मिसळपावचे धोरण..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
6 Feb 2008 - 6:25 pm
गाभा: 

राम राम मंडळी,

अधिक चौकशी करता असे कळले की जरी नामोल्लेख केलेला असला तरी कोणत्याही वृत्तपत्रातील अथवा मासिकामधील मजकूर संबंधित वृत्तपत्राच्या/मासिकाच्या लेखी परवानगीविना जसाच्या तसा मिसळपाव किंवा तत्सम संस्थळावर देणे हा कायदेशीर गुन्हा आहे.

तरी मिसळपाववरील सर्व सभासदांना नम्र विनंती की त्यांनी कृपया त्यांना अपेक्षित असलेल्या चर्चेकरता संबंधित वृत्तपत्रातील लेखाचा/बातमीचा/किंवा अन्य कुठल्याही लेखनाचा इथे फक्त दुवा द्यावा. ते लेखन इथे जसेच्या तसे कॉपीपेस्ट करू नये..

मिसळपाव डॉट कॉम कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर भानगडींत अडकू इच्छित नाही. तरी कृपया सर्वांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती...

तात्या.

प्रतिक्रिया

अविनाश ओगले's picture

6 Feb 2008 - 7:48 pm | अविनाश ओगले

आपल्या विनंतीची आणि कायदेशीर तरतूदींची सर्वांनीच दखल घेणे गरजेचे.

मि.पा.च्या मुख्य पानावर "सरकत्या जाहिरातीप्रमाणे" दाखविता येईल काय?
म्हणजे सुरुवातीला आल्याआल्या लोक सावध होतील आणि नंतर आपोआप लक्षात राहील.

चतुरंग

विसोबा खेचर's picture

7 Feb 2008 - 12:57 am | विसोबा खेचर

मि.पा.च्या मुख्य पानावर "सरकत्या जाहिरातीप्रमाणे" दाखविता येईल काय?

रंगराव,

आपली सूचना चांगली आहे, परंतु मला तांत्रिक बाबी काहीच कळत नाहीत. तरीही आपली सूचना मिपाच्या तांत्रिक सल्लागारांच्या कानावर घालतो. जमल्यास उत्तमच!

आपला,
(आभारी) तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Feb 2008 - 8:06 pm | llपुण्याचे पेशवेll

तात्या आपण वेळेवर लोकांना जागे केल्याबद्दल आपले धन्यवाद. तसेच चतुरंगरावांची सूचना स्वागतार्ह.....

-मिसळवादी
डॅनी
पुण्याचे पेशवे

प्राजु's picture

6 Feb 2008 - 8:21 pm | प्राजु

आताच सांगितलं...मला समजलं तरी...

- प्राजु

धोंडोपंत's picture

7 Feb 2008 - 10:28 am | धोंडोपंत

तात्यासाहेब,

योग्य समज दिल्याबद्दल धन्यवाद. दुवा देणे हे कायदेशीर आहे पण मजकूर जसाच्या तसा लेखकाच्या नावाशिवाय छापणे हा गुन्हा ठरू शकतो.

नैतिकदृष्टीनेही ते योग्य नाही. असो.

आपला,
(सहमत) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

तात्या.
योग्य समज दिल्याबद्दल धन्यवाद..
झालेल्या चुकिबद्ल माफ कराल.
आपला संजीव