वर्षाॠतूच्या आगमनाने राघूही आनंदले आहेत व ही आनंदाची बातमी वनात सर्वांना देण्यासाठी ते घिरट्या मारीत आहेत. झाडेदेखील अतिशय आनंदली आहेत व पक्षांप्रामाणेच त्यांच्याही अंगाखांद्यांवरून पावसाच्या सरी ओघळत आहेत.
पावसाचा इतका वर्षाव झाला आहे की नद्याही सागर भासु लागल्या आहेत. माझ्याही मनाला प्रियकराच्या भेटीची ओढ लागली आहे व या डोंगरवाटा जणु माझ्या मनाचे गुपित ओळखून माझ्या सर्व वाटा वेढून मला माझ्या प्रियकराच्या दिशेने नेत आहेत.
वर्षाॠतूचा ही किमया की पिकांचा मंद सुगंध मला केशाराच्या सुगंधप्रमाणे वाटते आहे. त्या सुवासने मी धुंद असतानाच माझ्यावर माझ्या प्रियकराच्या प्रेमाचा वर्षाव झाला आहे, माझा प्रियकर जणू घन होऊनच मला बिलगला आहे.
प्रतिक्रिया
19 Mar 2009 - 5:11 pm | ठकू

19 Mar 2009 - 5:19 pm | राजा
हे अस आहे काय !
धन्यवाद.
19 Mar 2009 - 5:44 pm | ठकू
अगदी असंच आहे असं नाही हो, राजाभाऊ. मी आपला अल्पमतीने अर्थ लावण्याचा प्रयत्न केलाय.
-ठकू
19 Mar 2009 - 6:20 pm | राजा
अहो हे तरि काय कमि आहे का !
19 Mar 2009 - 10:46 pm | क्रान्ति
छान भावार्थ लिहिलाय. कवितेइत्काच उत्कट!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
20 Mar 2009 - 5:45 pm | अजय देशपांडे
या गाण्याचे चाल छान आहे