गाभा:
झी टिव्हीवरील एका मालिकेसाठी आता आंब्याचे खरे खुरे झाड जाळणार.
हॅटस् ऑफ प्रॉडक्शनची "श्री' ही मालिका सध्या "झी टीव्ही'वर चालू आहे. जयेश पाटील यांनी ही मालिका लिहिली आहे. अंकुश मोहल्ला यांनी या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी हाती घेतली आहे. जे. डी. मजेठीया आणि आतीश कापडिया या मालिकेचे निर्माते आहेत.
मालिकेमध्ये खलनायिका मनोरूग्ण अथवा विक्षिप्त दाखवण्यासाठी आता हे झाड जाळणार म्हणे. शूटिंगसाठी जाळायचे तर खोटे झाड जाळावे ना. खरे झाड कशाला जाळायचे?
मालिकेतिल खलनायिक मनोरूग्ण असणं ठिक आहे .. पण त्यासाठी खरे झाड जाळणारे सुद्धा मनोरूग्णच असले पाहिजेत.
बातमी इथे वाचा.
प्रतिक्रिया
28 Apr 2009 - 8:34 pm | नितिन थत्ते
मालिकेतिल खलनायिक मनोरूग्ण असणं ठिक आहे
असल्या मालिका पाहणारेही मनोरुग्णच असतात.
खराटा
(रंग माझा वेगळा)
29 Apr 2009 - 9:28 am | प्रकाश घाटपांडे
सहमत पण गंमत म्हणजे जर त्या बघितल्या नाहीत तरी ते अधिक मनोरुग्ण होण्याची शक्यता असते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
28 Apr 2009 - 8:35 pm | चन्द्रशेखर गोखले
मला तर ब-याच मराठी मालिका मनोरुग्ण लोकांनी काढल्या असाव्यात असं वाटतं..!
28 Apr 2009 - 8:39 pm | चतुरंग
आपोआपच गाजावाजा होणार. पेपरात उलटसुलट बातम्या. शेवटी, 'लोकांच्या भावनांचा आदर करुन आम्ही झाड जाळणार नाही' असे म्हणायचे झाले! टीआरपी वाढायला किती वेळ लागतो! ;)
चतुरंग
28 Apr 2009 - 9:08 pm | देवदत्त
वास्तविक बातम्या बाहेर न काढता अशा गोष्टी चालू असतील, नंतर कधीतरी ह्या प्रसिद्ध होतात. पण ह्या वेळी वेगळेच काहीतरी. नंतर निर्माते म्हणतील, आम्ही असे काही ठरवलेच नव्हते.
आणि जरी त्यांनी ठरवले असेल तर त्याला विरोध हा राहिलच.
28 Apr 2009 - 8:41 pm | चकली
मी हि मालिका बघितलेली नाहि. पण बहुतेक मालिकांचे कथानक, पात्र, लेखन, संवाद काहिच रिअलिस्टीक नसते. झाड जाळणे वैगरे मात्र एक्दम खरे वाटायला पाहिजे.
असो. हि बातमी आली म्हणजे टी आर पी पण वाढणार !
चकली
http://chakali.blogspot.com
28 Apr 2009 - 8:53 pm | प्राजु
कधी लागते, कोण कोण आहे.. काहीही मला माहीत नाही. पण ही बातमी मात्र खरंच विक्षिप्तपणा वाटली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Apr 2009 - 9:13 pm | उमेश कोठीकर
तसे झाड जाळता येत नाही आणि तोडता पण येत नाही परवानगीशिवाय विनाकारण. शिवाय मराठी मालिकांपैकी एक दोन मालिका जर सोडल्या तर बाकीच्या मालिका काढणारे बिनडोक, आणि त्यामधे काही नाही हे माहित झाल्यावरही पाहणारे तर त्याहीपेक्षा बिनडोक. झी टी व्ही वरच संसार नावावरून कोणती तरी एक अशीच बिनडोक मालिका अव्याहतपणे सुरू आहे. त्यातला मूळ विषय जरा बरा वाटला होता म्हणून सुरूवातीला काही भाग बघितले.पण मूळ कथानकाचे दळण संपले आणि मग केवळ मालिकेची तिरडीच अखंड चालू आहे.
प्रेक्षकांना हे लोक मूर्ख समजतात आणि प्रेक्षक तसे बनतात हे जास्त चीड येण्यासारखे आहे. सद्ध्या शिवाजी महाराजांवरील मालिका मात्र खरेच छान आहे. प्राजु, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
28 Apr 2009 - 9:40 pm | टारझन
हा विक्षिप्तपणा काहीच नाही .. मी तर ह्या पेक्षा मेंदूचा "फालूदा" झालेले प्रकार अनुभवलेत =))
-
28 Apr 2009 - 10:11 pm | धनंजय
हिशोब पटकन सांगता येत नाही.
खोटे झाड बनवायचे तर लाकडाचे किंवा जळाऊ प्लास्टिकचे बनवावे लागेल. त्यामुळे खरे किंवा खोटे झाड - कुठले जाळणे बरे-वाईट त्याचा हिशोब सहज लागत नाही.
:-)
28 Apr 2009 - 10:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
जाळपोळ कशाला? संगणक, ऍनिमेशन इत्यादी गोष्टी अजूनतरी शिल्लक आहेत. जाळा काय आणि किती जाळायचंय ते आणि तेवढं!
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
28 Apr 2009 - 10:29 pm | लिखाळ
हेच म्हणतो.. डायनासोर बनवले.. एक झाड बनवायला काय ! :)
हे सगळे प्रसिद्धी वाढवण्याचे उपाय वाटतात .. आता त्या मालिकेचे नाव तरी माहित होईल लोकांना.
-- लिखाळ.
28 Apr 2009 - 10:55 pm | धनंजय
भविष्यात बहुधा सेट बनणार नाहीत, आणि ऑन-साइट प्रवास करून चित्रण तर होणारच नाही. प्रत्येक कलाकार आपल्या घराजवळच्या एखाद्या स्टूडियोमध्ये जाऊन, किंवा घरातच, आपल्या ओळी म्हणेल. मग संगणकावर त्यांच्या हालचाली एकत्र केल्या जातील.
पण संक्रमण काळात सेट बनतील आणि ऑन-साईट चित्रणही काही काळापर्यंत चालेल. सध्यातरी एखादाच सेट बनवण्यासाठी कित्येक झाडे तोडली जातात, कागद (पापियेर माशे) चा हिशोब लावता-लावता अनेक झाडे तोडली जातात, रंगरंगोटी मध्ये काही घातक रसायने वापरली जातात. भविष्याच्या संगणक-ग्राफिक चित्रपटांमध्ये केवळ संगणकासाठी सिलिकॉन खाणी/प्लास्टिके/वीजनिर्मिती हाच पर्यावरणाच्या दृष्टीने खर्च राहील.
शंका : आजच्या चित्रपटनिर्मितीत अशी बरीचशी झाडे वापरली जातात - एक जाळून-न-जाळून हिशोब फारसा बदलत नाही. आंब्याचे झाड जाळणार म्हणजे खाद्यनिर्मिक झाड नष्ट करणार असा काही विचार मनात येऊन शहारा येत आहे काय? पूर्वी कोणी मला आंब्याच्या आणि फणसाच्या लाकडाचे सुतारकाम दाखवले तेव्हा मला असाच शहारा आला होता.
29 Apr 2009 - 10:12 am | आनंदयात्री
भविष्यात बहुधा सेट बनणार नाहीत, आणि ऑन-साइट प्रवास करून चित्रण तर होणारच नाही. प्रत्येक कलाकार आपल्या घराजवळच्या एखाद्या स्टूडियोमध्ये जाऊन, किंवा घरातच, आपल्या ओळी म्हणेल. मग संगणकावर त्यांच्या हालचाली एकत्र केल्या जातील.
कलाकार्स बर्यापैकी ऑब्सोलेट होतील !!
हि बघा इमेज मॅट्रिक्सची एमिली ..
29 Apr 2009 - 5:46 am | विकास
>>>खोटे झाड बनवायचे तर लाकडाचे किंवा जळाऊ प्लास्टिकचे बनवावे लागेल. त्यामुळे खरे किंवा खोटे झाड - कुठले जाळणे बरे-वाईट त्याचा हिशोब सहज लागत नाही.
आंब्याच्या झाडाबद्दल असं म्हणतात की झाड आजोबा लावतात आणि फळं नातवंडे खातात. त्यातील अचूक कालगणना सोडली तरी इतके नक्की की आंब्याचे झाड रोपट्यापासून वृक्ष होण्यासाठी काही वर्षे लागतात.
प्लॅस्टीकचे झाड फारतर फार २४ तासात होईल असे वाटते. अर्थात त्यामुळे ते जाळणे योग्य असे म्हणायचे नाही कारण त्याचे म्हणून काही "प्रॉब्लेम्स" असणार...
म्हणून संगणकीय उपयोग व्हावा असे वाटते. तसेच वर चतुरंगने म्हणल्याप्रमाणे हे सगळे टिआरपी वाढवायचे उद्योग आहेत हे वेगळे सांगायला नको.
28 Apr 2009 - 11:06 pm | मराठमोळा
एकच काय अशी दररोज आपल्याला माहीत नसलेली कितीतरी झाडे तोडली/जाळली जातात. माणसांच्या पोटी जनावरे जन्माला यायला लागली आणी हे सर्व प्रकार सुरु झाले. बाकी ह्या बातमीतला प्रकार टीआरपी वाढवण्याचाच दिसतो.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
29 Apr 2009 - 10:24 am | काळा डॉन
आयला एकट्या होळीला हजारो झाडे जाळतात.. कुठल्यातर चिल्लर मालिकेत झाड जळताना दाखवले तर त्याची बातमी काय आणि त्यावर इथे चर्चा काय..आनंदी आनंदच आहे.
29 Apr 2009 - 10:32 am | मराठी_माणूस
सहमत.
29 Apr 2009 - 9:46 pm | विकास
>>>आयला एकट्या होळीला हजारो झाडे जाळतात.. कुठल्यातर चिल्लर मालिकेत झाड जळताना दाखवले तर त्याची बातमी काय आणि त्यावर इथे चर्चा काय..आनंदी आनंदच आहे.<<<
हे म्हणजे, "आयला काश्मीर, आसाम मध्ये सारखे दहशतवादी हल्ले होतात, तर एका मुंबईच्या हल्ल्याची बातमी काय आणि चर्चा काय... आनंदी आनंदच आहे" असे म्हणण्यातला प्रकार झाला. एक गाढव आहे म्हणून दुसरा आपोआप घोडा होत नाही... दोन्ही गाढवेच असू शकतात.
29 Apr 2009 - 10:33 am | विसोबा खेचर
मालिकेतिल खलनायिक मनोरूग्ण असणं ठिक आहे .. पण त्यासाठी खरे झाड जाळणारे सुद्धा मनोरूग्णच असले पाहिजेत.
सहमत आहे. अत्यंत संतापजनक प्रकार आहे. आंब्याचे झाड जाळणार्यांनादेखील तसेच जाळून मारले पाहिजे!
तात्या.
29 Apr 2009 - 10:43 am | परिकथेतील राजकुमार
=))
मनोरुग्ण म्हणा, फालतुपणा म्हणा नाहीतर अजुन काही...
येव्हड्या मोठ्या प्रमाणावर सुशिक्षीत लोकांनी घेतली का नाही दखल त्या मालिकेची ? हिच तर गंमत आहे. ती बातमी 'उठवली' नसती तर आज आपल्यापैकी कित्येकांना अशा प्रकारची मालीका सुरु आहे हे कळले देखील नसते ;)
एका दगडात (झाडात) किती पक्षी मारले गेले बघा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
30 Apr 2009 - 2:26 am | हरकाम्या
एरंडाचे झाड जाळणार असतील बहुतेक नाहीतरी सध्या पुण्यातली काही वाहने एरंडाच्या जिवावरच धावतायत.
एक तर या एरंडांना कोणी वाली नाही. शिवाय त्यांना जाळले म्हणून त्यांच्या नावाने कोणी गळेही काढणार नाही.