कोण कुणास्तव जगतो मरतो, कोण कुणास्तव सतत कष्टतो

निखिलचं शाईपेन's picture
निखिलचं शाईपेन in काथ्याकूट
16 Mar 2009 - 10:09 pm
गाभा: 

शिर्षकगीत हवे आहे : साळसूद (दिलीप प्रभावळकर) मालिकेचे "कोण कुणास्तव जगतो मरतो, कोण कुणास्तव सतत कष्टतो......"
ओळी किंवा म्पी३

प्रतिक्रिया

शिवापा's picture

17 Mar 2009 - 12:32 am | शिवापा

कोण कुणास्तव जगतो मरतो
कोण कुणास्तव सतत कष्टतो
माणुसकीचा गहिवर येतो
जेव्हा ज्याला जिथे सोयिचे
जगात नसते कुणि कुणाचे

मला तरी एवढेच माहित आहे.

अवांतर :- गर्लफ्रेंडसना ब्लॅकमेल करण्यासाठी फार वेळा म्हटलेय!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Mar 2009 - 10:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोण कुणास्तव जगतो मरतो
कोण कुणास्तव सतत कष्टतो
माणुसकीचा गहिवर येतो
जेव्हा ज्याला जिथे सोयिचे
जगात नसते कुणी कुणाचे

युगे युगे ही प्रथा चालते
निकषांवर नाते उरते
बलवंतांचे खपून जाते
उजाड जीवन हो दुबळ्यांचे
जगात नसते कुणी कुणाचे

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

शोधा म्हणजे सापडेल.

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

सौमित्र's picture

17 Mar 2009 - 5:59 pm | सौमित्र

साळ्सूद..... खूप च सुन्दर अभिनय दिलिप प्रभावळ्करान्चा ....
मी लहानपणी त्यान्च्या मालिकेत्ल्या पात्राची खूप हूबेहूब नक्कल करायचो...
दात पुढे काढून , हातात छत्री , काळा कोट, चश्मा आणी हाताच्या मूठीतून अन्गठा आणी करन्गळी बाहेर काढून तो टिपिकल टोन....

भडकमकर मास्तर's picture

18 Mar 2009 - 1:04 am | भडकमकर मास्तर

दात पुढे काढून , हातात छत्री , काळा कोट, चश्मा
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/