गाभा:
अक्षय तृतियेचा आणी आंबे खाणे याचा काय संबंध आहे.
आमच्या घरी अक्षय तृतिया नंतरच आंबे खाण्याची परवानगी आहे. व का खायचे हे विचारायची पण सोय नाही X( . एक दोनदा विचारले पण उत्तर मिळाले " आम्ही आमच्या तीर्थरुपांना असले प्रश्न नाही विचारले, विचारले असते तर तुम्हाल उत्तर दिले असते" :W :W
मला आंबे खुप आवडतात व मी चोरुन (घरच्यांपासून) ती खुप खातो. अगदी पहील्या दिवसापासुन ( जेव्हा प्रथम दिसतील) पाउस पडेपर्यंत जवळपास रोजच आंबा पोटात जातोच. :D :D :D
पण राजरोस घरी आणून खाण्यासाठी अक्षय तृतीयेची वाट पहावीच लागते. आणी तोपर्यंत रोज मनात भिती की, आंबे संपतील.
पण असे काय?
याला काय धार्मिक आधार आहे काय?
प्रतिक्रिया
27 Apr 2009 - 11:51 pm | एक
अक्षयतृतीयेला केलेली गोष्ट अक्षय रहाते. त्या दिवशी आंबे खाल्ले तर आंब्यांचा पुरवठा "अक्षय" राहिल हा विश्वास असावा.
हा अंधविश्वास-अंधश्रद्धा नाही. मी मे १९९९ ला अक्षयतृतीयेला आंबा खाऊ शकलो नाही. तेव्हा पासून १० वर्ष होत आली एकदाही सीझन मधला हापूस खाता आलेला नाही. :(
28 Apr 2009 - 1:09 pm | राजा
अहो आंबा नाहि खाल्ला मग माझा प्या
28 Apr 2009 - 2:20 pm | बाकरवडी
माझा आणा......
आं s s s ब्याची तहान भागवा.......
:B :B :B बाकरवडी :B :B :B
28 Apr 2009 - 3:04 pm | अनंता
पण अक्षय तृतीयेआधी माझा, मँगोला पिण्याबाबत धर्मशास्त्र काय सांगते?
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
28 Apr 2009 - 6:03 pm | बाकरवडी
पण अक्षय तृतीयेआधी माझा, मँगोला पिण्याबाबत धर्मशास्त्र काय सांगते?
मी माझा बद्दल बोललो, मँगोलाचे नाही. ते काय ते तुम्ही बघून घ्या.
अवांतर :-हा माणूस माझ्या प्रतिसादांच्या मागे लागलाय. माझ्या प्रत्येक प्रतिसादामागे ह्याचा प्रतिसाद असतो.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
30 Apr 2009 - 12:18 am | टारझन
मग तुम्ही पण लागा .. त्यांच्या प्रतिसादांच्या मागे हो ;)
=))
अन्यथा "बाकरवडा" असं नामकरन करा =))
28 Apr 2009 - 12:24 am | हर्षद बर्वे
अरेरे..दहा वर्षात आंबा खाल्ला नाहीत....म्हणजे ती दहा वर्षे न मोजण्याच्या रकान्यात लिहून टाका....
एच.बी.
28 Apr 2009 - 11:33 am | नितिन थत्ते
धार्मिक पेक्षा अनुभवसिद्ध ठोकताळे हे कारण असू शकेल.
अनुभवसिद्ध ठोकताळे हे स्थानिक अनुभवांवरून बांधलेले असतात.
कदाचित कोकणातील हवामानानुसार व ऋतुचक्रानुसार, तेथील स्थानिक आंबा खाण्यायोग्य होण्यास अक्षय्य तृतीया यावी लागत असेल. त्यापूर्वी आंबा कोवळा असल्याने चवीला चांगला लागत नसेल व असे आधी तोडलेले आंबे फुकट जात असतील. म्हणून हा नियम प्रचलित असेल.
हा नियम अर्थातच तत्कालीन तंत्रज्ञानानुसार असेल. आता खते घालून लवकर फळे आणण्याच्या तंत्रामुळे किंवा बाहेरून आलेल्या आंब्यांसाठी हा नियम व्हॅलिड असेलच असे नाही. (मी यातला ज्ञानी नाही. फक्त कन्सेप्ट सांगितली).
खराटा
(रंग माझा वेगळा)
28 Apr 2009 - 2:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अक्षय तृतियेचा आणि आंबे खाण्याचा काही संबंध नसावा, फुला-फळांचा हा बहरण्याचा काळ असल्यामुळे त्याचा आस्वाद घ्यावा. अक्षय तृतियेला शास्त्र अर्धा सण मानते, तेव्हा उत्सवाबरोबर मृत पितरांचे स्मरण करुन दान-धर्म केले पाहिजेत, हा अक्षय तृतीयेचा सोपा अर्थ असावा असे वाटते.
-दिलीप बिरुटे
28 Apr 2009 - 2:05 pm | अवलिया
अक्षयतृतीयेचा आणि आंबे खाण्याचा तोच संबंध आहे जो लग्नानंतर ऋतुशांती आणि सत्यनारायणाचा आहे.
असे रिवाज पाळणारे पाळत असतात, न पाळणारे .... हरी हरी !!
--अवलिया
28 Apr 2009 - 2:44 pm | नितिन थत्ते
तिकडे प्रतिसादातून संस्कृत श्लोक, इकडे रिवाज न पाळणार्यांच्या नावाने बोटे मोडणे.
नाना लवकरच भटजीगिरी सुरू करतायतसे दिसते. =))
खराटा
(रंग माझा वेगळा)
28 Apr 2009 - 2:59 pm | अवलिया
मंदी आली हो... साईड बिझनेसचा विचार नको का करायला ? ;)
--अवलिया
28 Apr 2009 - 3:31 pm | नितिन थत्ते
मंदीला ठेवून घ्यायची म्हणजे जास्त खर्च आलाच. मग बरोबर आहे.
अवांतरः मला वाटले 'कु. मंदी' हाच नानांचा साइड बिझिनेस आहे.
खराटा
(रंग माझा वेगळा)
28 Apr 2009 - 2:56 pm | सुनील
अक्षय तृतियेचा आणि आंबे खाण्याचा काही संबंध असतो हेच मला ठाऊक नव्हते! सुरुवातीला अव्वाच्या सव्वा असणारे आंब्याचे भाव जरा परवडणार्या पातळीवर आले की, मनसोक्त आंबे हादडायचे, हेच काय ते आम्ही करतो!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Apr 2009 - 3:03 pm | सँडी
अक्षय तृतियेचा आणि आंबे खाण्याचा काही संबंध नसावा, आंब्यांचा खप होण्यासाठी मला हा आंबेवाल्यांनी केलेला डाव वाटतो.;)
28 Apr 2009 - 3:28 pm | पर्नल नेने मराठे
आंब्यांचा खप होण्यासाठी मला हा आंबेवाल्यांनी केलेला डाव वाटतो
=))
चुचु
28 Apr 2009 - 6:42 pm | विनायक प्रभू
आंब्याच्या बाबतीत मिळाला तर मिळेल तेंव्हा 'चवलिया'
नाही मिळाला तर.....
28 Apr 2009 - 6:52 pm | अनंता
वरील प्रश्न बाकरवडीला उद्देशून नव्हे, तर इतर सन्माननीय मिपाकरांना आहे.
खुलासा संपला.
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
28 Apr 2009 - 10:21 pm | निशिगंध
मला काही उत्तर मिळालेच नाही.....
असो पण मी तरी असले काही मानत नाही व भरपूर आंबे खातोय..........
_______ निशिगंध_________
मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
28 Apr 2009 - 11:54 pm | भाग्यश्री
मी आई बाबा आधी पासूनच आंब्यांच्या पेट्या आणायचो.. (खायचोही) पण आज्जी कायम अक्षयतृतीयेसाठी थांबायची! आणि गम्मत म्हणजे नंतर डायबेटीस इत्यादी झाल्यावरही ती शास्त्र म्हणून अर्धा तुकडा का होईना अक्षयतृतीयेला खातेच.. कारण तिलाही माहीत नाही! नेहेमीचंच कारण सांगते ती, शास्त्र आहे.. पूर्वीपासून चालत आले आहे.. ते मी करते.. :)
www.bhagyashree.co.cc
29 Apr 2009 - 2:55 pm | निशिगंध
खुप लोक तसे करतात पण त्यांना कारण विचारले की, मग मात्र कुणालाच ते माहीत नसते.
______ निशिगंध_________
मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
29 Apr 2009 - 11:31 pm | दवबिन्दु
आबां केवापन खातात पन तो खोटा खोटा पिकवला नसला तरच. नायतर खायच टालतात.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?