गाभा:
गेले काही दिवस या विषयावर वाचन चालू आहे. सर्वाना पटकन समजेल असा गणितात फारसे न शिरता लेख लिहावा असे मनात आहे. कोणी आधीच हे कार्य केले असेल तर प्लीज मला दुवा (लिंक, आशिर्वाद नव्हेत) द्या. तसेच मिपावरील (वि)ज्ञानी मंडळी (वि. अदिती वगरे) मदत करू शकली तर ग्रेट्च!
-टायबेरीअस
प्रतिक्रिया
17 Apr 2009 - 11:10 pm | प्राजु
वाट पहात आहोत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Apr 2009 - 2:05 am | धनंजय
याविषयी आइन्स्टाइन यांनी दिलेल्या एका व्याख्यानाच्या थोड्याच भागाचे भाषांतर (आइन्स्टाइन यांचे व्याख्यान - काल आणि अवकाशाचा तात्त्विक पाया) मी केलेले आहे - त्यातून काही प्रारंभिक मुद्दे मिळू शकतील कदाचित.
तुमच्या लेखांची वाट बघत आहे.
18 Apr 2009 - 12:59 pm | मराठी_माणूस
अत्यंत स्तुत्य उपक्रम . खुप उत्सुकता आहे.
18 Apr 2009 - 3:10 pm | वाहीदा
मी हा किस्सा मी माझ्या एका ज्यूईश मैत्रीणीच्या वेडींग (यहूदी लग्नसमारंभ) मध्ये ऐकला
जेव्हा आईन्स्टाईनचा Theory of Relativity खुप प्रसिध्द झाला तेव्हा त्याच्या पत्नीला विचारण्यात आले ...
'काय हो तुम्हाला समजला का तुमच्या पती चा सिध्दांत' ("Have you understood what your husband has Said about Theory of Relativity" )
तेव्हा त्यांच्या पत्नीने अगदी साधेपणाने उत्तर दिले ..
"What I understand is Einstein and that is Theory of Relativity for me "
मला Einstein काय आहेत हे समजते अन तो च माझ्या साठी Theory of Relativity आहे
वरील वाक्य बरेच काही सांगून जाते ...किती सोप्या शब्दात त्या महिलेने आपल्या Relationship अन Theory of Relativity ची सांगड घातली ! :-)
~ वाहीदा
कहता है दरीया से ..समंदर का सुकूत (शांतता)
जिसमें जितना द्फ्त (गहराई) है उतना ही वो खमोश है !!
18 Apr 2009 - 4:27 pm | सुनील
उत्तम उपक्रम. धनंजय यांनी लिहिलेला लेख आवडला.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
18 Apr 2009 - 4:39 pm | लिखाळ
वा .. स्वागत आहे. वाचायला उत्सुक आहे.
-- लिखाळ.
18 Apr 2009 - 9:52 pm | मिहिर
मी डॉ. जयंत नारळीकरांच्या 'आकाशाशी जडले नाते' मध्ये याबद्दल वाचले होते. मोहन आपटेंच्या 'मला उत्तर हवय्'मध्येही होते. बाकी रेसनिक हॅलिडे मधील वाचायची ईच्छा झाली नाही. अभिजित यांचा लेख आवडला.
19 Apr 2009 - 5:45 am | सुनील
एक ऐकलेला किस्सा -
एका समारंभात चार्ली चॅप्लीन आणि आईनस्टाईन यांची गाठ पडते.
चॅप्लीन : सगळे जग तुमच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताची वाहवा करतेय. पण तो समजायला फार अवघड आहे, असे म्हणतात. जरा आमच्या अल्पबुद्धीला समजेल अशा शब्दात सांगाल का?
आईनस्टाईन : सोप्पं आहे. आता हे बघा, समजा तुम्ही तुमच्या प्रेयसीची वाट पाहात आहात. वाट पाहण्यात गेलेली ५ मिनिटे तुम्हाला ५ तासांप्रमाणे भासतात की नाही?
चॅप्लीन : अगदी बरोबर!
आईनस्टाईन : आणि ती आल्यानंतर, तिच्या समवेत घालवेले ५ तास हे ५ मिनिटांप्रमाणे भुर्रकन उडून जातात की नाही?
चॅप्लीन : कसं बोललात!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
19 Apr 2009 - 2:52 pm | Nile
सुरेख!
19 Apr 2009 - 6:18 am | क्रान्ति
धनंजय यांचा लेख तसेच वाहिदा व सुनिल यांच्या प्रतिसादातील किस्से आवडले. या विषयावर आणखी माहिती वाचायला मिळाली तर हवीच आहे. आपल्या उपक्रमाचं स्वागत आणि शुभेच्छा.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
19 Apr 2009 - 11:23 am | राघव
श्री. नारळीकरांच्या "आकाशाशी जडले नाते" मधे मी सुद्धा हा विषय खूप काळजीपूर्वक वाचला होता.
[तेव्हा बरेचसे समजले होते. आता पुन्हा सगळे सपाट झालेले आहे. :) ] खूप सोप्या भाषेत त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. कदाचित लेख लिहितांना तुम्हाला त्याची मदत होईल.
बाकी कॉलेज मधे असतांना आम्हालाही या दोन theories अभ्यासाला होत्या. पण तेव्हा ते डोक्यावरूनच गेलेले. :D
तुम्हाला लेखासाठी शुभेच्छा! वाट बघतोय.
राघव
20 Apr 2009 - 7:46 am | अवलिया
वा! छान लेख आणि त्याहुनही छान प्रतिसाद ! :)
--अवलिया
20 Apr 2009 - 10:37 am | दीपक साळुंके
अच्युत गोडबोले यांच्या 'किमयागार' या पुस्तकात या बद्दलची सोप्या पद्धतीने मांडलेली माहिती वाचण्यात आली होती. संदर्भ म्हणुन पाहायला हरकत नाही.
असो. तुमच्या लेखाच्या प्रतिक्षेत !
-- दीपक साळुंके
20 Apr 2009 - 10:57 am | महेश हतोळकर
हेच लिहीणार होतो. हे पण पहा. लेखाची वाट पहातो आहे.
20 Apr 2009 - 10:46 am | वेताळ
पण राज ठाकरे व वरुण गांधी ह्यानी कधी आईन्सटाईन वर टिका केली आहे? माझ्या वाचनात आली नाही. कुणी लिंक देईल काय?
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
20 Apr 2009 - 1:31 pm | मराठीप्रेमी
खालील दुवे कदाचीत तुम्हाला उपयुक्त ठरतील.
http://www.youtube.com/watch?v=wteiuxyqtoM
http://www.youtube.com/watch?v=C2VMO7pcWhg
http://www.youtube.com/watch?v=KHjpBjgIMVk
http://www.youtube.com/watch?v=tnQnAaVGPK0
http://www.youtube.com/watch?v=QA39FKsLdJc
20 Apr 2009 - 7:33 pm | टायबेरीअस
सगळ्याना धन्यवाद! एक गोष्ट मात्र कळली की आईन्स्टाईन काका नी फार गंमत करून ठेवलेली आहे जाता जाता! नाहीतर एकही शब्द न लिहिताच रीलेटीविटी ने , 'देव' , 'ईश्वर', 'मेंदू' , 'अस्तित्ववाद' असे विषय झटकन प्रकाशात आणले नसते....
सगळ्यानी इतके मात्र ध्यानात घ्या की मनुष्य सतत पुढे जात असतो.. We are as a species, still Evolving ! याचाच अर्थ असाही घ्या की आपणच आपल्याला 'Contradict' करणरोत. मी जे आज बरोबर समजतो आहे ते उद्या बरोबर असेलच असे नाही. तेव्हा 'ओपन माईंड' किंवा 'उघड्या मना' ने विचार घ्या, विचार करा, विचार मांडा.. कोणी कोणावर ' पर्सनली' कॉमेंट करू नका प्लीज,.. अन्यथा विषयाचा 'कॅफे' होतो :):)
बरेच 'मटेरीअल' वाचायला दिलेत सगळ्यानी. आता थोडा वेळ घेतो लिहायला !
-टायबेरीअस
मै तो अकेले ही चला था जानिबे ए मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
22 Apr 2009 - 7:42 am | विसोबा खेचर
नक्की लिहा साहेब, वाट पाहतो..
बाकी विज्ञान जिथे संपते ती तर ईश्वरी अस्तित्वाची सुरवात असते. मानवाने विज्ञानाच्या नावाखाली स्वत:ला ईश्वरापेक्षा, नियतीपेक्षा शहाणे समजू नये!
तात्या.
23 Apr 2009 - 9:37 pm | रामपुरी
मी एक मराठी पुस्तक वाचलं होतं. ही गोष्ट १९९६ मधली आहे. म्हणजे पुस्तक त्या अगोदरचे असले पाहीजे. आता नाव आठवत नाही (आणि लेखकसुद्धा) पण ते कोल्हापूरात करवीर नगर वाचन मंदिरात मिळाले होते (हे पुस्तक चांगलं जाडजूड होतं). त्याशिवाय एक रशियन (मराठी भाषांतरीत) पुस्तकही मिळते. हे एकदम छोटे आणि सुंदर पुस्तक आहे. याचा लेखकही आठवत नाही. बहुधा "मीर प्रकाशन" असावे आणि लेखक "या पेरेलमान".
23 Apr 2009 - 10:40 pm | नाटक्या
Physics for Entertainment हे त्या पुस्तकाचे नाव आहे. बरे आहे.
- नाटक्या