दोन सूचना

शक्तिमान's picture
शक्तिमान in काथ्याकूट
19 Mar 2009 - 11:30 pm
गाभा: 

मिपा सं.स्थळाबाबत मला दोन प्रेमळ सूचना करायच्या आहेत....

१. मिपावरील लेखसूची मधील लेखांचा क्रम हा प्रतिक्रियेप्रमाणे ठरतो. ज्या लेखावर काहीच वेळापूर्वी प्रतिक्रिया आली आहे.. तो लेख सर्वात वर येतो. ही व्यवस्था चांगली आहे.
यात अधिक भर म्हणून 'सॉर्ट लेख बाय नंबर ऑफ रीप्लायज्' (प्रतिसाद-संख्याअनुक्रमे लेखक्रम लावणे) असा पर्याय पुरवता येईल का?
म्हणजे ज्या लेखावर (साहित्यप्रकारावर) सर्वात जास्त प्रतिक्रिया असतील तो सर्वात वर येईल. यामुळे जुने उत्तम लिखाण शोधणे सोपे जाईल....

२. बर्‍याचदा असे आढळते की लेखाची वाचने ५०० च्या वर जातात पण लेखावर प्रतिसाद ५-६च असतात. यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे प्रतिक्रिया लिहिण्याचा कंटाळा... (पुरावा: कुठ्ल्याही कौलाला १०-१५ मतं नक्कीच मिळतात.. कारण एका क्लिकमध्ये मत नोंदवता येते.. पण प्रतिक्रियेचे तसे नाही.) यावर उपाय म्हणून प्रत्येक लेखावर (कवितेवर..इ.) 'लेख आवडला ' अशा स्वरूपाचे बटण्/लिंक पुरवता येईल का? एखाद्याला लेख आवडला तर तो त्यावर क्लिक करून तसे दर्शवू शकतो. एका सदस्याला एकदाच क्लिक करता येईल.
म्हणजे मग आपण जशी वाचन संख्या दाखवतो तसेच लेख आवडणार्‍यांची संख्याही दाखवता येईल. याची पुढची पायरी म्हणजे १ ते ५ अशी रेटींगची व्यवस्थाही करता येईल (जसे यूट्युब व्हिडीयोज् ला असते. ). आणि मग यावरही सॉर्टींग चा पर्याय दिला तर उत्तमोत्तम लेखन झट्क्यात सापडवता येईल.. तसेच प्रतिक्रिया न आल्याने लेखक नाराज होणार नाहीत..

मला वाटते की यामुळे मिपा सं.स्थळ वाचकांसाठी अजून सहज-सोपे होईल.

यावर या सं.स्थळचालकांचे/तज्ञांचे/मिपाप्रेमींचे काय विचार आहेत?

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

20 Mar 2009 - 1:17 am | संदीप चित्रे

अर्थात संपादकमंडळाने निर्णय घ्यायचा आहे पण सूचना नक्कीच आवडल्या.

गणा मास्तर's picture

20 Mar 2009 - 7:32 am | गणा मास्तर

चोखोबाशी एक कोटी टक्के सहमत.
एका ओळीचे चर्चाप्रस्ताव, निरर्थक कौल, उबगवाणी विडंबने यामुळे रसभंग होतो.
आणि आपण शक्यतो पहिल्या पानावरचेच लेख वाचतो. त्यामुळे वर फार चांगले साहित्य नसेल तर उबग येतो.
हौसेने एखाद दुवा उघडावा आणि टुकार काहितरी नजरेस पडावे यापेक्षा दुर्दैव ते काय?
तरी हल्ली तात्यांनी मिपाचे त्यांच्या लेखणीने मुखपृष्ठ सुंदर केले आहे.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

पक्या's picture

20 Mar 2009 - 1:08 pm | पक्या

>>एका ओळीचे चर्चाप्रस्ताव, निरर्थक कौल, उबगवाणी विडंबने यामुळे रसभंग होतो.
अगदी बरोबर्..त्यातही गेल्या काही दिवसात सतत येणार्‍या विडंबनांनी फारच उबग आणला होता.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

20 Mar 2009 - 10:00 am | घाशीराम कोतवाल १.२

सुचना चांगली आहे बघु या काय होत ते!!!

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

प्रकाश घाटपांडे's picture

20 Mar 2009 - 10:23 am | प्रकाश घाटपांडे

हा प्रस्ताव वजा सुचना चांगल्या आहेत. माझ्या मते मिपाच्या प्रकृतीला साजेशा मधला मार्ग शोधला पाहिजे. सर्वमान्य तोडगा कधीच असणार नाही. बागेच्या सुदृढ वाढी साठी माळी देखील छाटणी करतोच ना?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विसुनाना's picture

20 Mar 2009 - 10:29 am | विसुनाना

प्रस्तावकर्ता, चोखोबा आणि प्रकाश घाटपांडे यांना अनुमोदन.

चिरोटा's picture

20 Mar 2009 - 11:18 am | चिरोटा

एखाद्याला लेख आवडला तर तो त्यावर क्लिक करून तसे दर्शवू शकतो. एका सदस्याला एकदाच क्लिक करता येईल.
म्हणजे मग आपण जशी वाचन संख्या दाखवतो तसेच लेख आवडणार्‍यांची संख्याही दाखवता येईल

इतर काही वेब्साइट्स वर सदस्य आपापला घोळका तयार करतात्.मग 'तू माझा लेख चान्गला म्हण्,मी तुझा लेख चान्गला म्हणतो' असले प्रकार चालु होतात्.किन्वा एखाद्या सदस्याचे विचार पटत नसल्यास 'त्याची प्रत्येकवेळी मारायचीच' या इर्षने काही घोळके पेटतात.'मिसळपाव'वर हे होणार नाही अशी अपेक्षा करुया.

राघव's picture

20 Mar 2009 - 11:44 am | राघव

तसे बटन्स असावेत की नाही याबद्दल मतभेद राहणारच. मला स्वतःला बटन्स नसलेलेच आवडेल. हां, रेटींग आणि प्रतिक्रीया/प्रतिसाद दोन्ही असलेत तर सॉर्टींग ला आणिक एक पर्याय तयार होऊ शकेल. त्यातही काही घोळ असणारच पण तो एक चांगला पर्याय असेल.

एक सूचना आणखी मांडाविशी वाटते -
एखाद्या धाग्यावर प्रतिसाद जास्त झालेत की पुढील व मागील अशी पानं उघडायला लागतात. त्याऐवजी जर ते एकाच पानावर असले तर चालणार नाही का? वाटचाल, नवीन लेखन अशा धाग्यात पुढील/मागील पाने असायलाच हवीत. पण एखाद्या लेखात जर एकच पान असले तर योग्य ठरेल असे वाटते. अर्थात मला काही तांत्रिक बाबी माहित नाहीत. पण वाटले ते मांडले. :)

राघव

जागु's picture

20 Mar 2009 - 12:04 pm | जागु

तुमच्या सुचना खरच खुप आवडल्या. त्यावर अंमल व्ह्यायला हवा.

ठकू's picture

20 Mar 2009 - 12:30 pm | ठकू

स्तुत्य!

विसोबा खेचर's picture

20 Mar 2009 - 2:24 pm | विसोबा खेचर

आपुलकीने केलेल्या सूचनांबद्दल आभारी आहे. इष्ट आणि व्यवहार्य सूचनांचा अवश्य विचार केला जाईल..

तात्या,