लोक्स,
आपण चित्रपट पहात असालच. काही चित्रपट आवडतात, काही नाही आवडत, खरे की नाय ?
पण एखादा चित्रपट आवडला, तर कधी तो पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो ! खरे की नाय ?
माझ्या ओळखीतल्या एका इसमाने, "कयामत से कयामत तक" हा चित्रपट दररोज एकदा, ह्या दराने सलग तीस दिवस पाहिला होता.
असा अतिरेक पण करणे फारसे बरोबर नाही, पण तरीही, आवडलेले चित्रपट आपण एकापेक्षा अधिक वेळा पाहतो, हे सत्य आहे.
ह्या काथ्याकुटात आपण सर्वाधिक वेळा पाहिलेल्या चित्रपटांची नावे (हिंदी, मराठी, इंग्रजी, तमीळ, तेलगू, भोजपुरी कुठलाही चालेल), किती वेळा पाहिला, आणि वारंवार पाहण्याचे कारण, हे लिहावे.
माझ्यापासून सुरुवात करतो.
मी वारंवार पाहिलेले चित्रपट असे:
शोले, २० वेळा, कारणे - बसंती, गब्बर, जय, वीरू, ठाकूर, आणि ठाकूरची विधवा सून (सर्वात महत्वाचे कारण. पुढे बघा: गुड्डी)
मैने प्यार किया, १६ वेळा, कारणे - भाग्यश्री, भाग्यश्री, भाग्यश्री, आणि कबुतर जा जा जा.
गुड्डी, १४ वेळा, कारणे - जया भादुरी
गॉडफादर, १२ वेळा, कारणे - पृष्ठ क्रमांक २२. सूज्ञांस आणखी सांगणे न लगे. आणि मायकेलचे सिसिलीमधले वास्तव्य.
एकटा जीव सदाशिव, १० वेळा, कारणे - दादा, आणि शरद तळवलकर
पांडू हवालदार, १० वेळा, कारणे - दादा.
जाने भी दो यारो, ६ वेळा, कारणे - थोडा खाओ, थोडा फेको. सतीश शहा, ओम पुरी.
आता तुमचे येऊ द्या...
प्रतिक्रिया
17 Apr 2009 - 1:34 pm | बाकरवडी
रामू की - आग :-४० वेळा , कारणे :- मला आगी लावायला आवडते !
:B :B :B बाकरवडी :B :B :B
17 Apr 2009 - 11:30 pm | सुहास
रामू की फून्क -२ वेळा...
कारणे :- मला आग विझवायला आवडते !!! ;)
सुहास
19 Apr 2009 - 11:00 am | टारझन
काही पिक्चर अणंतवेळा पहाण्यात आलेले आहेत... पण खाली कोणीत उल्लेख केलेला दिसत नाही ,, म्हणून आम्ही गप्प बसतो ..( आणि आता त्याची कारणे काय द्यावी बरं ?)
(मांसाहारी) टारझन
20 Apr 2009 - 11:26 am | बाकरवडी
(मांसाहारी) टारझन
मांसाहारी म्हण्जे णॉण्व्हेज ना ओ टारझण ?
आपणांस असेच आवडनार! कारणे द्यायला लाजू नका. ;) ;)
:B :B :B बाकरवडी :B :B :B
17 Apr 2009 - 1:40 pm | चिरोटा
टी.व्ही. चॅनेल्स्चे पीक आले नव्हते तेव्हा चित्रपट एकदाच बघायला मिळायचा.चुकून दूरदर्शनवर दुसर्यांदा लागला तर परत बघता यायचा.नाहीतर कुठल्यातरी टॉकीजमधे.
मैने प्यार किया(२)
शोले(२)
चॅनेल्स्चे भरघोस पीक आल्यावर चित्रपट अनेक्वेळा बघता येऊ लागले.
कयामत से-(४),हेराफेरी (३),अमर्,अकबर..(४),राजू बन गया(४),ऍतराज(३),हन्गामा(३),वास्तव्(३),दिलवाले दुल्हनिया(३).
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
17 Apr 2009 - 1:50 pm | मिसळभोक्ता
कयामतसे (५), कारण - जुही चावली
हेराफेरी - (२) - कारणे - परेश राव - तेरेको गाना आता हैक्या ? क्योंकी संडास की कडी टूटी है, आणि विहिरीला वॉलपेपर
अमर अकबर (२) - कारणे - बच्चन
ऐतराज ?? मला ऐतबार (सुरेश ओबेरॉय, डिंपल, राज बब्बर) जास्त आवडला. "डायल एम फॉर मर्डर" ची सुंदर प्रत !
बाकी डीडीएलजे - एक वेळा खूप.
-- मिसळभोक्ता
17 Apr 2009 - 1:40 pm | मेघना भुस्कुटे
हम हैं राही प्यार के: आधी मुलांची मस्ती, मग आमीर-आमीर-आमीर, मग आमीर-जूहीचा रोमान्स, मग त्यातलं संगोपनशास्त्र, मग नॉस्टाल्जिया... किती वेळा पाहिला त्याला गणतीच नाही.
मुगल्-ए-आझम: गाणी-गाणी-गाणी, मग कितीतरी वेळा 'ये कनीझ मुहम्मद जलालुद्दीन अकबर को अपना खून मुआफ करती है', मग कितीवेळा नुसती 'मधुबाला'... खूपच वेळा पाहिला.
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे: अर्थात शाहरुख-काजोलची केमिस्ट्री-फ्रेशनेस-रोमान्स, मग गाणी, एकदा तर सिनेमाची आठवण
आली म्हणून, कधी सोबत म्हणून. अक्षरश: अनंत वेळा.
प्रीटी वुमनः लहान असताना ज्युलिया आवडायची म्हणून, मग रिचर्ड गिअर आवडायला लागला म्हणून कधी पाहायला लागलो कळलंच नाही, मग एकदा तिच्या उत्फुल्ल सुंदर ड्रेसेससाठी. अनेक-अनेक-अनेकवार शेवटच्या सीनकरता दबा धरून बसून.
शॅल वी डान्सः आतापावेतो निव्वळ रिचर्ड गिअर हेच पुरेसं कारण होतं, मग गाणी खूप आवडली, मग त्यातलं ते 'आनंदात जगा, स्वतःला आवडतं ते करा' सूत्र खूप आवडलं म्हणून, शिवाय त्यातल्या डिटेक्टिव्ह नि त्याच्या असिस्टंटसारखी बिनमहत्त्वाची पात्रंही खूप गोड नि ठसठशीत रेखाटलीयेत म्हणूनही. पण हे कारण तसं वरच्या बर्याच सिनेमांनाही लागू होतं.
चुपके चुपके, गोलमाल, खूबसूरतः कारण सांगायला हवं? निव्वळ प्रसन्न होण्यासाठी, मूड सुधारण्यासाठी. किंवा खरं तर कारण तरी कशाला हवं?
आणि असे खूप खूप सिनेमे. पुस्तकांच्या इतकेच. पण एका वेळी चारच एण्ट्रीजचं बंधन घालून थांबते.
17 Apr 2009 - 1:52 pm | मिसळभोक्ता
हम है राही प्यार के, ३ वेळा, कारणे - जुही चावली.
प्रिती वुमन, २ वेळा, कारणे - जुलिया राबर्ट
-- मिसळभोक्ता
17 Apr 2009 - 9:19 pm | भाग्यश्री
आईग.. तुलाही शॅल वी डान्स आवडतो??! \:D/
मला भयंकर आवडतो तो पिक्चर..
रिचर्ड गीअरही खूप आवडतो! :)
तुझी आख्खी लिस्टच पटली!
www.bhagyashree.co.cc
18 Apr 2009 - 12:30 pm | milindrasal
मला हि हा पिक्च्र्र आवड्तो कारण दिलिप कुमार , मधुबाला,प्रुथ्विराज कपूर्,नाना पल्शिकर्,दुर्गा खोटे, आणि गाणि सर्वच.
17 Apr 2009 - 1:50 pm | ऍडीजोशी (not verified)
टर्मीनेटर २ - एकूण ४७ वेळा पहिल्यावर नंतर काउंट ठेवला नाही.
शोले - ३४ वेळा पहिल्यावर नंतर काउंट ठेवला नाही.
मुन्नाभाई एम. बि. बि. एस. - २२ वेळा. ह्यावर आम्ही स्पूफ करून एका क्लायंट साठी ए. व्ही. बनवली होती.
ऑस्टीन पॉवर्स चे सगळे पार्ट्स - किमान १८-२० वेळा प्रत्येक पार्ट पाहिला आहे. भयानक विनोदी आहे.
द मेट्रिक्स - १४ वेळा. फंडा पूर्ण समजायला ३-४ वेळा पहावा लागला. मग समजल्यावर नंतर बघायला अजूनच मजा जायला लागली.
३०० - थेटर मधे आठवडाभर जाऊन रोज बघायचो. मग सि. डी. घेतली. टोटल किमान २० वेळा तरी पाहिलाय.
मोटरसायकल डायरीज - किमान १२-१४ वेळा पाहिलाय. क्युबन रिवॉल्यूशनीस्ट 'अर्नेस्टो शे ग्वारा'चा मोटरसारकवरून प्रवास नी त्यातून त्याची झालेली मानसीक जडण घडण. भन्नाट सिनेमा.
द वर्ल्ड्स फास्टेस्ट इंडीयन - १०-१२ वेळा पाहिलाय. रिटायर व्हायच्या वयात आपल्या 'इंडीयन' बाईक वर लँड स्पीड रेकॉर्ड बनवायला निघालेल्या माणसाची कथा. अँथनी कॉपकीन्स च्या अभिनयाला सलाम.
अशी ही बनवाबनवी - असंख्य वेळा
(अजून खूप सिनेमे आहेत. सवडीने लिहेन.)
17 Apr 2009 - 1:56 pm | मिसळभोक्ता
मुन्नाभाई एकदाच, कारण ती हिरोईन, सगळे गोड गोड, गुळाच्या पाकासारखे, डोक्यात जाते. सर्किटचे पार्ट वेगळे काढून सिनेमा बनवला, तर बघण्यासारखा सिनेमा.
-- मिसळभोक्ता
17 Apr 2009 - 9:43 pm | हरकाम्या
अरे मिसळ्भोक्त्या,
लेका तुला एचढे सिनेमे बघायला वेळ कसा मिळतो आणि पैशांचे काय ? तु थेटरवर डोअरकीपर म्हणून काम करत
नाहीस ना ???????
18 Apr 2009 - 4:37 pm | शिवापा
मी ऑफिसात अर्धा टाइम पिच्च्रर विषयीच बोलतो. इन्स्पायर करण्यासाठी दुसरा चांगला मार्ग नाहि. बुद्ध, गिता, गांधी, क्रिकेट आणि बॉलिवुड शिवाय भारत पुर्ण होत नाहि असे माझे पर्सनल मत आहे. झोडा.... झोडा... हवं तर!
25 Sep 2009 - 9:01 am | सुधीर काळे
काय राव! दोन्ही "मुन्नाभाई"त सर्किट (अर्शद वारसी)च फक्त जान आणतो! दुसरा हिरो म्हणजे बोमन इराणी-डीन व बिल्डरचे काम केलेला!! बाकी सारे मिथ्थ्या!
संजय दत्त तर एकदम भंकस. त्याचा रोल कुणीही केला असता!!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
25 Sep 2009 - 10:17 am | विशाल कुलकर्णी
१००% सहमत ! मी तर म्हणेन संजय दत्त सोडला तर बाकी सगळीच पात्रे सुरेखच होती. एक ती हिरोइन (दोन्ही चित्रपटातली) सोडली तर.
बाकी आमचा काऊंट...
शोले : गब्बरसिंग : २७ वेळा पाहिल्यावर मोजणे सोडुन दिले.
जंजीर : बच्चनच्या डोळ्यातला अंगार :किती वेळा पाहीला ते आठवत नाही.
दीवार : मै आज भी फेके हुये पैसे नही उठाता .... गणना नाही
तसे खुप चित्रपट आहेत.... लिस्ट मोठी आहे.........:-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
17 Apr 2009 - 2:41 pm | हर्षद बर्वे
बरेच जण आत्यंतिक, कल्पनातीत ई. म्हणावयाचे असते त्या ठिकाणी भयानक, भयंकर असे शब्द वापरतात....
भयात्कारी शब्दप्रयोग असेल तेंव्हा ठिक आहे....पण भयंकर आनंद झाला, बासुंदी भयानक गोड होती....अशी वाक्ये रुचत नाहीत. त्या ठिकाणी योग्य शब्दप्रयोग व्हावेत असे मला वाटते.
हर्षद बर्वे(एच.बी.)
17 Apr 2009 - 3:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बर्वे, तुमचा प्रतिसाद भयानक अवांतर आहे, तुम्हाला भयंकर आवडलेले चित्रपट कोणते हो? (ह. घ्या)
मला एकदा पिच्चर पाहून समजतं, आपल्याला हा(ही) पिच्चर समजणार नाही, मग उगाच का वेळ फुकट घालवा? पण कधीकधी आशा असते हा (तरी) पिच्चर समजेल मग बघते पुन्हा पुन्हा! उदा: शॉशँक रीडंप्शन, सिंहासन, सामना (सगळ्यात खत्तरनाक अभिनय आणि सशक्त कथा). इतर बरेचसे आवडते कॉमेडी सिनेमांबद्दल अनेकांनी लिहिलं आहेच. दिलवाले ... आवडला नव्हता, पण भडकमकर मास्तरांनी मिपावर लिहिलेलं "परीक्षण" वाचून पुन्हा एकदा पाहिला, आणि तुफान हसले.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
17 Apr 2009 - 2:01 pm | घाटावरचे भट
मायला, आत्तापर्यंत 'अंदाज अपना अपना'चं नाव कसं नाय आलं? आपण य वेळा पाहिलाय तो सिनेमा.
17 Apr 2009 - 2:09 pm | मिसळभोक्ता
अंदाज अपना अपना मी पण दोनदाच पाहिला. मला खरा तर तो खूप आवडलेला सिनेमा, पण ज्या काळात तो सिनेमा आवडला, तो काळ माझ्याकरता जरा कठीण काळ होता, म्हणजे मी कामात व्यग्र होतो, अन्यथा अधिक वेळा पाहिला असता, नक्कीच.
-- मिसळभोक्ता
17 Apr 2009 - 6:29 pm | रामदास
मी पण आणि य टेंड्स टू इन्फिनीटी.
20 Apr 2009 - 1:23 pm | मैत्र
जवळजवळ सगळे संवाद पाठ झाले !!
17 Apr 2009 - 2:01 pm | नंदन
वरील यादीत न आलेले एक नाव - अंदाज अपना अपना संपूर्ण असा दोनदाच पाहिला. पण कुठलंही पान उघडून वाचायला सुरूवात करावी तसे त्यातले रँडम सीन्स कितीदा पाहिले त्याची मोजदाद नाही.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Apr 2009 - 2:06 pm | रम्या
आम्हाला बाबा एकदाच बघितल्यावर सिनेमा समजतो =))
आम्ही येथे पडीक असतो!
17 Apr 2009 - 2:21 pm | मिसळभोक्ता
असे तुला वाटते.. :-)
-- मिसळभोक्ता
17 Apr 2009 - 3:09 pm | मेघना भुस्कुटे
असे तुला वाटते...
=))
=))
=))
खतरनाक!!!!!!
17 Apr 2009 - 2:14 pm | यशोधरा
हम दिल दे चुके सनम (२५) - :D
उत्तरायण (१०) - नीना आणि साटम यांचा अभिनय
संत तुकाराम - अगणित. दर वेळी तेवढाच भावतो.
रोमन हॉलिडे - हा सिनेमा म्हणजे केवळ नजाकत आहे! अगणित वेळा.
शोले (१५) - सिर्फ नामही काफी है!
अंदाज अपना अपना (१०) - अख्खा सिनेमा मस्त आहे म्हणून!
लिस्टमधे नंतर अजून भर टाकते.
18 Apr 2009 - 4:39 pm | शिवापा
रोमन हॉलिडे - हा सिनेमा म्हणजे केवळ नजाकत आहे! सहमत. म्हणजे एकदम स-ह-म-त!
17 Apr 2009 - 2:22 pm | सूहास (not verified)
१) डाय हार्ड-३ ====२५
२)द गर्ल एन्ड बॉ॑य थि॑ग=====३८ वेळा
३)द फर्म====१० वेळा
४)लॉर्ड ऑफ द रि॑ग ====डि व्ही डी रिलीज झाल्यापासुन दर आठवड्याला एकदा
५)बिहा॑ईड द एनिमी लाईन्स.====१५ ते २० वेळा
६)एलियन्स ==१० ते १५ वेळा
७)ग॑गाजल===१५ ते २० वेळा
८)कायद्याच बोला=======५० ते ६० वेळा(डायलॉ॑गस पाठ आहेत)
९)ग॑गा जमुना(दिलीप कुमारचा)....३० ते ४० वेळा
१०)हम साथ साथ है.......१० ते १५ वेळा
सुहास
मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..
17 Apr 2009 - 2:33 pm | मिसळभोक्ता
हा प्रतिसाद बाद ठरवला आहे, कारण कारणे दिलेली नाहीत.
फर्म विषयी बोलायचे, तर कादंबरी अधिक सुंदर आहे. तसेच लॉर्ड ऑफ द रिंगचे.
-- मिसळभोक्ता
17 Apr 2009 - 3:25 pm | सूहास (not verified)
१) डाय हार्ड-३ ====२५(व्हिलन रिडल्स घालतो म्हणुन,थेट पहिल्या सीन पासुन)
२)द गर्ल एन्ड बॉ॑य थि॑ग=====३८ वेळा(स्त्री च्या शरीरात पुरषाच मन आनी वाईस वर्सा)
३)द फर्म====१० वेळा(टॉम क्रुस चा डेब्यु)
४)लॉर्ड ऑफ द रि॑ग ====डि व्ही डी रिलीज झाल्यापासुन दर आठवड्याला एकदा(खतरनाक अनिमेशन)
५)बिहा॑ईड द एनिमी लाईन्स.====१५ ते २० वेळा(एकट्या माणसाची शत्रुदेशात जगण्यासाठी आणी सुटण्याची धडपड )
६)एलियन्स ==१० ते १५ वेळा(खतरनाक साय-फाय)
७)ग॑गाजल===१५ ते २० वेळा(अजय देवगण आणी ईतर मंडळीचा खरर्नाक अभिनय)
८)कायद्याच बोला=======५० ते ६० वेळा(डायलॉ॑गस पाठ आहेत) कारण द्यायची गरज नाही तरीपण देतो...आपल्या मक्या..
९)ग॑गा जमुना(दिलीप कुमारचा)....३० ते ४० वेळा...दिलीप कुमारचा अप्रतीम अभिनय तसा मी नया दोर,देवदास आणी मुगले आजम पण बर्याच वेळा पाहीला आहे,,
१०)हम साथ साथ है.......१० ते १५ वेळा(आम्ही तीन भाउ, मोठ्याच लग्न झाल आणी सगळ्या॑च झाल तरी एकत्र रहाणार्,धानोरीत ब॑गल्याच काम चालु आहे.)
17 Apr 2009 - 8:17 pm | योगी९००
शोले १५ नंतर गणती थांबवली.
अंगूर/गोलमाल २५ नंतर गणती थांबवली.
300/Sound of Music/Charli Chaplin movies/ प्रत्येकी १५ वेळा
My cousin Vinny किमान १०० वेळा. (कायद्याचे बोला हा चित्रपट ह्या पिक्चर वरून घेतला आहे. कायद्याचे बोला अतिशय टुकार वाटतो. मक्याला १ % ही भुमिका जमली नाहीये). एकदा हा मुळ चित्रपट बघा.
खादाडमाऊ
खादाडमाऊ
17 Apr 2009 - 9:28 pm | भाग्यश्री
My cousin Vinny बद्दल अतिशय सहमत! यासारखा पिक्चर होणे नाही! इथे जवळपास दर २ आठवड्यांनी टीव्हीवर लागतो.. बर्याचदा संपला की परत सलग दुसर्यांदा लागतो..आम्ही तो ही पाहतो!
तोड नाही याला! कायद्याचं बोला नुसता बघितला तर चांगला आहे.. पण पैला नंबर माय कझिन विनी!
www.bhagyashree.co.cc
17 Apr 2009 - 2:33 pm | सँडी
बॉम्बे : संपुर्ण - एकदाच.
मध्यंतरापर्यंत - अंदाजे १५०-२००वेळा, कारणे - (मिळती जुळती) प्रेमकथा.
रोजा : १५-२० वेळा (कथानक)
हेरा फेरी : ८-१० वेळा (संवाद)
वास्तव : ५-६ वेळा (कथानक)
भेजा फ्राय: ५-६ वेळा (कथानक)
ओशिएन्स-११,१२ ४-५वेळा(कथानक)
ओशिएन्स-१३ एकदा (कथानक)
ट्रॉय : ४-५वेळा (कथानक)
इतर अनेक...
-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
17 Apr 2009 - 3:01 pm | दिपक
ग्रेव्ह ऑफ द फ़ायर फ़्लाईज हा अप्रतिम सिनेमा एकदा बघितला तर परत बघावासा वाटणार नाही. कारण काय आहे हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
किती वेळा ते नक्की आठवत नाहित पण बर्याचवेळा पाहिलेले...
अशीही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा, अष्टविनायक आणि गंमत जंमत...
शोले, गोलमाल, आनंद, छोटीसी बात, अर्धसत्य, सरफ़रोष,चुपके चुपके, दिवाना मस्ताना, हम आपके है कौन, जो जीता वही सिंकदर आणि अंदाज अपना अपना..
बिहाइन्ड एनिमी लाइन्स, रेंबो (सगळे भाग), एन्टर द ड्रॅगन, ३००, डार्क नाईट्स...
सध्या एवढेच आठवतात....
17 Apr 2009 - 2:48 pm | नितिन थत्ते
शोले : ३ वेळा (कारण सांगण्याची काही गरज नाही)
बेताबः ६ वेळा (कारण काहीही नाही. नटराजला लागला होता. जातायेता पाहिला आहे)
जमाने को दिखाना है: ५ वेळा (बेताब प्रमाणेच)
सत्ते पे सत्ता: ३ वेळा (राहणीमान होस्टेलमधील आमच्या राहणीशी मिळतेजुळते होते. जवळचा वाटला)
चष्मेबद्दूरः २ वेळा
दीवार, त्रिशूल, चुपके चुपके, वगैरे अनेकः मोजले नाहीत
हे थेटरात पाहिलेल्या सिनेमाविषयी असावे.
(पवन ट्रॅवल + घाटगे पाटील ट्रान्स्पोर्ट च्या कृपेने मुंबई रत्नागिरी मुंबई प्रवासात तेच तेच सिनेमे अगणितवेळा)
खराटा
(रंग माझा वेगळा)
17 Apr 2009 - 3:28 pm | अमोल केळकर
अवांतर प्रतिसादः ट्रॅव्हल्स वरुन आठवले . प्रवासात गदर सिनेमा (|: साधारण १० वेळा तरी पाहिला असेन !
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
17 Apr 2009 - 3:33 pm | घाटावरचे भट
गंमत....मी वर अंदाज अपना अपना विषयी लिहिलं आहे. तो सिनेमा मी शाळेत असताना जळगाव-पुणे बशीत प्रथम पाहिला. आवडला. घरी आणून व्हिडीओवर पुन्हा पाहिला. अजून आवडला. मग त्यानंतर आजतागायत अनेक वेळा पाहिला आहे. त्यातल्या विनोदाची लेव्हल उच्च आहे.
18 Apr 2009 - 8:29 pm | सूहास (not verified)
सुहास
मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..
17 Apr 2009 - 2:59 pm | मराठमोळा
चांगला धागा आहे.
माझे काही आवडते आणी पुन्हा पुन्हा पहावेसे वाटणारे (काऊंट ठेवलेला नाही )सिनेमे (कारणे अनेक आहेत, समीक्षण लिहावे लागेल त्यामुळे लिहायचे टाळतोय)
मराठी
१. पिंजरा
२.अशी ही बनवा बनवी
३. सातच्या आत घरात
४. रात्रारंभ
५.वास्तुपुरुष
६. सरकारनामा
हिंदी
१. गाईड
२. जुएल थिफ
३. मै चुप रहुंगी
४. मदर ईंडिया
५. पडोसन
६. पेज थ्री
७. दिल चाहता है
ईंग्रजी
१. फेस ऑफ
२. पे-चेक
३. कॅच मी ईफ यु कॅन
४. द लास्ट समुराई
५. सायको
६. स्केरी मुवी सगळे भाग ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
17 Apr 2009 - 4:15 pm | पाषाणभेद
येनारा परतेक शिणुमा मी लई येळा पघतो. त्या मुले आसे कौल मन्जे लय भुक्क्ड हायती माझ्यासमुर.
म्या फुकट पास पन द्येतो. कुणाला पायजे आसल तर व्य. नी. करा, नाय तर थेटरवर येवून, "पाषाण्या कुठे आहे ? ", हे कोनालाबी ईचारा. कोनबी सांगन.
"अरे ए राम्या, माझी बॅटरी कुठे हाय रे ल्येका? सालं लोग पन ना शिनेमा चालु व्हायच्या आधी येत न्हायत"
मी दादा कोंडकेंचे सिनेमे कमीतकमी ३ / ३ वेळा बघीतले आहेत. बाकी हिंदी सिनेमावर दोन दोनदा पैसे खर्च करत नाही, आणि डोक्याला ताण पण करुन घेत नाही.
अशी ही बनवाबनवी -२
धमाल - ९ (माझ्या मुलाबरोबर)
एक डाव भुताचा -२
बाल शिवाजी -२
मुन्नाभाई -२
शोले -४
सौदागर -२ (लागोपाठ शो कॉलेज बुडवुन)
कश्मीर की कली -२
आपण थेटरातच सिनेमा बघतो त्यामुळे एश करुन चालत नाही.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
17 Apr 2009 - 3:31 pm | क्लिंटन
मी हिंदी चित्रपटांमध्ये अंगूर ५० वेळा तरी बघितला असेल. त्यात संजीव कुमार आणि देवेन वर्माचा डबल रोल पोट धरधरून हसायला लावतो. कितीही वेळा बघितला तरी तेवढेच हसायला येते. मराठीमध्ये कायद्याचे बोला. मकरंद अनासपुरे चा आवाज आणि शैली नवीन असताच्या काळात असाच ३०-४० वेळा बघितला असेल.आजही त्याचे संवाद आठवतात.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
17 Apr 2009 - 3:37 pm | घाटावरचे भट
यस. अंगूर कसा विसरलो मी.... बारावीत असताना प्रथम पाहिला. मग कुठूनतरी व्हीसीडी मिळवून पारायणं केली. आजही कंटाळा आला की अंगूर पाहातो, छान वाटतं.
-भटोबा
'चलो इंपीरियल हॉटेल. लेकिन हम वहां ठहरने वाले नहीं हैं. वहां उतरकर हम कहीं और चले जाएंगे' इति संजीवकुमार फ्रॉम अंगूर.
17 Apr 2009 - 3:46 pm | जागु
मी किती वेळा पाहीले ते मोजले नाहीत पण बर्याच वेळा पाहीलेले.
शोले
मैने प्यार किया
हम दिल दे चुके सनम
दिल वाले दुल्हनीया ले जायेंगे
हम है राही प्यार के
हम साथ साथ है
गम्मत जम्मत
कर्ज
बॉबी
मेरा नाम जोकर
हरीयाली और रास्ता.
अजुन असतील बरेच. पहीला खुप बघायचे आता वेळ नसतो . एखादा पण मुश्किलीने पाहाते.
17 Apr 2009 - 4:48 pm | खालिद
१. गुंडा: - (मिथुन, इर्शाद अली, मुकेश ऋषी,कांति शाह, शक्ती कपूर, दीपक शिर्के या सर्व कंपनीसाठी आणि आत्तापर्यंत मी ऐकलेल्या सर्वात परिणामकारक संवादांसाठी)...५० नंतर गणती सोडली.
२. लोहा: - (गुंडाप्रमाणेच...तसे बघायला गेल्यास गुंडा हा लोहाचा छोटा भाऊच आहे.).........५० नंतर गणती सोडली.
३. डॉन मुथ्थुस्वामी.: ----(फक्त मिथुन साठी) ----५ वेळा.
४. दो अंजाने ( मनिषा कोईराला, अतुल परचुरे आणि संजय कपूर यांची ऑस्करविजेत्यांच्या तोडीचा अभिनय पाहायला):-- २ वेळा
५. चांदनी चौक टू चायना (कोण म्हणतं की कराटे , कुंग फू फक्त चिनी, जपानी चित्रपटांमध्ये असतात? आपण भारतीय त्यातही मागे नाही अशी मनाची समजूत घालण्यासाठी) ......२ वेळा
६. टायटॅनिक (चित्रपटविषयक सौंदर्यमूल्ये कळायच्या आधी १० वेळा आणि चित्रपट कशाशी खातात हे कळल्यावर २० वेळा).....
७. सरकारनामा (आमदार मालविका पटेल यांचे अभिनय कौशल्य पाहण्यासाठी आधी, दिग्गज मंडळींसाठी नंतर) ... ७० नंतर गणती सोडली.
८. थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला, धूमधडाका, पछाडलेला....(फक्त "डॅम इट!!" हे ऐकण्यासाठी)......४० वेळा मिनिमम ईच
९. रेहना है तेरे दिल में ( पहिला अर्धा तास फक्त...प्रत्येक वेळी सिनेमा पाहिला तेव्हा.....फक्त मॅडी, सॅम आणि त्याचं कॉलेज; बासं!!!!! नंतर मुलीची येंट्री आणि सिनेमा बाराच्या भावात)........५० नंतर ग. सो.
१०. नाथा पुरे आता ( सहनशक्तीची परिक्षा घेण्यासाठी ) २-वेळा
तूर्त एवढेच
जसे लक्षात येतील तशी भर घालीन म्हणतो.
17 Apr 2009 - 4:54 pm | लिखाळ
संत तुकाराम ! अनेक वेळा
चित्रपटातील सर्व पात्रांचा अभिनय अतिशय आवडतो. संवाद, भजने अतिशय आवडतात. वातावरण निर्मिती आवडते. कितीही वेळा पाहिला तरी पुन्हा पहावा असा वाटतो.
भागवत धर्माचे म्हणणे काय हे सांगणारा प्रसंग, शिवाजीचा नजराणा आव्हेरतानाचा अभंग, धान्याने भरलेले घर गोरगरीबांना खुले करतानाचा प्रसंग फार उत्तम वाटतात.
-- लिखाळ.
17 Apr 2009 - 5:28 pm | अनामिक
कितीवेळा ते मोजले नाही... पण एकापेक्षा जास्तंवेळा पाहीलेले खाली दिलेत...
अशी ही बनवा बनवी
माझा पती करोडपती
सिलसिला
शोले
लगान
जब वुई मेट
यु हॅव गॉट अ मेल
सेरेंडीपिटी
नॉटींग हिल
स्लीपलेस इन सियाटल
वन फाईन डे
डाय हार्ड १, २, ३
प्रिटी वुमन
एरिन ब्रोकोवीच
ब्युटीफुल माईंड
शॉशँक रिडेम्प्शन
गॉडफादर
मेन ऑफ ऑनर
सायलेंस ऑफ द लँब्स्
आणि भरपूर आहेत.....
-अनामिक
17 Apr 2009 - 5:39 pm | परिकथेतील राजकुमार
प्रामाणीक उत्तरे दिल्यास आपला हा धाग आणी आमचा प्रतिसाद दोन्ही गायब व्हायची शक्यता आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
17 Apr 2009 - 5:51 pm | निखिल देशपांडे
सहमत परा......
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
17 Apr 2009 - 9:16 pm | सँडी
प्रामाणीक उत्तरे दिल्यास आपला हा धाग आणी आमचा प्रतिसाद दोन्ही गायब व्हायची शक्यता आहे.
=)) =)) लै भारी!
आकाशातले तारे मोजणारा जन्माला यायचाय अजुन! 8}
-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
18 Apr 2009 - 4:50 pm | शिवापा
टाका. टाका म्हणजे टाकाचं. एकदा कॉलेजात दुस-या दिवशी प्रयोग परिक्षा म्हणुन सगळे मित्र परिक्षा कशी महत्वाची आहे म्हणुन कट्ट्यावरुन सटकले. थोड्या वेळाने सहाचा शोला सगळे एकमेकांना फसवुन थेटरात हजर. पिच्चरचे नाव मान्सुन. जगमोहन मुन्द्राचा पिच्चर. पण जे पोष्टरात दिसते ते शिनेमात गायब. कट केला असावा म्हनुन प्रयोग परिक्षा संपल्यावर पुन्हा दुस-या दिवशी पाहिला तर पहिल्या दिवसाचे काहि तुकडे पण कट. तिच्यायला! ठरवले आता अभ्यास करायचा आणि सॉफ्टवेअर मधे जायचे. परमेश्वराला ते आवडले. नंतर कट न केलेला आ़ख्खा पिच्चर जालावर मिळाला. किती वेळा पाहिला ते विचारु नका.
जालींदर जलालाबादी हे केवळ यामुळेच देवदुत आहेत का? हा प्रश्न पडतो.
17 Apr 2009 - 5:48 pm | Suhas Narane
चांदनी चौक टू चायना,माझा पती करोडपती, शोले, लगान
खुप वेला पाहीले.
शाम्च्यी आयी सार्के पण कुप पाहीले
18 Apr 2009 - 2:18 pm | शक्तिमान
सरफरोश - आमीर खानसाठी, मुकेश रिषीच्या त्या संवादासाठी, कथानकासाठी
जो जीता वही सिकंदर - सायकल रेस आणि त्या भोवती गुंफलेल्या कथानकासाठी
रोजा - कथानक
cars - कथानक, फील गुडसाठी
शोले - सुज्ञास का.सां.न.ल.
अंदाज अपना अपना - सुज्ञास का.सां.न.ल.
महेश कोठारे चे पंचा़क्षरी सिनेमे - लक्ष्यासाठी
दिलवाले दुल्हनिया...
हम साथ साथ है - फील गुड, सलमानने साकारलेल्या नम्र/दयाळू प्रेमसाठी
हम आपके है कौन
विवाह
..
आणि अनेक
17 Apr 2009 - 7:19 pm | व्यंकु
मी सरफरोश नावाचा अमिर खानचा पिक्चर 16 वेळा बघितलाय. आणि अजूनही जाहिरातीँना सहन करुन कितीही वेळा पाहण्याची तयारी आहे.
17 Apr 2009 - 9:01 pm | पक्या
शोले - काऊंट ठेवला नाही - बच्चन , संजीव कुमार , जबरदस्त डॉयलॉग आणि अभिनय, खिळवून ठेवणारे प्रसंग ...
एक डाव भुताचा -
४-५ वेळा तरी नक्किच. निखळ करमणूक , अशोक सराफाचे भूत , दिलीप प्रभावळकरचा मास्तर पण छान होता , ठसकेबाज रंजना.
टायटॅनिक - लय वेळा - उत्कृष्ट सिनेमा , रंगत जाणारी प्रेमकहाणी , जहाजातले थरारक प्रसंग...
मैने प्यार किया- कॉलेजात असताना ४-५ वेळा तरी , नंतर टिव्हीवर - सलमान भाग्यश्री जोडी तेव्हा आवडली होती.
अजून असे बरेच सिनेमे आहेत - लगान , जोश , गोलमाल (अमोल पालेकरचा, मराठी गोलमाल नव्हे), अशीही बनवाबनवी , मास्क, लायर लायर , गन्स ऑफ नॉवेरॉन (ग्रेगरी पेक साठी) .....
17 Apr 2009 - 9:02 pm | यन्ना _रास्कला
छोटिसी बात - कारनं द्यायची गरजच नाय
17 Apr 2009 - 10:03 pm | वर्षा
अगणितवेळा पाहिलेले:
अशी ही बनवाबनवी: अभिनय आणि संवाद!
गंमत जंमतः कथा, अभिनय, संवाद
खूबसूरतः रेखा!!
गोलमाल (जुना): कथा
कथा (सई परांजपेंचा): कथा, अभिनय
चष्मेबद्दूर: कथा, अभिनय
शांतेचं कार्ट चालू आहे! (नाटक): सर्व कलाकार!
17 Apr 2009 - 10:46 pm | आपला अभिजित
असंख्य वेळा नाही पाहिलेले, पण अनेकदा टीव्हीवर लागल्यानंतर हलत नाही मी कुठे! अजूनही कितीही वेळा पाहण्याजोगे ः
- अंदाज अपना अपना (बेफाम, निरागस विनोद. आमिरचा विनोद. शक्ती कपूरचा "आँखे निकालके गोटी खेलूँगा' हा डायलॉग, परेश रावलला मारण्याचे प्रसंग आणि अफलातून क्लायमॅक्स!)
- सरफरोश (आमिरची जबरदस्त भूमिका, अफलातून रहस्य, (सोनालीचं ओलेतं गाणं वगळता) भन्नाट वेग, बुद्धिमान क्लायमॅक्स.)
- काय द्याचं बोला! (अजित दळवींचे भन्नाट संवाद, प्रशांत दळवींची पटकथा आणि चंद्रकांत कुलकर्णीचं दिग्दर्शन. आणि हो! मकरंदचा बेफाट अभिनय.)
- शोले (का, ते सांगायला नको.)
- बिनधास्त (अफलातून रहस्य, मराठीतलं सर्वांत वेगवान सादरीकरण. शर्वरी जमेनीस आणि वेगळी कल्पना.)
- सरकारनामा (जबरदस्त सादरीकरण, अफलातून डायलॉग, "कसला ते तुझा बंदोबस्त'सारखी यशवंत दत्त यांची विस्मयकारक शब्दफेक आणि दिलीप प्रभावळकरांची उत्कृष्ट भूमिका.)
- आँधी (गुलजार, आर. डी. बर्मन, संजीवकुमार आणि सुचित्रा सेन.)
- हम आपके हैं कौन आणि दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (तारुण्यातली क्रेझ!)
- शक्ती (अमिताभ-दिलीपकुमार, आणि सलीम-जावेद!!)
- टारझन! (किमी काटकर, किमी काटकर आणि किमी काटकर!!! आठवतेय?)
- गुंडा (मोहन जोशी, मुकेश ऋषी, शक्ती कपूर, हरीश पटेल वगैरेंचे संवाद!!) (हा मला एकदा तरी थेटरात जाऊन पाहायचाच!!)
- जब वुई मेट (करीना-शाहिदची अफलातून केमिस्ट्री, अप्रतिम पटकथा आणि हळुवार सादरीकरण.)
- बोट लावीन तिथं गुदगुल्या, पांडू हवालदार, एकटा जीव सदाशिव, आली अंगावर! (दादा, दादा आणि दादा! शिवाय, अशोक सराफ!!)
- धूमधडाका (विखी वाक्खू वाक्ख्याव!!, शरद तळवलकर, अशोक सराफ आणि "ऍक्टिंग शिकवण्यासाठी बलात्काराशिवाय दुसरा प्रसंग मिळाला नव्हता तुला?' शिवाय, सिनेमाची स्टोरी सांगण्याचा प्रसंग. हा प्रसंग मूळ "प्यार किये जा'मधल्या मेहमूद-ओमप्रकाशपेक्षा अप्रतिम झालाय, असा माझा दावा आहे!)
----------
आणि......
झपाटलेला (सर्वांत पहिल्यांदा बघितला, तेव्हा वेडा झालो होतो! बोलक्या बाहुल्याचा मराठी चित्रपटातला पहिल्यांदाच भन्नाट वापर, अफलातून विनोदी प्रसंग, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अण्णासाहेब देऊळगावकर (पटकथाकार) सगळ्यांचीच अत्युच्च कामगिरी. "ओम भगभुगे भग्नी भागोदरी' सारखे जबरदस्त डायलॉग आणि प्रसंग)
---
अवांतर ः
बघायचे राहिलेले असंख्य चित्रपट आहेत...
1. माहेरची साडी (त्या वेळी थेटरला बघायचा राहिला!)
2. हम साथ साथ हैं
3. मिर्च मसाला, आक्रोश वगैरे वगैरे.
4. अछूत कन्या, बंदिनी, ज्वेल थीफ, गाईड, पडोसन, बॉंबे टू गोवा, गुमनाम, तीसरी मंजिल, मेरा साया.....
5. मुगले आझम
6. कुछ कुछ होता है
7. कागज के फूल, साहब बीवी और गुलाम, प्यासा (सीडी आणून ठेवल्याहेत, पण बघणं होईना!)
8. गोलमाल, नरम-गरम, चितचोर, घरौंदा, वगैरे वगैरे.
9. भेजा फ्राय, लाइफ इन अ मेट्रो, मुंबई मॅटिनी...
10. ऐतबार (सुरेश ओबेरॉय नि कोणकोण...) (ऋषी कपूरचा पण एक रहस्यप्रधान कुठलातरी जबरदस्त सिनेमा आहे म्हणे. तोही!!)
18 Apr 2009 - 8:34 pm | स्वाती राजेश
(ऋषी कपूरचा पण एक रहस्यप्रधान कुठलातरी जबरदस्त सिनेमा आहे म्हणे. तोही!!)
खोज
18 Apr 2009 - 1:22 am | संदीप चित्रे
:)
18 Apr 2009 - 2:58 am | फारएन्ड
अरे येथे कोणी नेकेड गन वाले नाहीत का?
खालील प्रत्येकी अगणित वेळा...
नेकेड गन - १,२,३ (अफाट गिग्ज, विडंबने. प्रत्येक वेळेला बघताना आधी निसटलेले विनोद लक्षात येतात)
एअरप्लेन -१ (हीच कारणे)
हॉट शॉट्स - २ (हीच कारणे)
ड्म्ब ऍन्ड डम्बर - जिम कॅरे, जेफ डॅनियल्स ची धमाल
मास्क - जिक कॅरे आणि अफलातून संवाद
नीमो, कार्स, लायन किंग, जंगल बुक (डिस्ने चा)- अफलातून ऍनिमेशन, सुंदर कथा
वेडिंग क्रॅशर्स - विन्स वॉन चे मोटरमाउथ
गेट स्मार्ट (नवीन) - अफलातून संवाद
हिंदीत - अमिताभ आणि सलीम जावेद एकत्र आलेले सगळे. तसेच अ.अ.ऍ., मुकद्दर का सिकंदर, नसीब - कारण मुख्य बच्चन
मराठीत - धूमधडाका - अशोक आणि लक्ष्या
18 Apr 2009 - 4:39 am | भाग्यश्री
नेकेड गन, पिंक पँथर, मास्क, डंब अँड डंबर, फन विथ डिक अँड जेन, गेट स्मार्ट.. तसेच,
ऍनिमेशन मधले श्रेक सगळे भाग, मादागास्कर, कुंग फु पांडा, रॅटटुई इत्यादी पिक्चर्सची पारायणं असतात आमच्या घरी! :)
www.bhagyashree.co.cc
18 Apr 2009 - 5:27 am | श्रीयुत संतोष जोशी
मी अमिताभचे जवळजवळ सगळे चित्रपट किमान २/३ वेळा पाहिलेले आहेत.
कारण सांगायची गरज नाही.
त्यातही शोले ; दीवार आणे अग्निपथ ३० / ४० वेळा.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
18 Apr 2009 - 6:53 am | क्रान्ति
मोजणं सोडून दिलं, पण पहाणं नाही सोडलं.
पाकीजा - मीनाकुमारी आणि गाणी
पडोसन, अंगूर, जुना गोलमाल, खट्टामीठा, खूबसूरत [रेखा] - डोक्याला ताप नाही, हसा आणि हसत रहा!
गाईड - २४ तास पहायला तयार. अभिनय, गाणी, कथा, दिग्दर्शन सगळंच खास. शेवटच्या एका सीनमधली एकेक दागिना रस्त्यावर टाकत वाळवंटातून उन्हात येणारी वहिदा ग्रेट!
डोर - खास!
सवत माझी लाडकी - धमाल.
मटिल्डा, होम अलोन, बेबीज डे आउट, डॉ. डूलिटल - मस्त!
शक्यतो टीव्हीवरच जास्त चित्रपट पाहिले जातात. तेही जमेल तसे, आणि लागतील तसे. यादी बरीच मोठी आहे, सध्या एवढीच पुरे!क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
18 Apr 2009 - 10:18 am | सुचेल तसं
अगणित वेळा पाहिलेले (आणि परत पाहीन असे) चित्रपटः
१. स्वदेस: माझ्या मते आशुतोष गोवारीकरचा हा चित्रपट हवा तेवढा चालला नाही. शाहरूखची कुठेही ओव्हएक्टिंग नाही. विषय मनाला भिडणारा, सुंदर गाणी आणि गायत्री जोशी अप्रतिम. परत तिचा कुठलाही चित्रपट आला नाही.
२. अंगूरः शेक्सपिअरच्या comedy of errors वर आधारीत गुलजरचा चित्रपट. संजीव कुमार आणि देवेन वर्माचा डबल रोल अगदी धमाल आणतो. उत्तम comedy, कुठेही ओढूनताणून विनोद निर्मितीचा प्रयत्न नाही. मौशुमी पण एक नंबर.
३. लगानः पहिल्यांदा पाहिला तेव्हा जरा निराशा झाली. स्टोरी वेगळी असेल अशी अटकळ होती पण मध्यंतरानंतर एकदम क्रिकेट सुरु होतं. पण दुसर्यांदा जेव्हा पाहिला तेव्हा जाम आवडला. रेहेमानचं संगीत नेहेमीप्रमाणेच अत्युच्च. कथेतून सामाजिक संदेश देण्याची आशुतोषची स्टाईल आवडली.
४. आंखे: गोविंदा, कादर खान आणि राज बब्बरचा डबल रोल. फूल टू मसाला मूव्ही.
५. साजन चले ससुराल, हिरो नं १, दुल्हे राजा, हसीना मान जायेगी, राजा बाबू: गोविंदाची जबरदस्त comedy
६. गर्दिशः प्रियदर्शनचा अप्रतिम चित्रपट. jacky shroff आणि अमरीश पुरीचा अत्युच्च अभिनय.
७. परिंदा: उत्तम अभिनय आणि कथा.
८. अंदाज अपना अपना: केव्हाही आणि कुठुनही पाहा, धमाल चित्रपट.
९. सवत माझी लाडकी: मोहन जोशी १ नंबर
१०. मासूम, मिस्टर इंडिया: शेखर कपूरचे नितांत सुंदर चित्रपट.
११. चश्मेबद्दूर, कथा: सई परांजपेचे अप्रतिम चित्रपट.
१२. तिसरी मंझिल, अंदाजः शम्मीचे आवडलेले चित्रपट
१३. शिवा, रात, रंगीला: रामूचे आवडलेले चित्रपट.
१४. घायल, घातक, अर्जुन, जिद्दी: सनीचे आवडणारे action चित्रपट.
१५. अग्नीपथ, काला पथ्थर, त्रिशूल, नमकहलाल, मि. नटवरलाल, जंजीर, दिवार, शोले, शराबी, शक्ती: अमिताभचे आवडलेले चित्रपट.
१६. जो जिता वही सिकंदर, सरफरोश, दिल चाहता है, तारे जमीं पर, हम है राही प्यार के: आमीरचे आवडणारे चित्रपट
१७. द लिजंड आफ भगतसिंगः अप्रतिम.
१८. मुन्नाभाई: दोन्ही भाग मस्त.
१९. आनंद, बावर्ची, अभिमान, चुपके चुपके, गोलमालः ह्र्षीदांचे अप्रतिम चित्रपट.
२०. डीडीएलजे, हम आपके है कौन: अप्रतिम.
२१. रजनीगंधा: साधा सरळ असल्यामुळे आवडला.
२२. मेरे अपने, आंधी: गुलजारचे क्लासिक चित्रपट.
Finally I will be so matured that I will react to nothing.
18 Apr 2009 - 11:05 am | jenie
रंग दे बसंती - १५ वेळा सिनेमा पाहील्यावर एक जोश येतो असे वाटते य वढत्या करप्शन साठी आपणही काही तरी केले पाहीजे ..,अमिर
सवत माझी लाडकी -य वेळा नीना नं १
18 Apr 2009 - 12:02 pm | मनीषा
गुळाचा गणपती -- पु. ल.
परिचय - जया भादूरी
खूबसुरत - रेखा, अशोक कुमार
बावर्ची - जया भादूरी , राजेश खन्ना
आनंद - राजेश खन्ना
अभिमान - जया भादूरी
दिल तो पागल है - माधुरी दिक्षीत
(नवरंग, झनक झनक पायल बाजे, अनारकली, मुघले आझम, पाकिजा चित्रलेखा, आम्रपाली इ. चित्रपटां मधील गाणी खूप आवडतात पण त्या साठी ते चित्रपट परत बघावेसे नाही वाटत)
गॉन विथ दि विंड
माय फेअर लेडी
दि साउंड ऑफ म्युझिक
18 Apr 2009 - 7:54 pm | अनमिका
हम आपके है कौन - १०
जब वी मेट - ६
मै हु ना - नेहमी केबल वर असतो
शादि करके फस गया यार - नेहमी केबल वर असतो
रोजा - ४
हेरा फेरी - ४
वेलकम - ३
मैने प्यार किया - ५
मैने प्यार क्यु किया - नेहमी केबल वर असतो
पहेली - नेहमी केबल वर असतो
हम दिल दे चुके सनम - ६
19 Apr 2009 - 5:05 am | हुप्प्या
शोले : मोजणे थांबवले. आता तोंडपाठ आहे. पण एक अप्रतिम जमलेली भट्टी. शिरिष कणॅकरांच्या शब्दात सांगायचे तर एक घट्ट विणीची कथा, सगळ्यांचे उच्च अभिनय, संगीतही वाईट नाही. डाकू या जुन्या कल्पनेला सोडून एक वेगळ्याच प्रकारचा, मिलिटरी कपडे घालणारा, क्रूर, धाडसी दाखवला आहे. ग्रेट.
छोटी सी बातः ५-६ वेळा. उत्तम दिग्दर्शन, भावणारी कथा, अशोक कुमार, अमोल पालेकर, असरानी यांचे अभिनय उत्तम. विद्या सिन्हाही छान. ३५-४० वर्षापूर्वीची, बरीच कमी गर्दी असणारी मुंबई बघायला बरे (नॉस्ट्याल्जिक)वाटते.
ड्युअल : स्पीलबर्गचा एक जुना सिनेमा. चित्तथरारक, गूढ, पण तरी पुन्हा पुन्हा बघावासा वाटणारा सिनेमा. ३-४ वेळा बघितला. अजून मिळाला तर बघेन. एक ट्रक एका कारवाल्याच्या मागे लागतो. आणि पिच्छा सोडत नाही. बर्यापैकी निर्मनुष्य रस्ता, वाळवंटी, ओसाड. मनुष्य हैराण होतो. आणि बरेच काही घडते. मिळाला तर बघाच.
19 Apr 2009 - 11:22 am | कळस
अनेक वेळा..
शराबी - नशेमे कौन नही है ?
आखरी रास्ता - डबल रोल करावा तर असा !!
लगे रहो मुन्नाभाई - दि.प्र.
कळस !!
19 Apr 2009 - 3:32 pm | अदित्य
मालामाल विकलि. कारण निखळ मनोरनजन, शेवट चान्गला आणि सर्वात मह्त्वाचे घरातिल सर्व सद्स्यना सोबत पाह्ण्या लायक.
बाकि म्हणाल तर श्याम चि आई, आज पर्यन्त अनेकदा बघुनहि पुर्ण चित्रपट (शेवट पर्यन्त) पाह्ण्यचि हिम्मत आज पावेतो आलेलि नाहि.
20 Apr 2009 - 1:55 pm | मैत्र
अनेक आवडलेले व अनेकदा पाहिलेले चित्रपट वर लिहिले आहेत सगळ्यांनी.
बनवाबनवी, धुमधडाका, सिंहासन, वास्तुपुरुष, बनगरवाडी, प्रीटी वुमन, शॉशँक रिडम्प्शन, शॅल वी डान्स, स्पॅंग्लिश, रॅटाटुई, अंदाज अपना अपना, शोले, छोटी सी बात, गोलमाल, नरम गरम, कथा, चश्मेबद्दूर (हा विशेष आवडता - काली घोडी द्वार खडी आणि टुटि फ्रुटी), दिल चाहता है, मुन्नाभाई, जाने भी दो यारो, सरफरोश, स्वदेस, आनंद, बावर्ची , चुपके चुपके, हेरा फेरी, हंगामा,
इतर काही -
मॅकनाज गोल्ड - ग्रेगरी पेक ...
व्हेअर इगल्स डेअर - क्लिंट इस्टवूड
फ्युजिटिव्ह - हॅरिसन फोर्ड
खूप वेळा पाहिलेला - परस्युट ऑफ हॅपीनेस... विल स्मिथ... नितांत सुंदर चित्रपट. एक क्षणही सोडत नाही. जबरदस्त...
शेवटी त्याला जॉब मिळतो त्या क्षणी जे त्याने काम केले आहे ते अशक्य आहे...
एक खूप आवडलेला - फाइंडिंग नीमो - अनेकदा पाहिला आहे. आजवर पाहिलेला सर्वोत्कृष्ट ऍनिमेशनपट.
बनगरवाडी - विलक्षण आवडलेला चित्रपट
वास्तुपुरुष - मनावर गारूड करणारा. थोडा सुन्न करणारा अनुभव.
तू तिथं मी - अप्रतिम... खूप छान गाणी आहेत. सगळ्यांची कामं उत्तम आहेत. कथा पटकथा संवाद - सगळंच बेस्ट. सगळ्यात छान - सुहास जोशी...
कळत नकळत, चौकट राजा - स्मिता तळवलकरचे बहुतेक सर्वच चित्रपट
मुक्ता - ना धो महानोरांच्या कवितांना आनंद मोडकांनी दिलेल्या चाली, सोनाली, जब्बारचा चित्रपट.
सरकार - बॅकग्राउंड म्युझिक (गोविंदा गोविंदा .....), पटकथा, संवाद, अमिताभ, केके, ..
असे अनेक आहेत. आठवले तेवढे लिहिले..
22 Apr 2009 - 3:20 pm | विसुनाना
वरच्या सर्व प्रतिसादांत न आढळलेले माझे आवडते -
मराठी - दोघी, ध्यासपर्व
हिंदी - उत्सव
इंग्रजी - डॉ. झिवागो
22 Apr 2009 - 3:20 pm | विसुनाना
वरच्या सर्व प्रतिसादांत न आढळलेले माझे आवडते -
मराठी - दोघी, ध्यासपर्व
हिंदी - उत्सव
इंग्रजी - डॉ. झिवागो
24 Sep 2009 - 3:23 pm | JAGOMOHANPYARE
हम आपके है कौन..........!
हम आपके है कौन..........!
हम आपके है कौन..........!
हम आपके है कौन..........!
हम आपके है कौन..........!
24 Sep 2009 - 5:12 pm | गुंड्या
इंद्रा - द टायगर...
इंद्रा - द टायगर...
इंद्रा - द टायगर...
इंद्रा - द टायगर...
इंद्रा - द टायगर...
रोजच असतो.....
25 Sep 2009 - 3:00 pm | ब्रिटिश टिंग्या
इंद्रा - द टायगर हा चित्रपट सेट मॅक्सवर मी दररोज बघतो!
25 Sep 2009 - 3:00 pm | ब्रिटिश टिंग्या
इंद्रा - द टायगर हा चित्रपट सेट मॅक्सवर मी दररोज बघतो!
24 Sep 2009 - 10:20 pm | चेतन सुभाष गुगळे
गाईड - ५ वेळा
ज्वेल थीफ - ४ वेळा
कारण मी नास्तिक असलो तरी देव(आनंद)भक्त आहे.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
25 Sep 2009 - 8:54 am | सुधीर काळे
खालील सर्व पैसे देऊन थेटरात वो भी जब हम जवान थे तबकी बात है!
पेइंग गेस्ट (७ वेळा, "हाय हाय हाय ये निगाहें" हे गाणं फार आवडते!)
My Fair Lady (5)
Sound of Music (4)
टीव्हीवर लागलेले असताना चकटफू पाहिले असे या आकड्यात जोडलेले नाहीत.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
25 Sep 2009 - 11:33 am | निशांत५
१)वास्तुपुरुष
२) चुपके चुपके
३) हम आपके है कौन - फक्त माधुरीसाठि-भयान आवडायला लागली ति ह्यो फिल्म बघित्ल्यावर
४) टायटनिक
५) School of Dance
६) झंकार बीट्स
७) जब वूई मेट