इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे : एक शंका.

अनंता's picture
अनंता in काथ्याकूट
1 May 2009 - 10:59 am
गाभा: 

नमस्कार, नुकत्याच महाराष्ट्रातील निवडणूका झाल्या. यथावकाश निकालही लागतील. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमुळे निकालही तुलनेत झटपट लागू लागले आहेत.
मात्र, नव्या तंत्रज्ञानाचे फायदे असतात त्याचप्रमाणे तोटेही असतातच.माझ्या मते, इ.मतदानयंत्रात मेमरी-कार्ड आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला असावा. तसे असल्यास
यात ब्लू-टुथ तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असणारच. म्हणजेच गैरव्यवहार करणे फारच सोपे, विशेषत: सत्ताधारी पक्षाला. हे आपले माझे वैयक्तीक मत. चुकीचेही असू शकते.
संबधित विषयाच्या तज्ज्ञांनी माझ्या अल्पज्ञानात भर टाकावी.

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

1 May 2009 - 12:29 pm | नितिन थत्ते

अविश्वासच दाखवायचा तर आतील प्रोग्रामिंग असे असू शकते की लोकांनी काहीही मते दिली असली तरी मेमरी मधे अ मते काँग्रेस पक्षाला आणि अ-ब मते भाजपला स्टोअर होतील. अ आणि ब हे आकडे रॅण्डमली जनरेटेड असला म्हणजे कोणाला संशयही येणार नाही. हे पक्ष कोणत्या पक्षाच्या कारकीर्दीत यंत्रे खरेदी झाली त्याप्रमाणे वेगवेगळी असू शकतील.
खराटा
(रंग माझा वेगळा)

अडाणि's picture

1 May 2009 - 11:55 pm | अडाणि

निवड्णुका ह काम अजून तरी निवडणूक आयोग करत असल्याने सर्व गोष्टी तपासुन काम होते... आणि त्या यंत्रात ब्लुटूथ आसायचे काही कारण नाहीये...
-
अफाट जगातील एक अडाणि.

आळश्यांचा राजा's picture

2 May 2009 - 12:21 pm | आळश्यांचा राजा

हे अगदी साधे मशीन आहे. यात अगदी साधे प्रोग्राम करता येतात. उदा. उमेदवारांची संख्या फीड करणे, मतदान बंद (क्लोज) करणे, निकाल बघणे. यात रीड ओन्ली मेमरी असते. ती केवळ डिलीट करता येते, बदलता येत नाही. ही मेमरी ० ते ७० अंश सेल्सियस तपमानापर्यंत शाबूत राहते. चुंबकीय क्षेत्राचा यावर परिणाम होत नाही. दहा वर्षे मेमरी टिकून राहते.

एक मत दिल्यानंतर दहा ते पंधरा सेकंद मशीन व्यस्त राहते. म्हणजे `रिगिंग' करण्यासाठी भरपूर वेळ हवा!

सरकारी यंत्रणेला थोडा अधिक ताप देण्यासाठी या यंत्रांचे दोन वेळा 'रॅण्डमाय्झेशन' केले जाते. म्हणजे कॉम्प्युटर वर रँडम नंबर जनरेट करून हे मशीन त्या बूथला आणि ते मशीन आणखी तिसरीकडे असे केले जाते. असे दोन वेळा, सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या उपस्थितीत केले जाते. हा फार मोठा उद्योग असतो.

सर्व मशीन चार पाच प्रकारे सील केली जातात.

मतदान सकाळी सात वाजता सुरू होणार असेल तर सहा वाजता प्रत्येक बूथचा प्रिसायडिंग ऑफिसर सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष 'मॉक पोल' घेतो. म्हणजे मशीन ठीक आहे, अगोदर मते घालून ठेवलेली नाहीत याची शेवटची तपासणी आणि खात्री. त्यानंतर पुन्हा मशीन चार पाच प्रकारे सील होते. या सील्सवर उमेदवारांचे प्रतिनिधी सह्या करू शकतात. मतदान संपल्यानंतर पुन्हा एक सील अधिक लागते.

मतमोजणीपर्यंत ही यंत्रे कडेकोट बंदोबस्तात असतात.

अनेकांच्या अनेक शंका होत्या म्हणून हे मशीन बनल्यापासून आज व्यापक प्रमाणात वापरात यायला वीस वर्षे लागली. माझ्या मते पुढची वीस वर्षे तरी काही मूलभूत बदल होणे शक्य नाही. मशीन अगदी साधे आहे, म्हणूनच विश्वासार्ह आहे.

काही सुधारणांना वाव आहे. त्या आम्ही आयोगाला पाठवल्या आहेत.

( ईव्हीएम ची कसून तपासणी केलेला ) आळश्यांचा राजा

अमोल खरे's picture

2 May 2009 - 12:50 pm | अमोल खरे

मस्त लेख.बरीच सुंदर माहिती मिळाली. पण मागील एका निवडणुकीत बिहार मध्ये एका केंद्रावर कोणतेही बटण दाबल्यावर कंदिल ( लालू ची पार्टी ) समोरील दिवा लागत होता. कोणाच्यातरी हे लक्षात आलं आणि निवडणुक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. तेथे पुन्हा मतदान घेण्यात आले. तेव्हा हि मशिन्स आजच्यासारखी फुलप्रूफ नव्हती का ? कोणी खुलासा करु शकेल का ?