तर या देशात कायदा आणि सुव्यव्स्तेची हामी कोणी द्यायाही

राहुल सरकार's picture
राहुल सरकार in काथ्याकूट
24 Mar 2009 - 4:46 pm
गाभा: 

IPL ला सुरक्षा देण्याचा विषय सध्या गाजतोय काहिच्या मते हे राजकारण आहे
पण देशामधे सरकार सुरक्षेची हमी देत नाही हे गंभीर बाब आहे. election म्हणजे काय युद्ध नव्हे.
१) युधाची परिस्तिती अतिरेक्यानी निर्माण केली आहे अशी कबुलीच सरकार ने दिली नाही काय?
२) केंद्र सरकार आणी राज्य सरकार सुरक्षेची हमी द्यायला तयार नाहीत तर कायदा आणि सुरक्षेची हमी कोणी द्यायची?
३) खर सांगायची तर अशी सुरक्षा मागायची व द्यायची वेळ येते यातच कायदा व्यवस्था मोद्लीये असे नाही वाटत काय ?

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

24 Mar 2009 - 5:03 pm | मराठी_माणूस

IPL ला एव्हढे महत्व देण्याचे काहीही कारण नाही. मुठभर पैसे वाल्यांच्या मिजाशी साठी संपुर्ण देशाला वेठीला का धरायचे ?

चिरोटा's picture

24 Mar 2009 - 5:08 pm | चिरोटा

IPL ला उगाच डोक्यावर चढवुन ठेवले आहे.निवडणुक जास्त महत्वाची(जरी आपण भ्रश्ट्,उनाड लोकाना निवडुन देणार असलो तरी).

संदीप चित्रे's picture

25 Mar 2009 - 11:36 pm | संदीप चित्रे

बीसीसीआय सारख्या मुजोर संस्थेसाठी देशाला वेठीला धरू नये.
मी स्वतः क्रिकेटचा चाहता आहे पण शेवटी देशाची निवडणूक जास्त महत्वात (जरी त्यातून काहीही निष्पन्न होत असलं तरी)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

हरकाम्या's picture

24 Mar 2009 - 5:08 pm | हरकाम्या

आय. पी. एल. आणि सुरक्षा हा विषय तसा चर्चेला घेण्याचा विषय नाही. वास्तविक हे सामने म्हणजे महत्वाची बाब नाही.
निवड्णुका या महत्वाच्या आहेत. ह्या टुकार मालक लोकांनी विकत घेतलेले खेळाडू ( बोली लावून लिलाव केलेले बोकड )
ह्यांच्या टकरी ह्या निवडणुकांपेक्षा महत्वाच्या आहेत का ? मुळीच नाहीत. ह्या टकरी दर वर्षि लावुन हे तथाकथित मालक
मालामाल होऊ इछितात. देशाच्या निवडणुकांपेक्षा ह्या टुकार लोकांना महत्व द्यायचे का ? मुळीच नाही.
सरकारने घेतलेली भुमिका अतिशय योग्य आहे. ह्या टुकार लोकांना ह्या टकरी कुठे ही लावु देत. आणि यांना
सुरक्षा दिली नाही म्हणुन देशाची नाचक्की होत नाही. लोकांना आपले काहिही काम न करणारे खासदार निवडायचेत.
ह्या टकरी काय दरवर्षि होतच राहणार. खासदार थोडेच दरवर्षि निवडता येतात.?

छोटा डॉन's picture

24 Mar 2009 - 5:22 pm | छोटा डॉन

हरकाम्याशेठ, अगदी उत्तम प्रतिसाद ...
आपल्याशी १००% सहमत ...

प्रतिसाद आवडला व आपल्या मताचे कौतुक वाटले.

------
(सहमत)छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Mar 2009 - 5:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हरकाम्या आणि डॉन यांच्याशी सहमत.

थोडं अवांतरः धागा आणि प्रतिसादातली "लाघवी" भाषा पाहून अंमळ अवांतर लिहावसं वाटलं.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

अवलिया's picture

24 Mar 2009 - 10:20 pm | अवलिया

सहमत

--अवलिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

24 Mar 2009 - 5:08 pm | घाशीराम कोतवाल १.२

कसल आयपील कसल्या निवडनुका ह्या देशात सामन्य माणुस सुरक्षीत नाहि त्याच काय
रोज दंगे बॉम्ब् स्फोट अतिरेकि हल्ले होतात मी तर म्हणतो मी निवडनुकाना पण फारसे महत्व देत नाहि
साला काय फायदा एक चोर जाणार दुसरा खुर्ची वर बसनार

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सौमित्र's picture

24 Mar 2009 - 8:57 pm | सौमित्र

मी तर म्हणतो मी निवडनुकाना पण फारसे महत्व देत नाहि
-----------------------------------------------------------------------
भाषणबाजी वाटेल कदाचित, पण मी आपल्या या मताशी सहमत नाही.... मतदानाचा हक्क हा खरोखर कीती मोलाचा आहे ! आपण भारतीय आणी विशेषतः मराठी माणूस या बाबत खूप च ऊदासीन आहे असे मला वाटते... याचे परीणाम हळूहळू दिसू लागले आहेत. मुंबई हातातून बर् यापैकी निसटली आहे. ऊद्या पुणे जाईल... माग्च्या निवडणूकीत पेट्रोलियम मंत्री राम नाईक गोविंदा कडून हरले होते !!! का हो !!!

मला सांगा, महाराष्ट्रात एकही चांगला नेता नाही का ? नक्कीच आहेत... पण निवडून कोण येतात ? खरोखर सांगा, सध्याच्या राजकारणी मंडळींपैकी कोण अभिमान वाट्ण्यासारखे आहेत ? ही आपलीच चूक आहे, की आपण त्यांना निव्डून येण्यात मदत करतो, मते न देता...

आज मुंबई पनवेल भागाची हालत खूप नाजूक वाटते... पनवेल - दादर च्या बसमध्ये किती भैय्या लोक भरभरून असतात ! ऊद्या ती सगळी एखाद्या भैय्यासाठी च मत देणार... आणी आपण जुनेच तुणतुणे वाजवणार...

स्वामि's picture

24 Mar 2009 - 9:13 pm | स्वामि

शरद नावाच्या पवारांचं एखाद्या गोष्टीकडे लक्ष गेलं,की तिचा विचका झालाच म्हणुन समजा.आधीच जतीयवादाने महाराष्ट्र पोख्ररुन ठेवला,बिचारी मुलं २०-२० जिंकून आली तर त्यांना कोपर्यात बसवून स्वतःचे फोटो काढून घेतले,आता लोकांच्या जिवाची पर्वा न करता एन निवडणुकीच्या तोंडावर आय.पी.एल.घ्यायला निघाले होते.काय म्हणावं ह्या आपमतलबी माणसाला!

रामपुरी's picture

25 Mar 2009 - 2:56 am | रामपुरी

घाणेरडा राजकारणी म्हणावं.

धिंगाणा's picture

25 Mar 2009 - 6:52 pm | धिंगाणा

पण निवडणुका द. आफ्रिकेत नेल्या तर!!