मतदान करायचे तरी कोणाला?

वेताळ's picture
वेताळ in काथ्याकूट
22 Apr 2009 - 3:18 pm
गाभा: 

मैत्र ह्याचा लोकसभेला मतदान करताना ते फक्त राष्ट्रीयपक्षाना करावे हा लेख वाचला. त्यावर आलेल्या आतापर्यतच्या सर्व प्रतिक्रिया देखिल वाचल्या.मतदान करताना फक्त राष्ट्रीय पक्षाना करायचे ठरवले तर एक प्रश्न पडतो आजपर्यत त्याना मतदान केले त्यातुन काय निष्पन्न झाले. तर काहीच नाही. त्यामुळे लोक आता मतदान करताना त्याची प्रांतिय अस्मिता जपणार्‍या पक्षानाच मतदान करताना दिसत आहेत.राज ठाकरे व त्याचा पक्ष ह्याना नावे ठेवणारे द्रमुक व समाजवादी पक्षाच्या देशद्रोही वृतीला सोयिस्कर विसरतात.द्रमुक प्रांतिय अस्मिता जपताना लिट्टे सारख्या दहशतवादी संघटनेची पाठराखण करत आहेत व ते आज केंद्रात सत्तेत देखिल आहेत.तसे तर राज ठाकरे करत नाहीत.त्यापेक्षा मोठा असा कोणता गुन्हा राज ठाकरेनी केला आहे? ज्यात्या प्रदेशात राहणार्‍या लोकांचा त्या त्या प्रदेशातील साधनसंपतीवर प्रथम अधिकार आहे असे सांगणार्या पंतप्रधानाना राज ठाकरे का दोषी वाटतात? राज ठाकरे त्यापेक्षा काय वेगळे बोलत आहेत? घटनेने जसा भारतात कुठेही राहण्याचा हक्क दिला आहे तसा प्रत्येकाला स्वःताची भाषा जपण्याचा हक्क जपण्याचा अधिकार पण दिला आहे. राजठाकरे ह्याचे विचार नीट समजुन घेण्याचा प्रयत्न करा. नंतर त्याच्यावर टिका करा.सगळ्या राष्ट्रीय पक्षाना कडे एक नजर टाकुया.
सर्वात मोठा व जुना राजकिय पक्ष राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष हा आहे.त्याची स्थापना देशातील गोरगरीब जनतेला न्याय मिळावा ह्या उदांत हेतुने दीड शतकापुर्वी झाली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळ जवळ ४५ वर्षे हा पक्ष सत्तेत आहे. प्रथम सत्ता मिळवताना ह्या पक्षाने गरिबी हटाव हा एकच मुद्दा उचलला आहे तो आजतागायत सोडला नाही.कारण गेली ६० वर्ष देशातील गरीबी हटलेली नाही. म्हणुन आज ह्याचा हात परत एकदा गरिबी हटाव ह्या साठी सरसावला आहे.ह्या पक्षाचे नेते म्हणजे नेहरु कुटुंबिय व गांधी कुटूंबिय,सतत गरीबी हटाव हा नारा जोर जोरात देत असतात.प्रथम पंप्र नेहरु,त्यानंतर त्याची मुलगी इंदिरा गांधी. त्यानंतर संजय गांधी व राजीव गांधी. आता त्याच्या पश्चात सुन सोनिया गांधी व त्याची मुले राहुल व प्रियंका हाच मुद्दा प्रत्येक सभेत मांडत आहेत,कितीमोठा विनोद आहे हा,अजुनही ४थ्या पिढीत सत्ता येऊन देशातील गरीबी दुर झाली नाही.आणखी ह्या पक्षाचे एकच म्हणणे आहे ते म्हणजे आमच्या नेत्यानी असे केले तसे केले,इतका त्याग केला,बलिदान केले म्हणुन आम्हाला निवडुन द्या.पण करत मात्र कोणीच काही नाही.
दुसरा राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजपा. ह्याना मंदिर बांधणे,मस्चिद पाडणे ह्याबर बोलण्यातच धन्यता वाटते व ह्या शिवाय दुसरे कोणते विधायक काम असावे हेच पटत नाही. एकदा मतदारानी सत्ता दिल्यावर हे आपले मंदिर बांधण्याचे कामच विसरुन गेले.आणि आता परत सत्ता गेल्यावर ह्याना मंदिर बांधण्याचे काम आठवले आहे.ह्याना देशात समान नागरीकायदा आणावयाचा आहे पण सता आल्यावर ह्याचे हात बांधले जातात.सगळीकडे फिरताना ह्याना बरोबर साधुसंताना घेऊन फिरण्याची खुप हौस आहे.ह्या पक्षाच्या नेत्याना एक खोड आहे ती म्हणजे स्वःताचे नाव एकाद्या ऍतेहासिक नेत्याशी जोडण्याचा...म्हणजे पोलादीपुरुष,हिंदुह्रदयसम्राट वगैरे,
तिसरा राष्ट्रीय पक्ष म्हणजे बसपा. ह्याच्या सर्वेसर्वा म्हणजे बहन मायावती.पक्षाची स्थापना स्व.काशीराम ह्यानी केली होती.गोरगरीब,दलित व अल्पसंख्याक समाजाला प्रतिष्ठा मिळवुन देणे,त्यानास्वःताच्या पायावर उभे करणे. हा हेतुने ह्या पक्षाची स्थापना झाली. परंतु आताच्या नेत्याना देशाचे पंतप्रधान पद मिळवण्याची घाई झाली असल्या मुळे त्यानी सामजिक अभिसरण नावाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ह्यात फक्त दलित व गोरगरीब लोकाच्या मतावर सत्ता येत नसलेमुळे उच्च्वर्णियाना सत्तेत सामिल करुन घेवुन सता येनकेन प्रकारे मिळवणे हाच एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याना ह्या प्रयोगात उत्तरप्रदेश मध्ये सत्ता संपादित करता आली आहे. आता त्याची नजर दिल्लीवर आहे. ह्या पक्षाने सामाजिक अभिसरण व जंगी वाढदिवस साजरा करणे ह्या दोन देणग्या समाजाला दिल्या आहेत.
चौथा राष्ट्रीय पक्ष म्हणजे सपा . याचेसर्वेसर्वा मुलायम यादव हे आहेत.भारतातील अल्पसंख्याक समाज केवळ ह्याच्या कृपेमुळे भारतात सुरक्षित राहिला आहे हा ह्याचा गोड गैरसमज आहे.एकादा चोर किंवा दहशतवादी जरी अल्पसंख्याक असला तरी त्याला माफ केले पाहिजे हे त्याचे मत आहे.पाकिस्तान ह्या शेजार्‍यावर भारताने अन्याय केला असुन त्याला परत एकदा ५० कि ५००० कोटी नुकसान भरपाई भारताने द्यावेत ही त्याची न्याय मागणी आहे.भले त्यासाठी भारतातील जनता उपाशी राहिली तर चालेल. भारतातील सर्वात मोठे दलाल ह्याचा पक्ष संभाळण्याचे काम करतात.
आता राहिले ते शेवटचे दोन राष्ट्रीय पक्ष म्हणजे डावे पक्ष. ह्यात माकप व भाकप असे दोन पक्ष आहेत. जगातुन कम्युनिझम संपत चालला असुन देखिल ह्याना भारतात सर्वत्र लालबावटा फडकेल अशी दाट शक्यता वाटते. आमच्या शिवाय कोणीच एक पाऊल पुढे टाकणार नाही अशी ह्याची खात्री आहे .याचे आताचे तरुणतुर्क नेते तर सतत विमानातच असतात. ह्याचे सरकार पाड त्याचे पाय ओढ ह्यात याची सगळी हयात गेली. दोन राज्यात आता ह्याची सत्ता आहे पण ती कशाच्या जीवावर आहे हे सगळे जग जाणते.भांडवलशाही विरुध्द ह्याना प्रचंड तिरस्कार आहे, परंतु आपल्या राज्यात ते भांडवलदाराचे स्वागत लाल पायघड्या घालुन करतात. धर्मनिरपे़क्षता ह्या ह्याचा आवडता शब्द.परंतु जनतेला आजकाल ह्या शब्दाचा खरा अर्थच ठाऊक नाही.
आता इतके सगळे राजकिय पक्ष अशुन १०४ प्रादेशिक पक्ष देखिल कार्यरत आहेत. त्याना तरी कसे डावलणार?मग मत द्यायचे तर कोणाला? माझ्या मताप्रमाणे जिथे पक्ष नालायक ठरतो तिथे व्यक्तीकडे बघुन मतदान केले पाहिजे. निदान आपल्या एका मताने एक तरी चांगला माणुस लोकसभेत जाऊ शकेल.तो तरी आपली बाजु तिथे नेटाने मांडु शकेल.जगातील चांगुलपणा अजुनतरी संपला नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रात निदान चांगली माणसे लोकसभेत निवडुन जातील ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे.

प्रतिक्रिया

रम्या's picture

22 Apr 2009 - 3:24 pm | रम्या
कराडकर's picture

22 Apr 2009 - 3:29 pm | कराडकर

अगदी बरोबर..!
सध्या सगळेच पक्ष ना-लायक वाटतात,
आणि कांही मतदार संघातील सर्व उमेदवार सुध्दा तसेच आहेत..

महेश हतोळकर's picture

22 Apr 2009 - 3:37 pm | महेश हतोळकर

आत्ताच एक माहिती मिळाली आहे. बघा काही उपयोग होतो का?

बाकरवडी's picture

22 Apr 2009 - 6:17 pm | बाकरवडी

मी पाहीली.
अगदी चांगली वेबसाईट आहे.
मतदान कोणाला करावे याकरता योग्य दिशा मिळेल असे वाटते.

:B :B :B बाकरवडी :B :B :B

Suhas Narane's picture

22 Apr 2009 - 6:47 pm | Suhas Narane

याचे उत्तर देव त्री देउ सकेल का?

सूहास's picture

22 Apr 2009 - 8:07 pm | सूहास (not verified)

माझ्यासारख्या सामान्य माणसाचा अतिसामान्य प्रश्न ?/
हे प्रदेशीक राजकारण कुणी सुरु केले ??
काही जाणकारा॑नी प्रकाश टाकावा ???

सुहास
आज "मै॑ या तो वो"

हरकाम्या's picture

22 Apr 2009 - 9:48 pm | हरकाम्या

आपला लेख अतिशय उत्तम पण त्यातील माकप आणि भाकपवाले हे भांडवलदारांना पायघड्या घालतात हे पुर्ण चुकिचे आहे. कारण यामंडळींनी सोन्याच्या पावलांनी येणार्या " नॅनो " रूपी लक्ष्मीला बाहेर घालवले. देशाचे , टाटा सारख्या
सभ्य माणसाचे, आणि आपल्याच " बंगाली बाबूंचे "नुकसान केले.