारेगामा मधे आहे. :-)
ग्रेट माईंडस थिंक अलाईक ;-)

नितिन थत्ते's picture

11 May 2009 - 7:19 pm | नितिन थत्ते

लिम्बलोण उतरणे म्हणजे काय ते सांगा की राव.

खराटा
(रंग माझा वेगळा)

नंदन's picture

11 May 2009 - 7:24 pm | नंदन

काही वर्षांपूर्वी बालचित्रवाणीत गौरीची माहिती देणार्‍या एका छोटेखानी कार्यक्रमात हे लयदार गाणं पाहिल्याचं आठवतं. आठवण जागी केल्याबद्दल अनेक धन्यवाद.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी