ताजे व उत्तम मासे कोठे मिळतील ?

मि.इंडिया's picture
मि.इंडिया in काथ्याकूट
3 Apr 2009 - 1:40 pm
गाभा: 

सर्व सदस्यांना नमस्कार

कोकणात कोणकोणत्या बंदरांवर ताजे व उत्तम मासे मिळतात हे कोणी सांगू शकेल का ? मी काही दिवसांपूर्वी पापलेटटचा एक ढीग लिलावात घेतला होता. असे उत्तम मासे मला पुण्यात कधीही मिळालेले नाहीत.

मिपावरील जुने व जाणते मत्स्याहारी सदस्य ही माहिती पुरवू शकतील असे वाटते.

प्रदीप

प्रतिक्रिया

सागर's picture

3 Apr 2009 - 2:25 pm | सागर

हर्णे बंदरावर खूप उत्तम प्रकारचे पापलेट , सुरमई, किंग प्रॉन्स, आणि उत्तम दर्जेदार लॉब्स्टर मिळतात
सकाळी सकाळी गेलात तर स्वस्तात पापलेट ची करंडी घेऊन याल :)

तिथे लिलावात मासे विकले जातात.

सागर
अवांतर : ताजे व उत्तम मासे कोठे मिळतील? हे शीर्षक वाचुनच "समुद्रात" हे उत्तर सुचले होते ;)

चिरोटा's picture

3 Apr 2009 - 2:53 pm | चिरोटा

मासे कुठे चान्गले मिळतील हे आपल्याशिवाय कोणाला जास्त माहित असणार ,सागर?
भेन्डि.
क्ष्^न + य्^न = झ्^न

सागर's picture

3 Apr 2009 - 3:19 pm | सागर

हॅ हॅ हॅ :) सत्य वचन... ;)

(स्वतःच्या पोटात माशांची काळजी घेणारा) सागर

संदीप चित्रे's picture

3 Apr 2009 - 7:04 pm | संदीप चित्रे

मी हर्णै बंदरावर मासे घेतले होते एका सकाळी आणि ते ताजे म्हणजे ताजेच होते !
(अवांतर : त्याइतकी चांगली कोलंबी आधी फक्त एकदा मिळाली होती -- गणपती पुळे इथे मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करून परत येताना, नुकतेच मासे पकडून आलेले कोळी, किनार्‍यावर भेटले होते :) )

नरेश_'s picture

3 Apr 2009 - 2:26 pm | नरेश_

श्रीवर्धनला जिवना म्हणून बंदर आहे. तिथे चांगली मासळी मिळते.
कोळंबी, पापलेट , सुरमई इ. खासच.
मिपाकर ब्रिटिशच्या गावाला (खारपाडा, पनवेल जि. रायगड)जिताडा फेमस आहे

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

मि.इंडिया's picture

4 Apr 2009 - 10:03 am | मि.इंडिया

आहाहा........ जिताडा हा अतिशय चविश्ट प्रकार आहे. कोठे मिळतो याची अधीक माहिती दिल्यास बरे होइल. छडी व गळाने मासेमारीचा छंद असलेल्यांचाही आवडता मासा आहे. पण आजकाल हा दुर्मिळ झाला आहे हे खरे आहे का ?

प्रदीप

नरेश_'s picture

4 Apr 2009 - 10:36 am | नरेश_

जिताडा हा मासा आजही मिळतो.ठाणे, रायगड जिल्ह्यात खाडीकिनारी गावकीच्या वा शेतातील तलावात मत्स्यसंगोपन केले जाते.
बदली किंवा बढती मिळवण्यासाठी , कामं करुन घेण्यासाठी प्रामुख्याने भेट म्हणून हा मासा दिला जातो.

या जगात सासू-सुन वाद हा आद्य वाद होय.
समाजवाद, प्रांतवाद, भाषावाद हे अगदी अलिकडचे..

सँडी's picture

3 Apr 2009 - 2:55 pm | सँडी

ताजे व उत्तम मासे कोठे मिळतील? हे शीर्षक वाचुनच "समुद्रात" हे उत्तर सुचले होते
हेच म्हणतो. :)

सालोमालो's picture

3 Apr 2009 - 2:59 pm | सालोमालो

सिंहगड रोडवर एक नेट सी फुड फ्रेश म्हणून दुकान आहे. संतोष हॉलच्या समोर. तिथे छान मिळतात. सुरमइ, कोळंबी, पॉप्लेट झक्कास.

सालो

मि.इंडिया's picture

3 Apr 2009 - 3:40 pm | मि.इंडिया

नरेश व सागर

माहितीबद्दल आभार. मी जिवना बंदरालाच मासे घेतले होते. हर्णे बंदराबाबत ऐकुन आहे पण कधी गेलो नाही. हर्णेची अधिक महिती असल्यास सांगावी. (खासकरून वेळेबाबत). हर्णे बंदरावर लिलाव सायंकाळी ४ नंतर असतो असे मी समजत होतो. पण आपल्या माहितिप्रमाणे मासे सकाळी मिळतील असे दिसते.

प्रदीप

होय.. सकाळी पण मासे मिळतात हर्णेला... तिथली जागा चांगली सखल असल्यामुळे बोटींना चांगल्या प्रकारचे आणि भरपूर मासे मिळतात..
बोटीवर लक्ष ठेवा ;) बंदराला लागली की लगेच २०-३० मिनिटात माल किनार्‍यावर येतो आणि संपतो पण.
सुरुवातीच्याच वेळी तुम्ही लिलाव केला तर स्वस्तात मस्त माल मिळून जातो. नंतर लिलावाची किंमत माल खपत जातो तशी वाढत जाते.

मराठमोळा's picture

3 Apr 2009 - 7:15 pm | मराठमोळा

>>बोटीवर लक्ष ठेवा
आणी हो बोटीत कोळीच आहेत याची खात्री करुन घ्या, चुकुन अतिरेकी असायचे आणी मास्यांऐवजी बाँब हातात द्यायचे. ;)
असो..
>>असे उत्तम मासे मला पुण्यात कधीही मिळालेले नाहीत.
पुण्यात तितके ताजे मासे मिळणार नाहीत, परंतु शिवाजी मार्केट आणी फातिमानगर येथे परमार काँप्लेक्स येथे एक दुकान (नाव आठवत नाही) आहे जिथे बर्‍यापैकी ताजे मासे मिळतात.

आपला मराठमोळा
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

हरकाम्या's picture

3 Apr 2009 - 9:43 pm | हरकाम्या

पुण्याच्या लकडी पुलावर गळ टाकुन बसा, पाण्याच्या प्रदूषणातून वाचलेले, आणि जिवंत असलेच तर गळाला लागतील
उगीच लांब कुठे जाताय.

मि.इंडिया's picture

4 Apr 2009 - 8:00 am | मि.इंडिया

अरे हरकाम्या

पुण्यात नदीच शिल्लक नाही. एकेकाळी मुठेतही झकास मासे पकडले आहेत. आता मात्र नदी संपून गेली आहे. नदीचे उघडे गटार झाले आहे असे खेदाने नमूद करावे लागेल.

प्रदीप

नंदन's picture

3 Apr 2009 - 11:35 pm | नंदन

सकाळी आठच्या आधी गेलात तर वेंगुर्ला किंवा शिरोड्याच्या बंदरावर झकास मासे मिळतात. शिरोड्याला लिलावात घेतलेल्या ह्या दोन सुरमया -

From India Trip

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मि.इंडिया's picture

4 Apr 2009 - 9:52 am | मि.इंडिया

सुरमया पाहून जिभल्या चाटत आहे.

असो. माहितीबद्दल आभार. थेट तळकोकणातील महिती दिलीत. या बंदरांवरही लिलाव होतो का ?

काही कामानिमित्त कोकणात गेल्यावर येताना असे झकास मासे आणले की प्रवास सार्थकी लागतो व थकवाही दूर होतो. शिवाय स्थानिक भावात मासे मिळाले की अंगीही जास्त लागतात......... ;) >:)

प्रदीप

विसोबा खेचर's picture

5 Apr 2009 - 10:55 am | विसोबा खेचर

सुरमया झकास!

'मिपाच्या कलादालनातून..' या सदराखाली एक दिवस मुखपृष्ठावर टाकतो.. :)

आपला,
(साधना कोळणीचा लाडका) तात्या.

सुधीर कांदळकर's picture

4 Apr 2009 - 7:51 pm | सुधीर कांदळकर

किनार्‍यावर कोळीवाडा असतो तिथे तिथे कोळी लोक परत आले कीं लिलावांत ताजे मासे मिळतात. हर्णैहून आम्हीं पण आणलेले आहेत. मालवणला पण मिळतात. मुंबईत मालाड आणि भाईंदरला मिळतात. उत्तम ताजे, लिलावांत घाऊक आणि किरकोळींत पण.

सुधीर कांदळकर.