साहित्य : सुका जवळा (या नावाची सुकी मासळी बाजारात वाट्यावर मिळते. साधारण १० रुपायाचा एक वाटा असतो)
तेल, कांदा, गरम मसाला, २-४ कोकमं, मीठ चवीप्रमाणे.
दोन माणसांकरता.
बाजारातून छानपैकी तीन वाटे सुका जवळा आणावा. थोडा निवडावा. काही खडेबिडे असतील तर काढून टाकावेत. नंतर तो जवळा तव्यावर थोडा भाजून घ्यावा व त्यानंतर स्वच्छ धुवावा. पाणी निपटून टाकावे.
पातेल्यात तेल घेऊन झकासपैकी कांद्याची फोडणी करावी. कांदा छान लालसर परतून घ्यावा व त्यात सुका जवळा टाकावा. मिश्रण थोडा वेळ चांगले परतून घ्यावे, जवळा शिजू द्यावा. नंतर त्यात आमसूल, गरम मसाला व चवीनुसार मीठ घालून मिश्रण पुन्हा एकवार परतावे व सारखे करून घ्यावे.
झाला तैय्यार चटकदार, चटपटीत सुका जवळा! :)
हा जवळा तांदळाच्या भाकरीसोबत खावा, फारच छान लागतो. किंवा ओल्या बाजाराच्या जेवणासोबत तोंडीलावणं म्हणून घ्यावा. जेवणाची लज्जत वाढते! सुका जवळ्याचा स्वाद बाकी सुरेखच असतो!
संध्याकाळी आवडत्या स्त्रीसोबत दारू पितांना चाखना म्हणूनही हा जवळा विशेष सुंदर लागतो. आज बुधवार होता म्हणून मुद्दामून थोडी सवड काढली, बाजारात गेलो आणि जवळा घेऊन आलो व सौताच्या हाताने तुम्हा सर्व मिपाकरांकरता चवदार, चटपटीत सुका जवळा बनवला!
आपला,
(सुकाबाजार प्रेमी आणि साधना कोळणीचा लाडका) तात्या अभ्यंकर.
चित्तपावन ब्राह्मण समाजाने 'अभ्यंकर' हे आडनाव त्यांच्या ज्ञातीतून बाद केले आहे असे कळते! :)
हा घ्या चवदार चटपटीत सुका जवळा खास मायबाप मिपाकरांकरता! - :)
प्रतिक्रिया
15 Apr 2009 - 1:03 pm | अवलिया
वा! सुंदर... :)
--अवलिया
15 Apr 2009 - 1:03 pm | नंदन
मस्तच :). पावसाळ्यात माशे मिळत नसले की जवला हमखास मदतीला धावून येतो. अगदीच शिवराक खाण्यापेक्षा जवला-पाव ही जोडीही बेष्ट!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
15 Apr 2009 - 1:09 pm | आपला अभिजित
(सुकाबाजार प्रेमी आणि साधना कोळणीचा लाडका) तात्या अभ्यंकर.
छ्या! तात्या, बामणाच्या जातीला अगदीच कलंक निघालात! एवढे कसे हो तुम्ही धर्मबुडवे? शिव शिव! या विश्वाचा अंत जवळ आलाय बहुधा!! :S
संध्याकाळी आवडत्या स्त्रीसोबत दारू पितांना चाखना म्हणूनही हा जवळा विशेष सुंदर लागतो. आज बुधवार होता म्हणून मुद्दामून थोडी सवड काढली, बाजारात गेलो आणि जवळा घेऊन आलो व सौताच्या हाताने तुम्हा सर्व मिपाकरांकरता चवदार, चटपटीत सुका जवळा बनवला!
बाय द वे, तुम्ही कोणत्या आवडत्या मदिराक्षीसोबत मदिरापान केलेत, (नि जवळ्यासोबत जवळीक केलीत,) ते नाही लिहिलेत! की तो मजकूर `संपादित' झालाय?? ;)
असो. अभक्ष्यभक्षणात आम्हाला काही गती नाही. त्यामुळे, तूर्तास एवढ्याच प्रतिक्रियेवर थांबतो.
15 Apr 2009 - 1:09 pm | यशोधरा
पाककृतीबरोबर फोटू का नाही दिला? तेवढच समाधान आम्हांला. :)
बंगलुरात कुठे आलाय जवला!
15 Apr 2009 - 1:17 pm | जागु
वा छान तात्या.
आमच्या कडे पण आहे साधना कोळीण.
मी जवळा निवडून भाजत नाही.
तो एका टोपात टाकुन धुवुन घेते म्हणजे कचरा, कोंडा खाली बसतो, आणि जवळा स्वच्छा होतो. मग तो कांद्यावर घालते.
मी भाजून जवळ्याची चटणी करते.
15 Apr 2009 - 1:47 pm | दिपक
जवला आपला फेवरेट . तादंळाच्या भाकरीसोबत छान लागतोच पण मला चपातीबरोबरच जास्त आवडतो. :)
15 Apr 2009 - 1:52 pm | काजुकतली
मस्तच.. माझ्या मुलीला तर नुसता भाजुनही खायला आवडतो. कुरकुरीत भाजलेला जवला मी चटणीसारखा थोडा थोडा लाउन खाउन जेवणाची लज्जत वाढवते.. (आज रात्री भाजायला पाहिजे :) )
15 Apr 2009 - 3:43 pm | मेघना भुस्कुटे
तसं मच्छीचं मला वावडं नाही. पण जवळ्याचा वास जरा नडतोच. सॉरी तात्या...
15 Apr 2009 - 4:53 pm | विसोबा खेचर
पण जवळ्याचा वास जरा नडतोच. सॉरी तात्या...
कोई बात नही. पसंद अपनी अपनी! :)
तात्या.
15 Apr 2009 - 5:07 pm | स्मिता श्रीपाद
मी पण कधी जवळा खाउन नाही पाहिला...
ट्राय करायला आवडेल... :-)
पण जवळ्याचा वास जरा नडतोच.
फार उग्र वास असतो का?
15 Apr 2009 - 5:31 pm | स्वाती राजेश
मस्तच!!!!
फोटोसुद्धा...
15 Apr 2009 - 6:27 pm | प्राजु
जवळा नावाचा मासा असतो हे आताच समजलं मला.
तो निवडून का घ्यावा लागतो?? म्हणजे गहू तांदूळ निवडल्यासारखाच का?
असो.. भरपूर अज्ञान प्रकट झाले :)
जी काही रेसिपी आहे ते मस्त दिसते आहे.
भारतवारीत तात्या सोत्ताच्या हातनी बनवून खायला घालणार असतील तर आम्ही खाऊ. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Apr 2009 - 12:27 am | विसोबा खेचर
भारतवारीत तात्या सोत्ताच्या हातनी बनवून खायला घालणार असतील तर आम्ही खाऊ
अवश्य येण्याचे करावे! :)
तात्या.
15 Apr 2009 - 10:59 pm | नाटक्या
शिरा पडांदे तोंडार तुमच्या.. जवलाचा नाव काढलास आता हय अमेरिकेत खयसून हाडू? हय बोंबील गावाची मारामार.. निस्त्या पापलेटं, कोलंबी कुर्ल्या खाऊन दिवस काढतयं. आता ठाण्याक ईलो का धाडचं घालातयं तुमच्या घरांकडे...
- नाटक्या
16 Apr 2009 - 1:18 am | पिवळा डांबिस
तो तात्या सुक्या जवळ्याचे गोष्टी करतांसा...
रॅन्च ९९ मध्ये गावता.....
खाऊन प्रसन्न हो!!!!
:)
16 Apr 2009 - 1:24 am | नाटक्या
सांगाता काय? आवशीचो घोव आमका कसा दिसनत नाय ९९ मार्किटात? उद्याच थैली घेवन जाउक होया... नाटकीण बाइस लय आवडता हां. त्येका जवला हाडून देतयं आणि गप वाइच ताडी लावून पडतां ...
ओ पिडाकाका, थँक्यु हा..
- नाटक्या
16 Apr 2009 - 1:45 am | धनंजय
कळता तेन्ना माका सांग.
रँच ९९ हांगा ना. पुण निस्त्याचे नांव खबर आसल्यार ते सोदतलो.
16 Apr 2009 - 2:53 am | चित्रा
म्हणते. नाव माहिती असल्यास सांगा.
16 Apr 2009 - 2:01 am | प्रियाली
कोणीतरी संपादित करा रे हा धागा. ;) भलताच आक्षेपार्ह आहे. एखाद्या जखमेवर इतके मीठ चोळणे बरे नव्हे.
16 Apr 2009 - 2:08 am | मयुरा गुप्ते
उद्याच करुन बघते. उद्या नाही उद्या नाही ....आई बाबा आले आहेत,गुरुवारी नाव काढल तरी एक ठेवुन देतील. यु.एस.ओफ ए च्या इमिग्रेशन कस्ट्म मधुन सही सलामत घरी पोहोचलेले सोडे,सुकट्,जवळा आणि काड्याना शुक्रवार चा मुहुर्त दाखवते...काय बोलता
16 Apr 2009 - 3:22 am | संदीप चित्रे
ते सगळे मासे?
मग आता लवकर त्यांना सद्गती दे :)
16 Apr 2009 - 3:12 am | चित्रादेव
तात्या, काय आठवन काढून दिलीत.
बाकी 'अभ्यंकर' असून हे खातां? हें म्हणजे कोळणीला मागे काढले की हों?(अनुनासीक स्वर.. अन नाक वाकडे केलेला चेहरा). :)
16 Apr 2009 - 3:20 am | संदीप चित्रे
पावसाच्या गारव्यात जवळा आणि भाकरी म्हणजे ....
हॅ... कशाला उगाच वर्णन करत बसायच :)
18 Apr 2009 - 4:59 am | शोनू
मिळतात ना जवळा, सोडे , कधी कधी बोंबील पण मिळतात.
चिनी, व्हिएटनामी, कोरियन मार्केटात सुका जवळा मिळतो. बाटल्यांमधे ( कदाचित थोडा खारवलेला ) ओला जवळा मिळतो अन एक्झॅक्टली सोडे नव्हे पण सुकी सुंगटं पण मिळतात. टोळे ( स्मेल्ट्स) , तार्ले ( सार्डीन्स ) , ओली मोरी ( शार्क ), अन बोंबील ( कधीकधीच ) मिळतात.
माझ्या गावाजवळ असाल तर दुकानांची नावं , पत्ते देईन ( फिली )