"मिसळपाव" - काही सूचना (अधिक सदस्योपयोगी होण्यासाठी...)

वाचक's picture
वाचक in काथ्याकूट
24 Mar 2009 - 11:00 pm
गाभा: 

नमस्कार सुहृदहो...
माझा बराच वेळ मिपा वाचण्यात जातो. मला खात्री आहे इतरांचा ही जात असणार. त्या वेळाचा जास्तीतजास्त इफेक्टीव्हली वापर व्हावा म्हणून हा काथ्याकूट !
कुठल्याही संकेतस्थळावर, विशेषतः जे नियमित अद्ययावत होत रहाते, त्यावर सर्वात महत्त्वाची माहिती ताबडतोब मिळावी असा उद्देश, प्रयत्न असतो. मिपाही त्याला अपवाद का असावे ? संस्थळावर येणार्‍या वाचकांचे दोन गट - एक नियमित आणि दुसरे (क्वचित किंवा) प्रथमच येणारे. (त्यातही वाचनमात्र असलेले) ह्या दोघांना उपयोगी पडतील अशा गोष्टी मुख्यपॄष्ठावर असाव्यात अशी अपेक्षा.
नियमित वाचक वर्गासाठी
- नविन काय आहे ?
- प्रतिसाद कशाकशाला आहेत ?
(मुख्यपृष्ठावर) नविन काही आहे का ?
- 'खरडवही, कोण कोण आलय ?, लेखन करा' वगैरे सुविधा
- शोध

प्रतिसाद लिहिणार्‍यांसाठी
- प्रतिसाद पटकन लिहिता यायची सोय
- देवनागरी/इंग्रजी भाषा बदलाची सोय

नविन वाचक वर्गासाठी
- ह्या संकेतस्थळाचे उद्दिष्ट
- (नविन) मजकूर काय आहे ?
- वाविप्र
- सभासदत्त्व कसे घ्यायचे, संबंधित नियम

आता एकदा हा विचार झाल्यावर "माझ्या" सूचना बघू. ह्या अर्थातच वैयक्तिक आहेत आणि माझी खात्री आहे इतर सभासदांकडे सुद्धा वेगळ्या पण तितक्याच चांगल्या सूचना असतील.

- टंकलेखन भाषा बदलाची सोय 'संपादकाच्या' अगदी जवळ हवी
- मुख्य मेन्यू (स्वगृह वगैरे) खाली पण दिसावा
- मुख्यपृष्ठाच्या 'मांडणीत' बदल - जेणेकरुन 'सर्व प्रकारच्या' सभासदांना वरती दिलेल्या आणि त्यांना महत्त्वाच्या वाटणार्‍या गोष्टी तात्काल उपलब्ध असतील.
(मी एक छोटासा प्रयत्न केला आहे मुख्यपृष्ठाची मांडणी बदलायचा - पण एकतर ड्रुपल मधे ह्यातले काय शक्य होईल त्यावर मी अजून माहिती गोळा करतो आहे कारण त्याशिवाय काही बोलणे म्हणजे उंटावरुन शेळ्या हाकणे होय आणि त्याबरोबरच मला इतर सभासदांची/मालकांची/चालकांची विचार प्रक्रिया 'प्रभावित' करायची नाहीये. सर्वांनी स्वतंत्रपणे विचार करुन उपाय सुचवावेत अशी नम्र विनंती)

कळावे - लोभ आहेच - तो वाढावा ही विनंती.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

25 Mar 2009 - 12:40 am | विसोबा खेचर

वाचकराव,

मिपाबद्दल आपुलकीने काही सूचना केल्याबद्दल मनापासून धन्यवाद..

आपल्या सूचनांबद्दल नीलकांतच्या कानावर घालतो..

तात्या.

अडाणि's picture

25 Mar 2009 - 2:21 am | अडाणि

असे दिसते की काही धागे सर्वांना बघायची मुभा नसते. मुख्यपानावरून धाग्यावर टीचकी मारली की कळते हा धागा बघायची आपल्याला मुभा नाही... मिपा सारख्या लोकाभिमुख संकेतस्थळावर हा प्रकार बरोबर वाटत नाही. कुठलाही लेख, काव्य, कौल हे वाचायला सर्वांना मुभा हवी.
काही लेख लिहीलेला आहे आणि आपल्याला तो बघायची परवानगी नाही, हे पाहून काही निवडक लोकांची कंपूबाजी चालू आहे ही भावना दृढ होते.

-
अफाट जगातील एक अडाणि.

घाटावरचे भट's picture

25 Mar 2009 - 2:51 am | घाटावरचे भट

काही लेख लिहीलेला आहे आणि आपल्याला तो बघायची परवानगी नाही, हे पाहून काही निवडक लोकांची कंपूबाजी चालू आहे ही भावना दृढ होते.

ती संपादकांची कंपूबाजी असते ;). असे लेख संपादकांद्वारे अप्रकाशित करण्यात आलेले असतात. म्हणून आपल्याला ते लेख बघायची मुभा नसते.

छोटा डॉन's picture

25 Mar 2009 - 6:58 am | छोटा डॉन

>>ती संपादकांची कंपूबाजी असते . असे लेख संपादकांद्वारे अप्रकाशित करण्यात आलेले असतात.
=)) =)) =))
खल्लास ऽऽऽ , जहबहर्‍या हो भटोबा ...!!!

अडाणीसाहेब, त्याचे असे आहे काही काही वेळा धाग्यात काहितरी "सणसणीत, जळजळीत आणि आक्षेपार्ह्य" गोष्टी लिहलेल्या असतात की ज्या एकतर मिपाच्या धोरणात बसत नाहीत अथवा त्यामुळे एखाद्या समुदायाची ( कंपुची नव्हे ;) ) भावना दुखावली जाते अथवा तो वैयक्तीक मजकुर असतो अथवा कुणाला तरी हाणायचेच म्हणुन आणि भांडणे पेटवावीत म्हणुन लिहलेले लिखाण असते ...
मग अनावश्यक वाद टाळुन मिपाच्या धोरणाचे पालन करत मिपावरील शांतता कायम ठेवण्यासाठी "संपादक" लोक हे धागे "अप्रकाशित" करतात ...
त्यात ते ठराविक लोकांनाच वाचता येतात असे काही नाही ...
इथे "प्रायव्हेट" नावाची गोष्ट अस्तित्वात नाही तेव्हा गैरसमज नसावा ...

पण त्या धाग्याची लिंक मात्र "मुखपॄष्ठावर" काही कारणाने रहात आहे, नीलकांत बघ रे बाबा लोक काय म्हणतात ते ;)

अवांतर :
१. मी संपादक नाही अथवा संपादकांच्या कंपुत ( असल्यास ! ) नाही ...
२. भटोबा बहुदा आमच्या कंपुत असावेत असा अंदाज आहे.
३. आमचा कसलाही आणि कोणताही कंपु नाही ;)

------
( संपादकांच्या (नसलेल्या) कंपुतला) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

अवलिया's picture

25 Mar 2009 - 9:10 am | अवलिया

खल्लास ऽऽऽ , जहबहर्‍या हो भटोबा ...!!!

+++++१

=))

कोणताही आणि कसलाही कंपु नसलेल्या कंपुत आम्ही आहोत.

--अवलिया

दशानन's picture

25 Mar 2009 - 9:16 am | दशानन

घाशीराम कोतवाल १.२'s picture

25 Mar 2009 - 10:07 am | घाशीराम कोतवाल १.२

आम्ही सुध्दा आहोत
फक्त एक सुचना जर तो धागा अप्रकाशित झाला असेल तर त्याची सर्व ठिकाणा वरुन हकालपट्टी व्हावी तो कोठुन ही
नजरेस पडु नये
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

परिकथेतील राजकुमार's picture

25 Mar 2009 - 10:30 am | परिकथेतील राजकुमार

ज ह ब र्‍या मि. भट.
पानाच्या तळाला सुद्धा 'स्वगृही' जायची सोय असावी ह्याच्याशी सहमत. बर्‍याचदा एखादा मोठा लेख आणी त्याखालील प्रतिक्रीया वाचल्यावर पुन्हा खुप वरपर्यंत स्क्रोल करावे लागते.

(बॅक बटन न वापरणारा आळशी)
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

हे मला महिती नव्हते त्यामुळे गैरसमज झाला. सांगितल्याबद्दल धन्यवाद. असा धागा दिसलाच नाही तर उत्तम होइल.
-
अफाट जगातील एक अडाणि.

चतुरंग's picture

28 Mar 2009 - 12:06 am | चतुरंग

'संपू' असा एक शब्द मला सुचलाय! ;)

(खुद के साथ बातां : इस 'घाटावरचे भट' को 'संपू के घाट उतार' देना चाहिये! ;) )

चतुरंग

नितिन थत्ते's picture

25 Mar 2009 - 1:58 pm | नितिन थत्ते

५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्यावर दुसर्या पानावर जातात. तेव्हा पुढील पानांवर जायची लिंक प्रतिसादांच्या वरही असली तर उत्तम अशी सूचना व्य. नि. ने केली होती. येथे परत करीत आहे.
खराटा
(रंग माझा वेगळा)

हेरंब's picture

26 Mar 2009 - 11:35 am | हेरंब

आपली व्यक्तिगत ओळख असली (अगदी एका ग्लासातले असलात तरी), तरी ती इथे प्रतिक्रिया लिहिताना दाखवू नये. अशी अतिसलगीयुक्त भाषा वापरल्यामुळेच कित्येकांना कंपूबाजीचा संशय येतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Mar 2009 - 11:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो हेरंबकाका, कॉलेजच्या कट्ट्यावर अशीच सलगी होणार, गप्पा होणार आणि ते लपवता येणार नाही. सलगी आणि कंपूबाजी यांच्यात प्रचंड फरक आहे; आणि कोणालातरी तो समजत नाही म्हणून लोकांनी आपली सलगी बासनात गुंडाळून ठेवावी हे कसं जमणार?

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

मराठी_माणूस's picture

26 Mar 2009 - 12:24 pm | मराठी_माणूस

पन्नास पेक्षा जास्त प्रतीसाद असतील तर त्यानंतर आलेल्या प्रतीसादात नविन कोणते आहेत ते समजत नाहीत

(मी हि एका सन्स्थळाचा सन्चालक आहे, म्हणुन अनुभवावरुन)(It is an international forum( www.edulix.com ) for prospective grad students-feel free to remove link if any objections)
1. I am guessing, the activation system is manual? For my account took 4 days to get activated. Looking at a future, with a huge no. of registered users we can go for automatic registration. (It will save lot of time of our admins and won't frustrate people who are registering.

2. We should put some "contact us" link for non registered users. I wanted to contact but couldn't. (Thanks to MuktaSunit I could forward my message to admins. )

3. I feel we should disable 'comment on comments' tab, and introduce, popularize quote feature. It is very difficult to track who has replied where.
Regards,
Nile.

विसोबा खेचर's picture

28 Mar 2009 - 7:16 am | विसोबा खेचर

नीलराव,

आपल्या मौलिक सूचनांबद्दल आभारी आहे! :)

तात्या.

नितिन थत्ते's picture

28 Mar 2009 - 11:03 am | नितिन थत्ते

ए फॉर ऍपल हा शब्द आपण मराठीत अ वर चंद्र काढून लिहितो. तसा लिहिता येत नाही. कदाचित ड्रूपलचा किंवा युनिकोडचा प्रॉब्लेम असेल. पण ते जरा विचित्र दिसते. तसेच जोडाक्षरातले दुसरे अक्षर ल असेल तर ते जोडाक्षर एकावर एक असे जुन्या मराठी पद्धतीने उमटते. काही करता येईल का?
(शुद्धलेखनाला फाट्यावर न मारणारा) खराटा

भाग्यश्री's picture

28 Mar 2009 - 12:56 pm | भाग्यश्री

मायबोलीवर अलिकडेच त्या ऍ चा प्रॉब्लेम सुटला आहे.. आता अ वर चंद्र दिसतो तिथे नीट.. तेव्हा ते करता येणं शक्य असावं..