गाभा:
जगात भारतीय मसाल्यांना मानाचे स्थान आहे.
आता दिवस उन्हाळ्याचे आहेत. आताच्या दिवसात घरोघरी कुरडया, पापड, लोणची तसेच मसाला आणि तिखट केले जाते. त्यातही मसाला करणे म्हणजे एक प्रोजेक्ट असतो. कोणाचा मसाला कसा आहे यावर त्या त्या घरात ग्रुहीणींत संवाद होत असतो.
प्रत्येक घराची मसाला करायची पद्धत वेगवेगळी असते. कोणी कोणते प्रमाण वापरतो त्या बद्दल वेगवेगळी मते असतात.
तर अशा या वार्षीक पदार्थाचे १ किलो चे प्रमाण आपण सांगावे. लक्षात घ्या की आपण १ किलो मिरची वापरत आहोत. त्या १ किलो मिरचीचा आपण मसाला बनवत आहोत. तर प्रत्येक घटकांचे प्रमाण किती असावे?
जसे:-
गोडतेल: १कि.
तेजपान :
खसखस :
हळद :
शहाजीरे :
सुंठ :
वेलदोडा :
आपण प्रमाण जरी ठरवू / देवु शकत नसाल तरी कमीतकमी घटक पदार्थांची यादी तर द्या म्हणजे जाणकार सभासद त्याचे प्रमाण पण देतील.
आधीच धन्यवाद.
प्रतिक्रिया
6 May 2009 - 3:20 pm | विजय गणेश खर्डे
थाब्,आईला विचारून येतो.
6 May 2009 - 3:37 pm | अनंता
१ गोडेतेल कशाला?
२ मिरची कोणती? १ किलो म्हणजे देठांसकट का देठांविना?
३ शहाजिरे ऐवजी साधेच जिरे चालणार नाही का?
४खसखस पिकलेली असावी का कच्चीच?
परा अधिक माहिती देऊ शकेल.
अवांतर : आता पापड केव्हा? बोलवा हं. (खायला)
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)
6 May 2009 - 3:42 pm | प्राची
दगड फोडणार्यांवर मिरची कुटायची वेळ का आली? :/
6 May 2009 - 3:46 pm | जागु
वरती दगडफुल यादित नाही.
6 May 2009 - 8:25 pm | रेवती
ओ भाऊ.... गोडा मसाल्यात असते लाल मिरची ....पण प्रमाण कमी असते.
काहीजणी गोडा मसाल्यात लाल मिरची अजिबातच वापरत नाहीत.
अजून बरेच घटक असतात. आता मिरचीच जर एक किलो घेतली तर भरपूरच मसाला होइल.
(घरात किती माणसं आहेत, पाहुणे साधारण किती येतात त्यावर मसाला किती करायचा हे अवलंबून असतं.)
गोडं तेल हे अगदी थोडं घालून काही पदार्थ त्यावर परतावे लागतात. गोडं तेल एक किलो म्हणताय आपण....
(मला निटसं कळलं नाही आपल्याला काय म्हणायचय ते.)
रेवती
6 May 2009 - 8:54 pm | प्राजु
पाषाणभेद भाऊ,
एक सल्ला अगदी फुक्कटचा "बेडेकर गोडा मसाला, यंदा नक्की वापरा" ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 May 2009 - 9:01 pm | जृंभणश्वान
चकली ताईंनी द्यायच्या अगोदर मीच देतो ही लिंक
http://chakali.blogspot.com/2008/11/goda-masala-kala-masala.html
6 May 2009 - 11:41 pm | क्रान्ति
सुकं खोबरं, तीळ, धने, जिरे, लवंग, बडी इलायची [व-हाडात हे नाव आहे मोठ्या विलायचीला], मोहरी, मेथ्या, हे पदार्थ पण घालतात गोड्या मसाल्यात. खोबरं आणि तीळ हे बारीक केल्यावर तेल सुटतं, म्हणून १ किलो मिरचीच्या मसाल्याला १ किलो तेल नाही लागत. हे सगळे पदार्थ अगदी थोड्या तेलावर परतून घ्यायचे आणि बारीक वाटायचे. मिरची हवी तर तेलावर भाजून बारीक करावी. कांदा-लसणाचा मसाला करायचा असेल तर कांदा आधी कापून वाळवून तळावा, लसूण पण तळून घ्यावा. [प्रमाणाशी आणि मोजमापाशी माझं सख्य नाही, जे काही करते, ते अंदाजपंचे धागोदरसे असतं, पन खाणेबल असतं ब-यापैकी.] बाकी सुगरण ताया अधिक माहिती देतील आणि माझ्या माहितीत काही चुकलं असेल तर सांगतील.
अवांतर :- मसाला चुकून पाकृऐवजी इकडे नाही आला ना?
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
6 May 2009 - 11:45 pm | नितिन थत्ते
पाषाणभेद,
संस्कृती पाकक्रिया समाज जीवनमान मत शिफारस सल्ला अनुभव प्रश्नोत्तरे माहिती
एवढे सगळे लिहायच्या ऐवजी पाकृ असे लिहून
'गोड्या मसाल्याची पाककृती सांगा' असे लिहिले असते तर भागले असते.
खराटा
(स्वतःच घेतलेले नाव)
7 May 2009 - 11:08 am | पाषाणभेद
वरील मसाल्यात कोणतेही प्रमाण हे कोणीही ठरवलेले नाही आणि त्यात चवीनुसार कुटूंबाप्रमाणे त्यात बदल होत गेले आहे. माझा उद्देश हाच होता की त्यात वैविधता किती आणि कशी आहे ते बघण्याची.
१ कि. गोडतेल म्हणजे माझे चुकलेच.
बाकी चकली ताईंची लिंक म्हणजे उपयोगी आणि मस्तच.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)