गाभा:
या फळाला मंकीफ्रूट असे म्हणतात व औषध म्हणून याचा उपयोग होतो इतकीच माहिती मिळाली. पण कोणत्या आजारावर औषध्,हे मात्र कळू शकले नाही.
विकिदादा व गुगलकाकांकडे याची माहिती उपलब्ध नाही.
कुणी या फळाचे योग्य नाव व इतर माहिती देऊ शकेल काय?
या फळाला मंकीफ्रूट असे म्हणतात व औषध म्हणून याचा उपयोग होतो इतकीच माहिती मिळाली. पण कोणत्या आजारावर औषध्,हे मात्र कळू शकले नाही.
विकिदादा व गुगलकाकांकडे याची माहिती उपलब्ध नाही.
कुणी या फळाचे योग्य नाव व इतर माहिती देऊ शकेल काय?
प्रतिक्रिया
21 Apr 2009 - 5:57 am | विनायक प्रभू
मिपावरचे फळांचे व्यापारी मदत करतील
21 Apr 2009 - 7:15 am | चकली
मंकी नट म्हणून गूगल करा. थोडीफ़ार माहिती मिळेल
चकली
http://chakali.blogspot.com
21 Apr 2009 - 10:50 am | नरेंद्र गोळे
ठकुताई, हा "खुरासणी चिंच" म्हणजे "आफ्रिकन बाओबाब" वृक्ष वाटतो!
याचे खोड हत्तींना बेहद्द आवडते.
तर चिंच माकडांना.
आपल्याला खायलाही ही चिंच चवदार लागते.
21 Apr 2009 - 12:13 pm | ठकू
चकलीताई, गुगलकाकांना विचारून झालं. मंकी नट म्हणून विचारलं तर त्यांनी भुईमुगाच्या शेंगांची चित्र दाखवली [( पण तुमची नाव बदलून शोध घेण्याची युक्ती आवडली. :)
नरेंद्र गोळे साहेब, मी चिकटविलेल्या चित्रातील फळाचा आकार हा मध्यम दुधी भोपळयाएवढा आहे. ते झाड माझ्या घराच्या इमारतीच्या तिस-या मजल्याइतक्या उंचीचे आहे. त्याला पिवळ्या रंगाची फुले येतात. #o खुरासणी चिंचेचं झाड मी कधी पाहिलं नाही किंवा या झाडालाही चिंचा लागलेल्या मी पाहिल्या नाहीत पण तुम्ही म्हणता तसं आफ्रिकन बाओबाब वृक्षाची फळे व ही फळे यात कमालीचे साम्य आहे.
हं! कदाचित, तुम्ही म्हणता, तसा हा आफ्रिकन बाओबाब वृक्षच असावा. :| किंवा त्याचा भाऊ, भारतीय बाओबाब वृक्ष! 8>
बाओबाब वृक्षाच्या फळांचा गर हा मलेरिया, गोवर, देवी, ताप या आजरांवर औषध म्हणून वापरला जातो. तसेच वेदनाशामक म्हणूनही गराचा उपयोग होतो, ही माहिती मिळाली.
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबदद्ल आभार.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
21 Apr 2009 - 12:50 pm | नितिन थत्ते
हे झाड खरे आहे की फोटो आहे. तुम्ही घराच्या उंची एवढे वगैरे लिहिले आहे म्हणून खरे वाटते.
विचारण्याचा उद्देश म्हणजे मध्यंतरी 'नारीपोल' नावाच्या थायलंडमधील झाडाचा फोटो ढकलपत्रातून आला होता. त्या झाडाला बाईच्या आकाराची फळे येतात असे लिहिले होते. फोटोही तसाच होता. नंतर तो फेक फोटो असल्याचे कळून आले.
खराटा
(रंग माझा वेगळा)
21 Apr 2009 - 12:50 pm | नरेंद्र गोळे
ठकू, हा तर कल्पवृक्षच आहे!
आपल्याकडे उत्तर भारतात सर्वत्र आढळतो.
तिकडे त्याला "गोरख इमली" म्हणतात.
इंदोरजवळ मांडूच्या किल्ल्यावर गेलो असता मला गोरख चिंच खाल्ल्याचे आठवते.
मादागास्कर बेटावर विशाल बाओबाब आहेत तर मसाईमाराच्या अभयारण्यातही प्रचंड वृक्ष आहेत.
21 Apr 2009 - 12:55 pm | नितिन थत्ते
गोरखचिंच असेल तर ती दम्यावर उपयुक्त असते.
खराटा
(रंग माझा वेगळा)
21 Apr 2009 - 2:25 pm | ठकू
कल्पवृक्ष म्हणजे ह्या फळाचा गर ब-याच व्याधींवर गुणकारी असं औषध असणार! गोळे साहेब, तुमचं म्हणणं खरं असावं कारण मी जास्तकरून उत्तर प्रदेशी लोकांनाच, हे फळ घेऊन जाताना पाहिले आहे. गुगलकाकांना गोरख इमली ह्या शब्दाबद्दल विचारले असता त्यांच्या कडून जो पहिला दुवा सापडला, तो येथे देत आहे.
तसं गोरख ईमली किंवा गोरख चिंच हे नाव बरं आहे पण कल्पवृक्ष हे नाव जास्त छान वाटतं.
हे अवांतर होईल पण त्या घरात प्रवेश केल्यानंतर प्रथम दृष्टीस पडला तो घराच्या बाल्कनीतून दिसणारा हा वृक्ष! घनदाट आणि फळांनी लगडलेला. त्याच्या सावलीमुळे घरात खूप थंडावा राहतो.
खराटा, हा फोटो खरा आहे. तो मी स्वतः माझ्या N91 फोनच्या कॅमे-याने काढलेला आहे. माझ्या घराजवळ या फळाचे बरेच वृक्ष आहेत. माझं घर एका इमारतीत दुस-या माळयावर आहे. अंदाजे उंची कशी सांगावी म्हणून लिहिलं की 'ते झाड माझ्या घराच्या इमारतीच्या तिस-या मजल्याइतक्या उंचीचे आहे.' तुम्ही म्हणता तो नारीपोलचा फोटो मीही पाहिला आहे. तो खोटा आहे, हे बघूनच कळतं.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
21 Apr 2009 - 4:29 pm | आंबोळी
बघताक्षणीच फेक आहेत हे कळावे असे हे नारिपोल चे फोटू
![](http://i512.photobucket.com/albums/t329/kriz2804/ftree-img02.jpg)
आणि हा
आणि हा
![](http://i512.photobucket.com/albums/t329/kriz2804/ftree-img01.jpg)
प्रो. आंबोळी
21 Apr 2009 - 4:33 pm | चतुरंग
इथे वाचा. त्यात औषधी गुणधर्माबद्दलही लिहिले आहे.
चतुरंग
21 Apr 2009 - 5:20 pm | ठकू
चतुरंग, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी माहिती वाचली. हा वृक्ष खरोखरंच कल्पवृक्ष आहे. शारिराला आवश्यक असलेली अनेक पोषणतत्वे आहेत ह्या फळात.
वा! माझ्या दारात कल्पवृक्ष आहे! 8>
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
21 Apr 2009 - 6:32 pm | सूहास (not verified)
<<या फळाला मंकीफ्रूट असे म्हणतात व औषध म्हणून याचा उपयोग होतो इतकीच माहिती मिळाली>>
बाकी म॑की म्हणजे माकड, फ्रुट म्हणजे फळ आणी औषध म्हणजे आम्ही जे काय स॑ध्यासमयी घशात ओततो ते,एव्हढच आम्हाला माहीत आहे...
सुहास
सध्या " सखाराम गटणे" कोठे दिसत नाहीत.
21 Apr 2009 - 8:02 pm | क्रान्ति
ठकुताई, दारात कल्पवृक्ष आहे, म्हणून आपलं अभिनंदन आणि या इतक्या बहुगुणी वृक्षाची सविस्तर माहिती दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
23 Apr 2009 - 1:11 pm | विजुभाऊ
याला गोरख चिंच असे म्हणतात. मूळ अफ्रिकेतल हे झाड. हा असा एक वृक्ष वाई येथे मेणवलीला नाना फडणविसाच्या वाड्यामागे आहे ( स्वदेस चित्रपटात या झाडाखाली गाव पंचायत बसली आहे)
हे फळ पोटदुखीवर औषध म्हणून वापरले जाते.
भारतात याची झाडे मध्यप्रदेशात धार/ मांडवगड( माळवा प्रान्त) येथे आढळतात
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी