१मे पासून पुण्यातील रिक्षाचालक संपावर गेल्याची बातमी वाचनात आली. कारण काय तर १ रु. भाडे कपात करण्याचा निर्णय संबंधीत खात्याने त्यांच्यावर लादला आहे.
आमच्या सारख्या पुण्याच्या बाहेर रहाणार्यांना पुण्यात आल्यावर रिक्षा प्रवासा शिवाय पर्याय नाही. पी.एम्.टी तसेच पी.सी.एम्.टी चे बस रूट माहित नाहीत. उद्या पासून २-३ दिवस लग्न, मुंज आदिंचे मुहुर्त, सुट्ट्या या कारणाने अनेक बाहेरचे लोक/ पाहुणे पुण्यात येण्याची शक्यता आहे. मला देखील रविवार/ सोमवार पुण्यात यायचे आहे. पण रिक्षा संपामुळे अवघड परिस्थिती वाटत आहे.
मिपावर अनेक पुणेकर असल्याने त्यांच्या कडून सद्य परिस्थिती कळू शकेल यासाठी हा काथ्याकूट.
खालील माहिती कुणी देऊ शकेल का ?
१) हा संप अजून चालू आहे का ?
२) सिक्स सिटर / शेअरिंग रिक्षा यात सामील आहेत का ?
३) पिंपरी -चिंचवड मधील रिक्षाचालक यात सांमील आहेत का?
४) संप असाच चालू असल्यास खालील ठिकाणी जाण्यासाठी कुठला बस रुट आहे
चिंचवड स्टेशन ते - सांघवी/ औंध
औंध ते कोथरुड डेपो
कोथरुड डेपो ते अलंकार पोलिस चौकी
मेहेंदळे गॅरेज ते स्वारगेट
पुणेकर मिपासभासदांकडून मदतीची अपेक्षा .
प्रतिक्रिया
2 May 2009 - 10:45 am | अजय भागवत
मला ब्राऊजरने "This site may harm your computer" असा संदेश दिला पण तसे काही नाही. ही साईट पुणे महा. ने विकसित केली आहे. त्यावर तुम्हाला सगळ्या वाटा व बसमार्ग ह्यांची सांगड पाहता येईल.
http://www.pmpml.org/PMPML/Routes.php
2 May 2009 - 10:55 am | अमोल केळकर
अरे वा ! खुप चांगले संकेत स्थळ आहे
माहिती बद्दल धन्यवाद
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
2 May 2009 - 11:32 am | देवदत्त
माझ्या लहानशा राहणीकाळातील अनुभवावरून पडलेले आणखी प्रश्न :)
शहरातीलच रिक्षाचालक संपात सामिल आहेत की बाहेरचेही? कारण रिक्षाचालकांच्या म्हणण्याप्रमाणे केव्हाही बहुतेक भाग हे हद्दीच्या बाहेरच असतात. त्यामुळे त्यांचा आणि मीटरचा संबंध येत नाही. ते आपले मनाप्रमाणे पैसे घेत असतात.
हीच गत सहा आसनी रिक्षांचीही. त्यांचे तर मीटरही नसतात. त्यांच्यावर भाडेकपात कशी लागू करतील?
(नुकत्याच पाहिलेल्या बातमीनुसार सहा आसनी रिक्षाचालक संपातून बाहेर पडले आहेत)
2 May 2009 - 6:06 pm | अविनाशकुलकर्णी
के़ळ्कर साहेब कुठे १ रुपया साठी डोके फोड करता??? निघेल तोडगा २-३ दिवसात..या देशात रहायचे तर सारे सहन करायचे