शुन्य साखरे ची पौष्टिक खजुर बर्फी

दिपाली पाटिल's picture
दिपाली पाटिल in पाककृती
1 Apr 2009 - 10:18 pm

साहित्य:

१ वाटी खजुर
१/२ वाटी काळ्या मनुका
३/४ वाटी काजु + बदाम + पिस्ता पूड
१-२ छोटा चमचे तुप
२-३ वेलची पूड
२ चमचे खसखस
सजावटी साठी अख्खे काजु.....

कृति:

१) खजुर बारिक चिरुन यंत्रा वर जाडसर वाटून घ्या.
२) मनुका हि यंत्रा वर जाडसर वाटून घ्या.
३) काजु + बदाम + पिस्ता ची बारिक पूड करुन घ्या.
४) एका ताटात जाडसर वाट्लेले खजुर+मनुका+(काजु + बदाम + पिस्ता) पूड+वेलची पूड+तुप+ खसखस एकत्र करुन घ्या.
५) हे मिश्रण छान मळुन घ्या.
६) हव्या त्या आकारा त बर्फि करून घ्या.
७) काजु लावून सजवा.
८) लगेच एक बर्फि तोंडात टाका.

या बर्फि त गोडवा खजुर आणि मनुका तुन येतो पण अजुन गोड हवे असल्यास अंजीर वा साखर घालावी नहितर सुका मेव्या चे प्रमाण कमीजास्त करता येते.
यातुन खुप लोह मिळते.
चवी ला खुप छान लागते.

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

1 Apr 2009 - 11:12 pm | भाग्यश्री

वॉव.. मस्तच !! घरात चिक्कार खजुर पडलाय , त्यामुळे नक्कीच करणार..
मी सोपे आणि पटकन होणारे दाणे खजुराचे लाडू करते.. काय लागतात!! आहा!! :)
ही बर्फी सुद्धा सही लागेल चवीला!

समिधा's picture

1 Apr 2009 - 11:23 pm | समिधा

मुलीला देण्यासाठी चांगली आहे. लवकरच करुन बघते.
धन्यवाद.... :)

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

प्राजु's picture

1 Apr 2009 - 11:31 pm | प्राजु

लय भारी!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

2 Apr 2009 - 12:57 am | शितल

दिसत ही छान आहेत. :)

रेवती's picture

2 Apr 2009 - 1:44 am | रेवती

काय मस्त दिसतेय बर्फी!
थोडं सामान आत्ता नाहीये घरात.
आणते व करते.

रेवती

मी गौरी's picture

2 Apr 2009 - 2:31 am | मी गौरी

खुप छान आणि पौष्टिक व सोप्पा :)

चकली's picture

2 Apr 2009 - 5:05 am | चकली

मस्तच दिसतेय बर्फी!!

चकली
http://chakali.blogspot.com

दशानन's picture

2 Apr 2009 - 10:40 am | दशानन

क्या बात है !

सर्व भगीनी मंडळच येथे प्रतिसाद देण्यासाठी जमा झालेले आहे =))

* पाककृती छान आहे, पण आमच्या कडे कोणी नाही आहे करुन भरवणारे ;) त्यामुळे फोटोवर समाधान.

स्वाती दिनेश's picture

2 Apr 2009 - 12:28 pm | स्वाती दिनेश

मस्त आहे फोटू आणि पाकृ सुध्दा.. शून्य साखरेची असल्यामुळे करून पहायलाच हवी,:)
स्वाती

क्रान्ति's picture

2 Apr 2009 - 7:07 pm | क्रान्ति

खूप गोड फोटो आणि अगदी सोपी पौष्टीक पाकृ. नक्कीच करून पाहीन.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

संदीप चित्रे's picture

2 Apr 2009 - 8:16 pm | संदीप चित्रे

खाल्ली होती ही बर्फी..... मस्त असते एकदम.
पौष्टिक असते आणि शून्य साखर असते हे माहिती होते पण 'कॅलरीज' ही भानगड किती प्रमाणात असते याची काही माहिती देऊ शकशील का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Apr 2009 - 9:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भरपूर कॅलरीज संदीप! खजूर, मनुका (पक्षी: द्राक्ष) यांच्यात भरपूर शर्करा असते आणि काजू आहेतच वर!! :-)

पण मला आवडेल खायला, कोणी बनवून देणार असेल तर! दोन फेर्‍या जास्त मारेन ...

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

संदीप चित्रे's picture

3 Apr 2009 - 1:40 am | संदीप चित्रे

जिथे २ फेर्‍यांत व्यायाम संपतोय तिथे अजून फेर्‍या काय मारणार ;)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

धनंजय's picture

4 Apr 2009 - 2:56 am | धनंजय

सुंदर फोटो. हा प्रकार मागे खाल्ला होतो - छानच लागते बर्फी.
या क्षणी यातील सर्व जिन्नस सुका मेवा म्हणून खातो आहे :-)

मदनबाण's picture

3 Apr 2009 - 4:47 am | मदनबाण

अशी बर्फी खाल्ली आहे मस्त लागते,,,आज काल शुगर फ्री मिठाई घेण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे.

(अंजीर बर्फी प्रेमी)
मदनबाण.....

मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
जालावरुन सभार...