पाटी खास !!

कपिल काळे's picture
कपिल काळे in काथ्याकूट
30 Apr 2009 - 2:36 pm
गाभा: 

पुणेरी पाटयांविषयी बोलावं तरी किती आणि काय? पण काल ही एक खास पाटी आढळली. ती खास मिपाकरांसाठी...

पाटी बघण्यासाठी इथे टिचकी मारा.

प्रतिक्रिया

कपिल काळे's picture

30 Apr 2009 - 3:56 pm | कपिल काळे

कोणी , संपादक आहेत काय? पाटी दिसत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2009 - 4:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण पिकासावर चित्र अपलोड केलेले आहे,त्या दुव्यात काहीतरी गडबड आहे,
त्यामुळे चित्र दिसत नाही. योग्य दुरुस्ती करावी किंवा फ्लीकरवर चित्र अपलोड करुन दूवा दिला तर अडचण येणार नाही असे वाटते.

कपिल काळे's picture

30 Apr 2009 - 4:55 pm | कपिल काळे

इथे वर टिचकी मारल्यास पाटी दिसत आहे की. दुव्यात गडबड नाही.

मुक्तसुनीत's picture

30 Apr 2009 - 5:03 pm | मुक्तसुनीत

व्यक्तीगत चित्रसंग्रह प्रकाशित केला आहे काय ? का नुसता चढवलेला आहे ?

मूळ लेखातला दुवा बदलला आहे. चित्र दिसायला हवे.

मुक्तसुनीत's picture

30 Apr 2009 - 5:11 pm | मुक्तसुनीत

खरोखरच विचित्र पाटी. वाचल्याक्षणी हसलो !

मराठमोळा's picture

30 Apr 2009 - 5:13 pm | मराठमोळा

२टी मिक्स पेट्रोल रिक्षात व लेडीजमधे भरुन मिळते का काय तिथे?
मला वाटतं रिक्षा आणी लेडीज दोन्ही स्त्रिलिंगी असल्याने त्यांची रांग वेगळी केली असावी... ;)

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

अनामिक's picture

30 Apr 2009 - 7:09 pm | अनामिक

हा हा हा.. पाटी असावी तर अशी... बघता क्षणी हसता येण्यासारखी.... हा हा हा

-अनामिक

हे कोणतं नवं क्रिप्टीक?

हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

हरकाम्या's picture

1 May 2009 - 12:15 pm | हरकाम्या

माझ्या घरी दोन्ही आहेत या दोघींना कुठे ऊभे करु ?????

अनामिक's picture

30 Apr 2009 - 5:15 pm | अनामिक

मला तरी या पाटीत हसण्यासारखं काही वाटलं नाही. ही तर क्लासेसची जाहीरात आहे. आजच्या धावत्या जगात स्त्रीया नोकरी करत असताना पुरूषांना स्वयंपाक येणे ही आजची गरजच आहे.

अवांतर : फोटो दिसण्यासाठी ऍड्रेसबार मधला दुवा न देता पिकासामधे फोटोच्या बाजूला एक दुवा दिलेला असतो तो द्या. फोटो दिसायला हवा.

-अनामिक

चतुरंग's picture

30 Apr 2009 - 6:46 pm | चतुरंग

चतुरंग

भाग्यश्री's picture

30 Apr 2009 - 11:50 pm | भाग्यश्री

मेधा गोखले या पुरुषांना स्वयपाक शिकवण्याचे क्लासेस घेतात असं मी मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकात वाचले आहे..
त्यांची मुलाखतही होती.. बरीच उद्द्योगी महिला वाटली..
धाग्यातल्या पाटीमुळे हसू नाही आले.. प्रतिसादातली पाटी अशक्य! काय अर्थ आहे देव जाणे!

www.bhagyashree.co.cc

टारझन's picture

1 May 2009 - 12:20 pm | टारझन

अगं ताई,
चित्रातली "रिक्षा आणि लेडिज" ह्याचा अर्थ असा .. की त्या क्यू मधे ऑटो वाले आणि बाईक्स वाल्या महिलांनी पेट्रोलभरण्यास यावे.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Apr 2009 - 6:17 pm | परिकथेतील राजकुमार

वरील दिपक यांची पाटी भवतेक 'कुलकर्णी पेट्रोल पंप' येथील आहे. ह्या व अशा प्रकारच्या अनेक पाट्या पुणेरीपाट्या.कॉम या संकेतस्थळावर बघता येतील.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अविनाशकुलकर्णी's picture

30 Apr 2009 - 11:30 pm | अविनाशकुलकर्णी

राम मंदिरावर लावलेली पाटि.."देवळास रंगकाम काढल्याने या वर्षी रामजन्म होणार नाहि"