भाविष्यकाळातील मिपाकर!

रम्या's picture
रम्या in काथ्याकूट
27 Apr 2009 - 1:08 pm
गाभा: 

माझ्या शेजार्‍याचा शाळकरी चिरंजीव भारीच हुशार, तल्लख बुद्धीमत्तेचा, उत्साही आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, चित्रकला, हस्तकला, वैज्ञानिक प्रयोग यावरील नाना प्रश्न विचारून मला हैराण करतो नुसता. विमान कसं काय हवेत उडतं? या प्रश्नाचं उत्तर देताना त्याला राईट बंधूंची कथा सांगितली तर पठ्ठ्या भारावला. आपण सुद्धा विमान बनवू म्हणून मागे लागला. चर्चा रिमोट कंट्रोल्ड विमाना पर्यंत चालत आली. रिमोट कंट्रोल्ड विमानाचं फक्त इंजिन कसं बनवायचं सांगा बाकीचं विमान मी स्वतः बनवतो म्हणून माझं डोकं खाऊ लागला. कुठून दुर्बुद्धी झाली आणि राईट बंधुंची कथा त्याला सांगितली असं होऊन गेलं. त्याची समजूत काढता काढता नाकीनऊ आले.

नुकताच टि. व्ही. वरच्या कुठल्यातरी कार्यक्रमात कालयंत्रचा उल्लेख ऐकून आला.
मग कालयंत्राद्वारे आपण भविष्यात जाऊ शकतो, भविष्यातून परत वर्तमान काळात येऊ शकतो किंवा भूतकाळात जाऊ शकतो. अजूनपर्यंत ते वास्तवात कोणी बनवू शकलेलं नाही पण भविष्यात कदाचित तंत्रज्ञानात प्रगती झाल्यावर मानव बनवू शकेल, असं विज्ञानकथांमधलं वर्णन त्याला सांगितलं.
तरीही ते कसं बनवायचं? बनवायला स्पेअरपार्टस् बाजारात कुठे मिळतील, किती खर्च येईल असे प्रश्नांचा भडिमार सुरू झाला.
शेवटी मला माहीत नाही तुझ्या बापाला विचार म्हणून त्याला घालवून दिलं. बेट्याने यावर बराच विचार केला आणि एके दिवशी मला विचारलं
"कालयंत्र आपण आता बनवू शकत नाही पण कदाचित भविष्यात बनवू शकतो आणि भुतकाळात येऊ शकतो, मग कशावरून आपल्या भविष्यकाळातील माणंस कालयंत्रातून येऊन आपल्या सोबत वावरत नसतील?" ~X(
मी सर्दच झालो, आता काय उत्तर देऊ? मला वेळ नाही असं म्हणून त्याला हाकलवून दिलं.

मी आता विचार करतोय मिपावर असतील का काही भविष्यकाळातील लोक?
भविष्यकाळातील लोकांनी कॄपया आपली ओळख इथे करून द्यावी. भविष्यकाळात ते काय करतात तेही इथे सांगावं? भविष्यकाळात ते काय करतात काय खातात ते सांगावं.
उत्तरांची आतूरतेने वाट पाहत आहे!

रम्या वर्तमानकाळी

प्रतिक्रिया

अवलिया's picture

27 Apr 2009 - 1:13 pm | अवलिया

बाकीच्यांचे माहित नाही, पण आर्थिक मंदीने भयानक स्वरुप धारण केले असल्याने उपजिविकेसाठी मी तरी रामायण - महाभारतावर कथा किर्तने करत असेल हे नक्की !
आणि तेजीमधे बहरात आलेला शेअर्सचा धंदा मंदीमुळे सोडुन राजे पेटीवर साथ देत असेल
मारुती भक्त मास्तर समुपदेशनाचा धंदा सोडुन अडकलेली बोटे मोकळी करायला तबला बडवत मदतीला असावेत अशी अपेक्षा.

--अवलिया

रम्या's picture

27 Apr 2009 - 1:26 pm | रम्या

श्रोत्यांमध्ये कोण कोण होते?
आम्ही येथे पडीक असतो!

विनायक प्रभू's picture

27 Apr 2009 - 1:58 pm | विनायक प्रभू

तिच्या.
आता बोटे काढली की? आता इथे तीथे परत नाही घालायची ठरले ना?
तबला?
नको. बासरी चालेल.
चांगली वाजवता येते.

दशानन's picture

27 Apr 2009 - 3:19 pm | दशानन

=))

बरोबर पिपानी पण आहे !

थोडेसं नवीन !