पाकडे साले ..

बामनाचं पोर's picture
बामनाचं पोर in काथ्याकूट
26 Mar 2009 - 3:21 pm
गाभा: 

हा दुवा पहा... http://www.youtube.com/watch?v=eJnM6eKT3OI ... तळपायाची मस्तकात जाते... २००८ या एका वर्षात ६० पेक्षा जास्त स्फोट झाले.. दिल्ली , मुंबई , जयपुर , वारणसी , हैद्राबाद , अहमदाबाद , बेंगलोर एक शहर बाकी नाही सोडले.. कसाबने उरली-सुरली लक्तरे वेशीवर टांगली...सकाळी जसे बाहेर पडू तसेच संध्याकाळी घरी परत येऊ अशी खात्रि नाही देता येत आता ... आपले तरुण तुर्क नेते अजून कशाची वाट बघतायत कोण जाणे... सगळे मंत्री-संत्री प्रत्यक्ष्-अप्रत्यक्ष नाव न घेता दम देण्यात मग्न आहेत.. तिकडे पाक मधले साधे पत्रकार सुद्धा उघड-उघड जाहिरपणे भारताला संपवण्याची भाषा करतात...

------

याच पाकड्याने सध्या चर्चेत असलेली बाळासाहेबांची निंदा करणारी चित्रफीत बनवली आहे . ( http://www.youtube.com/watch?v=FgQCcqp_PrE ) . . सर्व मिपाकरांना विनंति की हा video ' inappropriate' अशा flag करावा ..

आपल्या पैकी अनेकांचे बाळासाहेबांशी वैचारिक - राजकिय मतभेद असतीलही पण कुणा पाकड्याने अशी चित्रफीत बनवावी आणि आपण गप बघत बसावे काय ?

प्रतिक्रिया

दशानन's picture

26 Mar 2009 - 3:28 pm | दशानन

मी केले Flag भकडकावू चित्रफित म्हणून.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

26 Mar 2009 - 3:30 pm | घाशीराम कोतवाल १.२

आपल्या पैकी अनेकांचे बाळासाहेबांशी वैचारिक - राजकिय मतभेद असतीलही पण कुणा पाकड्याने अशी चित्रफीत बनवावी आणि आपण गप बघत बसावे काय ?

सहमत वैचारीक मतभेद आहेत पण ते नंतर
विनंति की हा video ' inappropriate' अशा flag करावा

होय आम्ही केला

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

चिरोटा's picture

26 Mar 2009 - 4:31 pm | चिरोटा

आपले तरुण तुर्क नेते अजून कशाची वाट बघतायत कोण जाणे... सगळे मंत्री-संत्री प्रत्यक्ष्-अप्रत्यक्ष नाव न घेता दम देण्यात मग्न आहेत

कारण कुम्पणच शेत खात आहें. कसाब आणि कम्पनी ने केलेले सुरक्षाव्यवस्थेचे पुरते वस्त्रहरण लाजीरवाणे आहे.हे वस्त्रहरण स्थानिक् लोकान्च्या,पोलिसान्च्या,नेव्हिच्या मदतिशिवाय(पैसे खावुन) होवुच शकत नाही.आणी ह्या मुद्द्यावर बोलायला आपले सरकार्,नेते लाजत आहेत. ९३ च्या वेळी RDX कस्टम अधिकार्याना पैसे चारुनच आणले होते कोकण किनारपट्टीवर.त्यातले काही पकडले गेले,काही सुटले.
ह्या वेळीपण हाच प्रकार आहे.
अवान्तर-पैशासाठी वाटेल ते करण्याचा आणि नन्तर त्याचे समर्थन करण्याचा स्वभाव आपल्याला नडतो.

सौमित्र's picture

26 Mar 2009 - 6:07 pm | सौमित्र

आपल्या विनंतीनुसार फ्लॅग केला. या व्यतिरिक्त अजूनही अनेक असे व्हिडियोज आहेत यूट्यूब वर... आपण ते नियमित फ्लॅग करत राहूच...

पण भारत सरकार समोर खरोखर काही प्रश्न असे आहेत कि ज्यांकडे दुर्लक्श करून चालणार नाही... जसा नक्षलवाद्यांचा प्रश्न... आणखीन कीती वर्षे चालणार हा गोंधळ ? ओरिसा व ईतर ठिकाणी माओवाद्यांचा प्रश्न... आज ना उद्या तो चांगलाच गम्भीर होउ शकतो... या प्रकरणांवर ऊपाय लवकर शोधला गेला पाहीजे... नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वीच १६ महाराष्ट्र पोलिसान्ची हत्या केली होती... ३/४ राज्यांची पोलिस ताकद एकत्र येऊनही यांना मोडून नाही काढू शकत ?
खलिस्तान चा प्रश्न आता तेवढा गम्भीर नाही उरलाय... पन नॉर्थ ईस्ट बॉर्डर चे काय ?

चिरोटा's picture

26 Mar 2009 - 6:54 pm | चिरोटा

३/४ राज्यांची पोलिस ताकद एकत्र येऊनही यांना मोडून नाही काढू शकत ?

जे लोक मरायला तयार आहेत त्याना तुम्ही कसे रोखणार?अफगानिस्तानात अमेरिकेची महाबलाढ्य सेना ६/७ वर्षे आहे .तिकडे काय होत आहे ते आपणास माहित आहेच. हे अतिरेकी/नक्षल्वादी तयार होवु नयेत म्हणुन काय करावे लागेल ह्याचा विचार करावा लागेल्. ह्याचा अर्थ अतिरेक्याना सुटे सोडावे असा नाही पण हे नक्षल्वादी का तयार होतात,नॉर्थ ईस्ट बॉर्डर च्या लोकाना भारतात राहावेसे/मिसळावेसे का वाटत नाही ह्याचा विचार क्वचितच होतो.२० वर्षे झाली,असन्ख्य भारतिय सैनिक मारले गेले,काश्मिरी नागरिक् मारले गेले तरीही काश्मिर प्रश्न सुटत नाही.म्हणजेच कुठेतरी काहितरी चुकते आहे.गडचिरोली/चन्द्रपुर ला बदली म्हणजे पोलिस अधिकार्याना काळ्या पाण्याची शिक्षा वाटते्. हे सरकारने बदलायला हवे.
पोलिस्,सुरक्षा,अत्याधुनिक सामुग्री पाहिजेतच पण वरील मुद्द्यन्चा विचार झाला पाहिजे.

सौमित्र's picture

26 Mar 2009 - 7:48 pm | सौमित्र

ह्याचा अर्थ अतिरेक्याना सुटे सोडावे असा नाही पण हे नक्षल्वादी का तयार होतात,नॉर्थ ईस्ट बॉर्डर च्या लोकाना भारतात राहावेसे/मिसळावेसे का वाटत नाही ह्याचा विचार क्वचितच होतो.

योग्य बोललात. या नक्षलवाद्यांना चर्चेचे निमंत्रण दिले ही जात असेल. पण त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यातल्या कुठ्ल्या मागण्या पूर्ण करण्यासारख्या आहेत, कुठ्ल्या नाही, याचे कुठेच डिस्कशन चाललेले दिसत नाही... नेते या बाबतीत खूप ऊदासीन दिसतात...

चिरोटा's picture

26 Mar 2009 - 8:22 pm | चिरोटा

बर्याच वेळा नक्षल्वादी,अतिरेक्याच्या मागण्या आकलनापलिकडच्या असतात्.अश्यावेळी ह्या लोकान्विरुद्ध जनमत तयार करुन्,दडपण आणून त्याना वठणीवर आणणे महत्वाचे असते.राजकिय नेते वा नोकर्शाही असे प्रश्न सोडवण्यात उदासीन असते.अजुन्पण नक्षल्वादी म्हणजे साधा बिचारा आणि गरिबान्च्या बाजुने लढणारा अशी प्रतिमा बर्याच लोकान्त आहे(ही प्रतिम अन्श्तः च खरी आहे).काश्मिरी दहशत्वाद्यान्ची प्रतिमा आधी तशिच होती.
स्थानीक लोकाना मार्गी लावणे,त्यान्चे मन वळवणे ,मागास भागाचा विकास होइल अश्या योजना आखणे महत्वाचे असते.

सँडी's picture

26 Mar 2009 - 9:38 pm | सँडी

>>मिपाकरांना विनंति की हा video ' inappropriate' अशा flag करावा
आपला उद्देश खुपच चांगला आहे, पण युट्युब कडुन या विनंत्या फार क्वचित मान्य होतात, कारणे त्यांना येणार्‍या प्रचंड विनंत्या, चित्रफिती तील संवादाच पॄथ्:करण करण्यासाठीच मनुष्यबळ आणि संबधित प्रणाली. युट्युब चा स्वतःचा पोर्नोग्राफि, हिंसात्मक इ. विषय सोडुन इतर विषय तत्परतेने हाताळायचा आढमुठेपणा. कदाचित या मुळेच का चीन सरकारने युट्युब वर चीन मध्ये बंदी घातली आहे. (इतरही कारणे आहेतचं)

लेखकाची तळ्मळ समजु शकतो. आम्हा सर्वांच्या मनातही आपल्यासारख्याच भावना आहेत. आपणास विनंती आहे कि त्या युट्युब चे दुवे काढुन टाकावेत.
इथे कृपया गैरसमज होऊ देउ नये, पण अशा हजारो चित्रफिती सध्या युट्युब आहेत. पण अशा चर्चा घडवुन अप्रत्यक्ष पणे आपण या चित्रफितींच्या हिट्स वाढवुन अपलोड करणार्‍या उपर्‍यांना प्रोत्साहन देत असतो. तसेच चित्रफिती त व्यक्त केलेल्या विचारांना अप्रत्यक्षरीत्या प्रसिद्धी मिळते.
आपल्या सर्वांना माहितच आहे की पाकिस्तानी माध्यमांचा भारताविषयी काय रोख आहे/असतो. त्यामुळे अशा कुत्र्याच्या वाकड्या शेपटीवर परीक्षण/संशोधन करण्यात अर्थ नाही.

इथे इतकेच सांगावेसे वाटते कि, नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावीच लागते...
इथे असे होऊ देउ नये, असे मनापासुन वाटते...

मध्ये एका भंगार पाकिस्तानी वृत्तपत्राने भारताचा 'पाकिस्तान'? व्याप्त नकाशा टाकुन कशी प्रसिद्धी मिळविली, हे आपणा सर्वांना माहीत आहेच. भारतीयांच्या कुतुहलाचं भागभांडवल करुनच पकिस्तानी माध्यमे त्यांचे खिसे गरम करत आहे हे ध्यानात घ्यावे.

चित्रफिती इथे टाकल्या म्हणुन विरोध करुन कोणाला नाराज करायचा विचार अजिबात नाहिये...चर्चेला विरोध नाही.
आपणास आवडेल, पटेल त्यानुसार आपण सर्वांनी मिळुन निर्णय घ्यावा... अर्थात कमीत कमी या विषयावर तरी वादविवाद नसावा.

या असल्या भडकाऊ चित्रफिती वा माहिती ला आळा घालण्याच्या उपाययोजना व प्रतिबंध या वर चर्चा व्हावी.

बाकी चालु द्या. निर्णय सर्वस्वी आपला आहे.

प्रसाद लेले's picture

26 Mar 2009 - 9:30 pm | प्रसाद लेले

सेनेविशयि प्रेम असेल नसेल पन साहेबन्विशयि असे बोलने तेहि १ पाक्याने सवाल्च येत नहि ऐकन्याचा.वरिल प्रतिक्रियेने कोनाला त्रास झाला असेल तर क्षमा असवि.पन माझ्या कदे शब्द नाहित दूसरे

सौमित्र's picture

26 Mar 2009 - 9:54 pm | सौमित्र

हो... मलाही असे वाटते की यूट्यूब च्या या लिंक्स कृपया येथुन मिटवाव्यात... सँडी शी सहमत आहे मी.

एक's picture

26 Mar 2009 - 10:17 pm | एक

बाळासाहेबांचा व्हिडीओ आत्ताच फ्लॅग केला.
पण त्या पाकड्या पत्रकाराचा कॉमेडी शो (चारचौघात वापरण्यासाठी हाच शब्द सध्या योग्य वाटतो आहे) अफलातून !

धम्या च्या भाषेत सांगायचं तर "ठ्यॉ" करून कॉफी मॉनिटर वर सांडली.
(" दो बार इंडियन्स को हमने हराया है!... १००० साल तक हमने हुकुमत कि है!..." एवढी चढायला जगातली कुठली दारू या यडपटाने चाखली कुणास ठाऊक.. खास धारावीतली "खोपडी" असेल एकदम फ्रेंच पॉलिश मार के असेल का? :? )

+१ सहमत..

त्याचे नाव झाईद हमिद... माजी तालीबानी.. सध्या एक सिक्युरिटि अनालिस्ट (स्वयंघोशित) म्हणून कार्यरत... फक्त याच चायनेल वर (न्युज वन ) असतो... याची जादा माहीती विकिपेडिया वर आहे.. "न्युज वन" हे "आज तक" सारखे चायनेल आहे असे वाटते...

सुहास

yogeshwar patil's picture

27 Mar 2009 - 11:10 am | yogeshwar patil

मिही केला inappropriate flag.
पण त्या पाकद्याचे तेथील comment वाचुन धक्काच बसला!

सुहास..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

विकास's picture

27 Mar 2009 - 4:35 pm | विकास

मी आज बर्‍याच दिवसांनी वाचायला घेतले त्यामुळे उशीराच हा धागा पाहीला. पाहता क्षणी बाळासाहेबांवरील व्हिडीओ फ्लॅग करायला गेलो तर आश्चर्य! तो काढून टाकल्याचेच समजले!

वर चर्चेत म्हणल्याप्रमाणे हा प्रश्न बाळासाहेब, शिवसेनेचा नाही. असला प्रकार इतर कुठल्याही भारतीय राजकारण्यांच्या संदर्भात झाला असता तरी तेच केले असते/सर्वांनी करावे असे वाटते.

नववर्षाच्या त्यामुळे खास शुभेच्छा!

सौमित्र's picture

27 Mar 2009 - 5:35 pm | सौमित्र

बाळासाहेबांवरचा विवादात्मक व्हिडियो काढला ही खरोखरच चांगली गोष्ट आहे. आता हे आप्ल्या प्रयत्नांने की राजकीय पातळीवरून प्रयत्न केल्याने ते महीत नाही, पण यूट्यूब बद्दलचा आदर वाढला.

विसोबा खेचर's picture

28 Mar 2009 - 11:05 am | विसोबा खेचर

येस्स! व्हिडियो काढला आहे. बरे झाले! :)

हरकाम्या's picture

29 Mar 2009 - 1:17 am | हरकाम्या

मूळातच पाकड्यांच्या ह्या माकड चाळ्यांना आपण आवर घालू शकत नाही . आणि युट्युब काय त्यांना व्यापारापुढे ह्या
फालतु गोष्टींकडे लक्ष द्यावेसे वाटत नाही. त्यामुळे युटयुब वर आपण बहिष्कार घालणे योग्यच . एखादी युट्युबसारखी
भंगार वेबसाइट नाही बघितली तरी काही फरक पडत नाही.