मुंबई

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
28 Apr 2009 - 1:47 pm
गाभा: 

आज सारे जण असे म्हणतात कि मुंबई भारताचि आर्थिक राजधानि आहे....मुंब‌ईतील सभेत बोलताना सोनिया गांधी यानि " मुंब‌ई सर्वांची आहे " असे विधान केले,पण असे कुणिच म्हणत नाहि कि मुंबई महाराष्ट्रांचि राजधानि आहे...अत्रे,डांगे,एस,एम,जयवंत राव टिळक.यांचे नेतृत्व .१०६ हुताम्याच्या बलिदाना नंतर मुंबई महाराष्ट्राला मिळालि..आज ५० वर्षे झालि..पण आपल्याला मुंबई आपलि म्हणुन टिकवता आलि का? ..मुंबईतला मराठी माणुस आज हवालदिल आहे..महाराष्टापासुन मूबई तोडुन केंद्र शाशित करायचि असा डाव दिल्लित शिजत आहे असा राज ठाकरे यांच्या भाषणातुन कायम ईशारा असतो..तसेच एक खुप मोठा व ताकद्वान गट मुंबई निराळी करावि या साठी कार्यरत आहे...बिहारी व यु.पी या खासदारांचे षडयंत्र आहे अन रोज लोंढे मुंबई व महाराष्ट्रात पाठवत आहे..बिहारी व यु.पी खासदारांपुढे मराठी खासदार निष्प्रभ ठरले आहेत..जर मुंबई केंद्र शाशित करायचा डाव यशस्वि ठरला तर मराठि माणुस प्रतिकार करु शकेल का????नुसता आरडा ओरडा करुन हा प्रश्ण सुटणार आहे का?.आज ह्या विषयावर बोलण्यासा ठी आपल्या कडे अभ्यासु खासदार आहेत का?..चिंतामणराव देशमुखानि नेहरुंच्या तोंडावर मुंबई प्रकरणी राजिनामा फेकला होता.इतके तडफदार नेते महाराष्ट्रात आता आहेत का??? ..मराठी टक्का पध्धतशिर पणे कमी केला जात आहे...त्यावर मराठी खासदार चुप्पि साधुन आहेत...मराठी राज्यकर्ते मुंबईला वाचवु शकतिल का?.दिल्लिश्वरावर दबाव टाकु शकतिल का?

प्रतिक्रिया

अनंता's picture

28 Apr 2009 - 1:54 pm | अनंता

सुन्न जहालो, तुमचा विचारप्रवर्तक लेख वाचून.
पण तुमच्या लेखातील अशुद्धलेखनाबद्दल आम्ही कोणाला दोष द्यायचा ?
रोखठोक बोलल्याबद्दल माफी असावी.

हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

घाशीराम कोतवाल १.२'s picture

28 Apr 2009 - 3:29 pm | घाशीराम कोतवाल १.२

हे असे हाल झालेत माझ्या मुंबईचे जे वर कवी कुसुमाग्रजांनी कथन केलेत तसे शेवटी आता वेळ आलि आहे हे दिल्लीश्वरांचे मदांध
तख्त फोडण्याची ऊठा एक व्हा आणी ह्यांना उल्थुन टाका

**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

अडाणि's picture

29 Apr 2009 - 7:15 am | अडाणि

कोतवाल शेठ,
हि कविता सुरेश भट साहेबांची आहे... कुसुमाग्रज नाही...
-
अफाट जगातील एक अडाणि.

पाषाणभेद's picture

28 Apr 2009 - 1:56 pm | पाषाणभेद

महाराष्टाचा दबाव गट वाढला पाहीजे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

मराठी_माणूस's picture

28 Apr 2009 - 2:24 pm | मराठी_माणूस

मुंब‌ई सर्वांची आहे

हे विधान नेहमी राजकारणी लोंका कडुन केले जाते , पण ते करताना मुंबईचा उल्ले़ख होतो त्याच बरोबर बाकीच्या महनगरांचा पण व्हायला हवा , तो होत नाही.

विकि's picture

28 Apr 2009 - 2:34 pm | विकि

मुळात मुंबई केंद्रशासीत करणार याच मुधावर आतापर्यंत शिवसेना निवडणुका जिंकत होती.पण त्यांना काही मराठी टक्का वाचवता आला नाही आपण कोणत्या आधारावर हे विधान केलेत पुरावा आहे का आपल्याकडे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Apr 2009 - 2:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इवध्म वैत वटल्म मला हे लेख वचुन कि मि लगेच जालिंदर बाबांची नव घेल्त अनि त्यन्ची अरति म्हत्लि. तेव्ह कुथे थोदं शान्त वतलं अनि मग मि जालिंदर बाबांचा अन्गरा खोलिभर उदव्ल तेव्हा समधन वत्ल्म.

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

निखिल देशपांडे's picture

28 Apr 2009 - 2:51 pm | निखिल देशपांडे

मल्पन वैत वत्ल, पन म्जा क्दे अन्गारा नहिअहे मे कय करु???
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

अविनाशकुलकर्णी's picture

28 Apr 2009 - 2:48 pm | अविनाशकुलकर्णी

मी कुठलेच विधान केले नाहि..राज चि भाषणात हा सारखा उल्लेख होता

रम्या's picture

28 Apr 2009 - 2:49 pm | रम्या

काय करणार?
जिथे महाराष्ट्रातील नेतेच मुग गिळून गप्प आहेत तिथे आपण सामान्य लोक काय करणार.
स्वाभिमान विकून चाटूगिरी करण्याला आजकाल मानवतावाद, सर्वसमावेशक धोरण अशी गोंडस नावे देऊन चाललेली भडवेगिरी करणारे नेते आपले.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तर जाहीर पणे लाचारी करतात. भाजपा नेते स्वतःच स्वतःला लोहपुरूष घेऊन आपलीच पाठ थोपटतात. म्हणे स्विस बँकेतले पैसे परत भारतात आणणार. काय भाजपाचा जावई स्विस बॅंकेत व्यवस्थापकिय संचालक हाय का? ढुंगणावर चटके देऊन हाकलवून लावतील स्वघोषीत लोहपुरूषाला!

शिवसेना अजून ८३ वर्षाच्या बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगते.
सगळ्याच पक्षांनी आपलं बस्तान चांगले बसवलेले. आता त्यांचे खायचे दिवस आहेत.

त्यापेक्षा मनसे कैक पटींनी चांगली. उदयोन्मुख पक्ष असल्याने लोकांच्या लक्षात राहण्यासारखी कामगिरी केल्याशिवाय त्याला पर्याय नाही. हाच एक आशावाद. गांडूगिरीच्या फाट्यावर मारून जहाल का होईना पण राज ठाकरे रोखठोक बोलतो तरी! बाकीच्यांचं काय?

आम्ही येथे पडीक असतो!

नितिन थत्ते's picture

28 Apr 2009 - 3:17 pm | नितिन थत्ते

मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे वगैरे जसे राजकारणी बोलत असतात तसेच मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आहे हे ही राजकारणीच बोलतात.
मूंबई केंद्रशासित होणार म्हणजे नक्की काय होणार. म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीपुरती मुंबई वेगळी होणार की ठाणे जिल्ह्याचा दक्षिण भाग आणि रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग यांच्या सह वेगळी होणार (नॅशनल कॅपिटल रीजन प्रमाणे).
पहिल्या केसमध्ये अशा वेगळ्या झालेल्या मुंबईचा गळा सहज आवळला जाईल कारण पाणी पुरवठा, वीजपुरवठा वगैरे सारे या दोन जिल्ह्यातून होत असते.
दुसर्‍या केसमध्ये अवघड आहे. त्यावेळी या दोन जिल्ह्यातील जनतेला काय हवे असेल हे सांगता येत नाही.

बाकी ४० वर्षे आपण काकांच्या रोखठोकपणाचे कौतुक ऐकले आता पुतण्याच्या रोखठोकपणाचे कौतुक ऐकू. आपले जे व्हायचे ते होईल.

खराटा
(रंग माझा वेगळा)

अविनाशकुलकर्णी's picture

28 Apr 2009 - 4:11 pm | अविनाशकुलकर्णी

आजच्या मटामध्ये एक बोलकी प्रतिक्रीया वाचली -

'मुंबईवर सर्वांची आहे असं पुन्हा पुन्हा ओरडून सांगता, मग एकदा तरी म्हणा ना, काश्मीरवरपण सर्व भारतीयांचा समान हक्क आहे. तिथे का शेपुट घालता.'

सुनील's picture

28 Apr 2009 - 4:29 pm | सुनील

गेल्या कित्येक वर्षांत कोणताही नवा प्रदेश हा केंद्रशासित झाल्याचे उदाहरण नाही. याउलट, केंद्रशासित प्रदेशच राज्यांमध्ये परिवर्तीत झाल्याची उदाहरणे आहेत (उदा. गोवा, दिल्ली). तेव्हा "केंद्रशासित मुंबई" हा पन्नास वर्षांपूर्वीचा शब्दप्रयोग आताही वापरण्यामागील हेतू समजत नाही.

एखादा प्रदेश केंद्रशासित असणे आणि त्याचे स्वतंत्र राज्य असणे ह्यात बराच फरक आहे. मुंबईचे स्वतंत्र राज्य करण्याचा घाट घातला जात आहे, असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

तसे असेल तर याचे उत्तर होय असेच आहे. परंतु, निव्वळ मुंबई शहराचे स्वतंत्र राज्य करणे ही सध्यातरी अशक्य कोटीतील घटना वाटत आहे. कोणत्याही पक्षाला ते करणे परवडणारे नाही. (शिवाय हे स्वप्न पाहणार्‍या काही महाभागांना संपूर्ण मुंबईचे राज्यदेखिल नको आहे, त्यांना केवळ दक्षिण मुंबईच हवी!).

असो.

मुंबईपासूनच्या अवघ्या ६० किमीच्या त्रिज्येत महाराष्ट्राची एक पंचमांश लोकसंख्या राहते, ह्या वास्तवाची जाणीव ठेवली तर, ह्या बृहन्मुंबई परिसराचे स्वतंत्र राज्य होणे ही घटना आज नाही तर उद्या होणारच आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मराठी_माणूस's picture

28 Apr 2009 - 4:37 pm | मराठी_माणूस

मुंबईपासूनच्या अवघ्या ६० किमीच्या त्रिज्येत महाराष्ट्राची एक पंचमांश लोकसंख्या राहते,
दुसर्‍या भागातील प्रगती रोखुन एकाच ठीकाणी लक्ष केंद्रीत केले तर हेच होणार.

अभिज्ञ's picture

28 Apr 2009 - 5:51 pm | अभिज्ञ

मुंबईचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर व्हावे ???
मला वाटते नुसते मुंबैच काय महाराष्ट्राचे हि सध्या तेच चालु आहे.
राज्यसरकार तर कुठलाच निर्णय स्वतःच्या हिमतीवर घेताना दिसत नाहि.
घेतलाच तर त्यालाहि त्यांना "दिल्ली"चे अप्रुव्हल लागते.
मग फरक तो काय पडणार?

अभिज्ञ.

अवांतरः मिपाचे शुध्दलेखनाचे नियम बरेचसे शिथिल आहेत तरिहि सर्वांनी शक्यतो नियमात
लेखन केलेले बरे.
तसेच किमान संपादकांनी तरी इथे लिहिणा-यांची टवाळी करु नये असे वाटते.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

अमोल केळकर's picture

28 Apr 2009 - 6:44 pm | अमोल केळकर

मुंबई फक्त महाराष्ट्राची !
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

पिवळा डांबिस's picture

28 Apr 2009 - 11:48 pm | पिवळा डांबिस

यात खुद्द मुंबईकरांना काय पाहिजे ते जाणून घेण्यास उत्सुक आहे...
म्हणजे त्यांना महाराष्ट्रात रहायचंय की वेगळा केंद्रशासित प्रदेश होणं पसंत आहे?
या वादात खुद्द मुंबईकरांच्या मताला काहीच का मूल्य नाही?
तर मुंबईकरांनो, तुमचे मत निर्भीडपणे लिहा...

समीरसूर's picture

29 Apr 2009 - 3:11 pm | समीरसूर

मुंबई सध्या रामभरोसे आहे. महाराष्ट्रातले यच्चयावत सगळे नेते बिनबुडाचे आणि कणाहीन आहेत. मुंबईचा फक्त सत्तेसाठी आणि मराठी लोकांच्या भावना भडकविण्यासाठी उपयोग करण्यात येत आहे. राज ठाकरे यांचे मुद्दे बिनतोड आहेत पण त्याच मुद्यांना धरून मराठी माणसाच्या भल्याचे आणि त्याउपर सर्व जनतेच्या भल्याचे (यात जनतेचे सगळेच प्रश्न आलेत; नुसते मराठी टक्का शाबूत ठेवणेच नाही तर इतर सगळे प्रश्न ज्यांची उत्तरे आणि उपाय जनता शोधत असते) निर्णय घेऊन सक्षमपणे स्वच्छ राजकारण करणे जर त्यांना जमले तरच त्यांना धडाडीचा आणि जनतेचा विचार करणारा नेता असे म्हणता येईल. बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप इत्यादी सगळ्या पक्षांचे सगळे नेते अगदी पुचाट, दिल्लीसमोर/सत्तेसमोर लोटांगण घालणारे आणि एकजात भ्याड आणि स्वार्थी आहेत. महाराष्ट्रातल्या तमाम शहरांची होणारी दुरवस्था, परप्रांतियांच्या आक्रमणामुळे वाढलेली गर्दी, असह्य वाहतूक, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, वाढत्या लोकसंख्येला अपुरी पडणारी वीज, बेफाट बांधकामामुळे असह्य झालेले तापमान, अत्यंत वाईट अवस्थेत असलेले रस्ते, गगनाला भिडणार्‍या घरांच्या किमती, अफाट वाढलेल्या झोपडपट्ट्या, शेतीचे आणि शेतकर्‍यांचे होणारे अतोनात हाल इत्यादी प्रश्नांवर महराष्ट्रातला कुठलाच नेता धडाडीने काम करतांना दिसत नाही. पुण्यासारख्या शहराची बेसुमार वाढ झालेली आहे. पायाभूत सुविधांचा कधीच बोजवारा उडाला आहे. रस्त्यांवरून जातांना जीव नकोसा होतो. असह्य उन्हात १५-२० वर्षांपूर्वीचे आल्हाददायक पुणे आठवून तळपायाची आग मस्तकाला जात आहे. ३०-३५ वर्षात एकही वीजकेंद्र न उघडता निर्लज्जपणे भारनियमन करतांना शासनकर्त्यांना शरम वाटत नाही. आज कुठल्याच पक्षाकडे असा नेता नाही ज्याला या सगळ्या समस्यांची जाण आहे. महाराष्ट्रातल्या नेत्यांचा उत्तरेतल्या नेत्यांपुढे आवाज फुटत नाही. ते सगळे मुंबईमध्ये येऊन डरकाळ्या फोडून जातात, इथे येऊन इथल्या राजकारणाच्या नाड्या आपल्या हातात घेतात तरीही आपले "कणखर देशातील आणि राकट देशातेल" भ्याड नेते तोंडातून चकार शब्द ही काढत नाहीत. किती हा भ्याडपणा!! एकजात सगळे सत्तेसाठी लाचार तर झालेलेच आहेत पण स्वतःची अस्मिता आणि कधीकाळी (शिवरायांच्या, पेशव्यांच्या, टिळकांच्या, राजगुरुंच्या काळात) असलेली मनगटातली रग हे नेते (आणि सगळे मराठी) हरवून बसले आहेत. काँग्रेस तर सगळ्यात पुचाट नेत्यांची फौज आहे. महाराष्ट्रातले काँग्रेसमधले नेते इतके चाटू आहेत की त्यांनी दिल्लीचे गुडघे चाटण्याचा 'चाटे' क्लास लावला आहे की काय अशी शंका येते. नारायण राणेंसारखा नेता ज्या पक्षात, राज्यात आहे तो पक्ष किंवा ते राज्य काय कप्पाळ प्रगती करणार आणि कप्पाळ अस्मिता तेवत ठेवणार? २४ तास स्वतःच्या फायद्याचा, स्वार्थाचा विचार करणे आणि ते पदरात नाही पडले तर आकांडतांडव करून ज्याने आपल्या समोर तुकडा फेकला आहे त्याला शिव्या घालणे याखेरीज नारायणरावांना काय येते? जोपर्यंत तुकडा मिळतोय चघळायला तोपर्यंत हे शांत राहतात, जेंव्हा तो हिरावला जातो तेव्हा यांना तुकडा देणारा किती भ्रष्ट आहे, त्याने किती वाईट राजकारण केले आहे इत्यादी सगळे आठवते हे संतापजनक आहे आणि असले बिनबुडाचे गुंडप्रवृत्तीचे लोटे खुशाल निवडून येतात आणि मूर्ख जनता त्यांना खुशाल निवडूनही देते!!! आनंद आहे...

--समीर

बाबा देशमुख's picture

29 Apr 2009 - 8:30 pm | बाबा देशमुख

मुबंई कुनाच्या बापाचा माल नाही,कोणी बाजारबुजगावणी उभी राहातील आणी मुबंई तोडायची टरवतील.मराट्।यांच्या धमन्यांमधुन अजुनही रक्तच वाहते, पाणी नाही.कुनीही जरी थोडा जरी चुकीचा प्रयत्न केला तर रक्ताचे पाट वाहतील, ही देशमुखाची आण हाय.