मतदान करा आणि राष्ट्रीय पक्षालाच करा !

मैत्र's picture
मैत्र in काथ्याकूट
21 Apr 2009 - 7:24 am
गाभा: 

बहुतेक ठिकाणी २३ तारखेला मतदान आहे. इतरत्र ज्या तारखा जाहीर झाल्या असतील त्या तारखांप्रमाणे मतदान कराच.
अजूनही देशात ५० - ६० % वर मतदान होत नाही.
असंख्य वेळा चर्चा करून, वाचून, आवाहने करून सुद्धा सुशिक्षित विचारी मतदार मतदान करण्याचे कष्ट घेत नाही. सुटी म्हणजे निवांत पिक्चर बघणे, जवळपास पिकनिकला जाणे, मित्रांबरोबर पार्टी करणे असे बेत होतात. हेच लोक चर्चा करण्यात, नावे ठेवण्यात आणि ' काय अर्थ नाही हो राजकारणात, सगळे सारखेच!' हे म्हणण्यात आघाडीवर असतात.
म्हणून कळकळीची विनंती - मतदान करा!

दुसरा महत्त्वाचा मुद्दा. आपल्या मताप्रमाणे / इच्छेप्रमाणे काँग्रेस किंवा भाजपलाच मतदान करा!
आर्थिक परिस्थिती आणि सुरक्षितता याचा विचार करता आत्ता देशाला इतर कशाही पेक्षा स्थिर सरकारची गरज आहे!
स्थानिक प्रश्न हळूहळू सुटू शकतील. पण राष्ट्रीय पातळीवरचं अराजक अतिशय घातक ठरेल. सद्यस्थिती पाहता त्याची शक्यता जास्त आहे! ते टाळलेच पाहिजे यासाठी या दोन पैकी एका पक्षाला मतदान करा. जिथे यांचे परंपरागत साथीदार आहेत जसे शिवसेना / राष्ट्रवादी त्यांना मतदान करा. पण बसपा / सपा / प्रजाराज्यम / कम्युनिस्ट / अपक्ष अशा कुठल्याही पक्षाला नको.
जर तुमचं मत काँग्रेस किंवा भाजपला असेल पण तुमच्या मतदारसंघात असलेला त्यांचा उमेदवार तुम्हाला योग्य वाटत नसेल तरीही शक्यतोवर तिसर्‍या पक्षाला मत देऊ नका ही विनंती!
तुमचं मत बहुमोल आहे. त्याचा देशहितासाठी उपयोग करा!!

प्रतिक्रिया

दशानन's picture

21 Apr 2009 - 7:32 am | दशानन

अनुमोदन !

वर जे मैत्र ह्यांनी लिहले आहेत त्याला मी १००% सहमत आहे, राष्ट्रीय पक्षालाच मत द्या.

थोडेसं नवीन !

विनायक प्रभू's picture

21 Apr 2009 - 7:34 am | विनायक प्रभू

मोराला मतदान कसे करायचे?

दशानन's picture

21 Apr 2009 - 7:45 am | दशानन

=))

तो पक्षी आहे आम्ही पक्षाबद्दल बोलत आहोत ;)

थोडेसं नवीन !

मराठी_माणूस's picture

21 Apr 2009 - 7:46 am | मराठी_माणूस

अराजक टाळण्यासाठी ज्या पक्षाना तुम्ही मतदान करायला सांगता आहात , ही परिस्थीती उदभवण्या साठी त्यांचे उत्तरदायीत्व काहीच नाही का ? आपण काहीही विधायक काम केले नाही तरी काहीच फरक पडत नाही, सत्ता आपल्यालाच मिळते हा गैरसमज दुर व्हायला नको का ?

निखिल देशपांडे's picture

21 Apr 2009 - 7:59 am | निखिल देशपांडे

जर माझ्या इथुन लढणारे दोन्ही राष्ट्रिय पक्षाचे उमेदवार भ्रष्ट आहेत्....त्यांना मिळालेल्या संधीत त्यांनी काहिच केलेले नाही. आणी एक सामाजीक कार्याची चांगली जाण असलेला नेता अपक्ष म्हणुन उभा आहे. तेव्हा फक्त स्थिर सरकारा साठी राष्ट्रिय पक्षाला मतदान करणे अयोग्य वाटाते...

==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

मराठी_माणूस's picture

21 Apr 2009 - 9:46 am | मराठी_माणूस

तेव्हा फक्त स्थिर सरकारा साठी राष्ट्रिय पक्षाला मतदान करणे अयोग्य वाटाते...

हे नुसतेच अयोग्य नसुन स्वतःवर अन्याय करण्यासारखे आहे.

मला स्वतःला विचाराल तर मी पुण्यात अरूण भाटियांना मतदान करा सांगेन.
ते निवडून नाही आले तरी त्यांना मिळणारी काही हजार कदाचित एखाद लाख मते त्यांचे बळ वाढवतील. अचानकपणे कोणी अपक्ष खासदार होत नाही.
पण त्यातून साध्य काय होते - तात्विक समाधान? की मला कलमाडी किंवा शिरोळे नको आहेत मग मी एका स्वच्छ आणि चांगल्या माणसाला मत देईन...

देशातले स्थैर्य, चांगले केंद्र सरकार यापेक्षा तुमच्या घराजवळचे रस्ते / थोड्या किरकोळ सुधारणा आणि मी माझ्या मनाप्रमाणे केले असा भाबडा आनंद. त्यात गैर नाही. पण जरा लांबचा विचार केलात तर १९९५ पासून गेल्या सर्व निवडणूका आणि सरकारे यांची एकच मोठी डोके दुखी राहिली आहे - राज्य पातळीवरचे पक्ष आणि अपक्ष...
भारताची सुरक्षितता, आर्थिक सुधारणा, सध्याच्या मंदीतून स्थिरपणे बाहेर पडणे आणि विकास दर पूर्ववत करणे तुमच्या आमच्या समाधानापेक्षा / स्थानिक प्रश्नांपेक्षा खूप महत्त्वाचे आहे...

आणि त्यासाठी विधानसभा आहे ना! तुम्ही नगरसेवक चांगला निवडून आणा. तुमच्या गल्लीतले डांबरीकरण, कचरा, शहर वाहतूक, शहर सुधारणा आणि रचना, पाणी, वीज या अनेक गोष्टी ज्या जिव्हाळ्याच्या आहेत त्या बहुतेक नगरसेवक आणि आमदार या स्तरावर होतात. तिथे चांगला उमेदवार आणा. पण केंद्रात पक्षाला मतदान करा.

हे नुसतेच अयोग्य नसुन स्वतःवर अन्याय करण्यासारखे आहे.
हे कसे? कसला अन्याय होतो आहे?

कपिल काळे's picture

21 Apr 2009 - 6:02 pm | कपिल काळे

तुमच्या लाड्क्या अरुण भाटियांकडे २२ कोटीची मालमत्त्ता कशी आली. साधी आय पीएस अधिकारी होते ते. नोकरी सुद्धा मध्येच सोडली.
२२ कोटीची मालमत्ता ही त्यांनी जाहिर केलेली आहे. भाटियांचा पगार ५०,००० रु महिना होता असे मानले तर त्यांनी २५ वर्षे नोकरी करुन किती पैसे कमावले असतील??

मी म्हणतो राजकारण्यांकडे ह्यापेक्षा जास्त असेल/ असते. पण ते भ्रष्ट असतात हे तुम्हीच म्हणताय.

मग तुमच्याच भाषेत सांगाय्चे तर "एका स्वच्छ आणि चांगल्या माणसा कडे" इतकी माया कशी आली?

सब्बब: भाटिया काय किंवा कलमाडी
सगळे चढती एकच माडी
त्यांची आणि आपली
कशी जमावी जोडी?

मी पुण्यात राहतो तरी माझा राहता भाग जोडला गेला बारामती. मतदार संघात.. मी मत देउन , काय फरक पडणार? तरी मी माझा हक्क बजावणारच !

हा मालमत्ता दडवून ठेवणे आणि स्वतःची वडिलोपार्जित इस्टेटसुद्धा जाहीर करणे यातला फरक आहे. जर तुम्हाला २२ कोटीची मालमत्ता माहीत आहे तर ती कुठे कुठे आहे हे पण माहीत असायलाच हवे. त्यातली बरीचशी किंमत ही त्यांच्या सैन्यात असलेल्या वडिलांना मिळालेल्या जागांची किंवा तिथे बांधलेल्या घराची बाजारभावाप्रमाणे किंमत आहे. मालमत्ता ही स्वतःच्या बेसिक मधूनच मिळवायला हवी असे नाही ना? http://phorum.arunbhatiaelect.com/read.php?3,236,236
My father received a gallantry award in the Second World War. In those days such acts were honoured by the government. As a reward the government gave him land. Much later this land was sold and my father built a house in Delhi in Green Park. The house was built before I joined the IAS.
Another house in Diplomatic Enclave in Delhi was built by my grandfather and given to my mother before I joined the IAS.
The house in Diplomatic Enclave came to my share in the family partition after my mother died. This house has been valued at Rs. 20 crores.
I have no black money or benami property.

तुमचे लाडके अरूण भाटिया यातला खोचकपणा अनाठायी आहे.
२६ वेळा बदली झालेला, चीफ सेक्रेटरी वर सुद्धा भ्रष्टाचारासाठी खटला भरणारा, पुण्यातील नगरसेवकांची अतिक्रमणे काढल्यामुळे जनतेच्या विरोधात जाउन सभागृहाने ज्यांना जायला लावले, नंतर या निर्णयाविरोधात लोकांनी मुंबईत खटला भरला व जिंकला.
हे सर्व वृत्तपत्रात जगजाहीर असताना सरळ सरळ आपली पोळी भाजणारे नेते चांगले, का एक बुद्धिमान आणि आयुष्यभर भ्रष्टाचाराविरुद्ध लढलेला आय ए एस चांगला? स्पष्ट दिसणार्‍या गोष्टीला नजरेआड करून उगाच शरसंधान करण्यात काहीच हशील नाही..

कपिल काळे's picture

22 Apr 2009 - 11:37 am | कपिल काळे

भाटिया बोलले आणि तुम्ही विश्वास ठेवला.
वानवडी शिवाय दुसरी कोणतीही मते त्यांना मिळणार नाहीत.

राष्ट्रीय पक्षालाच मत द्या असा तुमचाह विषय असताना, तुम्हीच भाटीयांना का मत देणार?

अवांतर : सामंत काकांचा "प्रत्येक प्रतिसादां देइन मी उप प्रतिसाद" हा वसा मैत्राने घेतलेला दिसतोय!!

मैत्र's picture

22 Apr 2009 - 11:48 am | मैत्र

तसं असेल तर कोणावरही आणि कसलाही विश्वास ठेवता येत नाही! असो तुम्हाला डिटेल माहिती असेल असे वाटते त्यांनी कसे गोळा केले २२ कोटी किंवा त्यांनी कसे खोटे लिहिले आहे. त्यामुळे ती शेअर केल्यास उत्तम..
आणि मी भाटियांना मत दिलेले नाही. आत्ताही देणार नाही याच मुद्द्यामुळे.

काल डेली मिरर मध्ये भाटियांनी कलमाडींवर आरोप केला एक जमीन व तिची किंमत जाहीर न केल्याबद्दल.
त्यावर उत्तर काय द्यावं -- भाटियांकडे पुराव्याचे पेपर्स नाहीत!!
दुसरं उत्तर - ती जमीन मीरा कलमाडी यांनी मुलगा व सुनेला भेट दिली आहे ! म्हणून ती जाहीर केलेली नाही!!

लोकांची मुक्ताफळे वाचून स्वस्थ बसवत नाही. उत्तर द्यावेच लागते. असो..

चिरोटा's picture

21 Apr 2009 - 10:14 am | चिरोटा

स्थैर्य महत्वाचे आहेच पण त्यापेक्षा स्वतःची तुंबडी न भरता चांगला कारभार करणार्‍या लोकांची देशाला गरज आहे.राष्ट्रीय पक्ष केवळ नावालाच राष्ट्रीय असतात.ह्या पक्षाच्या नेत्यांचे वागणे आणि ईतर पक्षाच्या नेत्यांचे वागणे ह्यात फार फरक नसतो.

स्थानिक प्रश्न हळूहळू सुटू शकतील

स्थानिक प्रश्न सुटतील तेव्हाच हळूहळू राष्ट्रीय प्रश्न सुटू लागतील.स्थानिक प्रश्न कमी महत्वाचे मानले म्हणून तर एवढे पक्ष तयार झाले.तेव्हा मत देताना उमेद्वाराची लायकी ,स्थानिक प्रश्न सोडवण्याची कुवत लक्षात घ्यावी.
शिवाय आर्थिक ,सुरक्षा वगैरे राश्ट्रीय प्रश्न केवळ राष्ट्रीय पक्षानाच कळू शकतात हा गैर्समज आहे.समजा तिसरी आघाडी सत्तेवर आली तरी पुढची निवडणूक पाचच वर्षानी यावी म्हणून पक्ष प्रयत्न करतीलच.शिवाय भा.ज्.पा. काय काँग्रेस काय ,त्याना ईतर पक्षांच्या कुबड्यांची गरज लागतेच.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

स्थानिक प्रश्न सुटतील तेव्हाच हळूहळू राष्ट्रीय प्रश्न सुटू लागतील.स्थानिक प्रश्न कमी महत्वाचे मानले म्हणून तर एवढे पक्ष तयार झाले.तेव्हा मत देताना उमेद्वाराची लायकी ,स्थानिक प्रश्न सोडवण्याची कुवत लक्षात घ्यावी.

तुमच्या शहरातील प्रश्न सुटल्याने भारतावर होणारा छुपा किंवा उघड हल्ला हा कसा परतवून लावता येईल? मतदारसंघातील दयनीय रस्ते गुळगुळीत झाल्याने आर्थिक सुधारणांना कसा वाव मिळेल?
दुसरे - कोण्या खासदाराने स्थानिक प्रश्न सुधारण्याकडे संपूर्ण लक्ष दिले आहे?

त्यापेक्षा स्वतःची तुंबडी न भरता चांगला कारभार करणार्‍या लोकांची देशाला गरज आहे.
हे तर आदर्श म्हणून खरं आहे पण २ % तरी उमेदवार हे स्वतःची तुंबडी न भरणारे आहेत काय? स्थानिक पक्ष तेवढे स्वच्छ चारित्र्याचे, गुणसंपन्न आहेत काय? आणि चांगला कारभार करायचा असेल तर फक्त स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून काहीच उपयोग नाही...

पुन्हा तेच सांगतो की स्थानिक पातळीवरील गोष्टींसाठी स्थानिक स्तरावर - नगरसेवक / आमदार इथे विचार करा...
खासदार संसदेत निर्णयात मतदान करणार, कायदे बनवणार, देशावरील संकटांमध्ये निर्णयात भाग घेणार...
तिथे सरकारची कोंडी करणारे लोक असून काय फायदा?
अस्थिर सरकारमुळे मध्यावधी निवडणूका झाल्यास किती प्रचंड आर्थिक नुकसान होईल याचाही विचार केला पाहिजे...

चिरोटा's picture

21 Apr 2009 - 11:05 am | चिरोटा

तुमच्या शहरातील प्रश्न सुटल्याने भारतावर होणारा छुपा किंवा उघड हल्ला हा कसा परतवून लावता येईल? मतदारसंघातील दयनीय रस्ते गुळगुळीत झाल्याने आर्थिक सुधारणांना कसा वाव मिळेल?

स्थानिक प्रश्न म्हणजे केवळ रस्ते,संडास नव्हे तर बेरोजगारी सोडवणे,नवे उद्द्योगधंदे आणणे,मतदार संघाचे योग्य प्रतिनिधित्व करणे हे पण .हे सगळे सोडवायचे तर स्थानीक जाण हवीच.(तसे बघितले तर स्थानिक आणि राश्ट्रिय असा फार फरक नसतोच).
भारतावर होणारे हल्ले हा राश्ट्रिय सुरक्षेचा विषय.फारच कमी खासदाराना त्यातले समजते.गेल्या पाच वर्षात स्थिर सरकारच होते.शिवराज पाटील हे 'खंबीर' ग्रुहमंत्री होते. काय झाले? त्या आधी खुद्द 'पोलादी पुरुष' अडवाणी ग्रुहमंत्री होते.तेव्हा सुरक्षेचा मुद्दा येतो तेव्हा पक्षापेक्षा सत्तेवर असणार्‍या माणसात धमक आहे की नाही हे महत्वाचे.

खासदार संसदेत निर्णयात मतदान करणार, कायदे बनवणार, देशावरील संकटांमध्ये निर्णयात भाग घेणार...
तिथे सरकारची कोंडी करणारे लोक असून काय फायदा?

बरेचसे खासदार संसदेत जावून केवळ खुर्च्या गरम करतात.सरकारला होणारा विरोध म्हणजे कोंडी नव्हे.
कुठल्याही पक्षाचा उमेद्वार असो, स्थानिक आणि राश्ट्रिय जाण पाहिजेच.जर एखादा खासदार एखाद्या विषयात प्रविण असेल- अर्थ्,संरक्षण तर गोष्ट वेगळी.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

मैत्र's picture

21 Apr 2009 - 11:29 am | मैत्र

बेरोजगारी सोडवणे,नवे उद्द्योगधंदे आणणे,मतदार संघाचे योग्य प्रतिनिधित्व करणे
यात तुमच्या खासदाराचा सहभाग किती असतो? बेरोजगारी कमी करण्यासाठी खासदार काय करू शकतो? नवीन उद्योग हे सहसा करसवलती, स्वस्त जमीन, वीज आणि पाण्याची उपलब्धता, इतर कच्चा माल आणि कामगार, आणि मालवाहतूकीच्या सोयी या आधारावर येतात. त्याचे बरेचसे निर्णय हे राज्य सरकारकडे असतात किंवा काही ठिकाणच्या नैसर्गिक गरजा किंवा आत्तापर्यंत झालेल्या औद्योगिक वाढीमुळे मिळणारा फायदा याने ठरतात. त्यात मुख्यमंत्री आणि कररचना नवीन उद्योग आणायला उपयोगी ठरु शकते.
यात खासदारांचा सहभाग किती असतो?
आणि योग्य प्रतिनिधित्व हा खूप संदिग्ध मुद्दा आहे.

बहुतेक खासदार हे फक्त खुर्च्या गरम करतात आणी भत्ते घेतात ही वस्तुस्थिती आहे. ते एकमेव कारण असू शकत नाही.
हा दबाव आणि विरोध तेव्हा चांगला जेव्हा काही एका मताचे स्थिर सरकार असते. अनेक असंबद्ध आणि असंलग्न पक्षांचे कडबोळे सरकार एकमतावर काम करु शकत नाही. आणि अडवाणींच्या काळातले हल्ले किंवा शिवराज पाटील यांच्या कारकीर्दीतही अनेक गोष्टी घडल्या.
सुरक्षा म्हणजे फक्त हे टाळणेच नाही तर अशा हल्ल्यांनंतर खंबीरपणे उभे राहणे.
कोणीही नेते, उद्योगपती, अभिनेते, खेळाडू यांना स्थानिक किंवा राष्ट्रीय प्रश्नांची जाण असते म्हणणे धाडसाचे ठरेल. जर सर्वत्र गोंधळच आहे तर किमान चांगले सरकार तरी बनावे. जरी इतर पक्षांची मदत घ्यावी लागली तर संख्याबळ चांगले असल्यास जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळता येइल.

मराठी_माणूस's picture

21 Apr 2009 - 10:11 am | मराठी_माणूस

१९९५ च्या आधि काय परिस्थीति होती, तेंव्हा काय केले ह्यानी?

मैत्र's picture

21 Apr 2009 - 10:20 am | मैत्र

अशा सरकारांनी तरी काय केले? १९९५ च्या आधी व्ही पी सिंग आणि चंद्रशेखर यांची अल्पायुषी सरकारे वगळता काँग्रेसनेच चाळीस वर्षे राज्य केले. पण कडबोळे सरकार आल्यापासून राजकीय अस्थिरता आलेली आहे त्याचे काय?
कोणी काहीच केले नाही असे असते तर आजही आपण आपल्या आजोबांच्या काळातल्या परिस्थितीत असतो... तसे तर नक्कीच नाही...

या मताचे कारण या वेळी अतिशय त्रिशंकू परिस्थिती येण्याची शक्यता आहे. ती टाळली पाहिजे...

मराठी_माणूस's picture

21 Apr 2009 - 11:11 am | मराठी_माणूस

कोणी काहीच केले नाही असे असते तर आजही आपण आपल्या आजोबांच्या काळातल्या परिस्थितीत असतो

जे काही केले त्यात सिंव्हाचा वाटा सामान्य लोकांचा जास्त आहे, राजकरण्याचा नव्हे.

जे काही केले त्यात सिंव्हाचा वाटा सामान्य लोकांचा जास्त आहे, राजकरण्याचा नव्हे.

या विधानाचा अर्थ कळाला नाही...
सर्व औद्योगिक, आर्थिक, आणि सामाजिक सुधारणा सामान्य लोकांनी केल्या असे म्हणायचे आहे का?

मराठी_माणूस's picture

21 Apr 2009 - 11:20 am | मराठी_माणूस

सरकार न चालवणारे

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Apr 2009 - 10:37 am | llपुण्याचे पेशवेll

आपले मत मात्र मनसे ला. कमीतकमी, तरुण उमेदवार देण्याचे धाडस तरी त्यांनी दाखवले आहे. आणि मनसेचे नेते तरी नक्कीच सोनिया मॅडमनी पंतप्रधान व्हावे म्हणून त्यांची विनवणी करणार नाहीत.......
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

मैत्र's picture

21 Apr 2009 - 10:42 am | मैत्र

हे मान्य की त्यांचे उमेदवार तरूण आहेत.. पण त्याचा लोकसभेत आत्ता काय उपयोग आहे?
त्यांचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले तरी त्याचा काय फायदा होणार आहे?
काँग्रेस - सोनिया -- राष्ट्रवादी - पवार, शिवसेना - भाजप -- सगळ्यांच्याच विरोधात असलेल्या पक्षाचा लोकसभेत काय उपयोग?

काँग्रेस किंवा भाजप हे काही खूप उत्तम किंवा स्वच्छ आहेत असे नाही पण एका पक्षाचे बळ हे जास्त असलेच पाहिजे.
आपले स्थानिक हित महत्त्वाचे ( आणि तेही घडेल याची काहीही शाश्वती नाही) का देशाचे?

पुढच्या पाच वर्षात तालिबान आणि पाकिस्तानचे असंख्य छूपे आणि कदाचित उघड हल्ले होतील ... त्याला तोंड द्यायला समर्थ सरकार हवे.
अस्थिर लोकसभेमुळे मध्यावधी निवडणूका झाल्या तर तोपर्यंत मजबूत झालेले तालिबान नक्कीच संधीचा फायदा घेईल...

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Apr 2009 - 10:59 am | llपुण्याचे पेशवेll

>>हे मान्य की त्यांचे उमेदवार तरूण आहेत.. पण त्याचा लोकसभेत आत्ता काय उपयोग आहे?
का उपयोग का नाही. राजच्या आंदोलनाच्या समस्त भैय्ये पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्राच्या नावाने बोंब मारत होते तेव्हा ४८ खासजदारांपैकी कोणाचेही थोबाड उचकटले का तिथे? नंतर शिवसेनेने थोडे उचकटले होते. पण भाजप अगदीच होपलेस. अशात राष्ट्रीय पक्ष असले आणि नसले सारखेच, आपले विचार राष्ट्रीय पातळीवर तिथे संसदेत व्यक्त करण्यासाठी कोणतरी पाहीजे म्हणून मनसे.

>>पुढच्या पाच वर्षात तालिबान आणि पाकिस्तानचे असंख्य छूपे आणि कदाचित उघड हल्ले होतील ... त्याला तोंड द्यायला समर्थ सरकार >>हवे. अस्थिर लोकसभेमुळे मध्यावधी निवडणूका झाल्या तर तोपर्यंत मजबूत झालेले तालिबान नक्कीच संधीचा फायदा घेईल...

ते कदाचित कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाचे असले तरी ते बळकट असेल याची खात्री काय?

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

घाशीराम कोतवाल १.२'s picture

21 Apr 2009 - 11:45 am | घाशीराम कोतवाल १.२

राजच्या आंदोलनाच्या समस्त भैय्ये पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्राच्या नावाने बोंब मारत होते तेव्हा ४८ खासजदारांपैकी कोणाचेही थोबाड उचकटले का तिथे?
एक हि माईचा लाल काहिहि बोलला नाहि मैत्र तुमच्या माहिती करता सांगतो
एकनाथ गायकवाड सारखा माणूस पाच वर्षात संसदेत फक्त २ वेळा बोलला
गोविंदा एकदाही नाही बोलला
आमच्या ईकडचे मोहन रावले ५ वेळा खासदार झाले अजुन म्हणतात गिरणी कामगारांच भल करायचय
अहो आता काय हे भल करणार त्यांचे साला गिरणी कामगार तर कधीच देशोधडीला लागला.
परप्रांतियासाठी छातीचा कोट करु सांगणारे तेल लावलेले बारामती कर पैलवान आता फक्त मराठी पंतप्रधान म्हनुन बोंबलतात
तेव्हा ह्यात यांना प्रांतवाद दिसत नाहि का?

भाजप अगदीच होपलेस.

अहो ह्यांच्या बद्दल बोलुच नये कॉग्रेसने पन्नास वर्षात जेव्हडे देशाचे वाटोळे केले नसेल तेव्हडे ह्यांनी ६ वर्षात केले
जॉर्ज फर्णाडीस सारख्या संरक्षण मंत्र्याच्या काळात जवानांच्या टोपीपासुन तर पायातल्या बुटापर्यंत प्रत्येक सौद्यात भ्रष्टाचार
आणी भ्रष्टाचार केला गेला संसदेत प्रश्न विचारायला ह्यांचे खासदार पैसे मागतात तहलका मधे पैसे खातात
कबुतरबाजी मधे ह्यांचेच खासदार नं १ आहेत

राष्ट्रीय पक्ष असले आणि नसले सारखेच, आपले विचार राष्ट्रीय पातळीवर तिथे संसदेत व्यक्त करण्यासाठी कोणतरी पाहीजे म्हणून मनसे.

एकदा मत द्यायला काय हरकत आहे राजला तरुण आहे तडफदार आहे मुख्य म्हणजे जे बोलतोय तेच करतोय
अहो १५३ अ सारखे कलम ह्या देशात ३६ वेळा लावले जाणारा एकच राजकारणी ह्या देशात आहे तो म्हनजे राज ठाकरे
हा एक विक्रम आहे तो ह्या नालायक कॉग्रेस राष्ट्रवादी मुळे राज ठाकरेंच्या नावावर जमा झाला आहे

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

मैत्र's picture

21 Apr 2009 - 12:00 pm | मैत्र

भाजप / राष्ट्रवादी किंवा काँग्रेस हे मनसे किंवा इतर राज्याचे स्थानिक राजकारण करणार्‍यांपेक्षा चांगले असे काही माझे म्हणणे नाही..
लोकसभेच्या संस्थळावर प्रत्येक खासदार किती दिवस उपस्थित होता, किती प्रश्न विचारले, काय विचारले, महत्त्वाची भाषणे, सर्व माहिती उपलब्ध आहे आणि हे आकडे धक्कादायक आहेत.
पण मंत्रिमंडळ कोणाचे असावे आणि धोरणे काय असावीत हे जास्त महत्त्वाचे नाही का?
इतर सर्व पक्ष हे कोलांट्या उड्या मारण्यातच पटाईत आहेत आणि आजवर त्यांनी कधीही एक भूमिका घेतलेली नाही...
(अर्थात हा निकष लावला तर राष्ट्रवादी प्रथम क्रमांकावर येईल कोलांट्या उड्या मारण्यात)

भाजपाच्या काळात संरक्षण खात्यात भ्रष्टाचार झाला. पण तो बोफोर्स मध्येही झाला, जर्मन पाणबुड्यांमध्येही झाला, लालूच्या चारा घोटाळ्यातही झाला, आत्ता बिहार पूरमदतीमध्येही झाला, सुवर्ण चौकोन योजनेतही झाला... सर्वात मोठे प्रकरण - मुद्रांक घोटाळ्यातही झाला. उडदामाजी काळे गोरे ....
यात भाजप किंवा काँग्रेस इतरापेक्षा चांगले आहेत असा माझा मुद्दा अजिबात नाही... चांगले सरकार येण्यासाठी या १० - १५ ते ३०-४० जागा असणार्‍या संकुचित पक्षांची ताकद कमी व्हावी हा आहे... मनसे एकूण १२ जागा लढवत आहे. सगळ्या जरी जिंकल्या जादू होऊन तरी त्यांचा काय उपयोग आहे?
बसपा ने राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी कंबर कसून सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. पण मायावती पंतप्रधान होण्यापेक्षा काँग्रेस / भाजप नक्की परवडेल. म्हणून त्यांची धोरणे पाहता बसपा हा उप्र पुरता मर्यादित प्रादेशिक पक्षच गणला पाहिजे.

मनसेच्या जाहीर नाम्यात मराठी मुद्दा सोडता विकासाचे कोणतेही ठोस मुद्दे नाहीत. स्थानिकांना रोजगार मिळाला की सर्व प्रश्न सुटतील का? महाराष्ट्र मुंबई / कोकण इतकाच नाही... असो तो आत्ता मुद्दाच नाही.

मैत्र's picture

21 Apr 2009 - 12:07 pm | मैत्र

दोनदा आल्याने काढून टाकला आहे.

अडाणि's picture

22 Apr 2009 - 12:59 am | अडाणि

राज ठाकरे सारखा होपलस माणूस नाहीये असे माझे वैयक्तिक मत आहे. किणी हत्याकांड लोक फार लवकर विसरले आहेत असे वाटते. काही वैयक्तिक संपर्कातून असे समजले होते की दारू, छानछौकी हे सोडून काहीही न करणार्‍यापैकी एक म्हणजे राज ठाकरे....
मनसे आणि राज ह्यांचे उद्दीष्ट हेच मुळी चुकीचे आहे असे मला वाटते.. त्याच्या कार्यपद्धतीबद्दल तर बोलायलाच नको..मराठी माणसाचा एवढा कळवळा आला आहे तर सामाजीक कार्य करा ना !! बाबा आमटे, हजारे ह्यांच्या सारखे कार्य करा... राजकारणातच जायला पाहीजे असे काही नाही...
मनसे वैगेरे हे सर्व लोकांना मुर्ख बनवून स्वताची पोळी भाजून घेण्याचे प्रकार आहेत...

मैत्र यांचा विचार पटला.. स्थानीक प्रश्न नगरसेवक, आमदार ह्या वेळी बघावेत... लोकसभेच्या निवड्णूकीत नाही...

-
अफाट जगातील एक अडाणि.

मराठी_माणूस's picture

22 Apr 2009 - 6:49 am | मराठी_माणूस

बाबा आमटे, हजारे ह्यांच्या सारखे कार्य करा...

हे तर सर्वच नेत्याना लागु आहे , पण दुर्दैवाने असे कोणीच राष्ट्रिय पक्षात नाहीत.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Apr 2009 - 7:08 am | llपुण्याचे पेशवेll

>>काही वैयक्तिक संपर्कातून असे समजले होते की दारू, छानछौकी हे सोडून काहीही न करणार्‍यापैकी एक म्हणजे राज ठाकरे....
कदाचित म्हणूनच छानछौकी आणि दारूची आवड असलेले तरुण मनसेचे समर्थक असतील.

>>मनसे आणि राज ह्यांचे उद्दीष्ट हेच मुळी चुकीचे आहे असे मला वाटते..
असो ज्याचे त्याचे मत. शेवटी भाषेचा अभिमान वगैरे मनात असावा लागतो.

>> त्याच्या कार्यपद्धतीबद्दल तर बोलायलाच नको
हो बरोबर आहे. एकतर काँग्रेससारखी घोंगडे भिजत घालायची कार्यपद्धती त्याने स्वीकारली पाहीजे, किंवा सरळ सरळ बंदूकधारी टोळ्या ठेवण्याचा मुलायममार्ग स्वीकारला पाहीजे ना, किंवा भाजप सारखा कावेबाजपणा शिकला पाहीजे!

>>मराठी माणसाचा एवढा कळवळा आला आहे तर सामाजीक कार्य करा ना !! बाबा आमटे, हजारे ह्यांच्या सारखे कार्य करा...
हो का बरं बरं...

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

घाशीराम कोतवाल १.२'s picture

22 Apr 2009 - 10:31 am | घाशीराम कोतवाल १.२

अफाट जगातील एक अडाणि.
खरच तुम्ही अडानीच हो अहो चालु द्या चालु द्या तुमचे अहो भाषेचा अभिमान असणे म्हणजे गाढवपणाचे लक्षण असेल तर तुम्ही
बुध्दीमान आहात आणी तुमच्या बुध्दीला सलाम हॅटस ऑफ टु यु मिस्टर अडाणी

मनसे आणि राज ह्यांचे उद्दीष्ट हेच मुळी चुकीचे आहे असे मला वाटते..

तुमची तरी काय चुक म्हणा कारण त्यांचे मुद्दे समजायला तुमची बुध्दी मानत नाहि

त्याच्या कार्यपद्धतीबद्दल तर बोलायलाच नको

मग नका देउ तुम्ही तुमचे मत त्याना

मराठी माणसाचा एवढा कळवळा आला आहे तर सामाजीक कार्य करा ना !! बाबा आमटे, हजारे ह्यांच्या सारखे कार्य करा...

हो बरोबर आहे तुमचे अहिंसा स्वीकारावी त्यांनी आणी टाळ घेउन उदो उदो करावा अहो वारकर्याना पण डाउ केमीकल्सच्या
विरोधात हिंसा करावी लागली होती असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

मैत्र's picture

22 Apr 2009 - 10:39 am | मैत्र

एकदम मान्य कोतवाल - भाषेचा अभिमान आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा आदर हा असलाच पाहिजे!

पण त्यापलिकडेही काही काम असतं ना? हा मनसेचा जाहीरनामा त्यांच्या संस्थळावरचा
https://www.manase.org/manifesto.pdf

त्यात चार पानांची प्रस्तावनाच आहे भाषणवजा ज्यात आत्ताचा परप्रांतीयांचा मुद्दा, इतर पक्षांवर हल्ला इ. शिवाजी पार्कवर बोलावं अशा स्वरुपाची वाक्यं आहेत. एका पानाचा जाहीरनामा आहे ९ कलमी त्यात फक्त एका मुद्द्यात शेतकर्‍यांचा विचार आहे आणि तोही संदिग्ध आहे, आणि मूलभूत सुविधांचा महत्त्वाचा मुद्दा आहे. बाकी मराठी अस्मितेचेच मुद्दे आहेत ...
हा जाहीरनामा वाचल्यानंतर मात्र मनसे मराठी बाण्याच्या पलिकडे जात नाहीये असं वाटलं.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

22 Apr 2009 - 10:54 am | घाशीराम कोतवाल १.२

फक्त एका मुद्द्यात शेतकर्‍यांचा विचार आहे आणि तोही संदिग्ध आहे, आणि मूलभूत सुविधांचा महत्त्वाचा मुद्दा आहे. बाकी मराठी अस्मितेचेच मुद्दे आहेत ...

मग राष्ट्रीय पक्षाने काय दिवे लावलेत अहो ईन मीन तीनच वर्ष झालीत मनसे स्थापण होउन अजुन ते बाळच आहे पन
भल्या भल्या प्रस्थापितांच्या छातीत धडकी भरवली आहे त्यांनी जरा थांबा वेट ऍन्ड वॉच आता लोकांना झटपट हव असत
फास्ट फुडचा जमाना आहेना

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

मराठी_माणूस's picture

22 Apr 2009 - 10:54 am | मराठी_माणूस

बाकिच्यांचे जाहीरनामे हे फक्त कागदावरच असतात त्यातले कीती ते खरे करतात हा संशोधनाचाच भाग आहे. कित्येक मुद्दे आधिच्या निवडणुकीतलेच असतात. ह्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवणे हे भाबडे पणाचे लक्षण आहे.

मैत्र's picture

22 Apr 2009 - 10:56 am | मैत्र

कलमाडींच्या जाहीरनाम्यात आत्ताचा धरून गेल्या तीन निवडणूकांमध्ये तेच मुद्दे होते :)

अडाणि's picture

22 Apr 2009 - 10:16 pm | अडाणि

ह्याचा मनसे ने मक्ता घेतला आहे क? आणि भाषेचा अभिमान म्हणजे नक्की काय हो? मराठी भाषेच्या वाढीसाठी मनसेने नेमके काय केले आहे? मराठी भाषेसाठी म्हणाल तर संपूर्ण मनसे पेक्षा जास्त चांगले काम हे तात्यांनी केले आहे...

मला स्वतःला अडाणी म्हणून घेण्यात लाज वाटत नाही कारण मला बरेच गोष्टी नाही समजत!! पण स्वतःला काय समजत नाहीये हे मात्र मला समजते.. उगाचच खोटा आव आणून मलाच सर्व काही समजते हा माझा अर्विभाव नाही...

परप्रांतीय म्हणजे नक्की कोण? ठाकरे यांचे घराणे मुळचे कुठले? मुंबईचे नक्कीच नाही.. मग ते जाणार का पहीले त्यांच्या गावाला ? अनेक खेड्यातून मराठी लोक शहरात जातात कामाला.. त्यांन्नी जावू नये का? ते का बरे परप्रांतीय नाहीत ?

आजकाल काँग्रेस / भाजपा विरूद्द बोलायची जणू फैशन झाली आहे... भारत ज्या परीस्थीतीतून वरती आला आहे आणि जेवढी प्रगती आपण केलेली आहे त्याला आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाचा फार मोठा हातभार आहे... चांगल्या नेतॄत्वाअभावी काय होते ह्या साठी झिंबाब्वे / इंडोनेशिया हि उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत.

-
अफाट जगातील एक अडाणि.

मिसळभोक्ता's picture

22 Apr 2009 - 10:35 pm | मिसळभोक्ता

मराठी भाषेसाठी म्हणाल तर संपूर्ण मनसे पेक्षा जास्त चांगले काम हे तात्यांनी केले आहे...

बरोबर. त्यामुळे एकतर राज ठाकर्‍यांनी तात्याला मनसेचा अध्यक्ष करावे, किंवा तात्याने राजला मिसळपावचा संचालक करावे.

नाही तर, राजने लाईन बदलून, मराठी भाषेच्या शुद्धलेखनासाठी काम करावे, म्हणजे एक काही विशिष्ट मुद्दा तरी मिळेल त्याला.

-- मिसळभोक्ता

घाशीराम कोतवाल १.२'s picture

23 Apr 2009 - 11:29 am | घाशीराम कोतवाल १.२

परप्रांतीय म्हणजे नक्की कोण? ठाकरे यांचे घराणे मुळचे कुठले? मुंबईचे नक्कीच नाही.. मग ते जाणार का पहीले त्यांच्या गावाला ? अनेक खेड्यातून मराठी लोक शहरात जातात कामाला.. त्यांन्नी जावू नये का? ते का बरे परप्रांतीय नाहीत

जे जे उत्तर प्रदेशातुन आले ह्या शहरात राहिले जे ह्या शहराला आपले मानतात ते मुंबईकर पन जे लोक तिकडुन ईकडे येतात
ईकडच्या नोकर्‍या पटकावतात इथल्या लोकांच्या पोटावर पाय देतात ते सर्व परप्रांतिय आनि राज म्हणतात कि आता खरच मुंबईची
क्षमता संपली आहे लोकांना सामावुन घेण्याची उत्तर प्रदेश आणि बिहार मधुन ईकडे या अनधिक्रूतझोपड्या बांधा कोठेहि बांधा
महाराष्ट्र शासन फुकटच घर देतेच आहे पण जरा ५० / ५० वर्ष बी डी डी चाळीत बी आय टी चाळीत राहणार्‍या लोकांची अवस्था पहा
सरकार त्यांना एफ स आय देत नाहि आहे पोलिसांना हक्काच्या निवास्थानासाठी झगडाव लागते आहे
आज मुंबईचा क्राईम रेशो पहा ७०% युपि बिहारी गुन्हेगार आहेत तिकडच्या लोकांना बंदुकिचे परवाने मिळतात त्या परवान्यावर हे लोक ईक्डे सुरक्षा रक्षक म्हनुन भरती होतात आणि गुन्हे करतात प्रमाण ३०% आहे याचे ८०% रिक्षा / टॅक्सी चालकांना ह्या शहरातील रस्त्यांची माहिती नाहि आहे कायदा नियम धाब्यावर बसवुन हे लोक आपली मग्रुरी करतात ह्यांना राजचा विरोध आहे

बाकि आपणास सागंणे उचीत नोहे

**************************************************************
कोणी ऐकल तरच सांगायला अर्थ आहे ,
कोणी ऐकल तरच सांगायला अर्थ आहे ,
गाढवा समोर गीता गायला मी काय मुर्ख आहे ??

मराठी_माणूस's picture

23 Apr 2009 - 12:33 pm | मराठी_माणूस

राष्ट्रीय नेतृत्वाचा फार मोठा हातभार आहे

काही उदाहरणे आहेत का ?

अडाणि's picture

23 Apr 2009 - 9:11 pm | अडाणि

भरपूर आहेत... पण ह्या सर्व गोष्टी आपल्याला बसल्या जागेवर मिळाल्या आहेत त्यामुळे त्याचे मोल कळत नाही...
स्वातंत्र्यानंतर उद्योग धंद्याची वाढ... आय. आय टी स्थापन करणे.. विविध धरणे, अणुविज्ञान चालू करणे ह्या सर्व बाबतीत पंडीत नेहरूंचा मोठा वाटा होता... जरा त्रटस्थ व्यक्तीने लिहीलेली पुस्तके वाचा .. e.g Freedom at midnight by french author

-
अफाट जगातील एक अडाणि.

नितिन थत्ते's picture

21 Apr 2009 - 11:01 am | नितिन थत्ते

मतदान करा पण उमेदवार पाहून मतदान करू नका. पक्ष पाहून करा.
ज्या पक्षाची धोरणे तुम्हाला मान्य नाहीत त्या पक्षाच्या चांगल्या उमेदवाराला मतदान करू नका.
(पक्षीय लोकशाही मानणारा) खराटा

क्लिंटन's picture

21 Apr 2009 - 11:18 am | क्लिंटन

हो राज्य पातळीवरील पक्षांना काही करून सत्तेत वाटा हवा असतो असे चित्र अनेकदा दिसते.त्यामुळे कोणाचेही सरकार आले तरी त्याला पाठिंबा द्यायला ते मागेपुढे बघत नाहीत. आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे राज्य पातळीवरचे पक्ष राज्यात ६-७ जागा जिंकतात आणि लोकसभा निवडणुकीत देशात १% पेक्षा कमी मते मिळवतात पण देशाचा पंतप्रधान कोण हे ठरविण्यात महत्वाची भूमिका वठवतात.

२००४ मध्ये काँग्रेस आघाडीला २१७ तर भाजप आघाडीला १८५ जागा मिळाल्या.तामिळनाडू आणि पाँडेचेरी मधील ४० जागांची भूमिका यात मोठी होती.कारण २००४ च्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला तामिळनाडूतील द्रमुक-मद्रमुक-पी.एम.के या राज्य पातळीवरच्या पक्षांनी भाजप आघाडी सोडून काँग्रेस आघाडीत प्रवेश केला. तसे घडले नसते तर काँग्रेस आघाडीच्या ४० जागा भाजप आघाडीला मिळणे सहज शक्य झाले असते.त्या परिस्थितीत भाजप आघाडीला २२५ आणि काँग्रेस आघाडीला १७७ अशी परिस्थिती निर्माण झाली असती.तरीही मनमोहन सिंह पंतप्रधानपदी असते का?वाटत नाही. तरीही द्रमुक-अण्णा द्रमुक हे पूर्ण तामिळनाडूत अस्तित्व असलेले पक्ष आहेत.पण सध्या राज्यातील राजकारणाची जी खिचडी झाली आहे त्यात मद्रमुक आणि पी.एम.के ना बरोबर घेऊनच द्रमुक किंवा अण्णा द्रमुकला यश मिळू शकते. १९९८,१९९९ आणि २००४ च्या निवडणुकांमध्ये असेच झाले आहे. यावेळीही वेगळे काही होईल असे वाटत नाही.आणि या पक्षांचे वर्चस्व राज्याच्या काही भागापुरतेच सिमीत आहे. आणि असे छोटे पक्ष देशाचा पंतप्रधान कोण हे ठरवितात ही लोकशाहीची थट्टा नाही का? याविषयीची अधिक माहिती मी लिहिलेल्या या लेखात.

तेव्हा राज्य पातळीवरच्या पक्षांचे महत्व कमी होईल तितके चांगले.पण ते करायचे कसे यासाठी कोणतीही जादूची छडी उपलब्ध नाही.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

चिरोटा's picture

21 Apr 2009 - 11:33 am | चिरोटा

तसे बघितले तर १९५२ पासून काँग्रेस काय्,भा.ज.पा. काय ५०% टक्क्यांपेक्षा जास्त मते राष्ट्रिय पातळीवर कधीच मिळवू शकले नाहीत्.मग त्यांच्या पक्षाचा पन्तप्रधान हे पण विचित्र वाटते.थोडक्यात हे पक्ष केवळ नावालाच राश्ट्रिय आहेत.भारत असंख्य समुहांचा/प्रदेशांचा बनल्यामुळे मतदार स्थानिय अस्मिता पण तेवढीच महत्वाची मानतात ही वस्तुस्थिती आहे.अमेरिकेचे द्विपक्षिय मॉडेल इकडे चालु शकणार नाही.
आज मोदीना मिळणारा पाठींबा ते मोदी आहेत म्हणून आहे,भा.ज.पा.चे आहेत म्हणून नाही.गुजरातची अस्मिता जागवण्यात त्यांचा महत्वाचा हात आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

क्लिंटन's picture

21 Apr 2009 - 12:19 pm | क्लिंटन

>>काँग्रेस काय्,भा.ज.पा. काय ५०% टक्क्यांपेक्षा जास्त मते राष्ट्रिय पातळीवर कधीच मिळवू शकले नाहीत्.मग त्यांच्या पक्षाचा पन्तप्रधान हे पण विचित्र वाटते

मान्य. पण १% कमी मते मिळविणारे पक्ष पंतप्रधान कोण हे ठरवितात हे त्याहूनही अधिक विचित्र आहे.

देवेगौडा सरकारचा पाठिंबा काँग्रेसने काढून घेतल्यानंतर देवेगौडांनी विश्वासदर्शक ठराव मांडला होता. तेव्हा त्या ठरावावरील चर्चेत भाषण करताना प्रमोद महाजनांनी ते भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाबरोबर चीनला गेले होते तेव्हाचा अनुभव सांगितला.त्या शिष्टमंडळात त्यांच्या बरोबर काँग्रेसचे पी.जे.कुरीयन, माकपचे सोमनाथ चॅटर्जी आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे रमाकांत खलप हे खासदार होते. खलप त्यावेळी देवेगौडा सरकारमध्ये कायदा राज्यमंत्री होते.

भारतीय लोकशाहीचे कामकाज कसे चालते याची उत्सुकता चीनमध्ये पत्रकारांच्यात होती.तेव्हा महाजनांनी सांगितले--

" मी प्रमोद महाजन. मी संसदेतील सगळ्यात मोठ्या पक्षाचा खासदार आहे. आणि मी विरोधी पक्षात आहे. हे आहेत पी.जे.कुरीयन. हे संसदेतील दुसर्‍या क्रमांकाच्या मोठ्या पक्षाचे खासदार आहेत.हे सरकारमध्ये नाहीत आणि सत्ताधारी आघाडीतही नाहीत.पण त्यांच्या पक्षाचा सरकारला बाहेरून पाठिंबा आहे.त्यानंतर हे आहेत सोमनाथ चॅटर्जी. हे संसदेतील तिसर्‍या मोठ्या पक्षाचे नेते आहेत.हे सरकारमध्ये सामील नाहीत पण सत्ताधारी आघाडीत सामील आहेत.आणि त्यानंतर हे आहेत रमाकांत खलप. हे त्यांच्या पक्षाचे एकमेव खासदार आहेत आणि हे मात्र सरकारमध्ये सामील आहेत इतकेच नव्हे तर मंत्री पण आहेत." मी त्या भाषणाचे थेट प्रक्षेपण बघितले होते आणि आठवेल तसे इथे लिहिले आहे. पण सांगायचा मुद्दा म्हणजे महाजनांनी भारतीय लोकशाहीत गोष्टी कशा घडू शकतात हे सांगितले. आता ही गोष्ट त्यांनी चीनमध्ये सांगून आपल्याच व्यवस्थेची लक्तरे मुद्दामून चव्हाट्यावर आणणे योग्य नव्हते असे मला वाटते पण त्यांनी मांडलेला मुद्दा चुकीचा नक्कीच नाही.

त्यानंतर १२ वर्षे उलटून गेली आहेत.आणि या काळात आपल्या देशातील राजकारणाची अजूनच खिचडी झाली आहे ही मात्र वाईट गोष्ट आहे.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

नितिन थत्ते's picture

21 Apr 2009 - 12:00 pm | नितिन थत्ते

प्रादेशिक पक्षांची वाढ होण्यात ७० - ८० च्या दशकांतील काँग्रेसेतर पक्षांचा मोठा वाटा आहे. हे पक्ष स्वतः राष्ट्रीय पक्ष होते आणि त्यांना चांगला जनाधार होता. पण काँग्रेसची सत्तेवरील पकड ढिली करणे त्यांना जमत नव्हते. त्यावेळी त्यांनी अशा पक्षांना उत्तेजन देण्याचा उद्योग सुरू केला.
अशा प्रादेशिक पक्षांची मुख्य मोठी उदाहरणे तेलगू देसम, शिवसेना आणि अकाली दल तसेच माकप ही होत.
शिवसेनेची "मुंबई -ठाणे या मर्यादित क्षेत्रात प्रभाव असलेला गुंडांचा पक्ष" ही प्रतिमा पुसून राज्यव्यापी आणि प्रभावी पक्ष बनण्यात भाजपने त्यांच्याशी केलेली युती मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे.
(अवांतरः तेलगू देसम आणि द्रमुकच्या प्रभावाला नाके मुरडणारे आपण शिवसेनेबद्दल हेच मत बाळगून आहोत का? म्हणजे काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना असेल तर काँग्रेसला मत द्यावे असे या धाग्याच्या लेखकाचे खरोखरच मत आहे काय)
(अतिअवांतरः लालूंचा राजद, नितिशकुमारांची समता पार्टी, मुलायमसिंगांची समाजवादी पार्टी, देवेगौडांचा जनता दल, नवीन पटनायकांचा बिजू जनता दल हे पक्ष प्रादेशिक पक्ष मानायचे की एकाच पक्षाची शकले मानायची?)

खराटा
(रंग माझा वेगळा)

मैत्र's picture

21 Apr 2009 - 12:04 pm | मैत्र

म्हणजे काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना असेल तर काँग्रेसला मत द्यावे असे या धाग्याच्या लेखकाचे खरोखरच मत आहे काय

धाग्यात लिहिलं आहे - जिथे यांचे परंपरागत साथीदार आहेत जसे शिवसेना / राष्ट्रवादी त्यांना मतदान करा.
हे प्रादेशिक आहेत पण भाजप / काँग्रेसचे परंपरागत साथीदार आहेत जे विरोधात जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सरकार स्थापनेत ते एकच संख्या म्हणून गणता येतील. मत काँग्रेसला द्यायचे का शिवसेनेला हा वैयक्तिक निर्णय आहे.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

22 Apr 2009 - 10:33 am | घाशीराम कोतवाल १.२

जिथे यांचे परंपरागत साथीदार आहेत जसे शिवसेना / राष्ट्रवादी त्यांना मतदान करा.
उद्या तेल लावलेल्या बारामतीकर पैलवानाना वाटले कि आपण पंतप्रधान व्हावे आणी शिवसेने त्यांना पाठिंबा दिला तर
काय करणार अहो तुम्ही तर सरळ सरळ प्रचार करीत आहात असा सुध्दा ह्या धाग्याचा अर्थ होतो ना!!!

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

प्रदीप's picture

21 Apr 2009 - 12:56 pm | प्रदीप

लोकसभेच्या निवडणूकात स्थानिक प्रश्नांचे निकष लावून मतदान करू नये (थोडक्यात मतदारांनी (आता तरी) थोडीशी प्रगल्भता दाखवावी) हे मैत्र ह्यांच्या चर्चाप्रस्तावाचे उद्दिष्ट आहे हे समजले व पटलेही.

पण

......जसे शिवसेना / राष्ट्रवादी त्यांना मतदान करा. पण बसपा / सपा / प्रजाराज्यम / कम्युनिस्ट / अपक्ष अशा कुठल्याही पक्षाला नको.

हे मात्र अगम्य आहे. बसपा/सपा/कम्युनिस्ट हे स्थानिक पातळीवरील पक्ष नाहीत, त्यातील काही (उदा. कम्युनिस्ट) सुरूवातीपासूनच अखिल भारतीय पातळीवर कार्यरत आहेत. मला वाटते हे वाक्य मूळ चर्चाप्रस्तावाशी असंबंधित आहे. ते केवळ मैत्र ह्यांचे वैयक्तिक मत प्रदर्शित करते.

मैत्र's picture

21 Apr 2009 - 1:30 pm | मैत्र

प्रदीप तुमचे मुद्दे बरोबर आहेत.

माझे मत :
कम्युनिस्ट पक्षाचा मुद्दा मान्य आहे. त्यामुळे तो मागे घेतो.
वैयक्तिक पातळीवर मी विरोधच करतो -- कम्युनिस्ट राज्ये केरळ आणि प. बंगालमध्ये गेल्या साठ वर्षात काय घडलं ते तर स्पष्ट आहेच. पण सरकार मध्ये असताना अणुकरारावरुन आता काँग्रेस विरोध करणारे कम्युनिस्ट हे संधिसाधू आहेत. आता अचानकपणे ते पवार / मायावती आदिंना मनमोहनसिंगांपेक्षा चांगले म्हणायला लागले आहेत. सरकारला अडचणीत आणणारे काम करणे इतकेच त्यांचे ध्येयधोरण वाटते. सोमनाथ चटर्जी प्रकरणानंतर त्यांनी त्यांची तत्त्वेही गुंडाळून ठेवली आहेत.
बसपा / सपा - थोड्या जागा लढवल्या म्हणजे अस्तित्व आहे असे होते म्हणून ते राष्ट्रीय पक्ष म्हणता येत नाहीत.
बसपा ला जास्त जागा मिळाल्या तर दलित की बेटी चा निराधार मुद्दा लावून मायावती पुढे येतील जे धोकादायक आहे.
सपाचा जाहीरनामा वाचल्यावर त्यांना एकही जागा मिळायला नको. देशविरोधी विचार असलेला पक्ष आहे.
त्यामुळे यांनाही निवडून आणणे योग्य नाही.

विकि's picture

21 Apr 2009 - 11:26 pm | विकि

कोणत्याही राजकीय पक्षाचे अंतिम उद्दीष्ट हे सत्ता मिळवणे हेच असते त्यामुळे कम्युनिष्ठ पक्षांबद्दल बोलताना आधी तुमचे काँग्रेस, भाजपावाले काय करतात ते आधी पाहा.

कॉ. विकि,
भाजपाने वेळेला मायावती, जयललिता, कोणाचीही साथ घेतली आहे तत्त्वे सोडून आणि काँग्रेसला तर तत्त्व नाहीतच म्हणावे लागेल आत्ताच्या सरकारमधले पूर्ण वेगळी विचारसरणी असलेले पक्ष पाहता.
पण कम्युनिस्ट पक्ष तर साम्यवादासाठी जनतेसाठी आहे ना?
कोणत्याही राजकीय पक्षाचे अंतिम उद्दीष्ट हे सत्ता मिळवणे हेच असते हे जर कम्युनिस्टांनाही लागू असेल तर त्यांच्यात आणि इतर पक्षांमध्ये फरक काय? मग त्या तत्त्वांना, विचारसरणीला आणि पक्षसंघटनेला काहीच अर्थ नाही.
त्यांनी आपल्या तत्त्वांचे ढोल वाजवणे आणि सत्तेत राहून तात्विक विरोध करणे सोडून द्यायला हवे.

निखिल देशपांडे's picture

21 Apr 2009 - 2:30 pm | निखिल देशपांडे

आपली चर्चा आणी म. टा वरिल हा दुवा बघुन खरेच प्रश्न पडला
खासदाराची कर्तव्ये काय?

==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

सूहास's picture

21 Apr 2009 - 6:36 pm | सूहास (not verified)

सुहास
सध्या " सखाराम गटणे" कोठे दिसत नाहीत.

विकि's picture

21 Apr 2009 - 11:22 pm | विकि

काहीही बरळू नका.काँग्रेस आणि भाजपाने देश विकत घेतला नाही .इथे लोकशाही आहे.आधी प्रादेशिक पक्ष निघण्यास कोण कारणिभूत ठरले याचा आढावा घ्या मगच बोला.

विसोबा खेचर's picture

21 Apr 2009 - 11:34 pm | विसोबा खेचर

आजपर्यंत या राष्टीय म्हणवणार्‍या काँग्रेस आणि भाजपा पक्षाने या देशाचं काय भलं केलं??

अहो स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी यांना साधं वीज आणि पाणी देता आलेलं नाही! आजही कित्येक गावांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. खेडेगावात तर सोडाच परंतु आर्थिक राजधानी मुंबैच्या शेजारी असलेल्या आमच्या ठाण्यात रोजची तीन तीन तास वीज नसते. खेडेगावात तर आठ आठ, दहा दहा तास वीज नसते!

सर्व सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार नांदतो आहे!

कुठल्या पक्षाने या देशाचं भलं केलं आहे?? मी कुठल्याही पक्षाला मतदान करून देशद्रोह करणार नाही! मी मतदान करणार नाही..!

तात्या.

सुहास's picture

22 Apr 2009 - 2:55 am | सुहास

मी कुठल्याही पक्षाला मतदान करून देशद्रोह करणार नाही! मी मतदान करणार नाही..!

मीही मतदान करणार नाही!

मैत्र's picture

22 Apr 2009 - 10:18 am | मैत्र

मूलभूत गरजांचा विचार केला तर साठ वर्षात खरंच काम झालेलं नाही. पण ४७ साली ज्या मध्ययुगीन स्थितीत स्वातंत्र्य मिळाले त्याचा विचार करता नक्कीच वाईट स्थिती नाहीये. गेल्या शतकाच्या शेवटी (साधारण १८४० ते १९२०) इतर देशात प्रगती होत असताना, लोकशाही येत असताना, सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी काम होत असताना भारतात ब्रिटीश राज्यात दयनीय स्थिती होती.
त्या स्थितीत अचानक स्वातंत्र्य मिळाले आणि नंतर कितीतरी वर्षे फक्त राजकारण केले गेले. भ्रष्टाचार आणि सत्तेची हाव या दोन गोष्टींमुळेच आत्ता जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते उभे आहेत आणि अन्न वस्त्र निवारा - वीज, पाणी, रस्ते, साक्षरता अशा साध्या गोष्टी पण नाहियेत.

पण म्हणून मी कुठल्याही पक्षाला मतदान करून देशद्रोह करणार नाही! मी मतदान करणार नाही..!
हे साफ चुकीचे आहे. मतदान न करणे हाच नक्की देशद्रोह आहे...
जर आपण स्वतः राजकारणात पडत नाही, तिथे गुंडगिरीशी, धूर्तपणाशी लढत नाही, लोकांसाठी काही करत नाही तर मतदान तरी केलेच पाहिजे. कारण सर्व जण हे करणार नाहीत. आपले काम, छंद, कुटुंब यात आनंदाने राहणे काहीच गैर नाही. पण मग आजूबाजूच्या परिस्थितीचा मी भागच नाही आणि त्या नालायक, हरामखोर लोकांमुळे हे सगळे होते आहे अशी नावे ठेवून मी मतदानच करणार नाही म्हणणे चुकीचे आहे. तसे असल्यास कुठल्याही अराजकाला, भ्रष्टाचाराला, मूलभूत सुविधांच्या अभावाला, जाती धर्माच्या राजकारणाला, राजकीय गुंडगिरीला नावे ठेवण्याचा कसलाही अधिकार उरत नाही...

मराठी_माणूस's picture

22 Apr 2009 - 10:20 am | मराठी_माणूस

तसे असल्यास कुठल्याही अराजकाला, भ्रष्टाचाराला, मूलभूत सुविधांच्या अभावाला, जाती धर्माच्या राजकारणाला, राजकीय गुंडगिरीला नावे ठेवण्याचा कसलाही अधिकार उरत नाही...

सहमत.

दवबिन्दु's picture

22 Apr 2009 - 12:24 pm | दवबिन्दु

आपल्याकड निदान लोकशाहि आहे. मत देता येतय. पन पाकिस्तानमधे झिया
वगरे हुकुमशाह असताना त्याना बिचाऱया पाकिस्तानी लोकाना तर मत पन देता येत नव्हत. आपल्याकड लोकशाही आहे तर कोनाला पन त्याची किमत उरलेली नाय. सोमालिया, चीन सारख वातावरण असत तर कळल असत.

Ballot is powerful than a bullet.

विकि's picture

21 Apr 2009 - 11:39 pm | विकि

अस करू नका मतदान करा आपल्याला हुकुमशाही नाही लोकशाही हवी आहे.तुम्ही नुसते राजकारण्यांना शिव्या देऊ नका तर पाणी,वीजप्रश्न याबाबत दखल न घेणार्‍या आएएस(प्रशासकीय अधिकारी) लॉबीला ही घाला.या सर्व गोष्टी राजकारण्यांपेक्षा यांच्या हातात असल्याचे कळते.

सुहास's picture

22 Apr 2009 - 3:06 am | सुहास

जिथे यांचे परंपरागत साथीदार आहेत जसे शिवसेना / राष्ट्रवादी त्यांना मतदान करा. पण बसपा / सपा / प्रजाराज्यम / कम्युनिस्ट / अपक्ष अशा कुठल्याही पक्षाला नको.

शिवसेना / राष्ट्रवादी खरेच इतके विश्वासू आहेत काय? उद्या राष्ट्रवादी बसपा / सपा / प्रजाराज्यम / कम्युनिस्ट ला सामील होणार नाही कशावरुन? त्यावेळी मत वाया जाणार नाही काय?

आणी हो... पुढील २-३ वर्शांत पुन्हा निवडणुका होतील हे माझे भाकीत आहे..

--सुहास

सुहास's picture

22 Apr 2009 - 3:08 am | सुहास

जिथे यांचे परंपरागत साथीदार आहेत जसे शिवसेना / राष्ट्रवादी त्यांना मतदान करा. पण बसपा / सपा / प्रजाराज्यम / कम्युनिस्ट / अपक्ष अशा कुठल्याही पक्षाला नको.

शिवसेना / राष्ट्रवादी खरेच इतके विश्वासू आहेत काय? उद्या राष्ट्रवादी बसपा / सपा / प्रजाराज्यम / कम्युनिस्ट ला सामील होणार नाही कशावरुन? त्यावेळी मत वाया जाणार नाही काय?

आणी हो... पुढील २-३ वर्शांत पुन्हा निवडणुका होतील हे माझे भाकीत आहे..

--सुहास

यन्ना _रास्कला's picture

22 Apr 2009 - 5:15 am | यन्ना _रास्कला

लोकसभा राश्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नासाटी जसे की दहशतवाद, देशाची अर्थव्यवव्स्था आनि विधानसभा घरगुती प्रश्नासाठी.

लोकसभेमधे राष्ट्रिय पक्श तर विधान सभेत लोकल पक्श.

ऋषिकेश's picture

22 Apr 2009 - 10:28 am | ऋषिकेश

भारतात अधिकृतपणे असलेले राष्ट्रीय पक्ष पुढील प्रमाणे आहेत:

  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (अध्यक्षः सोनिया गांधी)
  • भारतीय जनता पक्ष (अध्यक्षः राजनाथ सिंह)
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अध्यक्षः शरद पवार)
  • बहुजन समाज पक्ष (अध्यक्षः मायावती)
  • भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्स्कवादी) (अध्यक्षः प्रकाश करात)
  • भारतीय कम्युनिस्ट पार्टी (अध्यक्षः ए. बी. बर्धन)

राष्ट्रीय पक्षांना मतदान करा ह्या आपल्या मताशी सहमत.
मात्र हे हि लक्षात ठेवा मायावती, डावे हे देखील राष्ट्रीय पक्षाचेच प्रतिनीधी आहेत

-ऋषिकेश

क्लिंटन's picture

22 Apr 2009 - 12:27 pm | क्लिंटन

निवडणुक आयोगाच्या नियमांप्रमाणे ४ किंवा जास्त राज्यांमध्ये (किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये) ४% किंवा जास्त मते मिळवणारे पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मानले जातात. तसेच ४ किंवा जास्त राज्यात काही (बहुदा ४ किंवा जास्त) विधानसभा जागा मिळविणारा पक्षही राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता पावतो. यात चार राज्यांचा आकार नेमका किती हवा किंवा त्या राज्यांमधून लोकसभेवर किती खासदार निवडले जावेत याला काहीही नियम नाहीत.

महाराष्ट्रात शिवसेनेला ४% पेक्षा जास्त मते मिळतातच. शेजारच्या गोवा, दादरा नगरहवेली आणि दिव-दमण या भागांमध्ये मराठी वस्ती काही प्रमाणात आहेच.समजा शिवसेनेने तिथे ही ४% पेक्षा जास्त मते मिळवली तर शिवसेना हा पक्ष महाराष्ट्र, गोवा, दिव-दमण आणि दादरा नगरहवेली या ४ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये ४% पेक्षा जास्त मते मिळवेल आणि तो ही राष्ट्रीय पक्ष बनू शकतो.तसेच शिवसेनेचा निपाणी-संकेश्वर या सीमाभागात काही प्रमाणात जोर आहेच.समजा भविष्यकाळात शिवसेनेने बेळगाव आणि विजापूर जिल्ह्यातून कर्नाटक विधानसभेच्या ४ जागा मिळवल्या (सद्यपरिस्थितीत ते फारच कठिण आहे) तर त्या पक्षासाठी आणखी चांगले.

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की निवडणुक आयोगाच्या नियमांप्रमाणे एखादा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यताप्राप्त झाला तरी त्याचा देशभर प्रभाव असेल असे मानायचे कारण नाही. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव मुख्यत्वे महाराष्ट्र आणि मेघालय या राज्यांत, बसपचा प्रभाव उत्तर प्रदेश आणि काही प्रमाणात दिल्लीत आणि तसेच कम्युनिस्ट पक्षांचा प्रभाव पश्चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरात आहे.तांत्रिकदृष्ट्या ते राष्ट्रीय पक्ष जरूर आहेत पण त्यांचे पूर्ण देशात वर्चस्व आहे असे नक्कीच नाही.

अवांतर: भाजपची आणि काही प्रमाणात काँग्रेसचीही सध्या होणारी घसरगुंडी चालूच राहिली तर ते ही काही वर्षांनी असेच ’तांत्रिकदृष्ट्या’ राष्ट्रीय पक्ष होतील असे वाटते.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

ऋषिकेश's picture

22 Apr 2009 - 1:31 pm | ऋषिकेश

तांत्रिकदृष्ट्या ते राष्ट्रीय पक्ष जरूर आहेत पण त्यांचे पूर्ण देशात वर्चस्व आहे असे नक्कीच नाही.

+१

मात्र देशात त्यांचे वर्चस्व आहेत असे मीही म्हटलेले नाहि. हा मुद्दा मांडला कारण चर्चा विषयाचा मथळा "मतदान करा आणि राष्ट्रीय पक्षालाच करा " असा आहे. आणि खालील मसुद्यामधे मात्र "पण बसपा / सपा / प्रजाराज्यम / कम्युनिस्ट / अपक्ष अशा कुठल्याही पक्षाला नको." असे लिहिले आहे तेव्हा हा विरोधाभास दाखवण्यासाठी हा प्रपंच

ऋषिकेश

निखिलराव's picture

22 Apr 2009 - 12:10 pm | निखिलराव

मी कोणाला मत द्यावे याचा विचार करुन गोंधळलो होतो. वरील सगळ्या मि.पा करांच्या प्रतिक्रीया वाचल्या, पुण्याचा विचार करता, सध्याचे खासदार कलमाडींना मत नाही द्यायचं हे तर ठाम होत.

डि.एस्.के चांगला माणुस वाट्ला, पण पक्ष (बहुजन समाज पक्ष ) मायावती ? नको...
(साहेबांनी कलमाडीची मतं खाण्य्यासाठी डि.एस्.के ला उभं केलय ? )

रविवारी म.न्.से ची राज ठाकरे यांची सभा नेहमीप्रमाणे जबरदस्तचं झाली. मराठीचा मुद्दा चांगलाच, उमेदवार रणजित शिरोळे पण चांगलाच, पण निवडुन येण्याचे चान्चेस खुपचं कमी वाट्तात, मत वाया जाईल असे मना पासुन वाट्ते.
(कलमाडींनी भा.ज्.प च्या अनिल शिरोळयांची मत खाण्य्यासाठी रणजित शिरोळेंना उभ केलय, राज ला १० ते १५ कोटी दिले ???)

अनिल शिरोळे हे कलमाडींना टक्करं देणारा, निवडुन येण्याचे चान्चेस असणारा, एका राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार वाट्तात.

आमचं मत भा.ज्.पा ला........
तुम्हीही मत द्या भा.ज्.पा ला........

सातारकर's picture

22 Apr 2009 - 12:12 pm | सातारकर

कदाचित अवांतर असेल,

इथे अर्ज भरलेल्या सगळ्या पुढार्‍यांची माहीती आहे जी त्यांनी निवडणूक आयोगाकडे दिली आहे.

अजून थोडीशी भर या चर्चेत माझ्यातर्फे ती म्हणजे Thoughts On Linguistic States (१९५५, डॉ. बाबासाहेब आंबेडकर) मधली माहीती. ती भाषांतर न करता जशीच्या तशीच इथे देत आहे. कॉंग्रेसच्या ध्येयधोरणासंदर्भातील (मी काँग्रेसविरोधकांचा समर्थक नाही, ही माहीती फक्त काँग्रेसशी संबधीत म्हणून पाहीली जावी.)

It is not that such a question can be asked about Maharashtra alone. It can be asked about many other States in India.

I give four statements relating to Part A States, Part B Stales and the Central Government from Part III of the Report of the Taxation Inquiry Committee presided over by Dr. John Mathai (See Tables 4, 5, 6 and 7).

From these statements the following propositions stand out:
(1) That up to a certain year in the life of the States there was no deficit. They were all viable. It is only after Congress came into office that States ceased to be viable.

(2) That since the Congress came into office the Excise Revenue has begun to dwindle. It has gone down to a vanishing point.

(3) That Income Tax and Sales Tax have increased enormously.

These are the causes which explain why States have ceased to be viable. The Excise Revenue is being sacrificed for a false ideology which has no meaning, no sense and no reality.

आणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा:

The Congress always wins, so it is found. But no one asks why does the Congress win? The answer is that Congress is very popular. But why is the Congress popular? The true answer is that Congress always puts up candidates which belong to castes which are in the majority in the constituencies. Caste and Congress are closely linked. It is by exploiting the caste system that the Congress wins.

-----------------------------------------------------------------------------------------
I have seen GOD. He bats at no. 4 for India
Matthew Hayden

अमोल केळकर's picture

23 Apr 2009 - 1:31 pm | अमोल केळकर

आपण आज आपले मत नोंदवले का ? B)
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा