धोंडोपंताना जाहिर आवाहन

कौटील्य's picture
कौटील्य in काथ्याकूट
5 Feb 2008 - 2:46 pm
गाभा: 

राम राम धोंडोपंत

२१-१२-२०१२ व माया संस्क्रुती या विषयी आपण मराठीत माहिती द्यावी

मला माहित असलेली लिंक

http://www.greatdreams.com/2012.htm
http://www.13moon.com/prophecy%20page.htm
http://www.knowledge.co.uk/xxx/cat/mayan/
http://www.crystalinks.com/mayancalendar.html

ग्रह तारे संबंध आलयामुळे तुम्हाला त्रास दिलआ

धन्यवाद

प्रतिक्रिया

ज्योतिषातल मला काही कळत नाही, पन अझटेक लोकांचा इतिहास वाचला.
त्यांच्या व आपल्यात काही साम्य जाणवलं. आपण तीन युग मानतो, ते पाच युग मानतात......आणि हे शेवटचे युग आहे.
आपल्याकडे चंद्र कालगणना आहे, त्यांच्याकडे बुध कालगणना आहे. बुध २२४.७ दिवसात सुर्य प्रदक्षिणा पु‍र्ण करतो.

सर्व पुरातन संस्क्रती (अरधी वाटी कशी लिहायचि..?) मधे ग्रहगोलांचा आभ्यास दांडगा होता. तसेच जीवनमुल्ये आणि श्रधा-अंधश्रधा यामधे बरेच साम्य आहे. वैदीक, इजिपशियन आणि ग्रीक संस्क्रती अनेकइश्वर, पुनर्जन्म मानणारी आहे.

अवांतर: परसंस्क्रतीचा ह्रास करून विवीधतेतील सुंदरता संपवतात, हे फारच वाइट आहे.
इतिहास जाणणे, जमल्यास आभ्यास करणे हा माझा छंद आहे......म्हणुन लिहले.

सागर's picture

6 Feb 2008 - 1:31 pm | सागर

बुध २२४.७ दिवसात सुर्य प्रदक्षिणा पु‍र्ण करतो.

बुध ८८ दिवसात सूर्याभोवती आणि ५९ दिवसांत स्वत:भोवती प्रदक्षिणा करतो.
स्त्रोत : http://www.avakashvedh.com/suryamala/budh.htm

(अरधी वाटी कशी लिहायचि..?)

सोपे आहे
संस्कृती

स्कृ कसे लिहावे हाच प्रश्न आहे ना? ही बटने वापरा
skRu
नुसते कृ लिहायचे असेल तर
kRu
याची नक्की मदत होईल तुम्हाला...

(खगोलप्रेमी )सागर

बुधाऐवजी मंगळ असे वाचावे.............दुरूस्ती सुचवल्याबद्दल (खगोलप्रेमी) सागर धन्यवाद.

संस्कृती
शिकलो बरकां अरधी वाटी लिहायला.

सुधीर कांदळकर's picture

10 Feb 2008 - 8:42 pm | सुधीर कांदळकर

मंगळ सुर्यापासून पृथ्वीपेक्षा जास्त अंतरावर आहे. साहाजिकच तो पृथ्वीपेक्षा जास्त दिवस घेतो. पण माझ्या माहितीप्रमाणे शुक्राचे वर्ष २२७ दिवसांचे आहे. प्रा. मोहन आपटे यांचे या विषयावरील पुस्तक वाचावे. ते विश्वसनीय आहे.

समर तुमचे टंकलेखन पाहून आनंद झाला...
आता प्रतिक्षा पंतांकडून .... पंत लिहिता का जरा माया संस्कृतीवर ? ... आनंद वाटेल तुमच्यासारख्या विद्वानाने अशा विषयावर लिहिले तर. नक्कीच वाचनीय आणि ज्ञानात भर टाकणारा लेख असेन तुमचा...

तसे मी मायसिनिअन आणि मिनोअन संस्कृतीवर थोडेसे लेखन केले आहे.
पण तूर्तास व्यस्ततेमुळे येथे देता येत नाहिये....
पण लवकरच देईन...
(प्राचीन संस्कृतीप्रेमी)सागर

अवलिया's picture

9 Feb 2008 - 11:19 am | अवलिया

२१-१२-२०१२

माया संस्कृतीनुसार एक महत्वाचा कालखंड समाप्त होवुन नवीन कालखंड चालु होणार
जसे महाभारत युद्धानंतर आपले द्वापार युग संपुन कलीयुग चालु झाले तसेच
यादिवशी असलेली ग्रहता-यांची स्थिती अतिशय वाइट गोष्टिंची सुचक असुन भयाणक रोगराइ, व्यसनाधीनता, युद्ध व अंतर्गत यादवी याची द्योतक असुन पृथ्वीवरील वातावरण बिघडण्ञाचे संकेत आहेत.

माया भाविष्यानुसार २०१२ च्या ४-५ वर्षे पुर्वी व नंतर हिमयुग वा कडाक्याची थंडी तसेच भयानक मोठे भुकंप होवु शकतात ज्यमुळे ७० ते ८० टक्के माणसे मृत्यमुखी पडतील

परमेश्वर सर्वांना सुबुद्धी देवो

नाना

लबाड मुलगा's picture

9 Feb 2008 - 12:00 pm | लबाड मुलगा

ओ नाना

उगा घाबरवु नगा
लगीन ठरलय अजुन हनुमान व्हयचाय
अन तुमी काय भय दावताय राव

पार कचकच झाली की वो

पक्या