"मे" अंताला सिक्कीममधे ट्रेकिंगला जाण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने माहितीची जमवाजमव चालु आहे..
जालावर अनेक कंपन्यांची स्थळे आहेत, मात्र आजपर्यंत युथ हॉस्टेलच्या सिरीयस ट्रेकिंगची आवड असलेल्या मला ह्या टुरिस्ट ट्रेकिंगबद्दल साशंकता आहे. या निमित्ताने मला काहि माहिती हवी आहे ती येथे मिळेल या उद्देशाने हा काथ्याकुट उघडत आहे.
मला हवी असलेली माहिती / पडलेले प्रश्न पुढिल प्रमाणे:
१. टुरिस्ट ट्रेकिंग मधे खरोखर एकांत मिळातो का? का सगळा ट्रेक धोपटमार्गांवरून असतो?
२. सिक्कीमधे कोणी ट्रेकिंग केले आहे का? (आम्हि साधारण ६-७ दिवसांचा ट्रेक करायचा विचार करत आहोत) असल्यास अनुभव कसा होता?
३. तिथील एखादी माहितगार/शासकीय/प्रमानीत संस्था जी ट्रेकिंग कार्यक्रम राबवते त्याबद्दल माहिती असल्यास द्यावी
यानिमित्ताने हिमालयन ट्रेकिंगवर चर्चा झाली तरी वाचायला आवडेलच :)
प्रतिक्रिया
19 Apr 2009 - 2:18 am | अमेरिकन त्रिशंकू
मला स्वतःला माहिती /अनुभव नाही पण ही लिंक बघा.
http://www.team-bhp.com/forum/travelogues/19135-few-days-close-heaven-dz...
19 Apr 2009 - 3:08 pm | ऋषिकेश
वा! अतिशय आभार!.. फार विस्तृत माहित आहे
ऋषिकेश
20 Apr 2009 - 7:31 pm | अमेरिकन त्रिशंकू
सिक्कीम ट्रेक चे वर्णन त्या लिंकवर वाचल्यावर सिक्कीम हे बकेट लिस्ट मधे टाकले आहे.
तुझ्या ट्रेक चे वर्णन वाचायला पण आवडेल.
20 Apr 2009 - 9:28 pm | प्राजु
टुरिस्ट ट्रेकिंग मधे खरोखर एकांत मिळातो का
ऋषी,
एकांत कशाला रे?;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Apr 2009 - 2:04 pm | ऋषिकेश
;)
ऋषिकेश