फाशिचि शिक्षा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
22 Apr 2009 - 10:17 pm
गाभा: 

फाशिचि शिक्षा देण्याच्या निकाल पत्रावर सहि करण्या साठि निराळा पेन असतो.. निकाल पत्रावर वर सहि झाल्या नंतर न्यायाधिश साहेब त्याचे निब मोडतात. व तो पेन वापरातुन बाद करतात..हे ऎकलेले व काहि सिनेमात पाहिलेले खर आहे का? मि.पा कायदे तज्ञ सभासद यावर काहि सांगु शकतिल का?

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

23 Apr 2009 - 1:15 am | योगी९००

आजकाल अतीप्रगती देशात फाशीची शिक्षा दिली की ज्या लॅपटॉपवर ती तो शिक्षेचा मसुदा तयार केला जातो तो लॅपटॉपही फोडतात असे ऐकले आहे.

धर्मनिरपेक्ष देशात ज्या न्यायाधिशाने ही शिक्षा ठोठावली त्यालाही काहीतरी शिक्षा देण्यात यावी यासाठी परमपुज्य जालंदर महाराज लवकरच आंदोलन करणार आहेत. तसेच धर्मनिरपेक्ष देशात संसदेवर हल्ला करण्याला फाशीतून माफी देणार आहेत असेही ऐकले आहे.

खादाडमाऊ

सायली पानसे's picture

23 Apr 2009 - 7:50 am | सायली पानसे

असे ऐकले आहे कि ज्या पेनाने एकाला फाशी ची शि़क्षा दिली जाते ते पुन्हा वापरत नाहीत. काहिशी अन्धश्रध्दा म्हणा हवे तर... पण ते पेन पुन्हा वापरले जाउ नये कोणाला फाशी ची शिक्षा देण्यासाठी म्हणुन निब तोडतात असे मागे एका वकिल मैत्रिणी ने सांगितले होते.

शरदिनी's picture

23 Apr 2009 - 10:04 am | शरदिनी

पेन मोडणे वगैरे ही एक अन्धष्रद्धा आहे...
मी त्याचा निषेध करते.

वेताळ's picture

23 Apr 2009 - 10:12 am | वेताळ

एकदा पेन मोडल्यावर पुन्हा गुन्हेगार निर्माण होता कामा नयेत पण तसे होत नाही.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

सनविवि's picture

23 Apr 2009 - 11:28 am | सनविवि

आजकाल अतीप्रगती देशात फाशीची शिक्षा दिली की ज्या लॅपटॉपवर ती तो शिक्षेचा मसुदा तयार केला जातो तो लॅपटॉपही फोडतात असे ऐकले आहे.

=)) =))

चिरोटा's picture

23 Apr 2009 - 12:33 pm | चिरोटा

म्हणजे हे अतिप्रगतवाले पण अंधश्रद्धाळू आहेत तर.लॅपटॉप फोडताय कसला ,फॉरमॅट करून मला द्या पाहिजे तर.हल्ली शाईचे पेन इतिहास जमा झाले आहे.त्या ऊंटवाल्या कॅम्लीनच्या शाईचा खोका पण हल्ली दिसत नाही.न्यायाधिश बॉलपेन फेकुन देत असावेत काम झाल्यावर.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

अमोल खरे's picture

23 Apr 2009 - 2:57 pm | अमोल खरे

डेल चा लॅपटॉप असेल तर मलाही चालेल. फक्त तो पाण्याखाली धरुन स्वच्छ धुवुन घेतला कि झालं. =))

अमोल केळकर's picture

23 Apr 2009 - 1:23 pm | अमोल केळकर

निकाल पत्रावर वर सहि झाल्या नंतर न्यायाधिश साहेब त्याचे निब मोडतात. व तो पेन वापरातुन बाद करतात

याची शहनिशा करण्यासाठी येणार्‍या नवीन सरकारने ( मायावती सरकार?) अफझल आणि कसाबला ताबडतोब फाशी द्यावी अशी आम्ही मागणी करत आहोत.
-----------------------------------------------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

छोटा डॉन's picture

23 Apr 2009 - 3:03 pm | छोटा डॉन

याची शहनिशा करण्यासाठी येणार्‍या नवीन सरकारने ( मायावती सरकार?) अफझल आणि कसाबला ताबडतोब फाशी द्यावी अशी आम्ही मागणी करत आहोत.

=)) =)) =))
हे जरी हास्यास्पस्द नसले तरी आपले सेन्स ऑफ ह्युमर आणि परिस्थीची जाण आवडली ...
केळकरसाहेबांचा प्रतिसाद आवडला ...
------
(जज)छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Apr 2009 - 3:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

केळकरसाहेबांचा प्रतिसाद आवडला ...
मलाही.

इथे लोकं चर्चा करतात फाशीची शिक्षा हवी का नको आणि आपण जातोय पुन्हा अश्मयुगात, पेनाची नीब तोडतात का!! चालू द्या ...

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

शक्तिमान's picture

23 Apr 2009 - 2:38 pm | शक्तिमान

थोडेसे गूगलिंग केल्यावर ही बातमी मिळाली.
शेवटच्या परिच्छेदावरून असेच दिसते की प्रथा अजुनही चालू आहे..

सँडी's picture

23 Apr 2009 - 3:15 pm | सँडी

ज्या लॅपटॉपवर ती तो शिक्षेचा मसुदा तयार केला जातो तो लॅपटॉपही फोडतात असे ऐकले आहे.
=))

न्यायाधिश साहेब त्याचे निब मोडतात. व तो पेन वापरातुन बाद करतात.
पुन्हा फाशीची शिक्षा द्यायची वेळ येऊ नये म्हणुन तसे करतात, असे ऐकुन आहे.

-सँडी
काय'द्याच बोला?

अभिज्ञ's picture

23 Apr 2009 - 3:20 pm | अभिज्ञ

मी तर म्हणतो,
त्यापेक्षा त्या न्यायाधीशालाच "फाशी" देउन टाकावी, म्हणजे हा प्रॉब्लेमच राहणार नाहि.

;)

अभिज्ञ.

रम्या's picture

23 Apr 2009 - 3:26 pm | रम्या

बरोबर आहे त्यामुळे पेन आणि लॅपटॉप या दोन्ही गोष्टी वाचतील. शिवाय त्या न्यायाधिशावर पुन्हा फाशीची शिक्षा देण्याची वेळ येणार नाही :D
आम्ही येथे पडीक असतो!

भडकमकर मास्तर's picture

23 Apr 2009 - 3:47 pm | भडकमकर मास्तर

शिवाय त्या न्यायाधिशावर पुन्हा फाशीची शिक्षा देण्याची वेळ येणार नाही

अगायायाया... =)) =))
_____________________________
कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?

सँडी's picture

24 Apr 2009 - 7:44 am | सँडी

=)) =)) =))

-सँडी
काय'द्याच बोला?

परिकथेतील राजकुमार's picture

23 Apr 2009 - 4:07 pm | परिकथेतील राजकुमार

अरे रे ! येव्हडा त्रास आणी मालमत्तेचे नुकसान होत असेल तर न्यायालयेच बंद का करुन टाकत नाहीत ?
तसेही आजकाल न्यायालयाच्या निर्णयांना किंमत कोण देते ?

द्रष्टा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

क्रान्ति's picture

23 Apr 2009 - 11:26 pm | क्रान्ति

बरेचदा जो मिळतो तो निकाल असतो, न्याय असेलच याची शाश्वती कुठे आहे?
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

अविनाशकुलकर्णी's picture

24 Apr 2009 - 7:06 am | अविनाशकुलकर्णी

कोर्टात न्याय मिळत नाहि..कोर्टात जो मिळतो त्याला न्याय म्हणतात

सँडी's picture

24 Apr 2009 - 7:54 am | सँडी

हे जबरीच! सह्ही!

-सँडी
काय'द्याच बोला?