खाजाच्या करंज्या

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
20 Mar 2009 - 2:43 pm

पेठकरांनी दिलेल्या कातील करंज्या पाहून मला खाजाच्या करंज्यांची आठवण झाली.

साहित्य-
आवरणासाठी:
१ वाटी रवा, १वाटी मैदा, दूध, ५,६ मोठे चमचे साजूक तूप, २ ,३ चमचे तांदळाची पिठी/कॉर्नफ्लोअर
सारणासाठी:
१ नारळ,२ वाट्या साखर, वेलचीपूड,२ चमचे बदाम/काजू पावडर,मूठभर बदाम,पिस्ते इ.चे तुकडे,बेदाणे
( ४,५ चमचे गुलकंद वेलचीऐवजी घातला तरी वेगळा,सुंदर स्वाद येतो.)
खवा हवा असल्यास अर्धी वाटी खवा घेऊन भाजून घ्यावा आणि अर्धी वाटी साखर जास्त घ्यावी.
तळणीसाठी :
तूप अथवा रिफाइंड तेल

कृती-
सारण :
नारळ खवून,साखर व खोबरे एकत्र करुन शिजवून घ्यावे. शिजत आल्यावर बदामपावडर , बदाम,पिस्ते, इ. चे तुकडे व बेदाणे घालावेत. वेलचीपूड घालावी अथवा गुलकंद घालावा.
खवा घालायचा असल्यास भाजलेला खवा सारण शिजत आल्यावर घालावा.
आवरण :
एका ताटात तूप फेसावे व ते हलके झाले की तांदळाची पिठी/कॉर्नफ्लोअर घालून अजून फेसावे व गोळा तयार करुन वाडग्यात काढून ठेवावा.
रवा व मैदा एकत्र करुन दुधात भिजवून तासभर ठेवावा ,नंतर तुपाचा हात लावून चांगले कुटून हलका करावा. नेहमीच्या पोळीपेक्षा थोडी जाड पोळी लाटून काट्याने किवा सुरीने तिला टोचे मारावेत. पोळीवर तांदळाची तुपात फेसलेली पिठी लावून घट्ट गुंडाळी करावी. त्याचे साधारण इंचभराचे तुकडे करावेत. तुकडा दोन्ही बाजूनी पिरगाळून त्याची लाटी करावी .ती पुरीप्रमाणे लाटून सारण भरावे आणि करंजी कातावी. अशा सर्व करंज्या कराव्यात. झालेल्या करंज्या ओलसर फडक्याखाली झाकून ठेवाव्यात म्हणजे वाळणार नाहीत.
मंद आचेवर करंज्या तळाव्यात.

प्रतिक्रिया

सहज's picture

20 Mar 2009 - 2:49 pm | सहज

वा वा! तिखट करंजी मग ही गोड करंजी.

सहीच!

श्रावण मोडक's picture

20 Mar 2009 - 3:26 pm | श्रावण मोडक

एक तर करंज्या मस्तच. त्यात पुन्हा वेलचीऐवजी गुलकंदाचा प्रयोग ही कल्पना तोंडून एकदम अहाहा हे शब्द उमटवून गेली.

लिखाळ's picture

20 Mar 2009 - 6:10 pm | लिखाळ

एकदम सहमत ! गुलकंदाची कल्पना एकदम मस्त :)

तूप फेसायचे म्हणजे काय करायचे?
-- लिखाळ.

दशानन's picture

20 Mar 2009 - 6:15 pm | दशानन

हेच म्हणतो.

छान रेसेपी. अरे कोणी आहे का तयार करुन मला पाठवणारं ह्या जगात ;)

>>तूप फेसायचे म्हणजे काय करायचे?

फेशीयल सारखं वापरायचं असेल बहूतेक =))

परिकथेतील राजकुमार's picture

20 Mar 2009 - 7:20 pm | परिकथेतील राजकुमार

छान रेसेपी. अरे कोणी आहे का तयार करुन मला पाठवणारं ह्या जगात
आजकाल घरी मिपावर आलेली नविन रेसिपी सांगितली की राजमाता वस्स्कन अंगावर ओरडतात आणी म्हणतात 'येव्हडी हौस आहे ना मग आता घेउन या बायको आणी सांगा तीला करायला. आम्हाला पण बसल्याजागी गरमा गरम खायला मिळेल."

पुन्हा अशा पाकृ देउन आमच्या घरच्या भांडणाचे कारण बनु नये हि विनंती

हुकुमावरुन
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

स्वाती दिनेश's picture

20 Mar 2009 - 6:38 pm | स्वाती दिनेश

एखाद्या ताटात किवा परातीत तूप घेऊन हाताने फेटायचे, केकसाठी चमच्याने किवा ब्लेंडरने फेटतो ना तसेच..
राजे, कुठे फेशिअल कुठे फेसणे..कै च्या कै..:)
स्वाती

लिखाळ's picture

20 Mar 2009 - 6:43 pm | लिखाळ

समजले.. धन्यवाद :)
-- लिखाळ.

नंदन's picture

21 Mar 2009 - 3:09 am | नंदन

अगदी असेच म्हणतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सँडी's picture

20 Mar 2009 - 3:57 pm | सँडी

दिवाळीची आठ्वण झाली!

विसोबा खेचर's picture

20 Mar 2009 - 5:17 pm | विसोबा खेचर

काय बोलू? काय लिहू?! :)

तात्या.

नन्या's picture

20 Mar 2009 - 5:29 pm | नन्या

स्वाती ताई
वीकान्तचा पदाथे दील्याबद्दल आपले आभार.

चकली's picture

20 Mar 2009 - 5:30 pm | चकली

करंज्या छान आहेत.

चकली
http://chakali.blogspot.com

स्वाती राजेश's picture

20 Mar 2009 - 5:52 pm | स्वाती राजेश

मस्त आहे रेसिपी....फोटो सुद्धा झकास..
गोडाबाई(गोड पदार्थ आवडणारी) आहेस का? सगळे गोड गोड पदार्थांची रेसिपीस लिहित आहेस म्हणून महटले. :)
मस्त दिवाळीची आठवण करून दिलीस....

रेवती's picture

20 Mar 2009 - 6:14 pm | रेवती

खाजाच्या करंज्या मस्तच!
तात्यांना असं वाटतं की पाकृबरोबर फोटूही असावा.
फक्त तुझ्यासाठी बीनफोटूच्या पाकृचा नियम करायला हवा.
अगं, असे फोटू दिल्यावर कराव्याश्या वाटतात करंज्या.;)

रेवती

प्राजु's picture

20 Mar 2009 - 7:11 pm | प्राजु

तांदळाची पिठी लावल्यामुले त्याला खाज्याच्या करंज्या म्हणतात का?
मी आज पर्यंत अशी पिठी लावून कधि नाही केल्या. त्याने जास्ती खुसखुशीतपणा येत असावा.
रेवती ,तू कधी करणार आहेस?? नाही म्हणजे तेव्हाच मॅस ची ट्रीप काढू. ;)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

20 Mar 2009 - 7:33 pm | रेवती

अगं, आपलं ठरतय ना?
तेंव्हाच करते की!
शितल वाचतीयेस ना?

रेवती

शितल's picture

20 Mar 2009 - 7:16 pm | शितल

स्वाती ताई,
फोटो आणि पाककृती मस्तच. मी ह्या करंज्या करताना आवरणाची पोळी लाटुन घेऊन त्यावर खुप तुप लावुन मग पिठी पेरते आणी रोल करून मग गोळे करते आणि ते लाटते. आवरण एकदम खुशखुशीत होते. :)

प्राजु's picture

20 Mar 2009 - 8:50 pm | प्राजु

आधीच गोंधळ... त्यात या करंज्या.. त्यात माझे प्रयोग.. आणि त्यात एक स्वातीताईची पाकृ आणि एक शितलचा प्रयोग..!! झाऽऽलं!!! नवर्‍याचं आणि लेकाचं अवघड आहे(माझ्या).
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

20 Mar 2009 - 11:04 pm | शितल

>>नवर्‍याचं आणि लेकाचं अवघड आहे(माझ्या).
=))

शाल्मली's picture

20 Mar 2009 - 8:50 pm | शाल्मली

स्वातीताई,
करंज्या काय मस्त दिसताहेत!!
आणि पाकृ. पण मस्तच.

--शाल्मली.

चतुरंग's picture

20 Mar 2009 - 9:23 pm | चतुरंग

स्वातीताई, का असा छळ मांडलाय?काय बिघडवलं आहे मी? मी तर पाकृची विडंबनंसुद्धा करत नाही! :S
अहाहा काय ती कृती? काय तो मंद आचेवर तळलेल्या करंज्यांचा फोटू? (माझा जीव मंद आचेवर जळवताय तुम्ही! ~X( )
छ्या! आजपासून जर्मनी माझा नावडता देश झालाय!! [(

चतुरंग

समिधा's picture

20 Mar 2009 - 11:01 pm | समिधा

स्वातीताई मस्त आहेत ह्या करंज्या,गुलकंद घालुन खुप छान लागतिल.

प्रिया८'s picture

21 Mar 2009 - 1:16 am | प्रिया८

स्वाती,
रेसिपी आणी करंज्या दोन्ही एकदम खुसखुशीत!!:)
झक्कास!!

दिपाली पाटिल's picture

21 Mar 2009 - 2:05 am | दिपाली पाटिल

या पुडा च्या करंज्या आहेत का?? मला पुडाच्या करंज्यां ची कॄति हवी आहे. कॄपया फोटो सोबत देता आला तर....

चित्रादेव's picture

21 Mar 2009 - 5:58 am | चित्रादेव

पाठारे प्रभु अश्याच दुधीहलवा घालून बनवतात हो अन बेक करतात. :) ह. घ्या.
पण खव्याच्या करंज्या मस्तच!

स्वाती दिनेश's picture

21 Mar 2009 - 6:15 pm | स्वाती दिनेश

खवय्यांनो,धन्यवाद.
चित्रादेव,दुधीहलव्याच्या बेक्ड करंज्या खाल्ल्या आहेत,सही लागतात.
प्राजु,शीतल,रेवती.. कधी करताय बेत?
चतुरंग, जर्मनी एवढी नावडती व्हायला नको. रेवती करणार आहे लवकरच करंज्या,:)
दिपाली, पुडाच्या करंज्या म्हणजे काय ते मला माहित नाहीत. पुडाच्या वड्या माहिती आहेत.
स्वाती (राजेश), अग.. गोडाबाई नाहीये मी,गोड,तिखट सगळंच आवडतं(हाच तर प्रॉब्लेम आहे ;))
तात्या,काही बोलू आणि लिहू नको.पुढचं विमान पकडून करंज्या खायला ये.,:)
लिखाळ, समजले ना फेसायचे म्हणजे काय ते? शाल्मली, आता करंज्यांचा बेत कधी?
प.रा, राजमातांना त्रास द्यायचा नसेल तर त्यांचे म्हणणे ऐकाचे,:)
चकलीला करंजी आवडली हे ऐकून मजा वाटली. :)
सहज,श्रावण मोडक, राजे,नंदन,नन्या,सँडी,प्रिया८,समिधा,
सर्वांना धन्यवाद.

रेवती's picture

14 Apr 2009 - 4:39 am | रेवती

स्वातीताई,
करंज्या केल्या होत्या.
त्याचा फोटो चढवतीये.

रेवती

प्राजु's picture

14 Apr 2009 - 6:00 am | प्राजु

आम्ही हादडल्याच हादडल्या. :)
रेवती, अथर्वला खूप आवडल्या करंज्या. शहाण्याने खेळण्याच्या नादात तुझ्या इथे खाल्ल्याच नाहीत मात्र घरी तू दिलेल्या करंज्या अगदी आवडीने खाल्ल्या. पुन्हा कधी जायचं मुकुलकडे करंज्या खायला विचारत होता.
मी विचार करत होते आपण कराव्यात घरी... पण नको त्या पिझ्झ्यासारखा प्रकार व्हायचा. 8|
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

14 Apr 2009 - 5:15 pm | स्वाती दिनेश

रेवती,मस्त दिसताहेत ग अगदी..
प्राजु नुसतं काय सांगतेस करंज्या हादडल्या ते? तुम्ही सगळे जमला होतात त्याचा वृतांत लिवा की कोणीतरी..:)
स्वाती